Tuesday, 29 October 2024

निवडणूक निरीक्षक अंजना एम. आणि पी. रामजी यांची मुंबई शहर माध्यम कक्षास भेट

 निवडणूक निरीक्षक अंजना एम. आणि पी. रामजी यांची

मुंबई शहर  माध्यम कक्षास भेट

 

             मुंबईदि. 29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ करिता नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) अंजना एम. आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) पी. रामजी यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम संनियंत्रणासाठी स्थापन केलेल्या माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

     यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

    मुंबई शहर जिल्ह्यातील १८४ - भायखळा१८५ - मलबार हिल या दोन विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) अंजना एम. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) पी. रामजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

   केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडियासोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया कक्षाची पाहणी केली व आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क व दक्ष राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पडाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

  यावेळी जिल्हाधिकारी श्री.यादव म्हणालेमाध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी-व्हिजिल ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील फेसबुकइन्स्टाग्राम आदींवरील उमेदवारांच्या अकाऊंटवर कशा प्रकारे नजर ठेवली जात आहेयाचीही त्यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi