Thursday, 12 December 2024

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाचे विविध उपक्रम गुंतवणूकदारांना मदतीसाठी "कंट्री डेस्क" विशेष कक्ष जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण तयार करण्यावर भर

 गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाचे विविध उपक्रम

गुंतवणूकदारांना मदतीसाठी "कंट्री डेस्क" विशेष कक्ष

जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण तयार करण्यावर भर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 12 : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी "कंट्री डेस्क" या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकार व प्रमुख उद्योग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्योगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल. आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची (MoUs) अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

याअंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांशी सहकार्य वाढवणे, दूतावास व व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

या नव्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), मैत्री व उद्योग संचालनालय सक्रिय भूमिका बजावणार आहे.

*ठळक मुद्दे*

- गुंतवणूकदारांना उद्योग प्रस्तावांमध्ये मदत करण्यासाठी "कंट्री डेस्क" विशेष कक्ष

- जागतिक आणि प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत नवीन गुंतवणूक धोरण

- शासन आणि प्रमुख औद्योगिक संस्थांमध्ये समन्वय वाढवणे

- गुंतवणुकीच्या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना सतत आवश्यक सहाय्य देणे

- सामंजस्य करारांचा पाठपुरावा आणि अंमलबजावणीची गती सुधारणे

- राज्यातील गुंतवणुकीच्या संधींबद्दल जागरूकता निर्माण करणे

- बहुपक्षीय संस्था आणि विकास बँकांसोबत काम करणे

- दूतावास आणि व्यापारी संघटनांसोबत समन्वय वाढवणे

- विशेषतः देशविदेशातील महाराष्ट्रीयन उद्योजक यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणे

- इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल, ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात पाच निरनिराळ्या मूर्ती देऊन घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात

 पाच निरनिराळ्या मूर्ती देऊन घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

 

नवी दिल्ली, 12 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. काल आणि आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एकूण 7 नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी 5 निरनिराळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांची अश्वारुढ मूर्ती भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वीर सावरकरांची मूर्ती भेट दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती भेट दिली. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सिद्धीविनायकाची मूर्ती भेट दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा केली.

००००

 







पूर्वी पण लग्नात हा प्रॉब्लेम होताच, पण किती नम्रपणे तो सोडवला ते बघा! 👌


 

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी.

 आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी.


एका वयस्कर दाम्पत्याला Digital Arrest / home arrest ची भिती दाखवून बँकेत जमा असलेल्या मुदत ठेवी मधून पैसे काढायला पाठवले गेले. परंतु भारतीय स्टेट बँकेच्या धनकवडी शाखेतील सतर्क महिला कर्मचारी शिल्पा ठुबे, आरूषा मिजार, आणि अमृता पाटील यांनी या भेदरलेल्या दांपत्याला विश्वासात घेऊन यांना अक्षरशः वाचवले ! या तिघींचे कौतुक !


सर्वांनी काळजी घ्या. फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. कोणत्याही कठीण परिस्थितीत घाबरून अवसान गाळून बसू नका. जवळच्या विश्वासू नातेवाईक किंवा मित्राला जरूर फोन करा आणि/ किंवा सरळ/तडक पोलिसांना चौकीत प्रत्यक्ष जावून भेटा !!


-- मिलिंद काळे, (९९६७०५७३६१)

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा

भव्य सोडतीचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि.  : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे  प्रत्येक महिन्यात पाच मासिक  तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिस जाहीर झाली आहेतअसे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

१ नोव्हेंबर२०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री२ नोव्हेंबर२०१४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी६ नोव्हेंबर२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष१२ डिसेंबर२०२४ रोजी महाराष्ट्र दिवाळी भव्यतम१९ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र गजराज व दि. २०/११/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

या लॉटरी तिकिटांना जाहीर झालेले बक्षीस:-

️ महाराष्ट्र सहयाद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2411D/43098 या चिराग एन्टरप्रायझेसनाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. १ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-०६-३८६२ या महाराजा लॉटरी सेंटरइचलकरंजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

️ महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत तिकीट क्रमांक DI-05 / 38465 या न्यू जय अंबे लॉटरी भंडारयवतमाळ यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. एक कोटीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

️ महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ 24/7136 या न्यू जय अंबे लॉटरी भंडारयवतमाळ यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.14 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G13/5771 या भारत लॉटरीकोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.35 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

️  महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. सात लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण 10 बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम. दहा हजारावरील वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव साजरा

 राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव साजरा

 

मुंबई, दि. 12 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे बुधवारी सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी केले.

पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 आमदार आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भगवद्गीता शिक्षा अभियान समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे, जुहू इस्कॉनचे अध्यक्ष श्री. ब्रज हरी दास, पोईसर जिमखानाचे अध्यक्ष मुकेश भंडारी, अमेरिकेच्या टेक्सासचे अटॉर्नी जनरल कॅन टॅक्सन आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, भगवद्गीता हा भारतातील ज्ञान आणि बुद्धीचा उत्कृष्ट ग्रंथ आहे. प्रत्येकाने स्वच्छ मनाने आणि फळाची चिंता न करता एकाग्रतेने आपले कर्तव्य करत रहावे, यशाच्या रूपाने फळ आपोआप मिळेल, असे गीता शिकविते.

समाजातील प्रत्येकाला शिक्षण, आरोग्य, निवास आदी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेने गरजूंना या किमान सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेऊन इतर देशांसमोर आदर्श निर्माण करावा, आपणही यासाठी सहकार्य करू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जगातील सर्व प्रगत देशांनी यासाठी प्रयत्न केल्यास चांगली समाज निर्मिती होऊन मानवाचा हॅपिनेस इंडेक्स वाढेल, असा विश्वास राज्यपाल श्री. राधाकृष्णन यावेळी व्यक्त केला.

००००

*Dhanushkoti Beach, Rameshwaram.* *The Power of word "RAM" - RAM NAMAM IS GREAT* *🌺🙏🏻जय श्री राम🙏🏻🌺*

 *Dhanushkoti Beach, Rameshwaram.*


*The Power of word "RAM" - RAM NAMAM IS GREAT* 


*🌺🙏🏻जय श्री राम🙏🏻🌺*


Featured post

Lakshvedhi