Saturday, 4 May 2024

मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आर्वजून बजावावा

 मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आर्वजून बजावावा

- मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

·        तिसऱ्या टप्प्यासाठी  7 मे रोजी मतदान २३ हजार ०३६  मतदान केंद्र

·        सुमारे 2 कोटी 9 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज

·       उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा

·        दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सरासरी 62.71 टक्के मतदान

            

मुंबईदि. 3 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

            मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

            यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणालेदुस-या टप्प्यात बुलढाणाअकोला, अमरावतीवर्धायवतमाळ-वाशिमहिंगोलीनांदेडपरभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्पात एकूण सरासरी 62.71 टक्के मतदान झाले.

            तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02, पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  यासाठी एकूण २३ हजार ०३६  मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ०९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४६,४९१ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,०३६ आणि २३,०३६ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून तिसऱ्या टप्प्यात एकूण २५८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

       तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.  मात्र मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची  मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरु राहील. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) रुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून घरोघरी वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या असून इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करत आपला मतदानाचा महत्वपूर्ण हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.      

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

            85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

            मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही  रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

            मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

            कायदा व सुव्यवस्थांतर्गत 1 मे पर्यंत 50,397 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1,110 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,595  इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,11,878 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.    राज्यामध्ये दि. 1 मार्च ते  २ मे  2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 49.95  कोटी रोख रक्कम तर 36.80 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 129.89 कोटी रुपयेड्रग्ज 220.65 कोटीफ्रिबीज .४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ९२.९२ कोटी रुपये अशा एकूण ५३०.६९ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

     ३३,४६१ तक्रारी निकाली

               16 मार्च ते 2 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ४३४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ४३३३ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ३४,१६८ तक्रारीपैकी ३३,४६१ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे २०५ प्रमाणपत्र वितरित

               राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने २०५ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्या टक्केवारी

 

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरूष मतदार

मतदान केलेले पुरूष मतदार

महिला मतदार

मतदान केलेल्या महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

मतदान केलेले तृतीयपंथी मतदार

एकूण मतदार टक्केवारी

1

05- बुलढाणा

933173

603525

(64.67%)

849503

502226

(59.12%)

24

10

(41.67%)

62.03%

2

06 - अकोला

977500

 

634116

(64.87%)

913269

 

534239

(58.50%)

45

11

 (24.44%)

61.79%

 

3

07- अमरावती

944213

 


निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांची माध्यम कक्षास भेट

 निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांची माध्यम कक्षास भेट

 

          मुंबई उपनगरदि. 3 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी आज दुपारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ आदी उपस्थित होते.

          श्रीमती चरण या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वरिष्ठ अधिकारी आहेत. निवडणूक निरीक्षक श्रीमती चरण यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाच्या माहिती घेतली. उपजिल्हाधिकारी श्री. समेळ यांनी त्यांना माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिली. माध्यम कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीमती चरण यांनी समाधान व्यक्त केले.

घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील नागरिकांना आवाहन

  

घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील नागरिकांना आवाहन

            मुंबई उपनगरदि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत 28 – मुंबई  उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील 169 – घाटकोपर (प) विधानसभा मतदार संघ कार्यालय बृहन्मुंबई महानगरपालिका वर्षानगर मुंबई पब्लिक स्कूलपहिला मजलावर्षानगर कैलास कॉम्प्लेक्सविक्रोळी पार्कसाईटविक्रोळी (पश्चिम)मुंबई -400079 येथे आहे.  निवडणूक कार्यसंबंधी कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 022-20853241 या ठिकाणी संपर्क साधावाअसे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले आहे. 

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक मतदारसंघात दाखल

 मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील

 निवडणूक निरीक्षक मतदारसंघात दाखल

            मुंबईदि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात निवडणूकविषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक राजीव रंजन

             ३१ - दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून राजीव रंजन (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.रंजन यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथील कक्ष क्रमांक २०९ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९९२०७९३६७६ आणि ई-मेल आयडी generalobservermum31@gmail.com हा आहे. श्री. रंजन यांचे  संपर्क अधिकारी नितीन काळे असून त्यांचा संपर्क क्रमांक ८००७००९००१ हा आहे. सर्वसाधारण निरीक्षक श्री. रंजन यांना सह्याद्री अतिथीगृह येथे उमेदवार व नागरिकांनी भेटण्याची वेळ  सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक गौरीशंकर प्रियदर्शी

            ३० - मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून गौरीशंकर प्रियदर्शी (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. प्रियदर्शी यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथील कक्ष क्रमांक २०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३७२५१८४२९ आणि ई-मेल आयडी 30mscgeneralobserver@gmail.com हा आहे. श्री. प्रियदर्शी यांचे  संपर्क अधिकारी चंद्रशेखर गवाणकर असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२२००३६७९ हा आहे. सर्वसाधारण निरीक्षक श्री. प्रियदर्शी यांना सह्याद्री अतिथीगृह येथे उमेदवार व नागरिकांनी भेटण्याची वेळ  सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश सिंह पोलीस निरीक्षक

      मुंबई शहर जिल्ह्यातील ३० - मुंबई दक्षिण मध्य मुंबई व ३१ -मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश सिंह (भा.पो.से.) यांची निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. सिंह यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथील कक्ष क्रमांक १०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८१६९९५८६२४ हा आहे. तसेच श्री. सिंह यांचे संपर्क अधिकारी संतोष ठुबे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९९६७८५२४४१ हा आहे. श्री. सिंह यांना सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई  येथे उमेदवार व भेटण्याची वेळ  सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत असणार आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश जैन खर्च निरीक्षक

 दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश जैन खर्च निरीक्षक

            मुंबईदि.  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३१ - दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून मुकेश जैन (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            निवडणूक खर्च निरीक्षक श्री.जैन यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथील कक्ष क्रमांक २०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३२४८५८३२८ आणि ई-मेल आयडी 31mscexpenditureobserver@gmail.com हा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सुदाम काठे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९९६७८१९७५७ हा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक श्री.जैन यांना सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई  येथे उमेदवारांना भेटण्याची वेळ दुपारी २ ते ४ वा. तर नागरिकांनी भेटण्याची वेळ  दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत असणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

  

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 

            मुंबईदि. ०३ : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ व ३१- मुंबई दक्षिणया दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या तयारीचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) मुकेश सिंह यांनी आज आढावा घेतला.     

        मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, ’३१-मुंबई दक्षिण’ चे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंडमुंबई शहर दक्षिण विभाग अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुखमुंबई शहर मध्यचे अपर पोलिस आयुक्त अनिल पारसकरपोलिस उपायुक्त डॉ. मोहित गर्गडॉ. प्रवीण मुंडेअकबर पठाणआदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजनकायदा व सुव्यवस्था समन्वय अधिकारी तेजूसिंग पवारउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, 'स्वीप'च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादमसमन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानीतक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटेमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात आदी उपस्थित होते.

        या बैठकीत जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मतदान केंद्रांवरील पोलीस बंदोबस्तफ्लाईंग स्कॉडस्टॅटिक सर्व्हेलन्स टीमव्हिडिओ सर्व्हिलन्स टीम यांनी आतापर्यंत केलेल्या कामांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी निर्भयमुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका होण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याचे श्री. सिंह यांनी सांगितले.

        दरम्यान, ’३१-मुंबई दक्षिणलोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राजीव रंजन, ’३०-मुंबई दक्षिण मध्य'चे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) गौरी शंकर प्रियदर्शी यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन आज निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी

            मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रणासाठी स्थापित प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलिस) मुकेश सिंहकेंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राजीव रंजनगौरी शंकर प्रियदर्शी यांनी भेट देऊन पाहणी केली.

        यावेळी तिन्ही केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसारमाध्यम कक्षाद्वारे मुद्रितइलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पेड न्यूजसमाजमाध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून उमेदवारांच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण केले जात असल्याचे सांगितले. तसेच सी-व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

       केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी  उमेदवारांच्या वर्तमानपत्रातीलइलेक्ट्रॉनिक व विशेषत: समाजमाध्यमांमधील जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष ठेवावे तसेच सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत

397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

 

             मुंबईदि. ३ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

             पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात - 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी - 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक - 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर - 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिडी - 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्याण - 34 उमेदवारांचे 45 अर्ज,  ठाणे - 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर - 25 उमेदवारांचे 32 अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम - 29 उमेदवारांचे 33 अर्ज,  मुंबई उत्तर - पूर्व - 34 उमेदवारांचे 42 अर्ज,  मुंबई उत्तर – मध्य - 39 उमेदवारांचे 45 अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य - 32 उमेदवारांचे 41 अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात  21 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल झाले आहेत.

0000


 


Featured post

Lakshvedhi