Wednesday, 21 August 2024

यशदामध्ये फळे, भाजीपाला, फुले निर्यात परिषदेचे आयोजन

 यशदामध्ये फळे, भाजीपाला, फुले निर्यात परिषदेचे आयोजन

            मुंबईदि. 21: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने फळेभाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे आयोजन गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी यशदापुणे येथे करण्यात आले आहे. कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी ही माहिती दिली.

            पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमारअपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारेपरकीय व्यापार महासंचालनालयाचे उपमहासंचालक दिलीराज दाभोळेफेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे क्षेत्रीय प्रमुख ऋषीकांत तिवारीआरपीक्यूएस मुंबईचे सहसंचालक डॉ. ब्रिजेश मिश्रा आदी उपस्थित राहणार आहेत.

            या परिषदेत अपेडाडीजीएफटीएनपीपीओजेएनपीटीकॉनकोरफेडरेशन ऑफ इंडियन एस्पोर्ट ऑर्गनायझेशन तसेच राज्यातील विविध फळेभाजीपाला व फुलाचे यशस्वी निर्यातदार मार्गदर्शन आयोजित करणार आहेत. पॅकेजिंगवाहतूक आणि लॉजिस्टिक सुधारण्यासाठी धोरणे याबाबतदेखील चर्चा होणार आहे.

            या परिषदेतून शासनाच्या कृषीमालविषयक विविध विभागांच्या योजनात्यांचे निकषजागतिक बाजारातील ट्रेंडगुणवत्ता मानके आणि निर्यातविषयक नियमांची माहिती उपस्थितांना होणार आहे. निर्यातदार व निर्यात बाजारातील इतर प्रमुख घटकांचादेखील यावेळी एकमेकांशी संवाद होणार  असल्यामुळे ही परिषद राज्यातून फळेभाजीपाला व फुलांच्या निर्यात वृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहे,

राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण

 राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील

महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण

                                       - पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबई दि. 21 : महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी  मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालय आणि  शासकीय वसतिगृह  येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थानी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व  मुंबई उपनगरमधील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर पासून स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

             मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य गीताचा कोनशीला उद्घाटन समारंभ  मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते  करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरउपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ,जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे  आदि उपस्थित होते.

              मंत्री श्री.लोढा म्हणाले कीराज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी  शाळामहाविद्यालयविद्यापीठ त्याचप्रमाणे शासकीय व खासगी आस्थापना यांनी  सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात.  शाळा व महाविद्यालयाने आणि  विविध संस्थांनी आपल्याकडे नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्गाची  देखील खात्रीपूर्वक तपासणी करावीकोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच शाळा व महाविद्यालयामधील शौचालयांच्या ठिकाणी जिथे महिला शौचालय आहेत तिथे महिलाच कर्मचारी नियुक्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

Thanks a lot

 कॅमेरूनच्या जंगलात एका चिंपांझीने एका फ्रेंच फोटोग्राफरला तुझ्या हातांची ओंजळ करून मला पाणी प्यायला मदत कर अशी इशाऱ्याने विनंती केली. त्यांनतर पाणी पिऊन झाल्यावर त्या फोटोग्राफरचे हात धुऊन देत आभार / कृतार्थता व्यक्त केले, आभारी असणे, कृतार्थ असणे, उपकारांची जाण ठेवणे हे निसर्गतः आहे, आपण विसरत चाललोय का ? आपलं वर्तन अधिकाधिक अनैसर्गिक होत चाललंय का ?


दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ पदाचा निकाल जाहीर

 दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयगट-अ पदाचा निकाल जाहीर

 

            मुंबईदि.२० :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापकदंतव्यंगोपचारशास्त्र (Orthodontics and Dentofacial Orthopedics), शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयगट-अ या पदाच्या मुलाखती दि. ९ ऑगस्ट२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.

000000

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात खादी प्रदर्शनाचे आयोजन

 मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात खादी प्रदर्शनाचे आयोजन

 

            मुंबई, दि. २० :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बातकार्यक्रमात खादीचा प्रचार-प्रसार वाढावा यासाठी खादी वस्त्र खरेदी केलेल्या आवाहनाला अनुसरून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दि २१ ते २३ ऑगस्ट या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे महाखादी प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली आहे. 

            या प्रदर्शनात सेवाग्राम, वर्धाअमरावती येथील कस्तुरबा महिला खादीछत्रपती संभाजीनगर येथील सत्यम खादीबोरिवलीभाईंदरपालघरनागपूर सह विविध जिल्ह्यातील खादी संस्था या प्रदर्शनात सहभागी  होणार आहेत.

            खादीचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा. तसेच मंत्रालयातील शासकीय कर्मचारी यांना खादी सहज उपलब्ध व्हावीयासाठी हे प्रदर्शन आयोजित केल्याचे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले आहे.

            या प्रदर्शनात जास्तीत जास्त अधिकारी-कर्मचारी यांनी भेट देऊन दि. 21 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत खादीचे कापड खरेदी करावेअसे आवाहन देखील सभापती श्री.साठे यांनी केले आहे.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे कामकाज सक्षम करणार

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे

कामकाज सक्षम करणार

- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

·       मेंढपाळांच्या उन्नतीसाठी विविध यंत्रणा उभारल्या जाणार

            मुंबई दि.२० : राज्यात मेंढीपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना" पुढे सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे कामकाज सक्षम होण्यासाठी पुणे येथे सुसज्ज मुख्य प्रशासकीय भवन उभारण्यात येईल असे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

            महामंडळाच्या ६ क्षेत्र बळकटीकरणबाबत आढावा बैठक मंत्री श्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार डॉ. विकास महात्मेआमदार सदाभाऊ खोतआमदार गोपीचंद पडळकरअपर मुख्य सचिव राजेश कुमारमहामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ शितल कुमार मुकणेउपसचिव निवृत्ती मराळे यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत मार्गदर्शन करताना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री विखे पाटील म्हणालेमंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेस गती देण्यात येत आहे. महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय भवन उभारणीसाठी सुधारित आराखडा तयार करण्यात यावा. प्रशिक्षण केंद्रासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जागा निश्चित केली आहे. तेथे प्रशिक्षणार्थी मेंढपाळ यांच्यासाठी वसतीगृह असलेले प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल,

            कामाबाबत नियोजन करून सर्व प्रक्षेत्रही त्या-त्या विभागातील जातिवंत शेळ्या मेंढ्यांसाठी विकास केंद्र व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी 66 कोटी 85 लाख रुपये निधी देण्यात येत आहे. यामध्ये मुख्यालयासह  रांजणीजि. सांगली महूदजि. सोलापूरदहिवडीजि. सातारा ,पडेगावजि. छत्रपती संभाजीनगरबिलाखेडजि. जळगांवअंबेजोगाईजि. बीड तीर्थजि. धाराशिवमुखेडजि. नांदेडबोंद्रीजि. नागपूर पोहराजि. अमरावती प्रक्षेत्रचा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व विकासकामांचा समावेश केला आहे.

            महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होणाऱ्या लोकरीवरती प्रक्रिया करून त्यापासून विविध लोकर वस्तू तयार करण्यासाठी लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन करून यामधून मेंढपाळांना रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे. त्यासाठी केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करून प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            मेंढपाळांची भटकंती थांबून त्यांना एका ठिकाणी स्थिर करून त्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती करण्यासाठी भागीदारी तत्त्वावर पोहरा (जि.अमरावती) येथील प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी चा प्रायोगिक तत्त्वावरचा प्रकल्प राबवण्यासंदर्भात बैठकीमध्ये निर्देश श्री. विखे- पाटील यांनी दिले.

            राज्यामध्ये बहुतांश मेंढपाळ हे भटकंती करून आपला व्यवसाय करतात. अपुरे  कुरण क्षेत्र व पडीक जमीन यामुळे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्यामुळे चराऊ कुरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल विभाग व वन विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक

 वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी

ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबई,दि.२० : समाजमाध्यमांचा वाढता वापरबदललेली जीवनशैली यामध्ये सुद्धा ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचनसंस्कृती ही ग्रंथालयांमुळेच टिकून आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

            शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पाटकर सभागृहएसएनडीटी महिला विद्यापीठ येथे झाला.

            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उपसचिव प्रताप लुबाळग्रंथालय संचालकअशोक गाडेकर,राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार, ज्येष्ठ पत्रकार  कुमार केतकर आदी उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींना रोख रक्कमसन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणालेग्रंथालयांना आर्थिक सहाय्य योग्य पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर नवीन पिढी ग्रंथालयाकडे जात नसेल तर नवनवीन प्रयोग करून त्यांच्यापर्यंत ग्रंथालय आणणे गरजेचे आहे.  फिरते वाचनालयई वाचनालय अशा विविध पद्धतीने लोकांपर्यंत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय संचालनालय काम करीत आहे. सर्वांनी मिळून ग्रंथालय, वाचनालयाचा आत्मा समजून घेऊन ग्रंथालयाची चळवळ विकसित करण्याची गरज आहे.

            प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले कीमहाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ खूप मोठी आहे. ही चळवळ बळकट होऊन वाचकांना अधिक चांगली सेवा चळवळी मार्फत देण्यात यावी. ग्रंथालयाच्या आस्थापनांनी ग्रंथालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातही आधुनिक तंत्रज्ञाननवीन पिढीची आवड ओळखून काम करावे. पुस्तके सहज उपलब्ध होण्यासाठी  डिजिटल तसेच ई-लायब्ररी करण्याकडे अधिक  भर देण्यात यावा. ग्रंथालयातील पुस्तकेसोयीसुविधा आणि परिसर यात सुधारणा कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग

१)  हिंद नगर वाचनालय व ग्रंथालयरहिमतपूर ता. कोरेगावजि. सातारा ( पुरस्काराची रक्कम रु. १ लाख)

२) विवेकानंद सार्वजनिक वाचनालयनांदुराश्री. शिवाजी महाराज पुतळ्याजवळबुलढाणा रोडनांदुरा जि. बुलढाणा (पुरस्काराची रक्कम रु. ७५ हजार)

*ग्रामीण विभाग* :

(अ)  १) शहीद भगतसिंग वाचनालयकुऱ्हामु.पो. कुऱ्हा ता. तिवसा जि. अमरावती (पुरस्काराची रक्कम १ लाख रु.)

(आ)     संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयभिडी ता. देवळी, जि. वर्धा (७५ हजार रु.)

(इ)       कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयबोरीता. जिंतूर जि. परभणी (५० हजार रुपये)

(ई)       कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालयबिरोबा मंदिराजवळकोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर (२५ हजार रु.)

(ब) डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. ५० हजार प्रत्येकी)

राज्यस्तरीय पुरस्कार

१) राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

श्री. विनायक दत्तात्रय गोखलेअनंत आनंद को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीआनंद पार्कठाणे (प) मराठी ग्रंथसंग्रहालयठाणे

२) राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

श्री. सुरेश बळिराम जोशीग्रंथपालविजय वाचनालयता. तुळजापूर जि. धाराशिव

 

डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती -  विनोद बाळकृष्ण मुंदेश्री. सरस्वती सार्वजनिक वाचनालयराजना पो. काजना ता. नांदगाव खंडेजि. अमरावती

२) छत्रपती संभाजीनगर -  युवराज मोहनराव जाधवलोकमान्य सार्वजनिक वाचनालयशिवणी (खुर्द)पो. शिवणी (बु.). ता.जि. लातूर

३) नागपूर -  धनराज देवीलाल रहांगडालेश्री. शारदा वाचनालयगोंदिया जि. गोंदिया

४) नाशिक -  गोपीचंद जगन्नाथ पगारेमातृभूमी प्रबोधन समिती संचलित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयजेल रोडनाशिक जि. नाशिक

५) पुणे - ज्योत्स्ना चंद्रशेखर कोल्हटकरश्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयभवानी पेठसातारा जि. सातारा

६) मुंबई - अनंत आपाजी वैद्यरा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालयकुडाळजि. सिंधुदुर्ग

डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती - ज्योती रामदास सरदार (धबाले)ग्रंथपालसानेगुरुजी वाचनालयजठार पेठअकोलाजि. अकोला

२) छत्रपती संभाजीनगर - गणेश रामभाऊ शेंडगेग्रंथपालए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालयता. जि. बीड

३) नागपूर - नंदू दामोदर बनसोडग्रंथपालदादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालयमहालता.जि. नागपूर

४) नाशिक -  अमोल संभाजी इथापेग्रंथपाल, अहमदनगर जिल्हा वाचनालयचितळे रोडअहमदनगर जि. अहमदनगर

५) पुणे - भगवान पांडुरंग शेवडेग्रंथपाल, श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयमांगलेता.शिराळाजि. सांगली

६) मुंबई - मंजिरी अनिल वैद्यग्रंथपालश्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालयविलेपार्ले (पूर्व) मुंबई.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

 


 

Featured post

Lakshvedhi