Sunday, 11 February 2024

संविधान व कायद्याच्या आधारे मार्गक्रमण केल्यास यशप्राप्ती

 संविधान व कायद्याच्या आधारे

मार्गक्रमण केल्यास यशप्राप्ती

सचिव सतीश वाघोले

 

            मुंबई, दि. ९ :- विधी विधान शाखेतील राज्यातील दहा विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम  शासनाने राबविला होता. विधी विधान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला असूनसंविधान व कायद्याच्या आधारे मार्गक्रमण केल्यास आयुष्यात यशप्राप्ती होणार असल्याचे सचिव सतीश वाघोले यांनी सांगितले.

            मंत्रालयात विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावायासाठी विधी विधान शालखेतील १० मुलांची इंटर्नशीपसाठी निवड करण्यात आली होती. या सहा आठवड्याच्या इंटर्नशीप नंतर समारोप कार्यक्रमाचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी  सचिव श्री. वाघोले विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

            राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP २०२०अंमलबजावणीमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिप हा महत्वाचा भाग असून विधी विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप लागू करण्यात आली आहे. विधी विधान विषयक कार्यपद्धतीची माहिती कोणत्याही विधी महाविद्यालयात शिकवली जात नाही किंवा अभ्यासक्रमाचाही भाग नाही.  कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

            विधी विधान शाखेत कायदे तयार करणेकायद्यांमध्ये सुधारणा करणेअध्यादेश प्रख्यापित करणेविधानमंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपध्दती अधिनियमांखालील नियम तयार करणेअधिसूचना काढणे आदी कामकाज चालते. याची माहिती विद्यार्थ्यांना या कालावधीत देण्यात आली. मंत्रालयविधानभवनराजभवन तेथे चालणारे कामकाज याची माहिती दिली.

            सचिव श्री.वाघोले म्हणाले कीकायदा तयार करताना तो इतर कायद्याला अधिक्षेप करणार नाहीकोणतीही अस्पष्टता राहणार नाहीत्याचे नियम स्वयंस्पष्ट व्हावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोर पालन नवीन कायदा तयार करताना करावे लागते. ही प्रक्रिया  विद्यार्थ्यांना समजुन सांगण्याचे काम या कार्यकाळात करण्यात आले. राजभवनविधानभवन आणि मंत्रालयातील विधी संदर्भातील कार्यपद्धती त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            कायदे तयार करण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेता आली. कायद्याकडे तसेच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.  शासकीय कामकाज कायदे आणि त्यांची अंमलबजावणी त्याचे गांभीर्य समजून घेतला आले. या अनुभवाचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल, असे विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले.

            यावेळी सहसचिव मुग्धा सावंतसुप्रिया धावरेमकरंद कुलकर्णीउपसचिव किरण पाटीलनरेश पुसनाकेपुष्पेंद्रसिंग राजपूतअवर सचिव सोनाली पाखरेअश्रफ पटेलभूषण भेंडारकर यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीविद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

०००

१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी

 १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी

 - मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

१३ फेब्रुवारीला विशेष मोहीम

 

            मुंबईदि. ०९ : जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमियापोटदुखीउलट्याअतिसारमळमळभूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजार उद्भवण्याची शक्यता असते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहीम राबविली जाते. येत्या १३ फेब्रुवारीला ही विशेष मोहीम राबविली जाणार असून१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी या मोहिमेंतर्गत जंतनाशक गोळी घ्यावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

            राज्यातील आरोग्य विभाग या मोहिमेची जय्यत तयारी करीत असूनवैद्यकीय अधिकारीशिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना याविषयीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोहिमेत १३ फेब्रुवारीला गोळी न घेऊ शकणाऱ्या मुलांना २० फेब्रुवारीला जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. राज्यभरामध्ये १३ फेब्रुवारी रोजी जवळपास २ कोटी ८० लाख मुला-मुलींना १ लाख १० हजार ९४४ अंगणवाडी केंद्रे१ लाख २७ हजार ८४९ शाळा व महाविद्यालयांमध्ये जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागशिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहनही करण्यात आले आहे.

            आरोग्य विभागाकडून सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. यंदा १३ फेब्रुवारी रोजी ही विशेष मोहीम राबविली जात असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये बैठकही घेतली जात आहे.

            जंतनाशक मोहिमेमध्ये १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी२ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येतेतर ३ ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास देण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही गोळी घ्यायला हवी. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

            या मोहिमेविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.

मोफत मिळते जंतनाशक गोळी

            अल्बेंडाझोल ही गोळी मोहिमेच्या दिवशी मोफत दिली जाते. तसेच आरोग्य उपकेंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडीशाळामहाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.

ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम; 339 वाहनचालकांची तपासणी

 ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम339 वाहनचालकांची तपासणी

 

            मुंबईदि. 09: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येत आहे. दारू पिऊन नशेच्या अंमलाखाली वाहने चालविली जाऊ नयेतअपघातांची व अपघाती मृत्यूंची रोखणे या उद्देशाने अशा वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्याकरीता ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 339 वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली.

            या मोहिमे अंतर्गत आरटीओ व वाहतूक विभागातील अधिकारी यांनी सायन सर्कलसुमन नगर चौकएडवर्ड नगरअमर महल चौक चेंबूरएलबीएस रोड घाटकोपरविक्रोळीदेवनारमानखुर्द शिवाजी नगर चौक आदी ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली. ही मोहिम 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान  सायं 7 ते रात्री 11.30 या दरम्यान राबविण्यात आली. यावेळी दुचाकीऑटोरिक्षाटॅक्सीमालवाहतूक करणारे हलके वाहनअवजड वाहन व बसचालकांची तपासणी करण्यात आली.

            दारू पिऊन वाहने चालविल्यास निश्चितपणे अपघात होऊन मृत्यूमुखी पडण्याची सर्वात जास्त शक्यता असल्याने वाहनचालकांनी नशेच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेत. पुढील काळातही ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी दारूच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेअसे आवाहन प्रादे‍शिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी केले आहे.

तख्त सचखंड, नांदेड प्रबंधन कमिटी में सिख समुदाय के ही रहेंगे सदस्य

 तख्त सचखंडनांदेड प्रबंधन कमिटी में सिख समुदाय के ही रहेंगे सदस्य

 

            मुंबई9 फरवरी : नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब में राज्य सरकार के नए निर्णय के कारणजो प्रबंधन कमिटी होगीउसमें सभी सदस्य सिख समुदाय सें ही होंगेऐसा स्पष्टीकरण राज्य सरकार के माध्यम सें किया जाता है.

            5 फरवरी को मंत्रिमंडल में निर्णय पश्चात कुछ संस्थाओंव्यक्तीओं द्वारा कुछ सवाल उठाए गए. लेकिनइस नए अधिनियम कें पश्चात भी प्रबंधन कमिटी में सभी सदस्य सिख समुदाय सें ही होंगे. सिख समुदाय के अधिकारीविशेषज्ञविचारवंत और समाज के भिन्न क्षेत्र में अतुलनीय योगदान देने वाले सिख समुदाय कें नागरिक ही होंगे. सिख समुदाय के बाहर के लोग इस प्रबंधन कमिटी में नहीं रहेंगे. कोई गलत प्रचार पर ध्यान ना दे या किसी संभ्रम में ना रहेंऐसा अनुरोध राज्य सरकार की ओर सें किया गया है. इस संदर्भ में बिल जल्द ही विधानसभा के पटल पर रखा जाएंगा और चर्चाउपरांत वहाँ इसका निर्णय लिया जाएगा. राज्य मंत्रिमंडल में लिए गए निर्णयानुसारनया बोर्ड कुल 17 सदस्यों का रहेंगाजिसमें 3 चुनाव सें2 सदस्य शिरोमणी प्रबंधक कमिटीअमृतसर सें और राज्य सरकार द्वारा नियुक्त भी सदस्य होंगे.

 

०००


 

Only the members belonging to the Sikh community will be accommodated in Takht Sachkhand Nanded Management Committee

 

            Mumbai, February 9:- Following the new decision of the state government, all the members in the Management Committee of Nanded Sikh Gurudwara Sachkhand Shri Hazur AbchalNagar Sahib will be from the Sikh community. Only This clarification had been given by the state government.

            Some questions were raised by few institutions and people after the decision of the state cabinet was taken on 5th of February 2024. But even after the pronouncement of this new Act, the management committee members will be all from the Sikh community. They will be the ones who are officials, experts, philosophers, thinkers of the community and have a lot of contribution in different fields of the society.

            The people who do not belong to the Sikh community will not be accommodated in the Management Committee. The government has clarified and appealed that no one should pay heed to the false campaign that is spreading a dilemma amongst the people. A bill will soon be tabled in the Legislative Assembly in this regard and the decision will be taken after detailed discussion on it. According to the decision taken by the state cabinet, there will be in all 17 members of the new Board. Three of them will be elected, two will be from Shiromani Prabandhak Committee Amritsar and there will be some appointed by the state government.

००००


पोलीसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे

 पोलीसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

34 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप

 

            नाशिकदि. 10- पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावेअसे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या समारोप समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजनपालकमंत्री दादाजी भुसेआमदार ॲड राहुल ढिकलेडॉ. राहुल आहेरपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाराज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसादविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेनाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकरअपर पोलीस महासंचालक निखील गुप्तानाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळेपोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमारपोलीस आयुक्त संदीप कर्णिकजिल्हाधिकारी जलज शर्माजिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेताणतणावापासून दूर राहण्यासाठी खेळ महत्वपूर्ण आहेत.  खेळामुळे संघ भावना तयार होऊन आव्हाने पेलण्याची स्फूर्ती व शक्ती मिळत असल्याने खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवत असतो. यासारख्या क्रीडा स्पर्धांमुळे राज्यराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असते. रेकॉर्डस हे तोडण्यासाठी असतातअशा स्पर्धांमधील रेकॉर्डस् तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या स्पर्धांच्या माध्यमांतून राज्यातील पोलीस दल एक नवा जोश व उत्साह घेऊन जाईल असा आशावाद उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

            महाराष्ट्र राज्याचे पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते आपले कर्तव्य निर्भीड व निस्पृहपणे बजावतात. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कल्याणासाठी चांगली दर्जेदार घरे उपलब्ध करून देणेकुटुंबियांना आरोग्यशिक्षणाच्या योजना देण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे सांगतनव्या पिढीसमोर असलेल्या अंमली पदार्थांच्या मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून ही लढाई जिंकण्याचा विश्वास देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

            पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मार्गदर्शन करतांना म्हणाल्यायासारख्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत होत असते. तसेच वेळोवेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पोलीस दलाने केलेली उत्कृष्ट कामगिरी बद्दल माहिती दिली.

            यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले पोलीस पथकांच्या संचलनाने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच  पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप झाल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस महासंचालक निखील गुप्ता यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

क्रीडा स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे….

20 व्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्सविनिपेगकॅनडा येथील पोलीस संघाचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा झाला सन्मान :

कुस्ती क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेते: सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंग यादवसहाय्यक समादेशक राहुल आवरेपोलीस उप अधीक्षक विजय चौधरी.

बॉडीबिल्डिंग मध्ये रौप्य व कांस्य पदक विजेते: सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारीपोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे

34 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा विजेते

हॉकी विजेता संघ : प्रशिक्षण संचालनालय

फुटबॉल विजेता संघ : राज्य राखीव पोलीस बल

महिला संघ : ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : वीर जिजामाता शिल्ड - प्रशिक्षण संचालनालय संघ पहिल्या रँकवर तर मुंबई शहर (द्वितीय)पुणे आणि पिंपरी चिंचवड (तृतीय)कोल्हापूर रेंज (चौथा)नागपूर शहर (पाचवा)अमरावती रेंज (सहावा)

व्हॉलीबॉल: नागपूर शहरकबड्डी : पुणे शहर/ पिंपरी चिंचवड आयुक्तालय

पुरूष संघ : कबड्डी : मुंबई शहरबास्केटबॉल : नाशिक परीक्षेत्रखो - खो व हँडबॉल : मुंबई शहरॲथलेटिक्स : प्रशिक्षण संचालनालय, 

उत्कृष्ट नेमबाज (पुरुष) : वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे 

ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : राज्य राखीव पोलीस बल (प्रथम)प्रशिक्षण संचालनालय संघ (द्वितीय)मुंबई शहर (तृतीय)कोल्हापूर रेंज (चौथा)पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड (पाचवा) तर नाशिक रेंज (सहावा).

जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक

 जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी

जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक

                                                                      -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

हिरवा झेंडा दाखवून जलरथ उद्घाटन सोहळा संपन्न

 

 

            नाशिकदि. 10- जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त 40 टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहेत. परंतु उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वीतेसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

            आज शहरातील गुरू दक्षिणा हॉल येथे जिल्हा परिषदनाशिक आयोजित जल जीवन मिशनस्वच्छ भारत मिशन टप्पा जलरथ उद्घाटन सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलरथांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

 

                        उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीगाळमुक्त धरणगाळयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचा पोत सुधारून ती जमीन सुपीक झाली आहे व उत्पादकता वाढली आहे. जलसंधारणाच्या दुसऱ्या टप्प्यासही आपण मागील वर्षात सुरवात केली असून जवळपास 409 जलसाठ्यांमध्ये काम करण्यात आले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला व जवळपास 667 कोटी लिटर पाणीसाठा तयार होऊन 67 लाख टँकर यातून भरता येणे शक्य आहे.

             जलस्त्रोत सुकलेले असल्यामुळे यातून माती व गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य आहे व संकटाचे संधीत रूपांतर करण्याची ही वेळ आहे. त्यादृष्टीने या कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून 24 हजार गावात काम होणार असून 16 हजार 405 पाणी साठे गाळ काढून  पुनर्जिवीत होणार आहेत. याचा फायदा लाख 20 हजार शेतकऱ्यांना थेट होणार आहे. 267 लाख टँकर भरतील इतका पाणीसाठा याद्वारे तयार होणार आहे. अशा नियोजनातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

            पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणालेमागील वर्षाच्या काळात महाराष्ट्रात प्रत्यक्ष कृतीतून तलावातून गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्याचे काम भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून झाले आहे. आज उद्घाटन झालेल्या जलरथांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये जल जनजागृती संपन्न होणार आहे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले तर परिणामी इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात.

 

            मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेजलजीवन मिशनच्या माध्यमातून झालेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे. जलजीवनच्या माध्यमातून कोरडवाहू जमीनही बागायत झाल्या आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून छोटे नाले व नदी यावर बंधारे बांधण्यात येत आहेत. यातून पाण्याची पातळी निश्चितच वाढीस लागली आहे.

            जलसंधारणाचे महत्व ओळखून मागील काळात जलयुक्त शिवार योजना सुरू केली. यात पहिल्या टप्प्यात 22 हजार गावांपर्यंत ही योजना पोहचली आहे. लोकांनीही उस्फुर्त सहभाग घेऊन यात योजनांमध्ये काम केले. यात गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवारडिप सीसीटी, साखळी बंधारे अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन गावागावांत जागृती करण्यात झाली. यामुळे पाण्याचे विज्ञान लोकांना समजले. जवळपास 700 कोटी रूपयांचा लोकसहभाग जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभला. या योजनेच्या माध्यमातून तयार केलेले स्ट्रक्चर्स पाणी साठवून ठेवतात त्यामुळे अभूतपूर्व भूजलस्तर वाढला आहे. 2020 मध्ये सादर झालेल्या अहवालात महाराष्ट्राची जलपातळी वाढल्याचे चित्र पहावयास मिळते. बुलढाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे झालेले काम राज्यात पथदर्शी आहे. जलसंधारण कामात अनेक बीजीएसनाम फाउंडेशनआर्ट ऑफ लिव्हिंगचंद्रा फाउंडेशनपाणी फाउंडेशन यासारख्या संस्थांचे कामही अधोरेखित करण्यासारखे आहे.

            यावेळी ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजनआमदार राहुल ढिकलेसीमा हिरेदेवयानी फरांदेपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनिल चव्हाणविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हाधिकारी जलज शर्माजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलजलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक दिपक पाटीलभारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

           

000000


 

स्व. सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिरचे लोकार्पण

  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

स्व. सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिरचे लोकार्पण

 

         नाशिक, 10: नाशिक महानगरपालिकेतर्फे 25 कोटी रूपये खर्चून हिरावाडी येथे साकारलेल्या स्व. सदाशिव गंगाराव भोरे कलामंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी फित कापून व कोनशिला अनावरण करून केले.

 

            यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसेग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजनआमदार राहुल ढिकलेसीमा हिरेदेवयानी फरांदेमहानगरपालिका आयुक्त अशोक करंजकरमाजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

            हिरावाडी परिसरात महापालिकेच्या सहा एकर जागेत या कलामंदिराचे  2900 चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले आहे. या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना प्रसाधनगृहांची व्यवस्थाकलाकरांना तालीम करण्यासाठी दोन्ही मजल्यांवर स्वतंत्र हॉलभव्य रंगमंच व सुसज्ज मेकअप रूमही आहे. नाट्यगृहात आधुनिक प्रकाशयोजनाध्वनीयोजनास्वयंचलित सरकते पडदे यासह एकूण 650 आरामदायी खुर्च्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक सीसीटिव्ही यंत्रणा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्नीशमन यंत्रणाही येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.

 

Featured post

Lakshvedhi