Wednesday, 1 May 2024

महाराष्ट्र दिनी राज्यातील शासकीय कार्यालयात एकाचवेळी ध्वजारोहण

 महाराष्ट्र दिनी राज्यातील शासकीय

कार्यालयात एकाचवेळी ध्वजारोहण

 

            मुंबईदि. 30 : महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुंबईविभागीय मुख्यालयेजिल्हा मुख्यालयेउपविभागीय मुख्यालयेतहसील मुख्यालये तसेच इतर ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ एकाचवेळी सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात येईलअसे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

            मुंबईत शिवाजी पार्कदादर येथे होणाऱ्या प्रमुख शासकीय कार्यक्रमात राज्यपाल श्री. रमेश बैस हे उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. अन्य जिल्ह्यांच्या मुख्य कार्यक्रमात संबंधित पालकमंत्री अथवा मंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहण करणारे मंत्री अथवा लोकप्रतिनिधी काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमस्थळी पोहोचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करावेअशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

            महाराष्ट्र दिन समारंभास निमंत्रितांना सहभागी होता यावेयासाठी या दिवशी सकाळी 7.15 ते 9 या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी अथवा सकाळी 9 च्या नंतर आयोजित करण्यात यावाअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या 2 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये महत्त्वाचे दिवस साजरे करण्यासंदर्भात आदर्श आचारसंहितेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेतया सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येऊन आचारसंहितेचा भंग होणार नाहीयाची दक्षता घेण्यात यावीअसेही राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi