Wednesday, 21 August 2024

बोंडअळीसह किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर - कृषी मंत्री धनंजय मुंडे विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे दिले निर्देश

 बोंडअळीसह किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

कृषी विभाग ॲक्शन मोडवर

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

विविध उपाययोजना तातडीने राबवण्याचे दिले निर्देश

 

            मुंबई, दि २० : राज्यात काही ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कापशीवर बोंडअळी व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याचे उघड झाले. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.

            कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी याबाबत आज तातडीने विभागाची बैठक घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी तयार केलेले सोलार लाईट ट्रॅप बाधित शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. हे लाईट ट्रॅप बोंड आळीचे व अन्य किडींचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले आहेत. तसेच फेरामाईन ट्रॅप व कृषी विद्यापीठाने सुचवलेल्या वेगवेगळ्या फवारण्या आदी बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे निर्देश दिले.

            याबाबत आयुक्तस्तरावरून व कृषी विद्यापीठाचे तज्ञांचे यांची एक संयुक्त पथक करून दैनंदिन आढावा घेण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी दिले आहेत.

            या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोजकृषी आयुक्त रवींद्र बिनवडेकृषी संचालक विनयकुमार आवटेत्याचबरोबर चारही कृषी विद्यापीठातील या विषयाचे तज्ञ यांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

दक्षता


 

*आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो* 1)

 🌸🌼🌸

 *आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो*

1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या.

2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या.

3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा.

4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या.

5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या.

6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या.

7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा.

8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.

9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा.

10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.

काही आजार नसला तरी

अनुलोमीलम 15 मी

कपालभाती 15 मी

सुर्यनमस्कार 12 आर्वतन

रोज करा

आरोग्य संवाद

स्वतः साठी एवढं तरी करा

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.

२) भरपूर टाळ्या वाजवा.

३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.

४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )

५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.

६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )

७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.

८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.

९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.

१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.

११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.

१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.

१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.

१४) चौरस आहार घ्या.

१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.

१६) Black Tea च प्या.

१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.

१८) ध्यानधारणा करा.

१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.

२०) सत्य बोला. समाजसेवा करा.

२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.

२२) *नैसर्गिक जीवन जगा.*

२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.

२४) पोट साफ ठेवणे.

२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.

*आरोग्य संदेश*

सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट,

हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक


केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

*उपाय*

कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.

किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

कंबर दुखी

*उपाय*

१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.

२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.

३) गरम पाण्याने शेक द्या.

४) हलका मसाज करा.

५) बर्फाने शेकवा.

६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.

७) नियमित प्राणायाम करा.

८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.

९) विश्रांति घ्या.

१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.

११) पोट साफ राहू द्या.

१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.

१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.

आरोग्य संदेश

व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,

माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.

मान दुखी - - - - -

कारणे -----

जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.

*उपाय -----*

१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )

२) हळद + चंदन लेप द्या.

३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरेल तेल लावा.

४) कोमटच पाणी प्या.

५) सुंठ उगाळून लेप द्या.

६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखून धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किंवा हाताने हलकेसे माँलिश करा.

७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.

८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.

९) वरील योग्य तेच उपाय करा.

आरोग्य संदेश

निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.

गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.

|| ध्यान (Meditation) ||*

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे !

त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !

ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

ध्यानाचे फायदे

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.

ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !

ताबडतोब बरे होणे

सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते.

🌸💥🌸💥🌸💥🌸💥🌸

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राज्यभरातून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन

 राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनपशु प्रदर्शनधान्य महोत्सवचर्चासत्रेप्रात्यक्षिकेरानभाज्या महोत्सवशेतकऱ्यांचा सन्मानयशोगाथाउत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम

राज्यभरातून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन

स्वागतासाठी परळी वैद्यनाथ नगरी सज्ज!

 

            मुंबई दि. 20 : परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्रीकेंद्रीय कृषी मंत्री व मान्यवरांच्या हस्ते बुधवारी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

            याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहेत.

            21 ते 25 ऑगस्ट असे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे आयोजन करण्यात आले असुनपरळी व बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होते आहे. या महोत्सवाचे आज दुपारी 1 वाजता दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

            परळी वैद्यनाथ नगरीमध्ये प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहानउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेमंत्री अब्दुल सत्तारमंत्री तानाजी सावंतमंत्री अतुल सावेखासदार सुनील तटकरेराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलआ.पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील व बीड जिल्ह्यातील मान्यवर आमदारखासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

            21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपामध्ये या कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार असूनकृषी प्रदर्शनाच्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली द्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.

