निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांची माध्यम कक्षास भेट
मुंबई उपनगर, दि. 3 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी आज दुपारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ आदी उपस्थित होते.
श्रीमती चरण या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वरिष्ठ अधिकारी आहेत. निवडणूक निरीक्षक श्रीमती चरण यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाच्या माहिती घेतली. उपजिल्हाधिकारी श्री. समेळ यांनी त्यांना माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिली. माध्यम कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीमती चरण यांनी समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment