महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) 7 डिसेंबर रोजी लोक अदालत
मुंबई, दि.6- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या (दि.07 डिसेंबर) रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोक अदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, ए. पी. कुऱ्हेकर, सदस्य(न्या.) आणि आर. बी. मलिक, सदस्य (न्या.) हे कामकाज पाहणार आहेत.
या लोक अदालतीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील प्रलंबित असलेली सेवाविषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
000
No comments:
Post a Comment