Wednesday, 18 December 2024

जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व ‘जीएसटी’ बाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा

 जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व

‘जीएसटी’ बाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा

 

नागपूरदि. 18 : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर 2024 च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु.तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये  अधिकाऱ्यांकडून जीएसटीबाबत सविस्तर आढावा घेतला.

          या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्माविक्रीकर सह आयुक्त किरण शिंदेविक्रीकर उपायुक्त नंदकुमार दिघे आदी उपस्थित होते.

          यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी यापूर्वी झालेल्या ‘जीएसटी’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने सुचविलेल्या सुधारणानव्याने सुचवावयाच्या सुधारणाकरांमध्ये विविध उद्योगघटक यांना द्यावयाची सूट तसेच कररचनेमध्ये सुलभता आणि करदात्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असण्याबाबतची माहिती घेतली. इलेक्ट्रीक वाहनेविमा हप्तेकृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांना करांमध्ये सूट देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काही क्षेत्रांमध्ये करावयाची करकपात आणि करवाढत्यामुळे महसुलामध्ये येणारा फरक याची माहितीही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी घेतली.

          जैसलमेर येथे दि. 20 व 21 डिसेंबर 2024 असे दोन दिवस ही जीएसटी परिषद होणार आहे. तसेच या परिषदेवेळी अर्थसंकल्पाविषयीही बैठक होणार आहे. यामध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षांची चर्चा करण्यात येणार आहे. याविषयीही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

नागपूरदि. 18 : मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी  प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहररायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदलजेएनपीटीतटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढाअसे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले. 

          एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळेमुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.

००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे अभिनंदन समीक्षा क्षेत्रातील व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे अभिनंदन

समीक्षा क्षेत्रातील व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान

 

नागपूरदि. 18 :  साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहेअशा शब्दात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय साहित्य संस्थेच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात डॉ रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतातडॉ रसाळ यांचे मराठी साहित्य विश्वातील योगदान अमुल्य असे आहे. मराठी भाषेचे अध्यापनसंशोधनसंपादन आणि समीक्षा असा त्यांचा चौफेर विहार राहीला आहे. विशेषतः त्यांचे मराठी काव्यविषयक संशोधनात्मक लेखन मौलिक असे आहे. समीक्षेतून कठीण विषय सहज-सुलभपणे समजावून देणारी त्यांची शैली नवोदितांना आश्वासक वाटतेयातच त्यांचे मोठेपण आहे. मराठी भाषा जतनसंवर्धन तसेच साहित्य विषयक चळवळीतील संस्थासमित्यांवरही डॉ रसाळ सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांच्या समीक्षात्मक लेखनाला राष्ट्रीयस्तरावर मिळालेली ही दाद नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. रसाळ आजही तितक्याच तडफेने लेखनसंशोधनात कार्यरत आहेत. त्यांच्या हातून यापुढेही मराठी साहित्याची अशीच अखंडित सेवा घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्यदीर्घायुष्य लाभो या शुभेच्छांसह मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. रसाळ यांचे अभिनंदन केले आहे.

००००

वर्ष 2017 ते 2020 पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकरमागण्यांशी संबंधीत

 वर्ष 2017 ते 2020 पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकरमागण्यांशी संबंधीत


व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू ; 30 मार्च अंतिम मुदत


- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती


 


मुंबई, दि. 18 :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 विधेयकातील कलम 73 अंतर्गत वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किेंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना (Amnesty Scheme) राज्यात लागू करण्यात आली असून 31 मार्च 2025 ही देय कर रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होणार असल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केले.


 


या अभय योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांकडून साधारण एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित आहेत. विवादित रक्कम 54 हजार कोटी रुपयांची आहे. त्यापैकी विवादीत कर 27 हजार कोटी रुपयांचा दंड तसेच शास्तीची रक्कम 27 हजार कोटी रुपयांची आहे. यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादीत कराच्या सुमारे 20 टक्के रक्कम योजनेमध्ये जमा होते. त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे 5 हजार 500 कोटी ते 6 हजार कोटी रुपये विवादीत कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. यापैकी अर्धी रक्क्म म्हणजे 2 हजार 700 कोटी ते 3 हजार कोटी रुपये राज्य शासनास मिळतील व उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडे जमा होईल. या योजनेमुळे व्यापाऱ्यांना सुमारे 5 हजार500 ते 6 हजार कोटी रुपयांच्या व्याज व दंडातून दिलासा मिळेल. या अभय योजनेची माहिती करदात्यांना, वकीलांना, चार्टर्ड अकाऊंटंट, नागरिकांना होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार

 गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी

दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. 18 : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व  दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत.  त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल असे,  निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीबोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू ११ जानेवारी, २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू

 ११ जानेवारी, २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई दि.18: भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता दि.23 डिसेंबर, 2024 ते 11 जानेवारी, 2025 या कालावधीत प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वरूपात करावे, असे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ग. ल. तरतरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

अर्ज करण्यासाठी www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://doaonline. Co.in/LDMIC/ या लिंकवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

संगीत महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता व उपयुक्तता उत्कृष्ट दर्जाची राखण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या सल्लागार मंडळावरती अध्यक्ष म्हणून उषा मंगेशकर, सदस्य म्हणून सुरेश वाडकर, आदिनाथ मंगेशकर तर मयुरेश पै समन्वयक म्हणून आणि कला संचालनालयाचे संचालक संतोष क्षीरसागर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

महाविद्यालयात शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम,  भारतीय बासरी वादन, तबला वादन , सतार वादन, पियानो/कीबोर्ड प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच संगीत निर्मिती व ध्वनी अभियांत्रिकी प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 25 प्रवेश क्षमता आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असून वार्षिक शुल्क 5400 रुपये इतके आहे. तसेच सलिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिने कालावधीसाठी शनिवार - रविवार या दिवशी भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून वीस हजार रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई येथे फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात येतील. प्रवेश प्रक्रिया तसेच ऑडिशन बाबत पुढील माहिती  www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याने उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

0000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

 

नागपूरदि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आ. एस. चहलपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिवप्रधान सचिव तसेच गृह विभागपोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभागमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा)आपले सरकारमहाराष्ट्र राज्य पोलीसबृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळमहाराष्ट्र शासनमोटार वाहन विभागलाचलुचपत प्रतिबंधक विभागसरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीकेंद्रीय अन्वेषण ब्युरोपोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर) पुणेगुन्हे अन्वेषण विभाग पुणेमहाराष्ट्र सुरक्षा दलमुंबई वाहतूक पोलीएनजेडीजी राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिडदेशाच्या सेवेत भारतीय पोलीसराष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टलई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

0000


Featured post

Lakshvedhi