Sunday, 14 April 2024

थोडं हसुया😊*

 *थोडं हसुया😊*


🤔 *काही अतिसुंदर(?) विचार* 🤔 


1: अंगात दम असणं चांगलं,

पण तो सारखा लागणं अत्यंत वाईट🤔


2: तारुण्यात न घसरलेला पाय उतारवयात नक्की घसरतो...

 बाथरूममध्ये......!🤪


3: कुणी उशिरापर्यंत झोपलेलं मी बघूच शकत नाही,

म्हणून मीच रोज उशिरा उठतो....🤭


4:  भांडण करताना ते विकोपाला जाणार नसेल तर ते करण्यात काहीच अर्थ नाही....🤓


5:  मराठी माणसांनी मराठीतूनच "कॉन्व्हरसेशन" केले पाहिजे....😃


6: स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..😜


7: काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.😛


8: रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂


9:  तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक मुलांना घेऊन दिली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😍


10: कुंडली  खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा  बिचारा कुणाशीही adjust करून घेतो..😁


11: लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..😎


12: जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😉


13: पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 😂


14: गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "इकडे  सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 🤣


15: जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😛😃🤗

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi