सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 31 October 2024
Wednesday, 30 October 2024
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे
मुंबई, दि. ३० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना 'विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई - 400002' या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात यावा, असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
सर्व अधिनस्त कार्यालये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) जिल्हा परिषद / मनपा, प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.
00000
भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित
भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी
गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित
मुंबई, दि. ३० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांना गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरच्या मतदानासाठी अर्ज दाखल केलेल्या मतदारांना गृह टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध होणार आहे.
मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणारे निवडणूक कर्तव्याच्या कामावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांना ‘प्रपत्र १२ ड’ दाखल केलेल्यांसाठी टपाली मतदान करण्यासाठी खास केंद्रे उभारण्यात आली आहेत.
भायखळा विधानसभा मतदारसंघात १८९ प्रौढ आणि ४९ दिव्यांग मतदारांसाठी, गृह टपाली मतदान १४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत होईल.
भायखळा विधानसभा मतदारसंघ कार्यालय, रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेड, तळ मजला हॉल, जे. जे. रोड, ह्युम हायस्कूल शेजारी, भायखळा येथील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक १ येथे टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत खुले राहील.
अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांसाठी टपाली मतदान , रिचर्डसन अँड क्रूडास लि., तळ मजला हॉल, जे. जे. रोड, ह्युम हायस्कूल शेजारी, भायखळा येथील आवारातील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक २ येथे मध्ये उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान करता येईल. भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रौढ आणि दिव्यांग मतदार, तसेच निवडणूक कर्तव्याचे अधिकारी आणि पोलिसांनी टपाली मतदानाची सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले आहे.
केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा
केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील
स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा
मुंबई, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहरातील १७८-धारावी, १७९-सायन-कोळीवाडा, १८०-वडाळा, १८१-माहिम आणि १८२-वरळी या पाच विधानसभा मतदारसंघांची केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आज भेट देऊन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा घेतला.
निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १० विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीमच्या कामकाजावर खर्च निरीक्षक लक्ष ठेवत आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाबद्दल माहिती घेतल्यानंतर श्री. वसंता यांनी वाहन तपासणीसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू आणि शस्त्रसाठा तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक टीमने त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधितांना वेळेत पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.
केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी संदिपान मते उपस्थित होते.
००००
कोकणी आकाशकंदिल नीसर्गिक उत्पादन
कोकणी आकाशकंदिल
आगतं दीपावली पुण्या सकलार्थ प्रदायिनी।
शुभं भवतु सर्वेषां सा दिव्या विश्वमोहिनी ॥
पुण्यकारक अन् सगळ्यांना सगळी सुखं देणारी, दिव्य,विश्वाला मोहून टाकणारी अशी दीपावली आली आहे ती सर्वांना शुभकारक आणि सुखकारक होवो ही शुभकामना.
निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली
निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून
निवडणूक कामकाजाचा आढावा
मुंबई दि 30 :- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 164 मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.
या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन श्री बाली यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री बाली यांनी यावेळी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी सादरीकरण केले.
------000------
केशव करंदीकर/विसंअ/
निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत
१८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई, दि. ३० :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...