Wednesday, 5 February 2025

लिंग समभावासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारताना येणाऱ्या आव्हानांवर 6 फेब्रुवारी रोजी चर्चासत्र

 लिंग समभावासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारताना

 येणाऱ्या आव्हानांवर 6 फेब्रुवारी रोजी चर्चासत्र

 

मुंबई, दि. ४ लिंगसमभावासाठी संस्थात्मक यंत्रण उभारताना येणारी आव्हानेअडथळे व कार्यपद्धती बाबत ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

बिजिंग परिषदेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जगातील सर्व देशांनी व राज्यांनी स्वीकृत केलेल्या कृती कार्यक्रमाला अनुसरून कृती कार्यक्रमांचा आढावा कमिशन ऑन स्टेटस ऑफ वूमन कडून संयुक्त राष्ट्रसंघ, न्यूयॉर्क येथे मार्च २०२५ मध्ये घेतला जाणार आहे. या पार्श्वभुमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात महिला व मुलींचे आरोग्य व प्रजननविषयक हक्कहिलाविरोधी हिंसाचार प्रतिबंध करण्यासाठी स्थायी कार्यपद्धतीलिंग समभाव वाढविण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने तसेच लोकसहभागातून संस्थात्मक कार्यप्रणाली उभारणी, नागरी भागातील रोजगारग्रामीण भागात रोजगार हमी योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण यावर यावेळी चर्चा होणार आहे.

०००

इकिगाई Ikigai*

 *इकिगाई Ikigai*


बऱ्याच वेळा माणसाला निवृत्त झाल्यावर काय करावे असा प्रश्न पडतो. काहीजण म्हणतात, आता बरीच वर्षे नोकरी, कामधंदा केला, आता जरा आराम करायचा ठरवलं आहे. .तर काहींना चैन पडत नाही नुसतं घरी बसून. मग काहीतरी उद्योग शोधून काढतात, TV बघत वेळ घालवतात,पत्ते, रमी खेळतात, भिशी join करतात….असे बरेच निरनिराळे विचार प्रवाह आपण ऐकतो. जपानी माणसाला मात्र निवृत्ती/रिटायरमेंट हा शब्दच माहिती नसतो. जपानी कल्चरमधे रिटायरमेंट ही संकल्पनाच नाही. या विषयी बरंच ऐकलं होतं आणि मध्यंतरी याच विषयासंबंधात" Ikigai "नावच पुस्तक वाचनात आलं. Hector Garcia व Francese Mirallesया दोघांनी हे पुस्तक लिहिले आहे.


इकिगाई ही एक जपानी concept आहे, ज्याचा अर्थ आहे "a reason for being" जगण्याचे कारण. तुम्ही सकाळी उठल्यावर कोणत्या कारणाने/विचाराने जागे होता, काहीतरी करण्याचे मनात घेऊन जागे होता, तेंव्हा ते तुमच्या हातून पुढे घडते. तुमची इकिगाई सापडवण्याचे मिशन हे प्रत्येक ओकिनावा(जपान मधील एक बेट) मधील जपानी माणसाचं जगण्याचं इंधन असते. एकदा का ती तुम्हाला मिळाली की धैर्याने, प्रयत्न पुर्वक तुम्हाला योग्य मार्गावर राहता येते. अर्थात हे जगण्याचे तत्व प्राचीन आहे.ते हाईयन( Heian  ) काळातील आहे. अशी ही Ikigai आहे तरी काय हे बघू.


हे एका Venn diagram ने सांगता येईल. ४ निरनिराळी वर्तुळे एकमेकांना छेदतात. ह्या चारही वर्तुळांचा सहभाग असलेली जागा म्हणजे तुमची इकिगाई. ही चार वर्तुळे म्हणजे


1.   जी गोष्ट मनापासून करायला तुम्हाला आवडते (what you love) passion

2.   ज्या गोष्टीत तुम्हाला गती आहे (what are you good at) profession

3.   ज्याची जगाला आवश्यकता/उपयोग आहे (what the world needs ) mission

4.   ज्या पासून तुम्हाला अर्थार्जन होऊ शकते (what you can be paid for) vocation


iki म्हणजे life किंवा जगणे. gai म्हणजे value किंवा कारण. काहीही करा पण निवृत्त होऊ नका, हे या मागचे मुख्य तत्व.


या चार गोष्टी ज्यात common असतील ती तुमची इकिगाई. ओकिनावा मधील प्रत्येक जपानी माणसाला त्याची इकिगाई माहिती असते, त्याने ती चिंतन, मनन करून शोधून काढलेली असते. त्यानुसार तो आयुष्यभर जगत असतो अर्थात काही नियम पाळून.


तुमची स्वतः ची इकिगाई शोधून काढण्यासाठी, मला कोणत्या चार गोष्टी करायला आवडतात ते तुम्ही लिहून काढा. मग कोणत्या चार गोष्टीत मला गती आहे किंवा करता येतात, किंवा माझ्याकडे कोणती स्किल्स आहेत हे लिहून काढा. मग जगाला कोणत्या गोष्टीची जरुरी आहे व या पैकी कोणत्या गोष्टींना जग पैसे देण्यास तयार आहे, हे लिहून काढले की या चारीमध्ये जे काही समान असेल ती तुमची इकिगाई. एकदा का ती तुम्हाला गवसली की तुमचा मार्ग सुकर होतो.


Dan Buettner नावाचे नॅशनल जॉग्रफिकचे फेलो व न्यूयॉर्क टाइम्सचे लोकप्रिय लेखक, Educator, Explorer आहेत. त्या लेखकाने जगातील असे पाच भाग शोधून काढले की तेथील लोकं दीर्घायुषी पण आनंदी जीवन जगतात. वयाची शंभरी गाठणे याचे कोणालाच आश्चर्य वाटत नाही. ते पाच भाग खालील प्रमाणे आहेत.

1.   Okinawa - जपान

2.   Sardinia - इटली

3.   Nicoya - कोस्टा रीका

4.   Icaria - ग्रीस

5.   Loma Linda -कॅलिफोर्नीया


या पाच भागांवर त्यांनी ‘Blue Zones' असे एक पुस्तक लिहिले आहे. दीर्घायुष्यावर अभ्यास करून त्यांनी काही आश्चर्यकारक गोष्टी शोधून काढल्या. 2012 मध्ये त्यांनी जगभर प्रवास केला. जगातील काही भागातील लोकं इतर जगभरातील लोकांपेक्षा दीर्घायुषी का असतात या भेडसावणाऱ्या प्रश्नाचे सर्वच डॉक्टर व तत्वज्ञाते विचार करत होते. त्यावेळी काही प्रवाशांनी त्यांना ग्रीस, निकरागुवा, जपान अशा ठिकाणी नेले. त्या अभ्यासातून त्यांनी अमेरिकेत परत येऊन “The Blue Zones Solution” असे पुस्तक लिहिले.

अशा या जगभरातील 'ब्लू झोन्स' मधील लोकं निरनिराळ्या भूप्रदेशातील असून त्यांच्यात 8 ते 9 समान घटक आढळले, जे त्या लोकांच्या दीर्घायुषी, आनंदी राहणीमानाशी निगडित आहेत. मानववंशशास्त्राचे अभ्यासक, लोकसंख्या शास्त्रज्ञ, साथीच्या रोगांचे वैद्यकीय विशेषज्ञ अशा टीमने सर्व पुरावे गोळा केले व त्यातून समान संप्रदायातील पुरावे घेऊन खालील 8-9 घटक त्यांच्यात समान असल्याचे सांगितले. या पाचही भागातील लोकांना स्वतःची इकिगाई सापडवण्याची सवय असते.


बऱ्याचदा असे होते, की जीवनात तुम्हाला एखादी गोष्ट करायला खूप आवडत असते, त्यात गती देखील असते व ती गोष्ट तुम्ही बऱ्याच वेळा लहानपणी केलेलेही असते. पण कुटुंबातील काही प्राधान्यामुळे म्हणा किंवा त्या त्या वेळेची निकड वेगळी असल्याने, बरेच वर्ष ती तुम्ही केलेली नसते व त्यामुळे ती गोष्ट आपल्याला करायला येते, हेच मागे पडलेले असते. इतके, की ती गोष्ट मनातूनही निघून जाते पण हुरहूर मात्र उरते आणि कशाची हुरहूर आहे ते मात्र कळत नाही.

हे शोधून काढण्यासाठी तुम्ही चार तास घ्या, एक दिवस घ्या, हवं तर महिना घ्या पण शोधून काढा. थोडा वेळ वाया गेला तरी चालेल. .....आत्तापर्यंत तुम्ही जर नुसते बसलेले असाल तर तुमचा असाही वेळ वायाच जात होता तेंव्हा तुम्हाला काय करायला येतं, तुम्हाला कशाची आवड आहे, अशी कुठली गोष्ट आहे, की जी जगाला उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठी जगात तुम्हाला मान मिळेल किंवा अर्थार्जन होऊ शकेल, अशी ही इकिगाई शोधून काढणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. केवळ असा आहार करा, तसा व्यायाम करा वगैरे सांगण्यात अर्थ नाही, तर पहिल्यांदा तुमची इकिगाई काय आहे, तुमचे goal काय हे तुम्हाला माहित असायला हवे.


जसे एखाद्या बाईला खूप छान स्वयंपाक येत असेल, तिच्या हाताला छान चव आहे, परंतु मधल्या काही वर्षात तिला असा छान छान स्वयंपाक करायला वेळच मिळाला नसेल, ती पूर्णतः विसरून गेलेली असेल, की तिला हे, हे पदार्थ छान जमतात. तर आता छान चविष्ट पदार्थ करणे तिची इकिगाई असू शकते. ती जेथे राहत असेल तेथे ती हे पदार्थ करून देऊ शकते, मुलं छोटी आहेत, नोकरीवर जायचे आहे अशा गृहिणीला याचा उपयोगही होऊ शकतो.


ओकिनावा बेटावरील एका 65 वर्षाच्या आनाआजीला आत्तापर्यंत मुलं, नोकरी, यात गुरफटल्यामुळे विणकाम करायला वेळच झालेला नसतो. लहानपणापासून तिला खूप वेगवेगळ्या डिझाईनचे स्वेटर, जॅकेट विणायची खूप हौस होती, आवडही होती व गतीही होती. नोकरीतून रिटायर झाल्यावर ती छोटे स्वेटर, मफलर यांच्या ऑर्डर्स घेऊ लागली. नवनवीन रंगसंगतीची डिझाइन्स करू लागली. moai ग्रुपमधे तिला खूप ऑर्डर्स मिळू लागल्या. वेळ कसा घालवायचा असा प्रश्नच तिला पडला नाही. तिची इकिगाई तिला सापडली.


प्रत्येक माणसाकडे असे काहींनाकाही कौशल्य असतेच. पण ते माणूस विसरून गेलेला असतो. आणि त्याला उगीचंच वाटत असते, की आपण खितपत पडलो आहोत. पण तुमची इकिगाई तुम्ही एकदा का शोधून काढली, की तुमचा पुढचा मार्ग सुकर होतो.


रिटायर झाल्यावर कोणाची भजनाचा क्लास घेण्याची, तर कोणाची योगासने शिकवण्याची इकिगाई होऊ शकते. त्यातून थोडे अर्थार्जन पण होते आणि आदरपूर्वक म्हातारपण जगता येते.


ही तुमची इकिगाई बदलूही शकते. वयाच्या पन्नाशीमध्ये असलेली इकिगाई, साठीमध्ये वेगळी असू शकते. तसेच भौगोलिक परिस्थितीप्रमाणेही इकिगाई बदलू शकते. वरील चारही घटकांपैकी पहिले दोन घटक शक्यतो कायम राहतात. म्हणजेच मला काय करायला आवडते व मला कशात गती आहे हे घटक स्थिर राहिले, तरी शेवटचे दोन, म्हणजे, जगात कशाची आवश्यकता आहे आणि लोकं कशासाठी पैसे अथवा आदर देण्यास तयार आहेत हे जागेप्रमाणे, काळाप्रमाणे बदलू शकते.


कोणाची गणित किंवा फिजिक्स शिकवण्याची आवड तिची इकिगाई बनू शकते. त्यातून जगाला असलेली गरज भागवणे आणि अर्थार्जन किंवा त्यातून मिळणारा आनंद, आदर या गोष्टी तिला आयुष्यभर उपयोगी पडतात. एखाद्या विद्यार्थ्याने मार्क मिळाल्यावर व्यक्त केलेला आनंद, स्मितहास्य यामूळे तिची जगण्याची उमेद वाढते.


अर्थार्जन हे नेहमी पैशांच्या स्वरूपातच असणे अभिप्रेत असते असे नाही, तर तुम्हाला lecture देण्यासाठी एखाद्या ग्रुपमध्ये बोलावणे, आदर देणे, तुमच्यातील कलेला प्रोत्साहन मिळणे, या स्वरूपातही pay/अर्थार्जन असा अर्थ अभिप्रेत आहे.


इकिगाईत आहार-विहारासंबंधी ही काही तत्वे पाळली जातात. तसेच व्यायाम, सामाजिकदृष्ट्या कसे एकत्र राहता येते याबद्दलही विस्ताराने विचार केलेला आहे.

🙏🙏🙏🙏

भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर 🚑


 🩺 भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर 🚑 


वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग क्रमांक ७, शिवसेना विभागप्रमुख श्री. कुणालजी सरमळकर आणि महिला विभागप्रमुख श्रीमती भक्ती भोसले यांच्या पुढाकाराने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 


📅 दिनांक – बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५

⏰ वेळ – सकाळी १०:०० ते दुपारी ३:००

📍 स्थळ – कलावती आई मंदिर**, इमारत क्र. ७ समोर, शासकीय वसाहत, ज्ञानेश्वर नगर जवळ, वांद्रे (पूर्व)  


🏥 शिबिरामध्ये मिळणाऱ्या सुविधा:

✔️ ECG तपासणी  

✔️ बीपी व सुगर तपासणी

✔️ हृदयरोग तपासणी 

 ✔️ जनरल तपासणी


🔹 आपले आरोग्य, आपली जबाबदारी!

🔹 शिवसेना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!


#ShivSena #ArogyaShibir #HealthcareForAll #BandraEast #PublicWelfare

🩺 भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर 🚑 

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग क्रमांक ७, शिवसेना विभागप्रमुख श्री. कुणालजी सरमळकर आणि महिला विभागप्रमुख श्रीमती भक्ती भोसले यांच्या पुढाकाराने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

📅 दिनांक – बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५
⏰ वेळ – सकाळी १०:०० ते दुपारी ३:००
📍 स्थळ – कलावती आई मंदिर**, इमारत क्र. ७ समोर, शासकीय वसाहत, ज्ञानेश्वर नगर जवळ, वांद्रे (पूर्व)  

🏥 शिबिरामध्ये मिळणाऱ्या सुविधा:
✔️ ECG तपासणी  
✔️ बीपी व सुगर तपासणी
✔️ हृदयरोग तपासणी 
 ✔️ जनरल तपासणी

🔹 आपले आरोग्य, आपली जबाबदारी!
🔹 शिवसेना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!

#ShivSena #ArogyaShibir #HealthcareForAll #BandraEast #PublicWelfare


महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करावा

 महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करावा

- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि.4 : महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने विविध उत्पादनाला व शेतकऱ्यांच्या कृषी मालाला विक्रीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करून त्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. ड्रोनव्दारे औषध फवारणीसाठी प्रत्येक गावात ड्रोनची उपलब्धता करणेशेतीमाल विक्रीसाठी निर्यात माल केंद्र उभारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करावी असे निर्देश कृषीमंत्री  ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

            मंत्रालयात महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीमहाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले,कृषी विभागाचे संचालक सुनिल बोरकर यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

            कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की,महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने शेतक-यांना रास्त भावात उपलब्ध होणारे उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना परवडेल असा त्याचा दर असावा याची काळजी घ्यावी. खतेकिटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना त्यांचा दर बाजारातील दरापेक्षा अधिक नसावा. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषि माल त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाच्या उत्पादित उत्पादनांसाठी ई कॉमर्स विभागाचे मार्केटींग करावे. ड्रोनव्दारे शेतीमध्ये औषध फवारणी करताना अत्यल्पअल्प व जास्त जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल असे पहावे. ड्रोन प्रत्येक गावात उपलब्ध होण्यासाठी विविध सामाजिक उत्तरदायित्व मध्ये सहभागी संस्थाराज्य शासनकेंद्र शासन यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी कार्यवाही करावी. रायगड जिल्ह्यात रसायनी (ता.पनवेल) येथे कृषी निर्यात क्षेत्र उभारणी साठीचा प्रस्ताव शासनाला सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

**

रागडमधील विकासकामांचा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 रागडमधील विकासकामांचा 

मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 

मुंबई दि. ४ : आदगाव समुद्रकिनारी पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण करण्याबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर नाममात्र दरात ग्रामपंचायतीने देखभाल दुरूस्तीचे काम करावे असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिले.

आदगाव बीचश्रीवर्धनसी.डी. देशमुख जैव विविधता प्रकल्प जामगावश्रीवर्धन परिसरातील नगरपरिषदनगरपंचायत मधील नगरविकास विभागातील प्रलंबित विषयप्रादेशिक परिवहन क्षेत्र माणगाव येथे ब्रेक टेस्ट ट्रेक करणेसंदर्भातील कामांचा आढावा मंत्री कु. तटकरे यांनी मंत्रालयात घेतला.

 बैठकीत माजी आमदार अनिकेत तटकरेरोहाचे मुख्य अधिकारी अजयकुमार एडकेश्रीवर्धनचे मुख्य अधिकारी विराज लबडेमेरिटाईम बोर्डचे अभियंता श्री. देवरेउपविभागीय अभियंता तुषार लुंगेसहायक अभियंता सोनिया महंदश्रीवर्धनचे प्रांत अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीआदगाव येथील अस्तित्वातील दगडी बंधाऱ्याच्या पृष्ठभागाचे काँक्रिटीकरण करून त्यावर मत्स्यजेट्टीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या प्रक्रियेस गती द्यावी. श्रीवर्धन मधील नगरपरिषदमधील प्रलंबित कामांसाठी निधी वितरीत करण्याची प्रक्रिया राबवावी. घनकचरा व्यवस्थापन करुन पर्यावरण व शहराची स्वच्छता राखण्यासाठी रोहा नगरपरिषदेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. रोहा वन विभागातील मौजे जामगांव येथे विकसित करावयाच्या डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधतावन व वनस्पती उद्यान अंतर्गत कामांना गती देण्याच्या सूचनाही मंत्री कु.तटकरे यांनी दिल्या.

०००

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा

सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पनाडिझाईन याबरोबरच

टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई दि. 4 : राज्यातील उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्णप्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पनाजाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पनाडिझाईन आणि टॅगलाईन स्पर्धेच्या प्रवेशिका स्पर्धकांनी दिनांक ५ ते १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने पाठवाव्या. स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांचे परीक्षण करून २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिनी’ विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येतील. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

उपयोजित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून क्रिएटिव्ह संकल्पनाडिझाईन तसेच उत्कृष्ट टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. डिजिटल डिझाइन मध्ये पोस्टर्ससोशल मीडिया क्रिएटिव्हबॅनर्सइन्फोग्राफिक्स तसेच प्रिंट डिझाइनमध्ये पोस्टर्सफ्लायर्सब्रोशर्सबॅनर्सस्टॅण्डीज अशा स्वरूपाची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी खुली असून सहभागी होणाऱ्यास वेगवेगळ्या स्पर्धांसाठी एकूण 3 प्रवेशिका पाठविता येतील.

विजेत्यांना मिळणार ही बक्षीसे -

प्रथम पारितोषक विजेता (१) - २५ हजार रुपये

द्वितीय पारितोषक विजेता (१) - १५ हजार रुपये

तृतीय पारितोषक विजेता (१) - १० हजार तसेच

उत्तेजनार्थ म्हणून एकूण १५ स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार याप्रमाणे एकूण १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

असे आहेत स्पर्धेचे विषय -

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणनगरविकाससार्वजनिक बांधकाममेट्रोपरिवहन सांस्कृतिक कार्यमराठी भाषापर्यटनराजशिष्टाचारमृद व जलसंधारणजलसंपदा व लाभक्षेत्र विकासशालेय शिक्षणउच्च शिक्षणकौशल्य विकाससार्वजनिक आरोग्यवैद्यकीय शिक्षणगृहराज्य उत्पादन शुल्कविधी व न्यायकामगारसामाजिक न्यायआदिवासी विकासदिव्यांग कल्याणइतर मागास व बहुजन कल्याणवनेपर्यावरण व वातावरणीय बदलऊर्जापाणी पुरवठा व स्वच्छतारोजगार हमी योजनामहिला व बालविकासक्रीडा व युवक कल्याणअन्न व नागरी पुरवठाअन्न व औषध प्रशासनसामान्य प्रशासन/वित्त व नियोजन/ माहिती व तंत्रज्ञानकृषि/सहकार/पणनवस्त्रोद्योगपशुसंवर्धन/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय/फलोत्पादनमहसूलमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन.

अशा आहेत स्पर्धेच्या अटी व शर्ती -

सादरीकरणे मूळ आणि सहभागी स्पर्धकांनी स्वत:ने तयार केलेली असावी. सादरीकरण कोणत्याही कॉपीराइट किंवा बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करणारी नसावीत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला सादर केलेली कोणतीही रचनात्मक सामग्री प्रचारविपणनकिंवा प्रकाशन उद्देशाने वापरण्याचा अधिकार महासंचालनालयाला असेल. अंतिम निर्णय महासंचालनालयाचा असेल. विजेते ईमेलद्वारे सूचित केले जातील आणि अधिकृत मंचावर जाहीर केले जातील. कोणतीही कॉपीराइट सामग्री वापरली जाऊ नये. असभ्य भाषा/आक्षेपार्ह शब्द/हिंसात्मक भाषा वापरण्यास बंदी असून राज्य शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सहभागींनी महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे माहितीपट सादर करणे आवश्यक आहे. डिजिटलसाठी JPEG/PNG/PDF (प्रिंट डिझाइनसाठी किमान 300 dpi रिझोल्यूशन) असणे आवश्यक आहे. तर व्हिडिओसाठी एचडी असल्यास HD 1280 X 720 पिक्सेल तसेच फुल एचडी असल्यास 1920 x 1080 पिक्सेल असणे आवश्यक आहे. पोस्टर्स: A3 आकार (297 x 420 मिमी). सोशल मीडिया क्रिएटिव्ह: 1080 x 1080 पिक्सेलफ्लायर्स/ब्रॉशर्स: A4 आकार (210 x 297 मिमी) स्वरुपात असणे आवश्यक आहे.

असे आहेत स्पर्धेचे निकष...

जाहिरात किती अनोखी आणि कल्पक आहे. ती इतरांपासून वेगळी आहे कासंकल्पना ताज्या आणि नाविन्यपूर्ण आहेत का हे परीक्षकांकडून तपासण्यात येतील. जाहिरात नवीन विचार किंवा पद्धतीवर तसेच रचनात्मक पद्धतीने सादर करण्यात आली आहे का हे पाहण्यात येईल. जाहिरात प्रेक्षकांवर कोणता भावनिक किंवा मानसिक प्रतिसाद निर्माण करते. ती लक्ष वेधून घेते काप्रभावशाली प्रतिक्रिया निर्माण करते काकिंवा समज बदलते का?याचा विचार यावेळी होईल. जाहिरातीचे सौंदर्यशास्त्र. ती दृश्यात्मकदृष्ट्या आकर्षक आहे का?, मांडणी नीटनेटकी आहे का?, आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवते का हे पाहण्यात येईल. जाहिरातमधील लिखित सामग्रीची गुणवत्ता. भाषा स्पष्टआकर्षक आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवणारी आहे का हे तपासण्यात येईल. जाहिरात निवडलेल्या माध्यमाचा (जसे की टीव्हीप्रिंटडिजिटल इ.) कसा वापर करते. ते प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे वापरले जाते काज्यामुळे जास्तीत जास्त रिच आणि प्रभावशाली होते का हे पाहण्यात येईल. सर्जनशीलताथीमशी सुसंगततासंदेशाची स्पष्टतादृश्य प्रभावमौलिकता यावर निर्णय घेण्यात येईल. या स्पर्धांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा निर्णय अंतिम राहिल.

याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

0000

ही निवृत्तीनंतरच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी ३६ शिफारसींची यादी आहे. एका नामांकित कंपनीच्या HR विभागाने हा संदेश प्रसारित केला आहे.

 ही निवृत्तीनंतरच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी ३६ शिफारसींची यादी आहे. एका नामांकित कंपनीच्या HR विभागाने हा संदेश प्रसारित केला आहे.


1. एकटे प्रवास टाळा.



2. जोडीदारासोबत प्रवास करा.



3. गर्दीच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.



4. अतिव्यायाम किंवा जास्त चालणे टाळा.



5. अति वाचन, मोबाईल वापर किंवा टीव्ही पाहणे टाळा.



6. औषधांचे अति सेवन टाळा.



7. वेळेवर डॉक्टरांना भेटा आणि नियमित औषधे घ्या.



8. निवृत्तीनंतर मालमत्ता व्यवहार टाळा.



9. ओळखपत्र आणि महत्त्वाचे फोन नंबर नेहमी सोबत ठेवा.



10. भूतकाळ विसरा आणि भविष्याची जास्त चिंता करू नका.



11. आपल्या तब्येतीस अनुकूल आहार घ्या आणि सावकाश चावून खा.



12. बाथरूम आणि टॉयलेटमध्ये काळजी घ्या.



13. धूम्रपान आणि मद्यपान टाळा, ते हानिकारक आहेत.



14. स्वतःच्या यशाची बढाई मारू नका.



15. निवृत्तीनंतर काही वर्षे भरपूर प्रवास करा, नंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.



16. इतरांसोबत आपल्या संपत्तीविषयी चर्चा करू नका.



17. आपल्या क्षमतेनुसार आणि आरोग्यानुसार व्यायाम करा.



18. उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असल्यास शीर्षासन व कपालभाती टाळा.



19. सकारात्मक राहा आणि अति भावना टाळा.



20. जेवल्यानंतर लगेच झोपू नका.



21. इतरांना पैसे उधार देऊ नका.



22. नवीन पिढीला विनाकारण सल्ले देऊ नका.



23. इतरांच्या वेळेचा आदर करा.



24. गरज नसताना जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नका.



25. रात्री चांगली झोप मिळण्यासाठी दुपारी झोप टाळा.



26. स्वतःची खासगी जागा ठेवा आणि इतरांच्या गोपनीयतेचा सन्मान करा.



27. मृत्यूपत्र तयार करा आणि जोडीदाराशी चर्चा करा.



28. निवृत्ती बचत पुढच्या पिढीला देण्यापेक्षा ती सुरक्षित ठेवा.



29. ज्येष्ठ नागरिक गटात सामील व्हा, पण वाद टाळा.



30. झोप येत नसेल तर इतरांना त्रास देऊ नका.



31. झाडांवरून फुले तोडू नका.



32. राजकारणावर चर्चा टाळा किंवा वेगवेगळ्या मतांचा स्वीकार करा.



33. सतत आरोग्याच्या तक्रारी करू नका.



34. जोडीदाराशी भांडण टाळा, ते तुमचे मुख्य आधार आहेत.



35. आध्यात्मिक कार्यक्रमांना हजेरी लावा, पण आंधळे अनुकरण करू नका.



36. हास्य आणि आनंदासह तणावमुक्त जीवन जगा.




भारतीय राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेने (National Senior Citizens' Welfare Association of India) शेअर केलेला हा संदेश अतिशय उपयुक्त आहे. कृपया तो समजून घ्या आणि शक्य तितका आचरणात आणा.

Featured post

Lakshvedhi