Thursday, 15 August 2024

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविणार अधिकाधिक मंडळांनी 31 ऑगस्टपूर्वी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविणार 

 अधिकाधिक मंडळांनी 31 ऑगस्टपूर्वी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 15: राज्यात गणेश उत्सवास दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  राज्यातील पहिल्या तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करावेतअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

            या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग 2 वर्षे राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत.  त्यामुळे अधिकाधिक नवीन मंडळांना संधी मिळणार असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

            या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,  मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई मेल आयडीवर 31 ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करावेतअसे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रमस्पर्धांचे आयोजनसंस्कृतीचे जतन संवर्धनराज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धनराष्ट्रीय/राज्य स्मारकेधार्मिक स्थळांविषयी जनजागृतीजतन व संवर्धनसामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरणपारंपरिक/ देशी खेळांच्या स्पर्धा आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या  प्राथमिक सुविधा आदी बाबींवर गणेशोत्सव मंडळांना गुणांकन दिले जाणार आहे.

            विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवायशासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. ही निवड समिती प्रत्यक्ष मंडळांना भेटी देतील. सदर जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरीय समिती असेल.

000

पर्यावरणपूरक महाराष्ट्र करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे

 पर्यावरणपूरक महाराष्ट्र करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे

                                                                    -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


            मुंबईदि. 15 :- ग्लोबल वार्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी
 पर्यावरण रक्षण महत्वाचे आहे. आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरण पूरक महाराष्ट्र करावयाचा आहे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            सेव्ह मुंबई (Save Mumbai) कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा व द ॲड्रेस सोसायटीच्या वतीने अडीच एकर क्षेत्रफळावरील "मानव निर्मित जंगलाचे लोकार्पण"  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते. कार्यक्रमास कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राम कदम, आमदार दिलीप लांडे यांच्यासह  ॲड्रेस सोसायटीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेस्वातंत्र्य दिनी घाटकोपर येथील  ॲड्रेस हाऊसिंग सोसायटीने त्यांच्या सोसायटीच्या  परिसरात अर्बन फॉरेस्ट निर्माण करून पर्यावरण रक्षणात केलेले काम अतुलनीय आहे. या सोसायटीचा आदर्श मुंबईतील अन्य सोसायटीनी घ्यावा. मुंबईत ज्या सोसायटी त्यांच्या परिसरात अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबवतील त्यांना  महापालिकेच्या सोसायटी करामध्ये सवलत देण्याबाबत विचार केला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेपर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “एक पेड़ माँ के नाम अभियान सुरू केले आहे.  या अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात वृक्ष लागवडीची जनचळवळ सुरू करूया. अर्बन फॉरेस्ट ऑक्सीजन पार्क असल्याने जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करण्यात सहभाग घ्यावा. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. बृहन्मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनेही त्यांच्या रिकाम्या असणाऱ्या जागेत अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात पुढाकार घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. प्रदूषणमुक्त  राज्य करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. राज्यात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत असून जवळपास 21 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवले असल्याचे ते म्हणाले.

            आपले राज्य विकासाच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असून विकासाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरू ठेवायची असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी

 राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा

गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत

कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि.१४ : राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथकरुग्णवाहिकाअग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.

            सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसकरमुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढामहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदममुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेपोलिस महासंचालक रश्मी शुक्लामुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकरउर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकरपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहापालिका आयुक्तपोलिस आयुक्तजिल्हा पोलिस प्रमुख यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेराज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराने बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईलअसे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तजिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथकरुग्णवाहिकाअग्निशमन वाहन तैनात करावेत.

            महापालिकांनी गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नयेअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावीअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावाअसे आवाहन मुख्यमंत्री. श्री. शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहापालिका आयुक्तपोलिस प्रमुख तसेच विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना ‘हर घर तिरंगा’ मोहिम यशस्वी करण्याचे आवाहनही केले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकरसार्वजनिक गणेशोत्सव महासंघसार्वजनिक गणेशोत्सव एकत्रितमूर्तीकारांचे प्रतिनिधीपर्यावरणपूरक सजावट उत्सवी संस्थेचे शाम शेंडकर आदी उपस्थित होते.

