Wednesday, 30 October 2024

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे सरसावले सदिच्छादूत करणार मतदान करण्याचे आवाहन

 मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे सरसावले

सदिच्छादूत करणार मतदान करण्याचे आवाहन

            मुंबई दि. 29 : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. हे सदिच्छादूत मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरसाहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाडअभिनेत्री उषा जाधवमहिला क्रिकेटपटू स्मृती मनधनासुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबरअर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडेतृतीयपंथी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंततृतीयपंथी प्रणीत हाटेतृतीयपंथी झैनब पटेलदिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीतदिव्यांग कार्यकर्ती व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका सोनाली नवांगुळ यांचा समावेश आहे.

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

 उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना

मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी

            मुंबईदि. २९ येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावायाकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी उद्योग,ऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाने जाहिर करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा१९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायातव्यापारातऔद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीलामतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईलमात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहीलकोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळेउद्योग समूहकंपन्या व संस्थांमध्येऔद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यासत्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईलअसे उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित परिपत्रकात नमूद केले आहे.

००००

-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या १६४६ तक्रारी निकाली

 सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या

१६४६ तक्रारी निकाली

 मुंबईदि. २९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दि. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

 सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.


निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

 निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून

निवडणूक कामकाजाचा आढावा

 

मुंबई दि 29:- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 164 मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.

या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन श्री बाली यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री बाली यांनी यावेळी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी सादरीकरण केले.

------000------

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल

 २८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ७९९५ उमेदवारांचे

१०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबईदि. २९ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.


निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल यांनी साधला मतदारांशी संवाद हरित निवडणूकीची संकल्पना राबविण्याचे आवाहन




 निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल यांनी साधला मतदारांशी संवाद

 

हरित निवडणूकीची संकल्पना राबविण्याचे आवाहन

 

मुंबई दि 29:- मतदार जागृती कार्यक्रम अंतर्गत 172- अणुशक्तीनगर आणि 173- चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल (भा.प्र.से 2009) यांनी वडाळा येथील भक्ती पार्क येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डॉ हीरा लाल यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

हरित निवडणूकीच्या संकल्पनेवर भर देत केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ हीरा लाल यांनी पर्यावरण रक्षण करत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे तसेच झाडे लावण्याचेही आवाहन केले. यावेळी डॉ हीरा लाल यांनी नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिक मतदार यांच्याशीही संवाद साधला. यावेळी उपनिबंधक सुनिल बनसोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

Tuesday, 29 October 2024

निवडणूक निरीक्षक अंजना एम. आणि पी. रामजी यांची मुंबई शहर माध्यम कक्षास भेट

 निवडणूक निरीक्षक अंजना एम. आणि पी. रामजी यांची

मुंबई शहर  माध्यम कक्षास भेट

 

             मुंबईदि. 29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ करिता नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) अंजना एम. आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) पी. रामजी यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम संनियंत्रणासाठी स्थापन केलेल्या माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

     यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

    मुंबई शहर जिल्ह्यातील १८४ - भायखळा१८५ - मलबार हिल या दोन विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) अंजना एम. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) पी. रामजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

   केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडियासोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया कक्षाची पाहणी केली व आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क व दक्ष राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पडाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

  यावेळी जिल्हाधिकारी श्री.यादव म्हणालेमाध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी-व्हिजिल ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील फेसबुकइन्स्टाग्राम आदींवरील उमेदवारांच्या अकाऊंटवर कशा प्रकारे नजर ठेवली जात आहेयाचीही त्यांनी माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi