Saturday, 10 August 2024

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रकमेचे वाटप पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत

सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रकमेचे वाटप

पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

               मुंबईदि. 9 : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्रया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावेअसे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावेअसे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

            पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली. सन 2017-18सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.

            या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दातेपगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

            पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.

000

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई दि 9 :- ०७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयातील परिशिष्ट "अ" मधील विहित नमुन्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेस्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि.३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            सन २०२४ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील.

            जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून ३ गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व्हिडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालकपु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांचेकडे सादर करतील. निकालाचा दिनांकसर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागमंत्रालय यांच्याकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

----

सामाजिक न्यायाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३,१०,१८६ अर्ज मंजूर

 सामाजिक न्यायाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३,१०,१८६ अर्ज मंजूर

 

            मुंबई, दि 9 :- राज्य शासनाने राज्यातील महिलायुवक-युवती,ज्येष्ठ नागरिकदिव्यांगकष्टकरीशेतकरीशेतमजूर यांना दिलासा देण्यासाठी  सामाजिक न्यायाच्या विविध योजना सुरु केल्या असून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर जिल्ह्यात या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी करण्यात येत असून या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाने जाहिर केलेल्या सर्व माध्यमांवर व जाहिरातींमधून या योजनांचे निकष व लाभ याबाबत माहिती घेण्याचे आवाहनही मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३,८४,८४३ अर्ज प्राप्त, मंजूर अर्ज - ३,१०,१८६, फेरतपासणीसाठी पाठविलेले अर्ज - ७१,४५९नामंजूर अर्ज - ११५० आहेत.

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत नवीन नोंदणी झालेल्या आस्थापना शासकीय - ३६खाजगी - २८आतापर्यंत अधिसूचित झालेली रिक्त पदे २७४१शासकीय - ४०५खाजगी - २३३६ऑनलाईन अर्ज केलेले उमेदवार २६३८अंतिमतः निवड झालेल्या उमेदवारांची संख्या- शासकीय - ११खाजगी – ३००, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेत अर्ज वाटप - १०००. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज वाटप - १५००प्राप्त अर्ज - १६३वैध अर्ज - ९९इतर जिल्हयातील – ६४ असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

-----000-----

Friday, 9 August 2024

मुंबई शहर व उपनगरमधील महाविद्यालयांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जाची प्रक्रिया तातडीने करण्याचे आवाहन

 मुंबई शहर व उपनगरमधील महाविद्यालयांनी

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जाची प्रक्रिया तातडीने करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ८ : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्विकृती दि. २५ जुलै २०२४  पासून सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहर/ उपनगरमधील अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेल्या अर्जाबाबत पुढील प्रक्रिया करावीअसे आवाहन मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

            मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर नोंदणीकृत झालेले अर्ज ऑनलाईन मंजूर करावेत. दरवर्षी प्रमाणे नोंदणीकृत झालेल्या अर्जापैकी नूतनीकरण अर्जाचे प्रमाण नवीन अर्जाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरील नुतनीकरणाचे अर्ज प्रथम प्राधान्याने पडताळणी करुन ऑनलाईन मंजूर करुन संबधित सहायक आयुक्तसमाज कल्याण, ( मुंबई शहर/उपनगर) यांच्या लॉगीनकरिता तात्काळ पाठवावेत. तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीयांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावीअसे श्री.खैरनार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्यावी

 भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्यावी

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. ८ :-  अमृत योजनेतून  भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात.  या योजनेतून पाणी पुरवठा लवकर  सुरू होण्यासाठी  योजनेच्या कामांना गती द्यावीअशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार संजय सावकारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली.  बैठकीस आमदार श्री. सावकारेऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लाकामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीस जिल्हाधिकारी जळगाव दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  पाणी पुरवठा योजनाची कामे वेगाने पूर्ण होणे महत्वाचे आहे.  यासाठी संबधित  यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी. भुसावळ शहराला पाणी पुरवठा योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांनी बैठकीचे आयोजन करून याबाबत आढावा घ्यावा. बैठकीत वरणगाव पाणी  पुरवठा योजनेबाबातही चर्चा करण्यात आली. संबधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

            जळगाव महानगरपालिका व वरणगाव नगरपंचायत क्षेत्रातील सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पाबाबत महाजनकोसमवेत तातडीने सामंजस्य करार करावाअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र विद्युत निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबतही चर्चा यावेळी करण्यात आली

भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा विचार

 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून


भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा विचार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. ८ :- भिल्ल समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, अपर आयुक्त सुदर्शन नगरे, निलेश अहिरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भिल्ल समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेचा लक्षांक वाढवून अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.


            भडगाव (जि.जळगाव) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. तसेच भगवान वीर एकलव्य यांचे मंदिर तसेच पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ केली जाईल,असे ते म्हणाले.

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे

 राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घरोघरी तिरंगा अभियानाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 

            मुंबई दि.८- राज्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करुन घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय. एस. चहलविकास खारगेमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरापरिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीजलसंपदा विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेकी घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसहमॅरेथॉनसांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे. या अभियानात व्यापक जनसहभाग वाढण्यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून जनजागृती करावी. सोबतच घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करुन द्यावा याकरिता जिल्हास्तरावर नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्यातील प्रमुख धरणांसह मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरळी सी लिंकगेटवे ऑफ इंडिया यासारख्या महत्वाच्या ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात यावीअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.खारगे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत सादरीकरण केले.

Featured post

Lakshvedhi