            या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसीय भव्य असे कृषी प्रदर्शनपशुप्रदर्शनधान्य महोत्सवचर्चासत्रे व संवादविविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिकेरानभाज्या महोत्सवयशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान व त्यांच्या यशोगाथात्याचबरोबर महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्रीशेतीतील वेगवेगळ्या उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीड्रोन फवारणीची प्रात्यक्षिकेयांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या असंख्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यांची दालनेभाजीपाला महोत्सवशेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांची थेट विक्रीकृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची प्रात्यक्षिके यांसारखे अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहेत. यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने जय्यत तयारी केली असून भव्य वॉटरप्रूफ सभामंडपचर्चा सत्र व अन्य कार्यक्रमांसाठी आणखी मंडपआसन व्यवस्थात्याचबरोबर विक्रेत्यांसाठी शेकडो वॉटरप्रूफ स्टॉल्स यासह वाहन पार्किंगभोजन आदी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान या कृषी महोत्सवात राज्यभरातून शेतकरी तसेच शेती विषयी आवड असणारे नागरिक सहभागी होणार असून त्यांच्या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी संपूर्ण परळी वैद्यनाथ नगरी सज्ज झाली आहे.

            दरम्यान बीड जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांसह शेतकरी बांधवांना अनेक प्रकारचे लाभदायक मार्गदर्शन मिळणार असून ही शेतकऱ्यांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे  तरी राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

प्रत्येक व्यक्ति के लिए आवश्यक नम्बरो की सूची। सभी नम्बर टोल फ्री*

 *प्रत्येक व्यक्ति के लिए आवश्यक  नम्बरो की सूची। सभी नम्बर टोल  फ्री*

_________________________

C M शिकायत पोर्टल         181

विद्युत सेवा                     1912

पशु सेवा                        1962

पुलिस सेवा               112,100

अग्नि  सेवा                       101

एमबुलैस  सेवा                  102

यातायात  पुलिस               103

आपदा  प्रबंधन                  108

चाइल्ड लाइन                 1098

रेलवे  पूछताछ                   139

भ्रष्टाचार  विरोधी             1031

रेल  दुर्घटना                    1072

सड़क  दुर्घटना                1073

सी एम सहायता लाइन     1076

क्राइम  सटायर                1090

महिला  सहायता  लाइन    1091

पृथ्वी  भूकम्प                  1092

बाल शोषण  सहायता       1098

किसान  काल  सेन्टर        1551

नागरिक  काल  सेन्टर  155300

ब्लड बैंक         9480044444


धन्यवाद 🙏

Tuesday, 20 August 2024

शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांची कार्यवाही तत्परतेने करावी

  

शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांची कार्यवाही तत्परतेने करावी

-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

 

            मुंबई, दि. २० : शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांच्या निविदा प्रक्रिया येत्या महिनाअखेर पूर्ण कराव्यात तसेच विहित कालमर्यादेत या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.

            शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकरसचिव सदाशिव साळुंखेसचिव संजय  दशपुते यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी  अमरावतीनागपूर नाशिकपुणेनांदेड छत्रपती संभाजीनगरमुंबईरत्नागिरीकोकणठाणेविक्रमगडपेण या ठिकाणच्या मुख्य अभियंतासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांच्या संदर्भात सद्यस्थितीचा आढावा घेऊन मंत्री श्री. चव्हाण यांनी या महिनाखेर सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत पुढील कार्यवाही तत्परतेने करुन शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीचे बांधकाम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचित केले.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले की,  शासकीय तंत्रनिकेतन मधील पदविकाधारक विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच बाहेरही मागणी वाढत असून रोजगाराच्या  संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन मधून प्राप्त होणा-या कौशल्याची  उपयुक्तता आणि महत्त्व  विशेष  उपक्रमाद्वारे  उच्च शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहचवले आहेत्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम हे दर्जेदार करण्याची  खबरदारी  सर्व  संबंधितांनी  घ्यावीसुविधायुक्त तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या व्यापक उद्देशाने सर्वांनी कार्यवाही करावीअसे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

 

          मुंबईदि. 20 : लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

            लोणारी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरेइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल व अखिल भारतीय लोणारी  समाज संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

            लोणारी समाजातील बांधवाच्या सर्वांगिण विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक विकास महामंडळासोबत लोणारी समाजाच्या मुला-मुलींसाठी नवी मुंबई किंवा पुण्यामध्ये वसतिगृह सुरू करावेलोणारी समाजाचे विष्णूपंत दादरे यांचे सांगोला तालुक्यात स्मारक उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या इतर विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

            रामोशीवडारगुरवलिंगायतनाभिकसुतारविणकर या समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून लोणारी समाजासाठीचे महामंडळ लवकरच होईल. राज्यातील इतर मागास  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू केली असून या वसतिगृहाचा तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचाही लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi