Saturday, 14 September 2024

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल जागतिक कृषी परिषदेच्या 20 देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

 पर्यावरण रक्षणशाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

जागतिक कृषी परिषदेच्या 20 देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

मुंबईदि. 13 : पर्यावरण रक्षणशाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एन सी पी ए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत दि. 18 रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची आहे.

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रातील प्रयत्न

संयुक्त राष्ट्र संघटनेने आता तापमान वाढीचे युग संपून होरपळीचे युग सुरू झाल्याने त्वरित कृतीची गरज व्यक्त केली आहे. त्यास प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील    पहिले राज्य ठरले आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीची स्थापना  केली असून त्याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमून संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ देखील तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली. त्याशिवाय औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5% बायोमास वापरायचे देखील निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 21 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. पवार यांनी एक लाख वीस हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या याच्या प्रयत्नांमुळे ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला आहे. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व जागतिक कृषी परिषदेने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

'वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमअन्न सुरक्षा विषयी जागतिक व्यासपीठ

जागतिक कृषी परिषद ('वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम') हे अन्न सुरक्षा विषयी जागतिक नेत्यांना चर्चा करण्यासाठी अनोखे व्यासपीठ आहे. जागतिक कृषी मंचचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंज हे आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर  होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक  वनस्पती विज्ञानकृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादनव्यापारतंत्रज्ञानव्यवसायधोरण आणि आर्थिक परिस्थितीपोषणअन्न प्रक्रियापाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा  समावेश करते. यासाठी  निवड देखील जुरी योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करूनते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते

येत्या बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन लोदगाजिल्हा लातूर यांनी केले असून 18 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा महत्त्वाचा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत विविध चर्चासत्रांनी पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात मुख्य सत्काराचा कार्यक्रम होईल.

0000

शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची आरती.. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली इच्छापूर्ती गणेश दर्शनासाठी आलेली मुले नव्या कोऱ्या बसमधून रवाना


 शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची आरती..

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली इच्छापूर्ती

गणेश दर्शनासाठी आलेली मुले नव्या कोऱ्या बसमधून रवाना

 

मुंबईदि. 13 :- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  मुलांच्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला दुमदुमून गेला. आपल्या मनातील दुःख, वेदना दूर सारत त्यांनी मोठ्या आनंदाने गणरायाची आरती केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारवड ठरलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील मुलांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

या मुलांनी शाळेला ये-जा करण्यासाठी पायपीट करावी लागते, अशी अडचण सांगितली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मुलांसाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यावर तातडीने अंमलबजावणी करत सायंकाळ पर्यंत नवी कोरी बस वर्षा येथे आणून या आश्रमशाळेचे महंत श्री शिवस्वरुपानंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

दरम्यानदुपारी ही मुले राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नक्की असते तरी कसे याबद्दल मनात प्रचंड कुतूहल बाळगत वर्षा निवासस्थानी आली होती. या सर्वांनी वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापित गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात त्यांनी श्री गणरायाची आरती केली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही आरती चांगलीच रंगली. आरती सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आगमन झाले आणि त्यांच्या सोबत मुलांनी आरती केली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदेमुख्यमंत्र्यांच्या स्नुषा श्रीमती वृषाली शिंदेमाजी खासदार हेमंत पाटीलत्यांच्या पत्नी श्रीमती राजश्री पाटील आदी उपस्थित होते.

या श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने या मुलांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन केले होते. यात ही मुले अंगात शेतकरी सदरेडोक्यावर टोपी घालून मोठ्या शिस्तीने टेबल खुर्चीवर येऊन बसली. त्यांच्यासाठी आज पंचपक्वांनांचा थाट होता. या भिरभिरत्या नजरेच्या मुलांनी जेवायला सुरूवात केली, पण ती पदार्थ पुन्हा मागून घेणे किंवा समोर दिसत असलेले पदार्थ घ्यायला लाजत होती. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही अडचण ओळखली आणि ते सरसावले. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वतःच एकेक पदार्थ घेऊन मायेने त्यांना आग्रह करून वाढू लागले. मुख्यमंत्र्यांनी या मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. आधारतीर्थ आश्रमाला जाणवणाऱ्या काही अडचणी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. तसेच त्या तत्काळ सोडवण्याचे निर्देशही दिले.

सायंकाळी वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात नवीन बस आणण्यात आली. मंत्रोच्चारात तिचे पूजन करून मुख्यमंत्र्यांनी ही बस आश्रमाला सोपवली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुपारी ऐकून घेतलेली अडचण सायंकाळपर्यंत सोडवल्याचे पाहून ही मुले भारावून गेली. त्यांनी टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या सगळ्या मुलांनी मुख्यमंत्र्यांचे आदरातिथ्य स्वीकारत आणि मनात वर्षा बंगल्याच्या गोड आठवणी ठेवून नव्या कोऱ्या बस मध्ये बसून या भारावल्या नजरेने वर्षाचा निरोप घेतला.

Friday, 13 September 2024

जिओ पारसी कार्यशाळेचे 14 सप्टेंबर रोजी आयोजन पारशी समुदायासोबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद

 जिओ पारसी कार्यशाळेचे 14 सप्टेंबर रोजी आयोजन

पारशी समुदायासोबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद

 

मुंबई, दि. 13 : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे शनिवार 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 ते दु. 3.30 वाजेपर्यंत जिओ पारशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय  अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार हे यावेळी पारशी समुदायाशी संवाद साधणार आहेत. पारशी समुदायातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागाने केले आहे.

पारशी मुख्य धर्मोपदेशक उदवाडाचे श्री. दस्तूरजी  आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा, उपाध्यक्ष केरसी के. देबू उपस्थित राहणार आहेत.

          पारशी  लोकसंख्या स्थिर करण्यासाठी आणि भारतातील पारशी लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने केंद्राने जिओ पारसी योजना सुरू केली. पारशी जोडप्यांना वैद्यकिय आणि समुदायाचे आरोग्य घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.  राज्य शासनाद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि इतर पडताळणीनंतर योजनेतील मदत थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) द्वारे नागरिकांना जारी केली जात आहे. योजनेची माहिती समुदायातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

 उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

 

नवी दिल्ली, 13 : उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची  वाढती मागणी लक्षात घेतायात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता,  अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या निर्देशानुसारउत्सवांच्या काळात मिठाईफरसाणदूध आणि दुग्धजन्य उत्पादने जसे की तूपखोवा आणि पनिर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीमुळे काही वेळा काही उत्पादक या वस्तूंमध्ये भेसळ करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एफएसएसएआय ने विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष देखरेख आणि उपाययोजना

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिठाईफरसाण आणि दुग्धजन्य उत्पादने यांची निर्मिती आणि विक्रीवर काटेकोर देखरेख ठेवावीअसे एफएसएसएआय चे निर्देश आहेत. नियमित अंमलबजावणी मोहीमा राबवून संभाव्य भेसळ रोखण्याचे निर्देश दिले आहेत.यासोबतचज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहेतिथे फूड सेफ्टी ऑन व्ह‍िल्स (FSW) युनिट्स तैनात करावेतअसे प्राधिकरणाचे निर्देश आहेत. या युनिट्समुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळू शकेल.

२१ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

 २१ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे

समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

 

मुंबईदि. १३ : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबर रोजी  सकाळी ७.०० वाजता जुहू बीचमुंबई येथे राज्य सरकारस्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.

दलामल हाऊसनरीमन पाँईंट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस निमित्ताने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने आयोजित  बैठकीत ते बोलत होते.

श्री. दराडे म्हणालेकेंद्रीय पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्रालयनवी दिल्ली तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत सर्व १३ किनारी राज्यांमध्ये २१ सप्टेंबर, २०२४ रोजी (आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस) समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत दि. २१ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू बीचमुंबई येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली असून त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सर्व यंत्रणास्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वायाने कामे करावे, अशा सूचना श्री. दराडे यांनी दिल्या.

यावेळी विविध यंत्रणांचे आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर

  

एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर

 

मुंबईदि. 13 : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणारी एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर धावू लागली आहे. आर्थिक संकटामध्ये रूतलेल्या एसटीने आता भरारी घेतली असून महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात आल्याने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत भविष्यातही प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने नफ्यात येईलअसे प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे.

            मागील काळात दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापिएसटीचा घटलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्याकी ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी 54 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात " हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छसुंदर बस स्थानक अभियान"विद्यार्थ्यांना शाळेत थेट पासप्रवासी राजा दिनकामगार पालक दिनश्रावणात एसटी संगे तीर्थाटनअसे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेतत्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करूनत्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. याच बरोबर नादुरुस्ती बसेसचे प्रमाण 12 टक्क्यांवरुन 6 टक्के झाले. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ते निम्याने कमी करण्यात आले. तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करुन डिझेलची खपत 0.52 कि.मी.ने वाढविण्यात आले. त्यामुळे डिझेलची बचत झाली आहे. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये  एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे.

भविष्यात येऊ घातलेल्या स्व: मालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करुन एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.

स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रमआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

 स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम

           राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे २० सप्टेंबर रोजी होणार आहे.या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीराज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय उद्योगमंत्री जीतन राम मांझी,केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंहउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार,वने मंत्री सुधीर मुनगंटीवार,उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

         नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे. 

Featured post

Lakshvedhi