Wednesday, 1 May 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दहा लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त रक्कम प्रकरणात दाद मागण्यासाठी त्रिसदस्यीय समिती मुंबई उपनगर जिल्हा समिती कार्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक जाहीर

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

दहा लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त रक्कम प्रकरणात

दाद मागण्यासाठी त्रिसदस्यीय समिती

मुंबई उपनगर जिल्हा समिती कार्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक जाहीर

            मुंबईदि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांकडून तसेच पोलीस पथकांच्या कार्यवाही दरम्यान 10 लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय रोख रक्कम सोडवणूक समिती (कॅश  रिलीज कमिटी) गठित करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ही गठित केली आहे. या रकमेच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांना या समितीकडे दाद मागता येईल.

            भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खर्च नियंत्रण विषयांतर्गत रोख रक्कम सोडवणुकीसाठी ही समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये अंबरनाथ खुले (सहआयुक्त) हे समन्वयक व अध्यक्ष आणि विश्वास मोटे (सहायक आयुक्तएम/पश्चिम विभाग) आणि विलास गांगुर्डे (अधिदान व लेखाधिकारी) हे सदस्य असतील.

            या समिती कार्यालयाचा पत्ता हा महसूल भवन सभागृहगुरुनानक रुग्णालयाच्या पाठीमागेवांद्रे (पूर्व)मुंबई -400051 असा असून समिती कार्यालयाचा संपर्क क्रमांक 8657010873 असा आहे. 

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प मुंबई शहर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विशेष मोहीम

 देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा

शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

मुंबई शहर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विशेष मोहीम

             मुंबईदि. ३० : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावीयासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

            मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास "स्वीप" च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादममुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटीलकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालक दीपाली मासिरकरकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या सल्लागार साधना राऊत, `अपने आपस्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू व्यासनागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

            दीपाली मासिरकर म्हणाल्या‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आयोजित आजच्या मतदान जनजागृती उपक्रमात एक जागरूक मतदार म्हणून मोठ्या संख्येने सहभागी झालात. तुम्ही जागरूक झालात तुमच्या सोबतच्या सगळ्यांना मतदान करण्यास सांगावे. आपल्या एक-एक मताचे योगदान महत्त्वाचे आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ केली आहे. देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत’असे त्यांनी सांगितले तर मतदानातील सहभागाबाबतही श्रीमती मासिरकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

            श्रीमती मुकादम यांनी मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहेत्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्व या महिलांना पटवून दिले. मतदान करणे हा आपला हक्क आहे. तुम्ही स्वतः मतदान करा आणि आपल्या परिसरातील  महिलांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून तो आपला अधिकार आहे. २० मे २०२४ रोजी सर्वांनी मतदान करावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            श्रीमती राऊत म्हणाल्याभारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकही जण मतदानापासून वंचित राहू नयेप्रत्येक घटकाने मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढावाहा उद्देश आहे.

            यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी केले. आभार तहसीलदार पल्लवी तभाने यांनी मानले.

***

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे  यांची

'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. ३०  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमातून लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांची 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ लातूर जिल्हा प्रशासन सज्जया विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार १ मे  आणि गुरुवार २ मे २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. लातूरच्या  जिल्हा  पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज सुरळित होण्यासाठी पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाहीमतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी मतदार जनजागृती कायदा व सुव्यवस्थेचे नियोजनमतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत श्रीमती  ठाकूर - घुगे यांनी माहिती दिली आहे.

             'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत बुधवार १ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

 नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

            मुंबई उपनगरदि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

26- मुंबई उत्तर मतदासंघासाठी दीपेंद्रकुमार आणि नेहा चौधरी निवडणूक निरीक्षक

            26- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार आणि नेहा चौधरी  यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे.

            श्री. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. ते 160-कांदिवली पूर्व, 161 चारकोप आणि 162- मालाड पश्चिम या विधानसभा मतदासंघांचे खर्च निरीक्षक असतील. तरश्रीमती चौधरी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघ 152 बोरिवली, 153 दहिसर आणि 154 मागाठाणे) साठी खर्च निरीक्षक असतील. श्रीमती चौधरी यांचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक 9372791082 असा आहे.

27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती निवडणूक निरीक्षक

            27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. नागरिकांसाठी खर्च निरीक्षकांनी त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

            त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 9321405417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगावतर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक - 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165-अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधावाअसे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदनश्री. छत्रपती यांनी केले आहे.

28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी डॉ.सुनील यादव निवडणूक निरीक्षक

            28 - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी डॉ. सुनील यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. खर्चविषयक बाबी आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे

29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी  सूरजकुमार गुप्ता निवडणूक खर्च निरीक्षक

            29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांचे  कार्यालय हे  29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयपाचवा मजलाप्रशासकीय इमारतशासकीय वसाहतवांद्रे पूर्वमुंबई 400051 येथे असून त्यांचा संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक 8591369100 असा आहे.                                                     

महाराष्ट्र दिनी राज्यातील शासकीय कार्यालयात एकाचवेळी ध्वजारोहण

 महाराष्ट्र दिनी राज्यातील शासकीय

कार्यालयात एकाचवेळी ध्वजारोहण

 

            मुंबईदि. 30 : महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुंबईविभागीय मुख्यालयेजिल्हा मुख्यालयेउपविभागीय मुख्यालयेतहसील मुख्यालये तसेच इतर ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ एकाचवेळी सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात येईलअसे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

            मुंबईत शिवाजी पार्कदादर येथे होणाऱ्या प्रमुख शासकीय कार्यक्रमात राज्यपाल श्री. रमेश बैस हे उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. अन्य जिल्ह्यांच्या मुख्य कार्यक्रमात संबंधित पालकमंत्री अथवा मंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहण करणारे मंत्री अथवा लोकप्रतिनिधी काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमस्थळी पोहोचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करावेअशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

            महाराष्ट्र दिन समारंभास निमंत्रितांना सहभागी होता यावेयासाठी या दिवशी सकाळी 7.15 ते 9 या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी अथवा सकाळी 9 च्या नंतर आयोजित करण्यात यावाअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या 2 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये महत्त्वाचे दिवस साजरे करण्यासंदर्भात आदर्श आचारसंहितेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेतया सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येऊन आचारसंहितेचा भंग होणार नाहीयाची दक्षता घेण्यात यावीअसेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी

मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम

 

          मुंबई उपनगरदि. 30 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात आता ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत गृहभेट उपक्रम राबविण्यात येत आहेत्यास मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

          मुंबई उपनगर जिल्हा जनगणनेनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा आहेया जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या 93.56 लाख असून जिल्ह्यात 87 गावांचा समावेश आहेहीच बाब विचारात घेवून लोकशाही शासनव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपले एक मत किती बहुमोल आहेहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर यांच्या माध्यमातून सांगण्यासाठी 'गृहभेटहा उपक्रम राबवण्यात येत आहे.

          लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वीपचे नोडल अधिकारी डॉसुभाष दळवी यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहेमतदारांमधील मतदानाबाबतची उदासीनता दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहेया उपक्रमांतर्गत मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहेगृहभेटीमध्ये मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने आपला (मतदारांचाकसा फायदा होणार आहेहे सांगणे मतदान केंद्र पातळीवर तयार करण्यात आलेल्या पथकाचे मुख्य काम आहे.

          या उपक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीसआरोग्य सेविका व आशा सेविकाग्रामसेवकपोल पाटीलतलाठीमहानगरपालिकेच्या नियोजन विभागाचे कम्युनिटी ऑर्गनायझर (CO), कर निर्धारण आणि संकलन विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारीघनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता उपक्रमांमध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणारे कनिष्ठ अवेक्षक व महानगरपालिका मुकादम, 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानयोजनेचे संस्थाचालकराष्ट्रीय सेवा योजनाराष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसह नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचा समावेश आहेएका मतदान केंद्रावर अंदाजे १२०० मतदार आहेतहे गृहीत धरून कमीत-कमी तीन ते चार जणांचे पथक तयार करण्यात आले आहेतएका पथकाने किमान ३०० कुटुंबियांना भेट देवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहेया गृहभेटीत प्रामुख्याने ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

०००

 


 

लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय

 ‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय

- एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

 

            मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मतप्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

            राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारीमतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहितीत्याचसोबत आचारसंहिता बाबतची  सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. यासोबतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची विश्वासार्हतास्वीप उपक्रमयापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अभ्यासक,पत्रकार वाचकांच्या सुलभ संदर्भासाठी या अंकात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            तसेच वाचकांसाठी हा विशेषांक dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महासंचालनालयाच्या महासंवाद या ब्लॉग समाजमाध्यमावर ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

Featured post

Lakshvedhi