Thursday, 12 December 2024

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात पाच निरनिराळ्या मूर्ती देऊन घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात

 पाच निरनिराळ्या मूर्ती देऊन घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

 

नवी दिल्ली, 12 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. काल आणि आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एकूण 7 नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी 5 निरनिराळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांची अश्वारुढ मूर्ती भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वीर सावरकरांची मूर्ती भेट दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती भेट दिली. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सिद्धीविनायकाची मूर्ती भेट दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा केली.

००००

 







No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi