Friday, 2 August 2024

महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

 महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

·       मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महसूल पंधरवड्याचे आयोजन

 

            मुंबईदि. १ : नैसर्गिक आपत्ती असो की निवडणूक प्रत्येक उपक्रमात महसूल विभागाचा सक्रिय सहभाग असतो. महसूल विभाग हा गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत आहे. महसूल विभाग अन्य विभागांचा मार्गदर्शक आहेअशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महसूल विभागाचा गौरव केला.

            महसूल पंधरवडा व महसूल दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादवनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी उपस्थित होते. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते महसूल योजनांची माहिती असलेल्या डिजिटल पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध दाखल्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

            ॲड. नार्वेकर म्हणाले कीमहसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी जवळचा संबंध आहे. या विभागाने नागरिकांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्पर्श केला आहे. पोलिसपाटील यांच्यापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच अधिकारी व कर्मचारी नेहमीच परिश्रमपूर्वक कामकाज करतात. त्यामुळे शासनाच्या विविध योजना यशस्वी होत आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावीअसेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले कीमहसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. याबाबत जनजागृतीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

            वैभव पांगम यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी आभार मानले. यावेळी महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi