Tuesday, 30 April 2024

*आज की अमृत कथा

 *आज की अमृत कथा

एक बार एक तपस्वी जंगल में तप कर रहे थे। नारद जी उधर से निकले तो उन्होंनेे साष्टांग प्रणाम किया और पूछा -मुनिवर कहाँ जा रहे हैं ? नारदजी ने कहा -विष्णुलोक को भगवान के दर्शन करने जा रहे हैं। तपस्वी ने कहा - एक प्रश्न मेरा भी पूछते आइए कि -मुझे उनके दर्शन कब तक होंगे ?


 नारद जी विष्णुलोक पहुँचे तो उन्होंने उस तपस्वी का भी प्रश्न पूछा -भगवान ने कहा-84 लाख योनियों में अभी 18 बार उसे और चक्कर लगाने पड़ेंगे तब कहीं मेरे दर्शन होंगे। वापिस लौटने पर नारदजी ने यही उत्तर उस तपस्वी को सुना दिया।


 तपस्वी अधीर नहीं हुए । समय की उन्हें जल्दी न थी। इतना आश्वासन उन्हें पर्याप्त लगा कि भगवान के दर्शन देर सबेर में उन्हें होंगे अवश्य ! इससे उन्हें बड़ी प्रसन्नता हुईं और दूने उत्साह के साथ अपनी तपस्या में लग गये। उनकी इस अविचल निष्ठा और धैर्य को देखकर भगवान बड़े प्रसन्न हुये और उन्होंने तुरन्त ही उन तपस्वी को दर्शन दे दिये।


कुछ दिन बाद नारद जी उधर से फिर निकले तो भक्त ने कहा -मुझे तो आपके जाने के दूसरे दिन ही दर्शन हो गये थे। इस पर नारद जी बहुत दुःखी हुये और विष्णु भगवान के पास जाकर शिकायत की कि आपने मुझसे कहा इनको लंबी अवधि में दर्शन होंगे और आपने तुरन्त ही दर्शन देकर मुझे झूठा बनाया।


भगवान ने कहा -नारद जिसकी निष्ठा अविचल है जिसमें असीम धैर्य है उसके तो मैं सदा ही समीप हूँ। देर तो उन्हें लगती है जो उतावली करते हैं । उस भक्त के प्रश्न में उतावली का आभास देखकर मैंने लंबी अवधि बताई थी पर जब देखा कि वह तो बहुत ही धैर्यवान है तो उतना विलंब लगाने की आवश्यकता न समझ और तुरन्त दर्शन दे दिये..!!


    *जय श्री कृष्ण*

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

                                                                                   

            मुंबईदि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

            अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ताविशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

 

            आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलमहाराष्ट्र पोलीस ध्वजमुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजमुंबई अग्निशमन दल ध्वजबृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलबृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळबृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथकराज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथकबृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथकमुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहनहायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

 

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

 

            भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथमराज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले)डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूलदादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली)एमसीएम मुलींचे हायस्कूलकाळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथमग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. 

 

            या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

 

00000

दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 

            मुंबईदि. २९ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील '३०-दक्षिण मध्य मुंबईव '३१-मुंबई दक्षिणया दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे२०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

         दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीपकार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी शाळांतर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमात मुख्याध्यापकशिक्षकविद्यार्थी तसेच माजी विद्यार्थीपालक यांच्यासमवेत मेळावेबैठकाचर्चासत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदान जागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. प्रभात फेऱ्यांद्वारे दिव्यांग मतदारांनी मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करण्याबाबतचे आवाहन विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. या उपक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम येथील शिवाजी पार्क लायन्स डेफ स्कूलदादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळामाटुंगा येथील मीरा विद्यालय विशेष मुलांची शाळाशिवडी येथील जय वकील ऑटिझम सेंटरमाहीम येथील लायन्स स्कूल फॉर डेफसीपी टॅंक येथील ए.के. मुन्शी योजना स्कूलनॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड या दिव्यांगासाठी कार्यरत शाळा व संस्था सहभागी झाल्या.

        दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग व्यक्तींची गृह भेट घेऊन त्यांना मतदानाच्यादिवशी व्हीलचेअरमतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यकतेनुसार मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा (रिक्षाटॅक्सी तसेच व्हीलचेअर युक्त वाहने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाकरिता दिव्यांग मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाहीप्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहेव्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंध मतदारांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपीमध्ये बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधेची माहिती देण्यासाठी कर्णबधिर प्रवर्गाच्या शाळांनी सांकेतिक भाषेमध्ये रिल्स बनवून समाज माध्यमांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहेअसे सुनीता मतेजिल्हा समन्वय अधिकारी दिव्यांग सुगम्यतामुंबई शहर यांनी सांगितले.

००००

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात चार उमेदवारांची सात नामनिर्देशनपत्रे दाखल

 मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात

चार उमेदवारांची सात नामनिर्देशनपत्रे दाखल

 

            मुंबईदि. २९ : मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २९ एप्रिल रोजी चार उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.

     आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये मोहम्मद माहताब अख्तर हुस्सेन शेख (बहुजन मुक्ती पार्टी)(१ अर्ज), डॉ. मयुरी संतोष शिंदे (अपक्ष)(१ अर्ज), अरविंद गणपत सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१+३ अर्ज), सबिहा बानो  (अपक्ष)(१ अर्ज) यांचा समावेश आहे.

****

28 लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल

 मुंबई उत्तर पूर्व -28 लोकसभा मतदारसंघात दोन

उमेदवारी अर्ज दाखल

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

 

            मुंबईदि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई  उपनगर जिल्ह्यातील २८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 26 एप्रिल रोजी अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरवात झाली.  आज दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

            आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी  1 ) भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभ भाई पटेल पार्टी )  (2) बबन सोपान ठोके (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात  मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत  155 - मुलुंड156 - विक्रोळी157 - भांडुप पश्चिम169 - घाटकोपर पश्चिम170 - घाटकोपर पूर्व171 - मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे 2024 रोजी दुपारी 3.00 पर्यंत आहे. 4 मे रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येईलतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ६ मे २०२४ आहे. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे आणि 4 जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळागोदरेज संकुलविक्रोळी येथे करण्यात येणार आहे.

000

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

 मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

 

              मुंबईदि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EM ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी MH03EN नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

             ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेलत्यांना विहित नमुन्यातील अर्जपत्त्याचा पुरावाछायाचित्र ओळखपत्रपॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI) (EAST) किंवा आरटीओ, मुंबई (पूर्व) (RTO MUMBAI) (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 2 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.

             एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास हा नोंदणी क्रमांक देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात जावून अर्ज करावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यात राज्यात 298 उमेदवार निवडणूक रिंग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यात राज्यात 298 उमेदवार निवडणूक रिंगणात मुंबई, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 369 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 71 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : नंदुरबार 11, जळगाव 14, रावेर 24, जालना 26, औरंगाबाद 37, मावळ 33, पुणे 35, शिरुर 32, अहमदनगर 25, शिर्डी 20, बीड 41 अशी आहे. या 11 मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. ००००

Featured post

Lakshvedhi