Tuesday, 17 December 2024

विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबर रोजी

 विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबर रोजी

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

नागपूरदि. 17 (शिबिर कार्यालय) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.


महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

 महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

 

नागपूरदि. 17 - राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले.        विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धनसंरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठीगोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.  

          राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. 'गो टेनअंतर्गत गो संगोपनगो संवर्धनगो संरक्षणगोमय मूल्यवर्धनगोशाळागोरक्षकगोपालकगो आधारीत शेतीगो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.

          आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धनसंरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळागोसदनपांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणीगोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे,  पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणेदुर्बलवयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापनकाळजी व उपचार यांची सुनिश्चितीपशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी मुख्य सचिव सुजाता सौनिकगोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसलेडॉ. नितीन मार्कंडेयउद्धव नेरकरसुनील सूर्यवंशीसनत कुमार गुप्तादीपक भगत आदी उपस्थित होते.

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार;

 महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार;


नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ ला चालना मिळाल्यामुळे

नागपूर शहरासह परिसराचा अधिक गतीने विकास होणार


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


नागपूर, दि. १७ : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्यासंदर्भातील करार करण्यात आला. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.


नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे.


यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, विविध विभागांचे सचिव, आशियाई विकास बँकेचे विविध विषयतज्ज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक (एसपी) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आदी उपस्थित होते.


0000

*कृषी उत्पन्न बाजार, तुळजापूर येथील हा हमाल, परंतु अफाट बुध्दी असूनही तो कमालीचे काम करतो.* 🤷‍♂️🙏पल शेअर

 *कृषी उत्पन्न बाजार, तुळजापूर येथील हा हमाल, परंतु अफाट बुध्दी असूनही तो कमालीचे काम करतो.* 🤷‍♂️🙏


Monday, 16 December 2024

मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील वाहनाची 18 डिसेंबर रोजी लिलावाव्दारे विक्रीमु

 मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील

वाहनाची 18 डिसेंबर रोजी लिलावाव्दारे विक्री


मुंबई, दि. 16 : मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई या कार्यालयातील मारुती स्विफ्ट डिझायर (पेट्रोल)  हे वाहन जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाचा लिलाव दि. 18 डिसेंबर 2024 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, महापालिका मार्ग, मुंबई 400001 येथे होणार असून दि. 17 डिसेंबर 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पहावयास मिळेल.

            या वाहनाची बोलीची सुरुवातीची किंमत 60 हजार एवढी आहे. अधिक माहितीकरिता सहा. प्रबंधक (लेखनसामग्री) मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय, एस्प्लनेड, मुंबई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे मुख्य न्यायदंडाधिकारी, एस्प्लनेड यांच्या कार्यालयाकडून  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती

 नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या

ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली

संपादक व ज्येष्ठ पत्रकारांची बैठक

 ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळाची निर्मिती

नागपूर, दि. 16 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमूख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते अनुशेषापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा हिवाळी अधिवेशनात झाल्या आहेत. याचा आढावा घेणारा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारावा असा मानस आहे. येथील तिन्ही पिढ्यांचा सहभाग असलेले सशक्त संपादक मंडळ या ग्रंथाची दिलेल्या मुदतीत अभ्यासपूर्ण निर्मिती करेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

        येथील विधानभवनात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांची विशेष बैठक उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रीत केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील राष्ट्रकुल समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस विधानभवनचे सचिव (कार्यभार) विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, नागपूर विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे,  माजी संपादक सुधीर पाठक, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्रा, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, पुण्य नगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, आनंद निर्वाण, विश्वास इंदुलकर, शैलेश पांडे, महेश उपदेव, रवी गुळकरी, विकास वैद्य, वैभव गांजापुरे व इतर सन्माननिय पत्रकार उपस्थित होते. या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांनी आपले योगदान देण्याचे सहर्ष मान्य केले. 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशने – विधानपरिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी संपादकीय मंडळ निश्चित करण्याचा सर्वांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. यात प्रदीप मैत्र, कार्याध्यक्ष, श्रीपाद अपराजित, श्रीमंत माने, गजानन निमदेव, रमेश कुलकर्णी, शैलेश पांडे, भुपेंद्र गणवीर, महेश उपदेव, प्रभाकर धुपारे, मनिष सोनी, आनंद निर्वाण, विकास वैद्य आणि नागपूर – अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे. समन्वय संपादक निलेश मदाने यांचा समावेश आहे. आवश्यक तो विस्तार यात चर्चेनुसार केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.

या प्रस्तावित ग्रंथासंदर्भात चर्चा करताना यातील मजकूर हा संशोधन व संदर्भाच्या दृष्टीने पूरक असावा असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. विशेषतः हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करताना पत्रकारांनी जे अनुभवले ते यात प्रतिबिंबित झाल्यास त्यातील वाचनियता वाढेल यावर  सर्वांचे एकमत झाले.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व संपादक यांना ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या प्रती देऊन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

लोकराज्य दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावेमु

 लोकराज्य दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावे

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

·         विधानभवन परिसरात लोकराज्य दुर्मिळ अंक’ प्रदर्शनाचे उद्घाटन

·         मंत्रीआमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक

 

नागपूरदि. 16 : ‘लोकराज्य’ चे दुर्मिळ अंक हे माहितीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजिटायजेशन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी विधानभवन परिसरातील लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्रीआमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले.

उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळेलोकराज्यचे संपादक तथा संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळेछत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक (माहिती)  किशोर गांगुर्डेवरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरेनागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारवर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गितेचंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते.

महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले.

प्रदर्शनात वैविध्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक

1964 पासूनचे अंक येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंकमराठी संगीत रंगभूमीडॉ. बाबासाहेब आंबेडकरमहात्मा फुलेछत्रपती शाहू महाराजयशवंतराव चव्हाणमराठवाडा विकास व सांस्कृतिक अंकस्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वेसांस्कृतिकभौगोलिकआर्थिक असा वैविध्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.

मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे

        विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली.

            भेट देणाऱ्यांमध्ये मंत्रीॲड. आशिष जायस्वालआमदार सर्वश्री प्रविण दरेकरचित्रा वाघबाबुसिंग राठोडअबु आझमीश्रीजया चव्हाणसुहास बाबरदेवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहलवनविभागाचे उपसचिव विवेक होशिंगउपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून हे प्रदर्शन पाहण्यास उपलब्ध राहणार आहे.

0000


Featured post

Lakshvedhi