००००


 

Wednesday, 14 August 2024

कृषिमंत्री धनंजय मुंडें यांच्या नेतृत्वात विभागाचे सूक्ष्म नियोजन; 28 जिल्ह्यात 250 मे.टन मेटाल्डिहाईडचा पुरवठा, गोगलगायीमुळे होणारे संकट टळले

 कृषिमंत्री धनंजय मुंडें यांच्या नेतृत्वात विभागाचे सूक्ष्म नियोजन;

28 जिल्ह्यात 250 मे.टन मेटाल्डिहाईडचा पुरवठागोगलगायीमुळे होणारे संकट टळले

 

            मुंबई दि. 14: - 2022 व 2023 च्या खरीप हंगामामध्ये गोगलगायींनी पिकांच्या केलेल्या नुकसानाच्या अनुषंगाने यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे फलित म्हणून यावर्षी गोगलगायीचे संकट पूर्णतः नियंत्रणात आले आहे.

            सन 2022 आणि 2023 या वर्षात राज्यामध्ये बहुतांशी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेती पिकाचे आणि फळ पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये बीडधाराशिवलातूरबुलढाणायवतमाळ  आदी जिह्यांमध्ये नुकसानाचे प्रमाण अधिक होते. इतरही बऱ्याच जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले होते.

            लातूरबीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये 33 टक्के पेक्षा जास्त शेत पिकाचे आणि फळ पिकाचे नुकसान झालेत्यांचे क्षेत्र 72,490 हेक्टर होते तर नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांची संख्या 129,596 इतकी होती.

            राज्यामध्ये गोगलगायीमुळे नुकसान होण्याची समस्या साधी होती. परंतु अलीकडील काही वर्षांमध्ये ही समस्या प्रमुख होत गेली. या बाबीची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आणि कृषी विभागाने याची दखल घेत राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी प्रकल्पाअंतर्गत राज्याच्या 28 जिह्यांमध्ये 250 मे.टन मेटाल्डिहाईड या गोगलगाय नाशकाचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये या बाबीची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून 2024 च्या खरीप हंगामामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव पूर्ण नियंत्रणात आणला गेला.

            यावर्षीच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली असून गोगलगायीचा प्रादुर्भाव नगण्य असून राज्यामध्ये कृषि मालाचे उत्पादन उच्चांकी असेल अशी भावना शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे. राज्यातील आणि विशेष करून लातूरबीडधाराशिव आदी जिल्ह्यातील अनेक  शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.

स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर दिग्दर्शक एन. चंद्रा आणि दिग्पाल लांजेकर विशेष योगदान पुरस्काराचे मानकरी

  

स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर

दिग्दर्शक एन. चंद्रा आणि दिग्पाल लांजेकर विशेष योगदान पुरस्काराचे मानकरी

 

            मुंबईदि. १४:  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ चा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखकदिग्दर्शकसंकलक एन.चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखकदिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली असून दिनांक २१ ऑगस्ट रोजी एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

 

            स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाखमानपत्र व मानचिन्ह असे असून  स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाखमानपत्र व मानचिन्ह असे आहे.  चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाखमानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाखमानपत्र व मानचिन्ह असे आहे.

 

            ‘राज्याचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करणाऱ्या या कलाकारांचा सर्वांना अभिमान आहे.  त्यांना पुरस्कार जाहीर करतांना मनापासून आनंद होत आहे. हे सर्वजण सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव अधिकाधिक उंचावत राहतील’अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन केले. 

 

            दरम्यानपुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार२१ ऑगस्ट २०२४ रोजीसायंकाळी ७ वाजता एनएससीआय (NSCI) डोमवरळी मुंबई येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

 महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना  अग्निशमन सेवा पदक

तर पाच कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदक’ प्रदान

 

            नवी दिल्ली14 : 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

            उल्लेखनीय सेवांसाठी राष्ट्रपती पदक’ तसेच शौर्य पदक’ आणि उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवानागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2024 साठी 59 जवानांना अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

            शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल संतोष श्रीधर वॉरिकमुख्य अग्निशमन अधिकारी यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीं पदक तर पाच जवानांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आला.

            देशभरातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 4 कर्मचाऱ्यांनाउल्लेखनीय सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक’ आणि 55 कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

            देशातील 14 कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘ ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 3 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 11 कर्मचारी, स्वयंसेवकांना पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी नागरी संरक्षण पदक’ प्रदान झाली.

राज्यातील अग्निशमन सेवा पदके’ आणि  नागरी संरक्षण पदक’ प्राप्त अधिका-यांची नावे-

            विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अग्निसेवा पदक - संतोष श्रीधर वॉरिकमुख्य अग्निशमन अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- अग्निसेवा पदक

            किशोर ज्ञानदेव घाडीगावकरविभागीय अग्निशमन अधिकारीअनंत भिवाजी धोत्रेउप अधिकारीमोहन वासुदेव तोस्करआघाडीचे फायरमनमुकेश केशव काटेलीडिंग फायरमन आणि किरण रजनीकांत हत्यालअग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे.

            विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम)- नागरी संरक्षण पदक अशोक बोवाजी ओलंबाहवालदार यांना प्रदान करण्यात आले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- )- नागरी संरक्षण पदक

            नितीन भालचंद्र वयचलप्राचार्यशिवाजी पांडुरंग जाधवजेलर ग्रुप-1दीपक सूर्याजी सावंतसुभेदार आणि जनार्दन गोविंद वाघहवालदार यांचा समावेश आहे.

सिन्नर ‘एमआयडीसी’तील समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला सविस्तर आढावा मुसळगाव औद्योगिक वसाहतीत शंभर बेडचे कामगार हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 सिन्नर एमआयडीसीतील समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला सविस्तर आढावा

मुसळगाव औद्योगिक वसाहतीत शंभर बेडचे कामगार हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 14 : नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्स’ प्रकल्पाकरिता संपादित जमिनीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीच्या सातबाऱ्यांवरील कर्जाचे बोजे दि.31 ऑगस्टपर्यंत हटवून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. त्याचबरोबर सिन्नर एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

            महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत (व्हिसीद्वारे)आमदार ॲङ माणिकराव कोकाटेआमदार राजू कारेमोरेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवराप्रधान सचिव सौरभ विजयउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मामहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे डॉ. अविनाश ढाकणेनाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (व्हिसीद्वारे) उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीउद्योगांना चालना देण्यासाठी माळेगाव व मुसळगाव लिंक रोड लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. हा रस्ता सिन्नर शहराच्या पूर्व व पश्चिमेस असलेल्या दोन औद्योगिक वसाहतींसह रतन इंडिया प्रकल्पाला जोडणार आहे. या रस्त्याकरिता नगरपालिकेने जागा संपादित करुन ती एमआयडीसीला वर्ग करावी. या रस्त्याचे काम एमआयडीसीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत पाच एकर क्षेत्रात शंभर बेडच्या हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी ई.एस.आय.सी.ला तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006’ या कायद्यात सुधारणा झाल्याने तसेच रेडी रेकनरच्या दरानुसार त्याची आकारणी करण्यात येत असल्याने फायर चार्जेसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हे दर उद्योजकांना परवडत नसल्याने फायर चार्जेस दर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयडीसीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याचप्रमाणेसिन्नर औद्योगिक क्षेत्रात बहुतांश अभियांत्रिकी व त्यासंलग्न उद्योग कार्यान्वित आहेत. या उद्योगामुळे रसायनयुक्त सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या क्षेत्रातील सर्व उद्योजकांनी एकत्रित येऊन सामाईक ईटीपी प्रकल्पाची उभारणी करावी. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi