Saturday, 7 December 2024

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला: देवेंद्र फडणवीस

 मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला: देवेंद्र फडणवीस


मुंबई, 6 डिसेंबर - भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

Friday, 6 December 2024

मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे मार्गे मॅरेथॉन धावणार 54 व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरॅथॉनचे आयोजन; राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन

  

मुंबईनाशिकअहिल्यानगरकोल्हापूरपुणे मार्गे मॅरेथॉन धावणार

54 व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरॅथॉनचे आयोजन;

राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन

 

            मुंबई, दि.6- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54 व्या विजय दिवसानिमित्त आयोजित 'विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन'ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. ही मॅरेथॉन 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून मॅरेथॉनमध्ये सहभागी सैन्य दलातील धावपटू मुंबई, नाशिकअहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे 405 किमी अंतर पार करणार आहेत. या मॅरॅथॉनचे आयोजन स्थलसेनेच्या महाराष्ट्रगुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे करण्यात आले. 

            मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. 

            अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील जवानमाजी अधिकारीयुवक व एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत. सैन्य दलाच्या वतीने या परिक्रमेदरम्यान नाशिक येथे 'जाणूया सैन्य दलांनाव अहिल्यानगर येथे 'सैन्य दलात महिलांना समान संधीया विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर येथे माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. 

            यावेळी महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल बिक्रमदीप सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) 7 डिसेंबर रोजी लोक अदालत

 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) डिसेंबर रोजी लोक अदालत

 

मुंबई, दि.6- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या (दि.07 डिसेंबर) रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणमुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समितीमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            लोक अदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशीए. पी. कुऱ्हेकर, सदस्य(न्या.) आणि आर. बी. मलिक, सदस्य (न्या.) हे कामकाज पाहणार आहेत.

            या लोक अदालतीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील प्रलंबित असलेली सेवाविषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

000

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) 7 डिसेंबर रोजी लोक अदालत

 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) डिसेंबर रोजी लोक अदालत

 

मुंबई, दि.6- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या (दि.07 डिसेंबर) रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणमुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समितीमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            लोक अदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशीए. पी. कुऱ्हेकर, सदस्य(न्या.) आणि आर. बी. मलिक, सदस्य (न्या.) हे कामकाज पाहणार आहेत.

            या लोक अदालतीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील प्रलंबित असलेली सेवाविषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत..

कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ

 कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ

वृत्त क्र. 234

 

मुंबईदि. 6 :-   विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली.

            राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली.

            यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हेमुख्य सचिव सुजाता सौनिकविधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली.


विधानसभेची बैठक दि.7 डिसेंबर रोजी मुंबईतमुख

 विधानसभेची बैठक दि.7 डिसेंबर रोजी मुंबईत

 

मुंबई, दि.6 : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे शनिवार, दि.7 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वा. आयोजित केली असल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव(1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली आहे.

            याच बरोबर महाराष्ट्र विधान परिषदेची बैठक सोमवार, दि.9 डिसेंबर, 2024 रोजी दु.4 वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली

 233

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
विधानभवनात आदरांजली

            मुंबईदिनांक डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.


            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळेसचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवलेअवर सचिव विजय कोमटवारउप सभापती यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकरसंचालक वि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

 

Featured post

Lakshvedhi