Tuesday, 8 October 2024

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

 मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. ८ : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी आगमन  झाले.

 मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरअतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसादप्रधान सचिव राधिका रस्तोगीमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरराजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. पुढील कार्यक्रमासाठी ते हॉटेल ताज पॅलेसमुंबई येथे रवाना केले.

मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाइन सोडत

 मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाइन सोडत

 

             मुंबई, दि. 8 : ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन

म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहेअसे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.

              म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली.

              यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंहम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकरमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

              यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

                मंत्री श्री.सावे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्पमध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून  यातली अडीच लाख घर ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. आजच्या या लॉटरीसाठी दोन हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिकपुणेकोकणछत्रपती संभाजीनगरनागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगरकामाठीपुराशहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

म्हाडामुळे मुंबईतील सर्वसामान्यांना घराचा दिलासा

- पालकमंत्री दीपक केसरकर

          म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. धारावीबीडीडीचाळ यांच्या पुनर्विकासामुळे या भागातील नागरिकांच्या हक्काच्या  घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून ही विकास करण्यात येत आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून  मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील असेही यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

              अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या कीआजची लॉटरी प्रणाली ही पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहित आहे. ही लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे झालेली आहे. म्हाडा म्हणजे विश्वास. म्हाडाचे घर मिळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला यावरूनच लोकांचा म्हाडावर किती विश्वास आहे हे लक्षात येते. एक स्थिर आणि सुरक्षित घर सर्वांचं स्वप्न आहे. या लॉटरी प्रक्रियेने ते स्वप्न पूर्ण होत आहे.

             प्रास्ताविकात श्री. जयस्वाल म्हणाले२ हजार ३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत करण्यात आली आहे. यासाठी अनामत रकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज पात्र होते. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये दुसऱ्यांदा लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार सदनिकांचे दरही कमी करण्यात आले आहेत.

            सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले होते. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. या प्रकल्पात मुंबईतील गोरेगावमालाडजुहूदादरवरळीताडदेववडाळाकन्नमवारनगरपवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार ३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची  प्रक्रिया राबविण्यात आली  होती.

            जयश्री कोटकर आणि कृपाल पटेल या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पत्र यावेळी देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मिलिंद बोरीकर यांनी यावेळी मानले.

ब्रिटिश कालीन अकृषिक कर राज्य सरकारने अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता रद्द केला.*

ब्रिटिश कालीन अकृषिक कर राज्य सरकारने अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता रद्द केला.*





 05.10.2024

*Good News*


*State govt has waived off the British Era N.A Tax across Maharashtra*


*ब्रिटिश कालीन अकृषिक कर राज्य सरकारने अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता रद्द केला.*


*_Satya Muley_*

*Advocate Bombay High Court*

For the Petitioner

*Maharashtra/Pune Housing Federation*

7028005951

कांदिवलीतील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशित

 कांदिवलीतील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला

आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशित


मुंबईदि. ऑक्टोबर (प्रतिनिधी)

              आमदार अतुल भातखळकर यांच्या अथक प्रयत्नांतून करण्यात आलेल्या कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरण प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलेमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीएआकुर्ली भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास नेले आहेया आधीचा आकुर्ली भुयारी मार्ग हा  11 मीटर रुंदीचा होताआता रुंदीकरणानंतर हा मार्ग 26 मीटर इतका रुंद झालेला आहेकांदिवली पूर्वेला होणारी वाहतूककोंडी हा एक महत्त्वाचा प्रश्न होतावाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरत असणारा हा मार्ग आता रुंदीकरणानंतर मात्र सुसाट झाला आहेहा भुयारी मार्ग आता सेवेत  दाखल झाल्याने कांदिवली पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास वेगवान झाला आहेत्याचवेळी वांद्रे – बोरिवली प्रवास करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहेयामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

याच वेळी आमदार अतुल भातखळकर यांच्या गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांच्या कार्यअहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.

              या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणालेकांदिवलीतील या आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणाचे श्रेय हे आमदार अतुल भातखळकर यांना एकहाती जाते.

जनहितासाठी काम करण्यात अतुल भातखळकर हे कायम तत्पर असतात असंही ते म्हणाले.  मुख्य म्हणजे एखाद्या कामाचा पाठपुरावा करण्यात भातखळकरांचा कुणीच हात धरू शकत नाही असंही मत यावेळी पियुष गोयल यांनी व्यक्त केले.

              या प्रसंगी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार  ॲडआशीष शेलार म्हणालेअतुल भातखळकर एक माणूस म्हणून एक आमदार म्हणून तसंच एक नेता म्हणून मास्टर ब्लास्टर आहेत.

आमदार अतुल भातखळकर म्हणालेमाझ्या विभागातील हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा देणारा प्रकल्प आहेहा आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मला शासन तसेच शासनेतर सहकारी मित्रांचा पाठिंबा खूप मोलाचा होताकेंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांनी मला वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे हा आकुर्ली भुयारी रुंदीकरण मार्ग आज जनतेसाठी खुला झाला आहे

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनीही या प्रसंगी भाषण करताना आमदार अतुल भातखळकर यांच्या समाजकार्याचे कौतुक केले.

            कांदिवली पूर्व भागातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Monday, 7 October 2024

जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या

नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

          मुंबईदि. ७ : मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

          मुंबई शहर जिल्हाकरिता पाच अशासकीय सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी अर्ज व अर्जासोबत परिचय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दि. १५ ऑक्टोबर २०२४  पूर्वी सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई शहरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर.सी. मार्गचेंबूर (पू)मुंबई-७१. ई-मेल acswomumbai@gmail.com यावर किंवा कार्यालयात सादर करावा.

