Wednesday, 8 May 2024

दिलखुलास' कार्यक्रमात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात बीडचे पोलीस अधीक्षक

नंदकुमार ठाकूर यांची मुलाखत

 

मुंबईदि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक  नंदकुमार ठाकूर  यांची 'कायदा व सुव्यवस्था या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहेशनिवार 11 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत  ही मुलाखत प्रसारित होणार आहेही मुलाखत पत्रकार दत्ता देशमुख यांनी घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाआदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध केलेली कार्यवाही याविषयी 'दिलखुलासकार्यक्रमातून श्री. ठाकूर यांनी माहिती दिली आहे.

 

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरिता खर्चविषयक निवडणूक निरीक्षकांकडून गुरुवारी उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी

 मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरिता खर्चविषयक निवडणूक निरीक्षकांकडून गुरुवारी उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी

 

मुंबईदि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 करिता 27 - मुंबई उत्तर-पश्चिम  मतदारसंघातील भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार आहेतयातील पहिली तपासणी उद्यागुरुवार 09 मे 2024 रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 

           लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च हा त्यांच्या खर्च नोंदवहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहेनिवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

 

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांकदिनांकवार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 9 मे 2024, गुरुवारसकाळी 10 ते सायंकाळी 5 वाद्वितीय तपासणी, 13 मे 2024, सोमवारसकाळी 10 ते सायंकाळी 5 वातृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवारसकाळी 10 ते सायंकाळी 5 वातपासणीचे ठिकाणनिवडणूक निर्णय अधिकारी, 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघअर्थ व सांख्यिकी सभागृह,  प्रशासकीय इमारतआठवा मजलाशासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051.

            तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट -1, भाग ’, ‘’, ‘’, खर्चाची मूळ प्रमाणक (इनव्हाईसजीएसटी क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/बॅंक विवरणपत्रसर्व परवाने (वाहनरॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईलअसेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे  

0000


 


मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता नियुक्त सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

 मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता नियुक्त

सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

 

            मुंबईदि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करिता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची  सर्वसाधारण केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केली आहे. हे निवडणूक निरीक्षक जिल्ह्यातील चारही मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेत विविध ठिकाणी भेटी देण्यास सुरुवात केली .

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

            26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहेत्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9321887963 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-26435480 असा आहेत्यांचे वास्तव्याचे ठिकाणकक्ष क्रमांक 304, तिसरा मजलाइंडियन ऑईल विश्रामगृहवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सवांद्रे पूर्वमुंबई -400051 असा आहेत्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ दुपारी 1 ते 2 वाठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघअपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासनपश्चिम उपनगरे यांचे कार्यालय, 7 वा मजलाप्रशासकीय इमारतशासकीय इमारतवांद्रे पूर्वमुंबई-400051.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

            27– मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहेत्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9372753013 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-25720610 असा आहेत्यांचे वास्तव्याचे ठिकाणकक्ष क्रमांक 1002, दहावा मजलापद्मविहार विश्रामगृहआयआयटीपवईमुंबई -400076 असा आहेत्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळसायंकाळी 4 ते वाठिकाण – कक्ष क्रमांक 1002, दहावा मजलापद्मविहार विश्रामगृहआयआयटीपवईमुंबई -400076.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघासाठी स्तुती चारण सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

            28– मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी स्तुती चारण यांची नियुक्ती करण्यात आली आहेत्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8591366725 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-20851459 असा आहेत्यांचे वास्तव्याचे ठिकाणकक्ष क्रमांक 03, पहिला मजलाआर्क विश्रामगृहआर.सीएफ., चेंबूरमुंबई -400074 असा आहेत्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळदुपारी 12 ते 1 वाठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 28 - मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघपिरोजशा नगरसांस्कृतिक सभागृहस्टेशन साईड कॉलनीगोदरेज कॉलनीविक्रोळी स्टेशन जवळविक्रोळी (पूर्व), मुंबई - 400079.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

            29– मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड यांची नियुक्ती करण्यात आली आहेत्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8928571253 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-45006422 असा आहेत्यांचे वास्तव्याचे ठिकाणकक्ष क्रमांक 305, तिसरा मजलाइंडियन ऑईल विश्रामगृहवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सवांद्रे पूर्वमुंबई -400051 असा आहेत्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळदुपारी 1 ते 3 वाठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 29 - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी (नाक्षे.) यांचे कार्यालयपाचवा मजलाप्रशासकीय इमारतशासकीय वसाहतवांद्रे पूर्वमुंबई - 400051.

000


विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

 विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

 

            मुंबईदि. ८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी  सोमवार१० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

            विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ)निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक  ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.  त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

            या निवडणुकीसाठी बुधवार१५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार२२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार२४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार२७ मे २०२४ अशी आहे. सोमवार१० जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार१३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईलअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

 राज्यात तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

 

            मुंबईदि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रायगड - ५८.१० टक्के

बारामती – ५६.०७ टक्के

उस्मानाबाद -  ६०.९१ टक्के

लातूर - ६०.१८ टक्के

सोलापूर – ५७.६१  टक्के

माढा – ६२.१७ टक्के

सांगली - ६०.९५ टक्के

सातारा -  ६३.०५ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५९.२३ टक्के

कोल्हापूर -  ७०.३५ टक्के

हातकणंगले - ६८.०७ टक्के

0000


26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांची दहिसर विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट

 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांची दहिसर विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट

 

            मुंबई उपनगरदि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करीता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. 26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांनी आज 153- दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची माहिती घेतली.

            श्री. भदोरिया यांनी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना लोकसभा निवडणूक  नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी या कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय आणि सांघिक प्रयत्नाने काम करावे. मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावीमतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाहीयाची काळजी घ्यावी. दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या सुविधा पुरविल्या जातीलयाबाबतची दक्षता घ्यावीअशा सूचना यावेळी श्री. भदोरिया यांनी दिल्या. या भेटीदरम्यान श्री. भदोरिया यांनी 153-दहिसर विधानसभा मतदार संघातील स्ट्रॉंग रूम तसेच रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली. 

000


Featured post

Lakshvedhi