Tuesday, 7 May 2024

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात

 मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात

 

            मुंबई उपनगरदि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली आहे.

            आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नावपक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अयुब अमीन हुनगुंद (बहुजन समाज पार्टीहत्ती)ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टीकमळ)गायकवाड वर्षा एकनाथ (इंडियन नॅशनल काँग्रेसहात)ॲन्सन थॉमस (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरद्राक्षे)कुर्बान शहादत हुसेन (राष्ट्रीय ओलमा कौन्सिलबॅट)खान अब्बास अहमद (बहुजन महा पार्टीशिट्टी)डॉ. (ॲड.) यशवंत रामभाऊ कसबे (भारतीय जनविकास आघाडीकोट)रमजान अली चौधरी (ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीनपंतग)शौकत अब्दुल रफीक खान (इन्सानियत पार्टीऑटो रिक्षा)संतोष गणपत अंबुलगे (वंचित बहुजन आघाडीगॅस सिलेंडर)हयात्तुल्लाह अब्दुल्लाह शेख (अखिल भारतीय मुस्लिम लीग सेक्युलरबॅटरी टॉर्च)हर्षदा बाबूराव जाधव (महाराष्ट्र विकास आघाडीरोड रोलर)अब्दुल ताहीर ॲडव्होकेट (बबलू रजनीकांतअपक्षकाडेपेटी)ॲड. असिफ अली सिद्दीकी (अपक्षजहाज)ॲड. उत्तमकुमार नकुल सजनी साहू (अपक्षबासरी)इजाज मोहम्मद सफी खान (अपक्षडंबेल्स)डॉ. गफ्फार इब्राहिम सय्यद (अपक्षस्टेथोस्कोप)नजमाखतून मोहम्मद जफर खान (अपक्षकॅमेरा)नरेंद्र मिश्रा (अपक्षसफरचंद)ॲड. फिरोज शेख (अपक्षस्पॅनर)मुझाफर अली शेख (अपक्षचालण्याची काठी)मुश्ताक हैदर शेख (अपक्षहिरा)युनूसअली रशीद मुल्ला (अपक्षदूरध्वनी)रमा अरुण साबळे (अपक्षनागरिक)राजेश मोहन लोखंडे (अपक्षखाट)शांताराम स. दिघे (अपक्षप्रेशर कुकर)संदीप (भाऊ) रामचंद्र जाधव (अपक्षपेनाची निबसात किरणांसह).

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात

 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात

 

            मुंबई उपनगरदि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात माघारीअंती 21 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली आहे.

            निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नावपक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अमोल गजानन कीर्तिकर (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मशाल)रवींद्र दत्ताराम वायकर (शिवसेनाधनुष्यबाण)राजेश रामकिसन मल्लाह (बहुजन समाज पक्षहत्ती)अरोरा सुरिंदर मोहन (भारत जनआधार पार्टीकारंजा)परमेश्वर अशोक रणशूर (वंचित बहुजन आघाडीगॅस सिलेंडर)बाला वेंकटेश विनायक नाडर (आपकी अपनी पार्टी (पीपल्स) बॅटरी टॉर्च)भरत खिमजी शाह (हिंदू समाज पार्टीऑटो रिक्षा)मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पार्टीप्रेशर कुकर)ॲड. मितेश वर्ष्णेय (भीमसेनाबासरी)सारिका डब्राल (इंडिया ग्रीन्स पार्टीसफरचंद)हरिशंकर यादव (समाजविकास क्रांती पार्टीविजेचा खांब)ॲडव्होकेट कपिल कांतिलाल सोनी (अपक्षसीसीटीव्ही कॅमेरा)गजानन तुकाराम सोनकांबळे (अपक्षपाटी)रोहन साठोणे (अपक्षमाईक)ॲड. लता पांडुरंग शिंदे (अपक्षटंकलेखन यंत्र)समीर मोरे (अपक्षभालाफेक)सुनील भिमा चव्हाण (अपक्षजहाज)सुषमा दयानंद मेहता (अपक्षखाट)ॲड. संजीवकुमार अप्पाराव कलकोरी (अपक्षशिट्टी)संतोष माणिक रायबान (अपक्षट्रक)ह्दा धनंजय शिंदे (अपक्षपेनाची निब सात किरणांसह).

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवार रिंगणात

 मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवार रिंगणात

 

            मुंबई उपनगरदि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई उत्तर मतदारसंघात 19 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली.

            निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नावपक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टीकमळ)भूषण पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेसहात)रईस डॉक्टर (बहुजन समाज पार्टीहत्ती)अलिक सुंदर मेश्राम (भारतीय मूलनिवासी आजाद पार्टीहंडी)कमलेश डाह्याभाई व्यास (सरदार वल्लभभाई पटेल पार्टीशिट्टी)कॉम्रेड जयराम विश्वकर्मा (सोशॅलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्टबॅटरी टॉर्च)जयेंद्र वसंत सुर्वे (भारतीय जवान किसान पार्टीभेटवस्तू)दीपाली भवरसिंग शेखावत (महाराष्ट्र विकास आघाडीरोड रोलर)बिपिन बच्चूभाई शाह (हिंदू समाज पार्टीऑटो रिक्षा)रवी बाबू गवळी (समता पार्टीनागरिक)सय्यद जुल्फिकार आलम (बहुजन महा पार्टीदूरदर्शन)ॲड. सोनल दिवाकर गोंडाणे (वंचित बहुजन आघाडीगॅस सिलेंडर)ॲड. कपिल कां. सोनी (अपक्षसीसीटीव्ही कॅमेरा)गुरुदास रामदास खैरनार (अपक्षशिवणयंत्र)दीप्ती अशोक वालावलकर (अपक्षऊस शेतकरी)पांडे धर्मेंद्र राममुरत (अपक्षबॅट)मुन्नालाल गजराज प्रजापती (अपक्षखाट)लक्ष्मण यल्लपा कुराडे (अपक्षप्रेशर कुकर)संजय मफतलाल मोरखिया (अपक्षकॅमेरा).


