Friday, 14 June 2024

मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकाचा आढावा

 मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे यांच्या

नियोजित स्मारकाचा आढावा

 

            मुंबई, दि. 13 : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक  घेतली.

            रायगड जिल्ह्यात येणारे पर्यटकइतिहासप्रेमी आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे श्रीमंत पेशवे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देऊन या कामाला गती द्यावी असे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले. या बैठकीला मुख्याधिकारी विराज लबडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


कालबाह्य अधिनियमांचे निरसन करावे

 कालबाह्य अधिनियमांचे निरसन करावे

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

             मुंबई दि. १३ :-  महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात उपसभापती डॉ. नीलम  गोऱ्हे  यांना राज्यातील कालबाह्य अधिनियमाचे निरसन करण्याचे निदेश सभागृहात दिले होते.

            या निदेशाच्या अनुषंगाने व विधी सेंटर फॉर लिगल पॉलीसी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील कालबाह्य झालेल्या २१ कायद्यांना निरसित करावे किंवा कसे याबाबत शासनाने गांभिर्याने लक्ष घालावे, अशा आशयाचे सूचनेचे पत्र डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री (विधी व न्याय)महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे.

Thursday, 13 June 2024

डोंबिवली एमआयडीसी मधील मृत कामगारांच्या वारसांना व जखमींना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी

 डोंबिवली एमआयडीसी मधील मृत कामगारांच्या वारसांना व जखमींना

शासनाकडून आर्थिक मदत मिळावी

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

             मुंबई, दि. 12 :- डोंबिवली एमआयडीसी येथे फेज दोन मधील कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा - पुन्हा घडू नये यासंदर्भात शासनास अनेक सूचना केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करावेअसेही त्यांनी सूचित केले आहे.

            एमआयडीमध्ये अशा स्फोटाच्या घटना घडू नयेतयासाठी नियमावली करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. अशा घटनांमध्ये मृतांच्या वारसांना व जखमींना तात्काळ शासकीय मदत करण्यात यावी. डोंबिवली येथील सर्व कंपन्यांचा सर्व्हे करून धोकादायक व नियमाचा भंग करणाऱ्या कंपन्यांवर उचित कार्यवाही करण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. प्रत्येक हॉस्पिटल मध्ये बर्न वॉर्ड तयार करावा. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्व कारखान्यांच्या कर्मचारी व अधिकारी यांना द्यावे. अनधिकृत व्यवसाय व कारखाने तात्काळ बंद करावेत. उद्योग सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने सर्व कारखान्यांची नियमित तपासणी करावी व त्या तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात. औद्योगिक सुरक्षा कायद्यामध्ये आवश्यक बदल करावेत. यात कामगार व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. सर्व कर्मचाऱ्यांचे विमा संरक्षण करण्यासाठी या कारखान्यांना अनिवार्य करावेअशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शासनास दिल्या आहेत.

तळा आणि म्हसळा नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचा आराखडा तयार करावा

 तळा आणि म्हसळा नगरपंचायत

प्रशासकीय इमारतीचा आराखडा  तयार करावा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 13 : रायगड जिल्ह्यातील तळा आणि म्हसळा नगरपंचायतीच्या  प्रशासकीय इमारत बांधकामाचा आराखडा तातडीने तयार करून इमारतीच्या कामाला गती द्यावीअसे  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

            रायगड जिल्ह्यातील तळा आणि म्हसळा नगरपंचायत प्रशासकीय इमारती संदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तळा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी विराज लबडेम्हसळा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी विठ्ठल राठोड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            तळा आणि म्हसळा या दोन्ही नगरपंचायत इमारत कार्यालयासाठी जागा तसेच निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा तयार करून यामध्ये लोकांसाठी सोयी सुविधांचा समावेश करावा. पिण्याचे पाणी,  टॉयलेटसौर ऊर्जा या सुविधांचा समावेश करून आराखडा तयार करावा अशा सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

फळ पीक विमा योजनेत संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 फळ पीक विमा योजनेत

संबंधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

- कृषिमंत्री धनंजय मुंडे

मृग व आंबिया बहारातील फळांचा विमा भरण्यास सुरुवात

 

            मुंबई, दि. 13 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली असून मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरून या योजनेत सहभागी व्हावेअसे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

            या हंगामात राज्यात डाळिंबसंत्रामोसंबीचिकूपेरूलिंबूसीताफळद्राक्षआंबापपईकाजूस्ट्रॉबेरी व द्राक्ष क इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनीबजाज अलियांजफ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.

            मृग बहरात द्राक्ष कसंत्रापेरूलिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली आहेत्याचबरोबर मोसंबी चिकू 30 जूनडाळिंब 14 जुलै तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत देण्यात आली आहे.

            दरम्यान 2024 ते 26 या दोन वर्षात राबविण्यात येणाऱ्या फळपिक विमा योजनेचे स्वरूपविमा संरक्षित रक्कम यांसह सविस्तर माहिती कृषी विभागाकडून जारी करण्यात आली असूनफळ उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपला विमा भरून घ्यावाअसे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 


यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य

 यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर

अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य

    

              मुंबईदि. १३ : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही दि. १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

              मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्राची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० (पेपर - ०१) आणि दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी २.३० ते ४.३० (पेपर - ०२) अशी आहे.

              केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वीच निर्गमित केलेल्या ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या लेखी सूचनेनुसार परीक्षार्थींनी आपल्या नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास (३० मिनट) अगोदर हजर राहणे अनिवार्य केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थींनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर अर्धा तास (३० मिनिट) अगोदर उपस्थित रहावे.

0000

डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

 डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील

विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

 

            मुंबई, दि. 13 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.

            सातारा येथील  डॉ. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे  प्राचार्य असलेल्या डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतीलत्या दिवसापर्यंत असेल. 

            सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

            डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.

            कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

            सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटीलपुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदमउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे 'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते.

            समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.

००००

Dr. Dnyandev Mhaske to be new VC of

Karmaveer Bhaurao Patil University

 

       Mumbai, 13th June : The Governor of Maharashtra and Chancellor of state Universities Ramesh Bais has appointed Dr Dnyandev Kundlik Mhaske as the new Vice Chancellor of the Karmaveer Bhaurao Patil University, Satara.

       Dr Mhaske is presently serving as the Principal of Dhananjayrao Gadgil College of Commerce, Satara.

       Vice Chancellor of the Shivaji University, Kolhapur Dr. D. T. Shirke was the first Vice Chancellor of the newly formed Karmaveer Bhaurao Patil University, Satara.

        Prof. D.T Shirke was appointed to the post of Vice Chancellor by Government order dated 21st October 2022 and thereafter granted two extensions on 11th  October 2023 and 13th  April 2024.

       The Governor had constituted a Search Committee under the chairmanship of Former Chairman of AICTE, New Delhi Dr. S.S. Mantha to recommend a panel of names suitable for appointment of the Vice Chancellor.

       Dr. Anil Appasaheb Patil, Chairman Rayat Shikshan Sanstha, Satara, Prof Dr Shivajirao Kadan, Chancellor, Bharati Vidyapeeth, Pune, Vikas Chandra Rastogi, Principal Secretary to Government, Higher and Technical Education Department and Prof Ganga Prasad Prasain, Vice Chancellor, Tripura University (UGC Nominee) were the members of the Search Committee.

       Dr Mhaske was appointed as the Vice-Chancellor for a period of five years from the date he assumes the charge of the post or till he attains the age of 65 years, whichever is earlier.

Featured post

Lakshvedhi