Monday, 15 April 2024

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राजभवन येथे शुभारंभ मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे

 राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा

राजभवन येथे शुभारंभ

मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान

अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई दि. 14 : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून पूर्वीपेक्षा अनेक बहुमजली इमारती शहरात निर्माण होत आहेत. अनेक देशात अग्निशमन कार्यात ड्रोन तंत्रज्ञान वापरले जातेतसेच आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान आपल्या अग्निशमन दलांनी देखील अंगिकारण्याबाबत विचार करावाअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

        राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल  रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. 

            महानगरांमध्ये आगीबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घेणे आवश्यक आहेतसेच सर्व हाऊसिंग सोसायटी व औद्योगिक आस्थापनांचे नियमित फायर ऑडिट करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.    

            आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असून वाहनांच्या आगीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यंदा अग्निशमन सेवेकरिता राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या मुंबई अग्निशमन दलातील ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते यावेळी पदक प्रदान करण्यात आले. 

      मुंबई अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी संपत कारंडेलिडिंग फायरमन दत्तात्रय पाटीलसहायक फायरमन गुरुप्रसाद सावंत तसेच चालक ऑपरेटर संदीप गवळी यांना राज्यपालांनी पदक प्रदान केले.  राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांचे स्वागत केले तसेच त्यांच्या पोशाखाला अग्निशमन ध्वजाचे तिकीट लावले. 

            मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकरमहाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील विविध शहरे व आस्थापनांचे मुख्य अग्निशमन अधिकारी यावेळी उपस्थित होते.सन १९४४ साली मुंबई डॉकयार्ड येथे जहाजाच्या स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो.

0000

Maharashtra Governor inaugurates Fire Service Week

on 80th anniversary of Dock Explosion

      Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the State level Fire Service Week on the occasion of the 80th anniversary of the Dock Explosion, commemorated as National Fire Service Day at Raj Bhavan Mumbai on Sun (14 April). 

      The Governor presented the President's Fire Service Medals to four officers and firefighters of Mumbai Fire Brigade who have been declared the medals. The Governor also inaugurated the Fund Collection drive for the Maharashtra Fire Service Welfare Fund.

Director of Maharashtra Fire Services Santosh Warick. Chief Fire Officer of Mumbai Fire Brigade Ravindra Ambulgekar, senior fire officers of State Fire Services, Heads of various Fire Service establishments in Mumbai and various other cities.     

Sampat Bapurao Karade, Divisional Fire officer, Dattatray Bandu Patil, Leading Fireman, Guruprasad Anil Sawant, Assistant Fireman and Sandeep R Gavali, Driver Operator were presented the medals by the Governor.

      The National Fire Service Day is observed on April 14 to commemorate all the brave firefighters who lost their lives during a ship explosion at the Mumbai dockyard in 1944.  

0000

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

 राज्यपालांच्या उपस्थितीत राज्य कौशल्य विद्यापीठाचा

प्रथम वर्धापन दिन संपन्न

            मुंबई, दि. 14 :राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिवस एल्फिन्स्टन तांत्रिक शिक्षण संस्थामुंबई येथे साजरा करण्यात आला.

       यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षांच्या नियोजन अहवालाचे (व्हिजन डाक्युमेंट) प्रकाशन करण्यात आले.  

            कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक मेघना गुलजारकौशल्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणि तिवारीविद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकरकौशल्य आयुक्त निधी चौधरी तसेच विद्यापीठातील विभाग प्रमुखप्राध्यापकविद्यार्थी उपस्थित होते.

0000

Governor presides over Foundation Day of Maharashtra State Skills University

     Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the first foundation day celebration of the Maharashtra State Skills University (MSSU) at Elphinstone Technical Institute premises in Mumbai on Sunday (14 April). 

     The Governor released the Five Year Vision Document of the University on this occasion. The Governor also felicitated the best faculty members and well wishers of the university on the occasion.

     Filmmaker Meghna Gulzar, Additional Chief Secretary of Skill, Employment, Entrepreneurship & Innovation Department Om Prakash Gupta, MD of National Skill Development Corporation (NSDC) International Ved Mani Tiwari, Vice Chancellor of MSSU Dr. Apoorva Palkar, Commissioner of Skills , Employability and Innovation Nidhi Choudhari, faculty, staff and students  of the University were present.

0000

Sunday, 14 April 2024

मतदार जागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी

 मतदार जागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे

 दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम

राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग:

मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क  बजावण्याचे आवाहन

            मुंबईदि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि  मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयातर्फे  विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीमुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादवमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरमुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १८१- माहिम विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वाक्षरी मोहीम उपक्रमास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर सही करून मतदारांनी दि.२० मे रोजी  मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणुकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने(Systematic Voters Education & Electoral Participation) समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. 

            मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागरज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींसह विविध मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

            याप्रसंगी माहीम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकरतहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी या विशेष मोहीमेसाठी पुढाकार घेतला.

0000

काशिबाई थोरात/विसंअ/

मतदार जागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

 मतदार जागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे

 दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम

राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग:

मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क  बजावण्याचे आवाहन

            मुंबईदि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि  मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयातर्फे  विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीमुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादवमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरमुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १८१- माहिम विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वाक्षरी मोहीम उपक्रमास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर सही करून मतदारांनी दि.२० मे रोजी  मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणुकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने(Systematic Voters Education & Electoral Participation) समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. 

            मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागरज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींसह विविध मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

            याप्रसंगी माहीम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकरतहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी या विशेष मोहीमेसाठी पुढाकार घेतला.

0000

 lakshvedhimm

थोडं हसुया😊*

 *थोडं हसुया😊*

🤔 *काही अतिसुंदर(?) विचार* 🤔 

1: अंगात दम असणं चांगलं,

पण तो सारखा लागणं अत्यंत वाईट🤔

2: तारुण्यात न घसरलेला पाय उतारवयात नक्की घसरतो...

 बाथरूममध्ये......!🤪

3: कुणी उशिरापर्यंत झोपलेलं मी बघूच शकत नाही,

म्हणून मीच रोज उशिरा उठतो....🤭

4:  भांडण करताना ते विकोपाला जाणार नसेल तर ते करण्यात काहीच अर्थ नाही....🤓

5:  मराठी माणसांनी मराठीतूनच "कॉन्व्हरसेशन" केले पाहिजे....😃

6: स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..😜

7: काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.😛

8: रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂

9:  तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक मुलांना घेऊन दिली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😍

10: कुंडली  खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा  बिचारा कुणाशीही adjust करून घेतो..😁

11: लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😎

12: जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😉

13: पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂

14: गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "इकडे  सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 🤣

15: जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😛😃🤗

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदानासाठी दिव्यांगांचे सक्षमीकरण आवश्यक

 दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

देशाच्या सामाजिकआर्थिक प्रगतीमध्ये योगदानासाठी दिव्यांगांचे सक्षमीकरण आवश्यक

                                                   राज्यपाल रमेश बैस

 मुंबई, दि. १3 : दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिकआर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी अनेक कौशल्ये कालबाह्य होण्याची शक्यता असून त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम प्रज्ञा कौशल्यांच्या बाबतीत अवगत करणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजोग्या 'इन्कलुसिव्ह ॲटलास इंडिया 2024' या नकाशांच्या पुस्तकाचे राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने सदर ब्रेल तसेच सामान्य लिपीतून हा ॲटलास तयार केला आहे.

            दिव्यांग व्यक्तीसाठी संसदेने विधेयक तयार केले त्या समितीचे आपण अध्यक्ष असल्याचे नमूद करून स्पर्शजन्य नकाशांच्या पुस्तकाच्या माध्यमातून दृष्टिबाधित विद्यार्थी व मोठ्यांना विविध खंडदेशमहासागरसमुद्रराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सीमा यांची माहिती मिळेल तसेच स्पर्शजन्य आकृतींच्या माध्यमातून जीवशास्त्रभूगोलगणित विषय देखील समजणे सुलभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

            राज्यपालांनी नॅबला दिलेल्या निधीतून खरेदी केलेल्या 'ब्रेलोमशीन मुळे दृष्टिबाधित मुलांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाची छपाई तसेच निवडणुकीसंबंधित वोटर स्लिप छापण्यास मदत होत असल्याची माहिती 'नॅब'चे मानद सचिव डॉ विमल कुमार डेंगला यांनी यावेळी दिली. स्पर्शजन्य ग्राफीफ ॲटलास प्रकाशन सोहळ्याला नॅबचे मानद सचिव हरेंद्र कुमार मलिककार्यकारी संचालिका पल्लवी कदमरमाकांत साटमसुनील कपूरगुंजना मालवीय आदी उपस्थित होते.

000

Maharashtra Governor Bais releases 'Tactile Graphic Atlas' for Visually Impaired

            Maharashtra Governor Ramesh Bais released the 'Inclusive Atlas India 2024', a tactile graphic map of India and various States at Raj Bhavan Mumbai on Sat (13 April).

            The Tactile Graphic Atlas prepared by the National Association for the Blind in Braille and normal text will enable visually impaired persons to understand the map of India and that of various States.

            Dr Vimal Kumar Dengla, Hon Secretary General, NAB India, Pallavi Kadam, Executive President, Harendra Kumar Malik Hon Secretary, Ramakant Satam, Sunil Kapoor, Gunjana Malaviya were among those present.

000

Featured post

Lakshvedhi