Friday, 9 August 2024

घरोघरी तिरंगा अभियान' आता

'घरोघरी तिरंगा अभियान' आता लोकचळवळ -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई, दि. 9 : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव ‘घरोघरी तिरंगा अभियान‘ आपल्याला सतत करून देईल. घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल, कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंद राज, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी व अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची यावेळी उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत 1942 रोजी याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून चले जाव चा नारा देण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्यासाठीचे हे आंदोलन अधिक व्यापक झाले. लाखो जणांनी आपले प्राण या देशासाठी अर्पण केले. या देशप्रेमाची, शहिदांच्या बलिदानाची आठवण आणि शहीद वीरांप्रती कृतज्ञता म्हणून आपण देशभरात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मीयता निर्माण करत आहोत. मागील दोन वर्षात राज्यात घरोघरी तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे. अधिक उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करून राज्यभरात देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि देशप्रेमाचा सुगंध वाहणार आहे. या अभियानात गावागावात, शहरात रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचे काम राज्य शासन करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत विविध पदक मिळवून तिरंगा फडकवला, याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. आपल्या राज्याच्या स्वप्नील कुसाळे यांच्यासह नीरज चोप्रा, मनू भाकर, हॉकी संघाने पदक पटकावले. ही खरोखरच अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले. प्रास्ताविकात अपर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले की, देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबविले जात आहे. राज्यातही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे केले जात आहे. या अभियानात मागील दोन वर्षा प्रमाणेच आपले राज्य आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन केले. कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लाथॉन यात्रेस यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिरंगा कॅनव्हास वर स्वाक्षरी केली आणि त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

Friday, 2 August 2024

महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

 महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

·       मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महसूल पंधरवड्याचे आयोजन

 

            मुंबईदि. १ : नैसर्गिक आपत्ती असो की निवडणूक प्रत्येक उपक्रमात महसूल विभागाचा सक्रिय सहभाग असतो. महसूल विभाग हा गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत आहे. महसूल विभाग अन्य विभागांचा मार्गदर्शक आहेअशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महसूल विभागाचा गौरव केला.

            महसूल पंधरवडा व महसूल दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादवनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी उपस्थित होते. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते महसूल योजनांची माहिती असलेल्या डिजिटल पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध दाखल्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

            ॲड. नार्वेकर म्हणाले कीमहसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी जवळचा संबंध आहे. या विभागाने नागरिकांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्पर्श केला आहे. पोलिसपाटील यांच्यापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच अधिकारी व कर्मचारी नेहमीच परिश्रमपूर्वक कामकाज करतात. त्यामुळे शासनाच्या विविध योजना यशस्वी होत आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावीअसेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले कीमहसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. याबाबत जनजागृतीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

            वैभव पांगम यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी आभार मानले. यावेळी महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

 छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले

जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

 

            मुंबईदि. 1: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा  ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे  करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले नक्कीच जागतिक वारसा यादीत समाविष्ट होतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारकौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढाजागतिक वारसा समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेभारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महानिदेशक डॉ. जान्विज शर्माभारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मीअधीक्षक शुभा मुजुमदारसांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊतराज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले आदींची यावेळी उपस्थिती होती.

            जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश या वैशिष्ट्यपूर्ण वारशाचा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील साल्हेरशिवनेरीलोहगडरायगडसुवर्णदुर्गपन्हाळाविजयदुर्गसिंधुदुर्गखांदेरीराजगडप्रतापगड हे 11 आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा 12 किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 गड किल्ले जागतिक वारसा नामांकन प्रक्रियेसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय पुरातत्व विभाग यांचे विशेष धन्यवाद मानले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य महापुरुष होते. स्वराज्याची निर्मिती करून त्यांनी एक जाज्वल्य असा इतिहास निर्माण केला. त्यांच्या काळात झालेल्या गड किल्ल्याची निर्मिती ही त्यांची दूरदृष्टी दाखवून देते. जलदुर्गाची निर्मिती करुन त्यांनी स्वराज्य संरक्षणासाठी किती जागरुकता हवीहे त्याकाळी दाखवून दिले. शत्रुला नामोहरम करण्यासाठी त्यावेळचे तंत्रज्ञानवास्तू शास्त्र  यांचा अप्रतिम आविष्कार त्यांनी दाखविला. शिवकालीन हे किल्ले पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आजही हे किल्ले मजबूत स्थितीत आहेत. येथील कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी आहेत. हा इतिहास आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. तो आपण जपत आहोत. त्याला जागतिक पातळीवर नेण्याची संधी आपल्याला मिळाली आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्यनीतीगनिमी कावा सर्वांना अभिमानास्पद

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीमहाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्यनीतीगनिमी कावा हे आजही अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने येथील गड किल्ल्यांच्या डागडुजी आणि सुधारणासाठी प्रयत्न केले. हा वारसा जपण्यासाठी अधिक निधी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या साहाय्याने या गड किल्ल्यांना अधिक चांगले रुप देऊन सर्वांना प्रेरणा देणारा इतिहास प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.  सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयातून निश्चितपणे जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश होईलअसे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यांचे पावित्र्य जपले जावेयासाठी तेथे मद्यपान करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य शासन लवकरच आणणार असल्याची माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

गड किल्ल्यांशी भावनिक ओढ हे येथील वेगळेपण- विशाल शर्मा

             जागतिक वारसा केंद्र समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. शर्मा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक वारसा यादीत नोंद ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक देश हे जागतिक पातळीवर त्यांच्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची  नोंद व्हावीयासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अधिक सकारात्मक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले आणि तेथील इतिहास हा युनेस्कोच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचला पाहिजे. येथील गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नागरिकांची भावना ही त्याच्याशी जोडली गेली आहे. जगात इतरत्र कुठे असे पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही बाब अतिशय सकारात्मक परिणाम करणारी ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक वारसा केंद्र समितीचे अधिवेशन पहिल्यांदा भारतात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

           येथील गड किल्लेत्यांच्या संरक्षणासाठीचे प्रयत्नतेथे सध्या कशा प्रकारे व्यवस्थापन केले जात आहेस्थानिक नागरिकांचा सहभाग कसा आहे याबाबीही महत्वपूर्ण असल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले. ज्यावेळी या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राचे प्रतिनिधी भेट देतीलत्यावेळी ही बाब प्रकर्षाने पाहिली जाईल. त्यामुळे या गडकिल्ल्यांबाबत सर्वसामान्यांसह शाळामहाविद्यालयेविदयापीठे यामध्ये अधिक व्यापक जनजागृती करावी. गेल्या 10 वर्षात देशातील 13 स्थळांची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झाली. त्यामुळे कमी कालावधीत उत्कृष्ट काम करुन निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे गड किल्ले जागतिक वारसा म्हणून ओळखले जातीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

             यावेळी डॉ. शिखा जैन यांनी जागतिक वारसा नामांकनासाठी हे गडकिल्ले निवडण्यामागे त्यांचे वेगळेपण असल्याचे नमूद केले. तसेचजागतिक वारसा नामांकनानंतर केंद्र शासनाचा पुरातत्व विभाग आणि राज्य शासन यांच्या मदतीने यासाठीचे सादरीकरण कशा प्रकारे करता येईलयाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.डॉ. जान्विज शर्मा यांनी जागतिक वारसा यादीत या गड किल्ल्यांचा समावेश व्हावायासाठी काम सुरु केले असलल्याचे सांगितले.

            सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने यापूर्वीच कामाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. राज्याने महावारसा समिती स्थापन करुन गड किल्ले विकासासाठी राज्य स्तरजिल्हा स्तर आणि प्रत्यक्ष संबंधित गड किल्ले याठिकाणी अशा समिती स्थापन केल्या आहेत. त्यानुसार काम सुरु आहे. याशिवायआता जागतिक वारसा नामांकनानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले. जागतिक वारसा नामांकनाबाबत अधिक जनजागृती व्हावीयासाठी विद्यार्थीयुवा यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून सर्वांचा सहभाग निश्चितपणे वाढविण्यात येईलअसे त्यांनी स्पष्ट केले. 

000

दीपक चव्हाण/विसंअ

श्री सप्तशृंगी निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य*

 *श्री सप्तशृंगी निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य*


1 गडावर साग ,काग,नाग दिसत नाही गडाच्या आजुबाजुला भरपुर सागाची झाडे असुन सुध्दा

जंगल परीसर आहे तरी नाग दिसत नाही

आणि कावळयाचे दर्शन फार दुर्मीळ


2 देवी मध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मिका आहेत

ह्या मीळुन देवीचे स्वरुप आहे


3 वणी गडावर सप्त मातृका हि आहेत

1 शिवा 2 चामुण्डा 3 वाराही 4 वैष्णवी 5 इंद्राणी 6 कार्तिकेयी 7 नारसिंही 

ह्या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाने विराजमान आहेत


4 गडावर मच्छिंद्रनाथाना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत त्याची समाधी ही गडावर आहे


5 सप्तशृंग गडा द्रोणागीरी पर्वताचाच एक भाग आहे

राम रावण युध्दात लक्ष्मण जख्मी झाला तेव्हा हनुमंताना द्रोणागीरी आनण्यास सांगीतले 

द्रोणागीरी आणतांना त्याचा काही भुभाग सह्याद्री पर्वतात पडला तोच भुभाग म्हणजे सध्याचा 

सप्तशृंग गड


6 गडावर संजिवनी बुटी आहे पण कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरुपात ठेवली आहे


7 देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे तेथे दत्त दिगंबर भेटीसही येतात

त्या औदुबंराखाली शुभ्र नागराज असुन त्याच्या मस्तकात शक्तीशाली हिरा आहे


9 राम सिता लक्ष्मण वनवास काळी पंचवटीत आले तेव्हा गडावर आईसेबांचे नीत्य दर्शनास येत असत


8 देविच्या द्वारी कासव आहे कासवीन जसी प्रेमळ नजरेन आपल्या पीलांचे पालन पोषन करते

तसे आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करते

आणि कासव गती ने दर्शनास यावे असेही सांगते 

घाई गर्दि करु नये हाही त्यामागील उद्देश आहे


11 ज्ञानेश्वराची ही कुलस्वामिनी आहे त्याचे मोठे बंधु निवृत्तीनाथ हे समाधी घेण्यापुर्वी वणी गडावर आले होते 

भगवती च्या आदेशानुसार त्यानीं त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली

त्याना सप्तशृगी माते मध्ये त्याची वीठुमाउली दिसली होती


10 नाथ सांप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे नवनाथाची शाबरी विद्या हीचीच देणगी आहे


12 गडावर तीर्थराज शिवालय आहे ब्रम्हदेवाच्या कमंडलु मधुन जे पाणी वाहीले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला तीच गीरिजा(सध्याची गिरणा नदी) नदी आणी त्यापासुन हे तीर्थ तयार झाले ह्यास गीरीजा तीर्थ ही म्हटले जाते

ह्या कुंडात सर्व देवानीं स्नान केले होते असे हे पापविनाशक तीर्थ आहे


13 ह्या तीर्था शेजारी श्री शंभुराज विराजमान आहेत

तसेच कुंडावरती अर्धनारी नटेश्वर आहे त्याचा संबध किन्नरांशी आहे


14 किन्नर येथे कोजागीरी ला खुप मोठया प्रमाणात हजेरी लावतात 

देवीच्या सेवे साठी कृष्णाने किन्नराना धरती वर पाठवले आणि सांगितले त्या आदिमायेच्या कृपेन तुम्ही भक्ताची संकटे स्वत:वर घ्याल आणि तुमची सेवा श्री भगवती पर्यंत पोहचेल तुमचा उध्दार होइल


(स्रि ला मासिक धर्म असतो पुरूषा स त्याची कामे 

किन्नर हा सर्व काम पाशापासुन मुक्त असतो त्यात शिव आणी शक्ती दोघांचा एकत्रीत मीलन असते (अर्धनारीनटेश्वर) म्हणुन त्यानी केलेली सेवा लवकर आईसाहेब चरणी रुजु होते )


तसेच शरद पौर्णिमा ही शापमुक्ती देणारी पौर्णिमा आहे आणि आईचा जागर घालण्यासाठी ही मंडळी येते 

आणि आईकडे मागणे मागते पुढचा जन्म व्यवस्थित द्यावा आणि ह्या जन्माचे सार्थक व्हावै


15 डावर 108 कुंड होती काही बुजली गेली सध्यस्थितीत काहीच कुंडे अस्तीत्वात आहेत


17 कालीका तीर्थ हे कुंड कपारीत असुन ह्याचे पाणी थंड आहे


16 तांबुल तीर्थ जेथे भगवती ने पानाचा वीडा खाउन थुखंली होती

आणी चुळ भरली होती ते तीर्थ 

गडाच्या पश्चिमेला आहे

तसेच ह्य कुंडाचे पाणी ही तांबडे आहे


देवीच्या मुखातील विडयाला खुप मान आहे खुप कमी देवी आहेत ज्याना विडा भरवला जातो


गडावर दैनंदीन देवीला वीडा भरवला जातो आणी दुसरया दिवशी

तो वीडा भक्ताना दिला जातो 

भाग्यवान भक्ताला वीडा मीळतो

आणि तो वीडा खायला सांगतात पण थुंकायचा नसतो


19 सुर्यतीर्थ ह्या कुंडाटचे पाणी उष्ण असते तिन्ही रुतु मध्दे


18 काजळ तीर्थ देवीने डोळ्यातील काजळ येथे धुतले होते ह्या कुंडाचे पाणी काळेशार आहे


20 सप्तशृंग पर्वताशेजारी नादुंरी गावानजीक एक पर्वत आहे त्यास खिंडार आहे असे सांगतात की देवी दैत्य युध्दात देवीने त्रिशुलाने ते खिंडार पाडले आहे


21 दैत्याला नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वणी गडावर आला तेथे देवीने महिषासुराचा वध केला अशी ही मानता आहे


22 दैत्य मारुन आदिशक्ती सप्तशृंगी त्या दैत्यांच्या रक्तान नहाली होती म्हणुन ती रक्तवर्णा आहे


23 महिषासुर वधानंतर ती तांडव करु लागली तीचा क्रोध शांत करण्यासाठी शंकर मासांच्या ढिगार्यात पडुन राहीले त्याच्या छातीवर देवीने पाय दिला तेव्हा तीने विचार केला

पाय पडुनही हाडांचा चुरा झाला नाही ही छाती पतीची असावी

आणि पती वरती पाय ठेवल्यामुळे 

अरे रे नवरा असे म्हणुन तीने जीभ बाहेरही काढली होती


तीचा क्रोधावर नियंत्रण रहावे म्हणुन शिवशंभु गडावर विराजमान आहेत


24 युध्दामुळे थकलेले हे रुप विसावा घेण्यासाठी रम्य अशा वणी डावर आले 

आणि 18 हातासह विसावले


25 मार्कंडेयानीं देवीची स्थापना केली असे सांगतात


26 मार्कंडेयानीं तीच्या स्वरुपाची व्याप्ती केली तीला रुपास आणले 

आणि रक्तवर्णीय आदिमाया स्वरुपास आली


27 मार्कंडेय मुणी च्या काळी दुष्काळ पडला होता तो हिवाळयात

म्हणुन मार्कंडेयांचे बंधु ह्यानी देवीचा अभीषेक थांबु नये म्हणुन कावडी ने पाणी आणुन नित्य देवीचा अभीषेक केला, कावडीची सुरुवात शरद पौर्णिमे पासुन केली म्हणुन भक्त कधीही दुष्काळ पडु नये म्हणुन

कोजागीरीस कावड आणतात आणी देवीचा अभीषेक करतात


29 गडावर खैराचा वृक्ष आहे त्यावर शाबरी विद्येच्या तांत्रिक 52 देवता विराजीत आहेत पण तो वृक्ष उदृष्य स्वरुपात आहेत 

पण योग्य उपासनेने तो जागृत होतो


28 देविने दैत्याचा हाडाचा चुरा केला त्यापासुन हळद बनवीली 

आणि त्यापासुन कंकू

आणि सांगीतले की जी स्रि कुकंवासह हळद लावेल ती प्रेत योणी पासुन वाचेल


30 गडपठारावर ध्वज लावण्याची खुप जुनी परंपरा आहे तो मान 

दरेगावच्या गवळी परीवाराचा आहे त्यांच्या पिढयानपीढया ही भगवतीची सेवा करीत आहे 


11 वार झेंडयाचे निषाण असते ते घेउन गवळी परीवाराती एक जण ज्याला पठारावर जाण्याचा रस्ता माहीत आहे ती व्यक्ती 

झेंडा घेउन जाते पण कुणालाही ते कळत नाही की ती व्यकती कुठून जाते ते


एका परदेशी जानकाराने सांगीतले की दुरबिनीने बघीतले असता गडाला झेंडा घेउन जाणार्या रस्त्यावर कातळावर पायर्या त्याला दिसुन आल्या

पण गड कातळावर पायर्या नाहित


31 देवीच्या पाठीमागे दुसरी देवी आहे असे काही लोकांचे मानने आहे

पण ते साफ खोटे आहे देवीची जी मुळ मुर्ती आहे तीच खरी मुर्ती 

आणि देवी पाठी मागे काहीमते शक्तीपीठाचे स्थान आहे तेथे नैवेद्या दिलाजातो आरती च्या आधी देवीला पडदा लावला जातो तेव्हा त्या स्थानी नैवेद्य दिला जातो