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पाचव्या टप्प्यात राज्यात 264 उमेदवार निवडणूक रिंगणात

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

पाचव्या टप्प्यात राज्यात 264 उमेदवार निवडणूक रिंगणात

 

मुंबईदि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघात 18दिंडोरी - 10 , नाशिक - 31पालघर - 10भिवंडी - 27कल्याण - 28ठाणे - 24मुंबई उत्तर - 19मुंबई उत्तर पश्चिम - 21मुंबई उत्तर पूर्व  - 20मुंबई उत्तर मध्य - 27मुंबई दक्षिण मध्य - 15 आणि मुंबई दक्षिण -  14 अशी आहे. या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.


Monday, 6 May 2024

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे

 मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे

-केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

 

मुंबई उपनगरदि. 5 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेसर्वांचे लक्ष मुंबईकडे असतेलोकसभेची निवडणूक मुक्त  निर्भय होण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहेयामध्ये वरिष्ठ अधिकारीकर्मचाऱ्यांपासून ते मतदारदूतांपर्यंत सर्वांचीच भूमिका महत्वाची असणार आहेमुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावेअसे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी केले.

वांद्रे (पश्चिमयेथील आरडीनॅशनल कॉलेज येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होतात्यावेळी ते बोलत होतेलोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील किमान 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि अपर जिल्हाधिकारी तथा 'स्वीपचे मुख्य नोडल अधिकारी किरण महाजन यांच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेतत्याचाच एक भाग म्हणून सहकारी संस्था सभासदांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे मुख्य समन्वयक डॉमहाजनस्वीपचे नोडल अधिकारी डॉसुभाष दळवीजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (2) पूर्व उपनगरचे श्रीदहिभातेजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (3) पश्चिम उपनगरचे श्रीवीरजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (4), मुंबईस्वीपच्या आयकॉन ॲडअश्विनी बोरुडेडॉमृण्मयी भजकमुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्षसचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्रीथिंड म्हणाले कीमुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहेया उपक्रमांदरम्यान मतदानासंबंधित काही समस्या असतीलतर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडविण्यात येतीलत्यामुळे आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून भावी पिढीसमोर एक आदर्श ठेवावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्रीक्षीरसागर म्हणाले कीमुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार गृहनिर्माण संस्था आहेमुंबई उपनगर जिल्ह्यात सुमारे 73 लाख लोकसंख्या असून या गृहनिर्माण संस्थांमध्ये सुमारे 20 लाख मतदार आहेतमतदानाच्या प्रक्रियेत 50 टक्के मोलाचा वाटा हा या गृहनिर्माण संस्थांचा आहेनिवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष तसेच सचिवांना मतदान केंद्रावरील मतदार दूत म्हणून काही विशेष अधिकार दिले आहेतआपण आपल्या संस्थामधील एकूण किती कुटुंब आहेत, त्यामध्ये किती नागरिकांचे मतदान आहे, याची एक यादी तयार करावीत्यांनतर त्यांना 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

देशाच्या स्वातंत्र्यापासून राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहेमाझा देश कोणी चालवावा हे ठरविण्याचा अधिकार मला आहेआणि त्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहेयंदाच्या लोकसभा निवडणूकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे

-केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

 

मुंबई उपनगर, दि. 5 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वांचे लक्ष मुंबईकडे असते. लोकसभेची निवडणूक मुक्त व निर्भय होण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते मतदारदूतांपर्यंत सर्वांचीच भूमिका महत्वाची असणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी केले.

वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील किमान 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि अपर जिल्हाधिकारी तथा 'स्वीप' चे मुख्य नोडल अधिकारी किरण महाजन यांच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सहकारी संस्था सभासदांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा ‘स्वीप’चे मुख्य समन्वयक डॉ. महाजन, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (2) पूर्व उपनगरचे श्री. दहिभाते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (3) पश्चिम उपनगरचे श्री. वीर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (4), मुंबई, स्वीपच्या आयकॉन ॲड. अश्विनी बोरुडे, डॉ. मृण्मयी भजक, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्री. थिंड म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमांदरम्यान मतदानासंबंधित काही समस्या असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडविण्यात येतील. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून भावी पिढीसमोर एक आदर्श ठेवावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार गृहनिर्माण संस्था आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात सुमारे 73 लाख लोकसंख्या असून या गृहनिर्माण संस्थांमध्ये सुमारे 20 लाख मतदार आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत 50 टक्के मोलाचा वाटा हा या गृहनिर्माण संस्थांचा आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष तसेच सचिवांना मतदान केंद्रावरील मतदार दूत म्हणून काही विशेष अधिकार दिले आहेत. आपण आपल्या संस्थामधील एकूण किती कुटुंब आहेत, त्यामध्ये किती नागरिकांचे मतदान आहे, याची एक यादी तयार करावी. त्यांनतर त्यांना 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

देशाच्या स्वातंत्र्यापासून राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. माझा देश कोणी चालवावा हे ठरविण्याचा अधिकार मला आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची


Featured post

Lakshvedhi