Wednesday, 1 May 2024

देवमाणूस

 


बघा हे चंद्रकांत जी गोखले...


असा देवमाणूस खरोखरच अस्तित्वात होता,कोणाचा विश्वास बसणार नाही.


सच्चा रणभुमी  मागील योद्धा...असे सामाजिक कार्य  जमणार आहे का ?? 


चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख 

रुपये कारगिल शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली.आज हा आकडा कमी वाटत असला तरी चार दशकापुर्वी तो एक कोटीप्रमाणे होता .सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते केवळ  एकच वेळ जेवन करत ,कुणाचीही पण  एक पै ची पण मदत घेत नसत ,स्वतःला मिळणाऱ्या पेन्शन मधून,ते हे आभाळाएवढे समाजकार्य करत होते का ? तर  भारतमातेसाठी शाहिद झाल्याच्या घरात कुणी उपाशी राहू नये. रेशनींगच्या रांगेत  शेवटपर्यंत उभा राहणारा ,मराठी दिग्ग्ज अभिनेता.


मराठी रंगभूमी,आणि चित्रपटात आघाडीचा नायक ,नेहमी बसने व  पायी प्रवास करत.आपल्या विक्रमला ,तू मला भेटायला २००० रु चे पेट्रोल जाळून मुंबईहून पुण्याला  येऊ नकोस असे निक्षून सांगणारे  चंद्रकांत गोखले .कितीही अडचणी आल्या तरी कारगिल शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी प्रतिवर्षी एक लाख रुपये मदत थांबविली नाही.

-----------------------------------------------------------------------------------

अशी माणसं खरोखरच दुर्मिळ..


०२.०९.१९९९ ची गोष्ट.. मी सकाळी सकाळीच कुठल्याशा नाटकाच्या जाहिरातीचं अर्जंट काम करत घरी बसलो होतो, तेवढ्यात खालून खणखणीत आवाजात हाक ऐकू आली... "कुमार, आहेस का घरात?"

दोनतीन मिनिटांत जिन्याच्या पायऱ्या चढून शेजारच्या बिल्डिंगमधे राहणारे चंद्रकांत गोखले (बाबा) हजर झाले.

मला घाईघाईत म्हणाले,

"कुमार, एक तातडीचं, महत्त्वाचं काम होतं..! मला कारगिल जवानांच्या मदतीसाठी 100,000 रु. पाठवयचेत, पण 16,000 रु कमी पडताहेत..मला मिळतील का उसने?"

मी म्हणालो, "बाबा, आत्ता माझ्याकडं एवढे पैसे नाहीत, पण संध्याकाळपर्यंत बँकेतून काढून दिले तर चालेल का?"

तर "चालेल, मी येतो संध्याकाळी" म्हणाले आणि आनंदात घरी गेले...

मी संध्याकाळी बँकेतून आणून 16,000 रु. तयार ठेवले...

संध्याकाळी 4-4.30 च्या सुमारास बाबा पुन्हा माझ्या घरी आले आणि म्हणाले,

"मला येणे होते ते 3500 रु. आत्ताच एकाकडून मिळाले, तर आता तू मला फक्त 12,500 रुपयेच दे"

मग कापडी पिशवीतून एक पिवळा पडलेला, नीट घडी घातलेला कागद माझ्या हातात देत म्हणाले,

"हा कागद असू दे तुझ्याकडं.."

मी कुतूहलानं कागद पाह्यला, तर त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या जुन्या लेटरहेडवर, (सकाळी हवी असलेली) 16,000 ची रक्कम माझ्याकडून उसनी घेत असल्याचं आणि ती डिसेंबर 99 च्या आत परत करणार असल्याचं त्यांनी 'लिहून' दिलं होतं, एवढंच नव्हे, तर, 'मी जिवंत नसलो, तर माझा मुलगा विक्रम आपले पैसे परत देईल' असंही लिहिलं होतं..!!!

त्यांच्या कल्पनेप्रमाणे दोन 'रेव्हेन्यू स्टँप्स' लावून, त्यावर सही करून तो 'कागद' (त्यांच्या परीनं) त्यांनी 'प्रमाणित'ही केला होता..!

मी म्हणालो, "बाबा काय गरज आहे ह्या कागदाची? जमतील तेव्हा द्या पैसे परत. पण मी हा कागद ठेवून घेणार नाही!"तर डोळ्यांत पाणी आणून आर्जवपूर्वक तो ठेवून घ्यायला त्यांनी मला भाग पाडलं.

तीनचारच दिवस होतात, न होतात, एवढ्यात बाबा पुन्हा माझ्याकडे आले, आणि (डिसेंबरचा 'वायदा' असताना) पिशवीतून पैशांचा गठ्ठा काढून मला देत म्हणाले,

"अरे.. योगायोग बघ कसा आहे..! कालच मला एका चित्रपटाचं काम आलं आहे, आणि त्यांनी अ‍ॅडव्हान्सही दिलाय.. आता ती चिठ्ठी आण, आणि माझ्यासमोर फाडून टाक..!"

मी म्हटलं, "मुळीच फाडून टाकणार नाही..! माझा ठेवा आहे तो..!"

मी त्याच कागदावर तारीख टाकून आभारपूर्वक पैसे परत मिळाल्याचे लिहिले, आणि (.. मी 'नको' म्हणत असताना बाबांनी आवर्जून लिहून आणलेला) तो 'कागद' जपून ठेवला..!

ह्या आमच्या 'व्यवहाराची' माहिती कदाचित विक्रम गोखल्यांनाही नसावी.. (मीही सांगितली नाही अजून.. पण आता कधीतरी आवर्जून सांगायलाच हवी..!)

सोबत : त्या 'कागदपत्राचा' फोटो, आणि पूर्वी मी टिळक स्मारक मंदिराच्या पायऱ्यांवर, फिल्म कॅमेऱ्याने काढलेला बाबांचा फोटो.


एक वेळ उपाशी राहुन प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देनारा अभिनेता चंद्रकांत गोखले...जन्म - ७ जानेवारी १९२१..मृत्यु - २० जुन २००८.

परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील ,

अभिनय प्रवास..वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण..सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटक व त्याहिपेक्षा जास्त चित्रपटात काम ,चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख रुपये शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली.या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण आदरांजली .


सच्चा रणभुमीमागील योद्धा...असे जाज्ज्वल्य  सामाजिक कार्य  करायचे म्हटले तर आज कुणाला जमणार आहे का ??  


आजही अभिनेते विक्रम गोखले आपल्या वडिलांचा वसा पुढे चालवत आहेत.


लेखक अज्ञात

महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

 महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त

विधान भवन येथे ध्वजारोहण

       

            मुंबईदि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनमुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

            65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाची देखणी वास्तू पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. गोऱ्हे तसेच महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळेसह सचिव मेघना तळेकरशिवदर्शन साठ्येउप सचिव राजेश तारवीउमेश शिंदेउप सचिव (विधी) सायली कांबळीअवर सचिव विजय कोमटवारसंचालकवि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्रजनसंपर्क अधिकारीनिलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

                                                        *****

वृत्त क्र. 229

 

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री

मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या  65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

            या प्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरपोलीस उपायुक्त डॉ.दीक्षित गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकारीपोलीसज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

000

संजय ओरके/विसंअ/

 

 

वृत्त क्र. 228

 

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 

            मुंबईदि. 1 :  महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारीउपजिल्हाधिकारी एकनाथ नवलेजिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकस्वतंत्र सेनानीनागरिकअधिकारीकर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी व मुंबई जिल्हा, महिला कारागृह विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

0000

दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची मुलाखत

 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात

लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची मुलाखत

           

            मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची ‘कायदा व सुव्यवस्था या विषयावर शुक्रवार दि.३ मे २०२४ आणि शनिवार दि.४ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत विभागीय माहिती कार्यालय लातूरचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके  यांनी घेतली आहे.

              लातूर जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था याबाबत पुर्वतयारी कशा पद्धतीने केली आहे याविषयी 'दिलखुलासकार्यक्रमातून लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी माहिती दिली आहे.

            तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि.३ मे २०२४ सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या

 समृद्धबलशाली महाराष्ट्र घडवू या

- राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

            मुंबईदि. 1 : उद्यमशीलपुरोगामीव्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू याअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

            आपल्या शुभेच्छा संदेशात राज्यपाल म्हणालेसामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक समताशिक्षणमहिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींचा महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे. राज्यात उच्च दर्जाची विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आहेत. विलोभनीय विस्तीर्ण समुद्रकिनारेपर्वत रांगावनेगड-किल्लेनदी खोरे आणि पठारे अशा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेलाजैवविविधतेने नटलेला महाराष्ट्र पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्वाधिक आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे.

            राज्यपाल म्हणालेशेतीऔद्योगिक उत्पादनेव्यापारदळणवळण आदी क्षेत्रात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्याच्या विकासात मुंबईसह पुणेनागपूरकोल्हापूरनाशिकछत्रपती संभाजीनगरसोलापूर आदी शहरांचे मोठे योगदान आहे.

मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

            संसदीय लोकशाहीमध्ये नियमितपणे होणाऱ्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तसेच बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावाअसे आवाहन राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी केले.

            राज्यपालांच्या संदेशाच्या मराठी अनुवादाचे वाचन अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी केले.

            याप्रसंगी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलमहाराष्ट्र पोलीस ध्वजमुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजमुंबई अग्निशमन दल ध्वजबृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलबृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळबृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथकराज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथकबृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथकमुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहनहायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

            याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस्थानिक लोकप्रतिनिधीमुख्य सचिव नितिन करीरपोलीस महासंचालक रश्मी शुक्लावरिष्ठ प्रशासकीय अधिकारीवरिष्ठ पोलीस अधिकारीविविध देशांचे उच्चायुक्तमहावाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

            या समारंभात किरण सुरेश शिंदेअरुण सुरेश शिंदेविवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी निवेदन केले.

0000

मुंबई शहर जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 मुंबई शहर जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत

सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


 

            मुंबई, दि. १ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज 1 मे 2024 रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


            लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत विविध वयोगटातील 450 पेक्षा अधिक सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.


            मुंबईतील वांद्रे म्हाडा कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. वांद्र्याच्या म्हाडा कार्यालयापासून चार विविध मार्गांवर ही रॅली काढण्यात आली. वांद्रे ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, वांद्रे ते अंधेरी क्रीडा संकुल, वांद्रे ते एनसीपीए नरिमन पॉईंट आणि वांद्रे ते कालिदास सभागृह, मुलुंड अशा चार मार्गांवर ही रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान विविध ठिकाणी सहभागी सायकलस्वारांनी नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला. सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदारांना जागृत करण्यात मदत होत आहे. सहा वर्षांच्या सायकलस्वारापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत यात हौशी तसेच व्यावसायिक सायकलस्वारांचा उत्साहपूर्ण सहभागी झाले होते.


            लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुंबईत जनजागृती करण्यात येत आहे.


नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे.


            मुंबई शहर जिल्ह्यांतील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘स्वीप’ च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. रॅलीत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वीप चे पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या समारोपप्रसंगी निवडक प्रतिनिधींना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.


*

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर सायकल रॅलीच्या माध्यमातून 20 मे रोजी मतदारांना मतदानाचे आवाहन

 देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान

- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

सायकल रॅलीच्या माध्यमातून 20 मे रोजी मतदारांना मतदानाचे आवाहन

            मुंबई उपनगरदि. 1 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहेप्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहेलोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावू याअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

            आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयचेतना कॉलेज जवळ सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर  अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवुन करण्यात आलीया रॅली मध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादमअपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी किरण महाजनबृहन्मुंबई महानगरपालिका उपयुक्त विश्वास मोटेउपजिल्हाधिकारी संदीप निश्चितस्वीप चे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवीसमाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आणि जिल्ह्यातील सायकल ग्रपचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहेयंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय  ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेतत्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज महाराष्ट्र दिनी या  बीवायसीएसमुंबई  मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

            मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयवांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आलीत्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने मार्ग बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृहअंधेरी क्रीडा संकुलएनसीपीएदक्षिण मुंबई आणि मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर  येथे रॅलीचा समारोप करण्यात आलाअनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि मतदानाचे आपले कर्तव्य बजावण्याचा संकल्प केलायावेळी स्वीपच्या माध्यमातून 'मी मतदान करणारअशी प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली.

000

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान

- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

सायकल रॅलीच्या माध्यमातून 20 मे रोजी मतदारांना मतदानाचे आवाहन

            मुंबई उपनगर, दि. 1 : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. लोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

            आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवुन करण्यात आली. या रॅली मध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी किरण महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे, उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, स्वीप चे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आणि जिल्ह्यातील सायकल ग्रुपचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज महाराष्ट्र दिनी या बीवायसीएस, मुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

            मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने मार्ग बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, अंधेरी क्रीडा संकुल, एनसीपीए, दक्षिण मुंबई आणि मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि मतदानाचे आपले कर्तव्य बजावण्याचा संकल्प केला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून 'मी मतदान करणार' अशी प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली.

000


६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

       ६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस:

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

 

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले.  राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

००००

 

65th Maharashtra State Foundation Day:

Governor Ramesh Bais hoists national flag at Raj Bhavan

 

      Mumbai, May 1 : Maharashtra Governor Ramesh Bais hoisted the national tricolor on the occasion of the 65th Maharashtra State Foundation Day at Raj Bhavan, Mumbai on Wed (1 May).

The Governor saluted the national flag even as the national anthem and Maharashtra Rajya Geet were played on the occasion.

      Officers and staff of Raj Bhavan, State Reserve Police Force and Mumbai Police were present.

0000


 

वृत्त क्र. 234

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा

 

            मुंबईदि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज गौरवगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

            शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

            यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदेउपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळेसहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी आदी यावेळी उपस्थित होते.

            कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गायनाने करण्यात आली. महानगरपालिकेच्या संगीत अकादमीच्या वाद्यवृंदाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे वाद्य संगीताच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी राज्यपालांनी संगीत अकादमीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.

००००     ००००

Featured post

Lakshvedhi