32 देवीचे मंदिर पुर्वी रात्री लवकर बंद राही अशी मानता होती की 

सिंहराज देवीच्या भेटीला नीत्य येत

त्याच्या डरकाळी चा आवाज स्पष्टपणे ऐकु यायचा असे तेथील आदिवासी सांगत


33 श्री सप्तशृंग निवासिनि भगवतीस चामुण्डा ही म्हटले जाते 

तीचा मंत्र ही आहे 

ॐ ऐं र्हिं क्लीं चामुण्डाए विचै

देवीमुर्ती च्या वरती चांदीमध्ये कोरला आहे


म्हणुन काहीच्या मते गुजरात मधील चोटीला चामुण्डा आईसाहेब सप्तशृंगीचेच रुप असावे अशी मानता देखील आहे


ही आदिशक्ती गुजरात राज्यातील बहुतेक कुळांची कुलदेवता आहे

तसेच मध्यप्रदेश महाराष्ट्र दक्षिण भारतीयांची ही कुलदैवत आहे


35 सप्तशृंग क्षेत्र पुर्वीचे दंडकारण्य होय

ह्या पर्वताला सात शीखर असल्याने ह्यास सप्तशृंग म्हणतात


आणि सात शृंगार केलेली देवी आणि सप्त शीखरावर विराजीत आहे म्हणुन तीला श्री सप्तशृंग निवासिनि सप्तशृंगी म्हणतात


34 ॐ काराचे अर्धे चंद्र स्वरुप सप्तशृंग क्षेत्री पुर्ण होते म्हणुन हे अर्ध शक्तीपीठ होय

हि माता येथे बिंदुस्वरुपिनी आहे

ॐ म्हणजेच आदिशक्ती स्वरुप होय आणि आदिशक्ती ने सर्व विश्व व्यापले आहे


36 देवीची नकळत कलती मान आहे

समोर मार्कण्डेय मुणी सप्तशतीचे पाठ वाचतायेत आणि आईसाहेब कान देउन ऐकतायेत

थकव्या मुळे मान झुकली आहे आणि डावा हात कानावर ठेवुन आदिशक्ती मार्क॔ण्डय मुणींचा कथासार ऐकत आहे


38 ह्या आदिमायेची न्यारीच कला आहे ही सकाळी बाला , मध्यदिवसावर तारुणी दुपारी वयस्क आणि संध्याकाळी वृध्दा भासते


37 देवीचे माहेर खांन्देश आहे आणि तीचे सासर वणी आहे अशी मानता आहे तीकडे तीचे ध्यान ही आहे

असे म्हणतात की जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा तीचे स्वरुप अधिक खुलते

आणी जेव्हा माहेरची मानस परतीला निघतात तेव्हा आई रडकी होते


39 गडावर रडतोंडी नामक वाट आहे नांदुरी हुन गडावर जायला

महिषासुर वधानंतर आईसाहेब वणीगडावर विश्रांती साठी आल्या असता डोंगर दर्यांचा भाग मग जी अवघड वाट चढतान्ना आईसाहेब चक्क रडल्या म्हणुन त्या वाटेला रडतोंडी असे म्हणतात 


ह्या रडतोंड्या 3 आहेत 

1 नादुरी मार्ग

2 वणी मार्ग

3 मार्कण्डेय पर्वताकडुन येणारा रस्ता


40 आदिमायेचे हे स्वरुप दृष्टिस पडले ते सर्वप्रथम गवळी बांधवाला

तो गाई चारण्यास गडावर येत असे त्याची एक गाय अचानक गायींमधुन निघुन अवघड अशा स्थानी चरण्यास जायी 

हे त्याने कित्यांदा बघीतले

तो तेथे गेला मग त्याला तेथे भले मोठे मधाचे पोळ दिसले तो खुश झाला पण मधाच्या पोळात काठी खुपसली असता काठीच्या टोकाला शेंदुर लागलेला दिसुन आला

मग झाड पाचोळा बाजुला केल्यावर त्याला आदिमायेचे स्वरुप दृष्टिस पडले


आदिमाया बोलती झाली की 

`` मी ह्या गडावर आधीच होते माझी पुजा करणार कोणी नव्हते माझ्या दर्शनाचे भाग्य तुला लाभले आता माझी नीत्य पुजा होणार तुझ्या गवळी घराण्याला कधीही हाणी पोहचणार नाही 


आणि मग भक्ता देवीच्या दर्शनाला यायला लागले देवीचा महीमा दुरवर पसरला स्थानिक दिक्षीत आणि देशमुख कुंटुबीय पिढयानपीढया देवीच्या सेवेत आहे


तसेच गवळी परीवाराला ध्वजाचा मान मीळाला


41 सप्तशृंगी मंदिराच्य दुसर्या टप्प्यात परतीच्या मार्गावर श्री कालभैरव महाराज विराजमान आहेत 

आदिशक्तीच्या संरक्षणा साठी ते तेथे आहेततसेच गडावर मारुती आणि इतर अकरा रुद्र ही आहेत


42 तसेच चितांमणी म्हणुन एक दगडाचा भाग आहे तेथे भाविक पैशे चिकटवुन मनातील इच्छा बोलतात

रुपया चिकटला तर इच्छा पुर्ण नाही चिकटला तर काहीच नाही अशी भाविकांची श्रध्दा आहे


43 गडासमोर एक पर्वत आहे त्यास मार्कण्डेयाचा पर्वत असे म्हणतात तेथे मार्कण्डेत ऋषींचा आश्रम ही होता येथेच बसुन मार्कण्डय ऋषींनी दुर्गा सप्तशती हा अनमोल ग्रंथाचे लिखान केले अशी मानता आहे 

हा मार्कण्य पर्वत एक किल्ला ही आहे मार्कंडा म्हणुन ओळखला जातो..🙏🙏🙏

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर

 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा

सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर

 

            मुंबईदि. १ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहेअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतरभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून2024 रोजीच्या पत्रान्वये दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

            मात्रभारत निवडणूक आयोगाने  दि. १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असूनसुधारित कार्यक्रम जाहीर केला आहेतो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणीमतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणमतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ.आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेचअस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे,  विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे,  कंट्रोल टेबल अद्ययावत करणेनमुना १-८ तयार करणे१ जुलै२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे - २५ जून ते ५ ऑगस्ट २०२४. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- ६ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ६ ते २० ऑगस्ट २०२४.

            विशेष मोहिमांचा कालावधी – शनिवार १०, रविवार ११, शनिवार १७, रविवार १८ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणेअंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २९ ऑगस्ट २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- ३० ऑगस्ट २०२४.

०००००

अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षणाचे महिला व बालविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षणाचे

महिला व बालविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबईदि. १ : अंगणवाडी केंद्रांच्या कर्मचाऱ्यांमध्ये व लाभार्थ्यांमध्ये पोषण आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडावा यासाठी अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते (दुरदृष्य संवाद प्रणालीद्वारे) करण्यात आले.

            कोकण विभागांमध्ये महात्मा गांधी प्रशिक्षण संस्थेतर्फे मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका पोषण मापदंड प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी आयुक्त डॉ प्रशांत नारनवरेमहिला व बाल विकास  आयुक्त कैलाश पगारे ऐकात्मिक बाल विकास सेवा योजना  व विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उप आयुक्त महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे या उपस्थित होत्या यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्तबालविकास प्रकल्प अधिकारीएकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

            महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मानकानुसार अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील २५ हजार  अंगणवाडी केंद्रातील ५० हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते यशस्विनी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि स्त्रीशक्ती डिजिटल प्लॅटफॉर्म चे उद्घाटन करण्यात आले.

महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

 महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

·       मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महसूल पंधरवड्याचे आयोजन

 

            मुंबईदि. १ : नैसर्गिक आपत्ती असो की निवडणूक प्रत्येक उपक्रमात महसूल विभागाचा सक्रिय सहभाग असतो. महसूल विभाग हा गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत आहे. महसूल विभाग अन्य विभागांचा मार्गदर्शक आहेअशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महसूल विभागाचा गौरव केला.

            महसूल पंधरवडा व महसूल दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादवनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी उपस्थित होते. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते महसूल योजनांची माहिती असलेल्या डिजिटल पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध दाखल्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

            ॲड. नार्वेकर म्हणाले कीमहसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी जवळचा संबंध आहे. या विभागाने नागरिकांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्पर्श केला आहे. पोलिसपाटील यांच्यापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच अधिकारी व कर्मचारी नेहमीच परिश्रमपूर्वक कामकाज करतात. त्यामुळे शासनाच्या विविध योजना यशस्वी होत आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावीअसेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले कीमहसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. याबाबत जनजागृतीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

            वैभव पांगम यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी आभार मानले. यावेळी महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

00000

Featured post

Lakshvedhi