          अशासकीय सदस्य पात्रतेचे नियम पुढील प्रमाणे आहेतसदस्य अनुसूचित जातीजमातीचा असावासदस्यास सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याचा अनुभव असावासदस्यास अनुसूचित जातीजमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कायद्याचे ज्ञान असावेविधी शाखेची पदवी (LLB, LLM) असलेले सदस्यांना प्राधान्य राहील, सदस्य मुंबई शहर जिल्ह्यात राहणारा असावा,असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

****

कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रीया (Replacement Surgeries), यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. गोर-गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत

वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा वाढता आलेख

 

          मुंबई,  दि. 7 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने  रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना त्यांच्या अडचणीच्या काळात मोठी मदत केली आहे. आरोग्य सेवेचा वसा घेवून गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्याचे काम हा वैद्यकीय कक्ष करीत आहे. अशा रूग्णांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. वैद्यकीय कक्षाचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आलेख उंचाविला असून अवघ्या 9 महिन्यात एकूण 13 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

          जानेवारी, 2024 पासून ते सप्टेंबर 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 418 रुग्णांना मदत झाली आहे. ह्रदय रोगकर्करोगयकृत प्रत्यारोपणमुत्रपिंड प्रत्यारोपणबोनमॅरो ट्रान्सप्लांटफुफ्फुसाचे आजारअस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रीया (Replacement Surgeries), यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. गोर-गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत ‍कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

          निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता उच्च न्यायालयमुंबई यांनी योजना तयार केली आहे. त्यानुसारप्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व  10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे धर्मादाय रूग्णालयांना बंधनकारक आहे. 

          योजनेकरीता सुरु केलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन २ ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले आहे. तसेच रुग्णांच्या २४ तास सहाय्याकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी १८०० १२३ २२११ या संपर्क क्रमांकावर आणि https://charitymedicalhelpdeskmaharashtra.gov.in/ या संकेत स्थळास भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालयेत्यांच्याकडील राखीव बेडची संख्या यांची माहिती मिळणार आहे.

          राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12 हजार बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेनमुंबईएन.एन रिलायन्समुंबईसह्याद्री हॉस्पीटलपुणेदिनानाथ मंगेशकर रुग्णालयपुणे इत्यादी नामांकीत रुग्णालयांचा समावेश असून सर्वधर्मादाय योजनेची अधिक प्रभावी अंमलबाजवणी कशी करता येईल यासाठी कक्षामार्फत मुंबईनागपूरछत्रपती संभाजीनगरकोल्हापूर येथे विभागीय कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी उत्साहाने सहभाग घेतला. निर्धन रूग्णाकरीता वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लक्ष ८० हजार पर्यंत असून अशा रूग्णांना मोफत उपचारतर १.८० लाख ते ३.६० लाख या वार्षिक उत्पन्न दरम्यान गरीब रूग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतात.

          केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सरलिव्हर ट्रान्सप्लांटहृदय प्रत्यारोपण अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात. त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान ठरली आहे.   

          सद्यस्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पध्दतीने सरु असुन निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदती मिळणे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo@maharashtra. gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात. धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास त्याचानातेवाईकांचा अर्जलोकप्रतिनीधींचे पत्रआधार कार्ड / ओळखपत्ररेशनकार्ड / तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला,   डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक आहे. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत योजनेचा लाभ घेण्याकरीता निर्धन व दुर्बल रूग्णांनी लाभ घेण्यात यावाअसे आवाहन कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास आवश्यक कागदपत्रे

          रूग्णाचा / नातेवाईकांचा अर्ज/ लोकप्रतिनीधींचे पत्रआधार कार्ड / ओळखपत्ररेशनकार्ड / तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला/ असल्यास पॅनकार्डडॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन.

****

नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी

 नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी


 


          मुंबई, दि. 07 : केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी नवीन पूर्ण बांधणी झालेल्या (Fully Built) परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी 4.0 संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. आता अशा पूर्णत: नवीन बांधणी झालेल्या टुरीस्ट टॅक्सी, सर्व तीन चाकी मालवाहू वाहने व 7,500 किलोग्रॅम पेक्षा कमी सकल भार क्षमता असलेली चारचाकी या परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी अधिकृत वाहन वितरकांमार्फत होणार आहे.


          या निर्णयाचे ऑटोमोबाईल असोसिएशनच्यावतीने स्वागत करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहे. या वाहनांची नोंदणी आता विक्रेत्यांकडेच होणार असल्यामुळे वाहन धारकांना परिवहन कार्यालयाकडे वाहनांना आणायची गरज नाही. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास वाचणार आहे. या निर्णयाचा लाभ जवळपास 7 ते 8 लाख वाहनधारकांना होणार आहे.


           नोंदणीबाबतचे अधिकार विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. टुरीस्ट टॅक्सीमध्ये मीटर्ड टॅक्सी वगळून नवीन बांधणी केलेल्या टॅक्सीचा समावेश असणार आहे. यापूर्वी वाहन वितरकांमार्फत नवीन दुचाकी व कार या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांची नोंदणी करण्यात येत आहे. आता परिवहन संवर्गातील पूर्ण नवीन बांधणी असलेल्या वाहनांची सर्व वाहनांची नोंदणी 4.0 प्रणालीवर अधिकृत वाहन विक्रेत्यामार्फत करण्यात येणार आहे. तरी सर्व वाहन वितरकांनी 4.0 संगणकीय प्रणालीवर परिवहन संवर्गातील नवीन पूर्ण बांधणी झालेल्या वाहनांची नोंदणी करावी, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi