Wednesday, 31 January 2024

खिचडी वर्ग

 उघडा डोळे बघा नीट आपलं भविष्य पूर्ण अंधारात आहे प्रत्येक पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे

विदर्भातील आठ जिल्ह्यांत 'कौशल्य रथ' च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देणार

 विदर्भातील आठ जिल्ह्यांत 'कौशल्य रथच्या माध्यमातून

व्यवसाय प्रशिक्षण देणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई दि. ३० : स्थानिक युवकांमधील कौशल्य विकास वाढवणेप्रत्येकाच्या हाताला रोजगार देणेकौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी यासाठी  विदर्भातील आठ जिल्ह्यांत "कौशल्य रथ" च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग आणि  पुष्पांचल फाउंडेशनतर्फे आयोजित "कौशल्या रथ" चे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यानी हिरवी झेंडीं दाखवून केले.

             कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त निधी चौधरीव्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवीव्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटीलमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणेपंचशील फाउंडेशनचे संचालक गौरांग पांडे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की‘कौशल्य रथ’चा उद्देश  रोजगारक्षमता आणि उद्योजकता  वाढवण्यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यातील युवकाना करिअर मार्गदर्शन करणेत्यासंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत  होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले कीविदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध कौशल्य क्षेत्रीय परिषदा यांच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या कौशल्य विषयक अभ्यासक्रमासाठी युवक युवतींची नोंदणी करणे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करणे  याकरिता ‘कौशल्य रथ’ महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानांतर्गत  नियोक्ते आणि नोकरी शोधणारे यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी व्यक्तींसाठी ‘कौशल्य रथा’द्वारे  व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये पाच बसेसचा वापर करून महाविद्यालयांमध्ये थेट नावनोंदणी सत्रे आयोजित केली जाणार असल्याची श्री. लोढा यांनी सांगितले.

000

इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र

 इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल

मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र

            मुंबईदि. ३० :- अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या इट राईट कॅम्पस उपक्रमात मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उत्कृष्ट  कामगिरी केली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी लहू कनसकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

            या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआयुक्त अभिमन्यू काळेसह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरातसहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवलेसहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे आदी उपस्थित होते.

            मुंबई मध्यवर्ती कारागृहाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाक गृहातील उपकरणांची स्वच्छता व देखभाल नोंदीपेस्ट कंट्रोल रेकॉर्ड्सअन्न पदार्थ हाताळणाऱ्यांना देण्यात येणारे  प्रशिक्षण तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रऑडिटकच्च्या मालाची गुणवत्ता तसेच बनवलेल्या अन्नाची गुणवत्ता व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता या निकषांमध्ये परिपूर्ण कामगिरी केली आहे. इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून प्रमाणपत्र मिळवणारे पहिले कारागृह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढेही मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उपक्रमात सातत्य राखावे अशी अपेक्षा मंत्री श्री. आत्राम व्यक्त केली.

            मंत्री श्री. आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात इट राईट कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.  या उपक्रमातून राज्यातील रुग्णालयेमहाविद्यालयाची कॅन्टीनइंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स कॅन्टीन मध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) श्रीमती अनुपमा पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार

 अन्न व औषध प्रशासन विभागाच्या

प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार

- मंत्री धर्मरावबाबा आत्राम

            मुंबईदि. ३० :-  अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज अधिक गतीने व सुलभपणे होण्यासाठी  विभागाकडील प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

            मंत्री श्री. आत्राम यांनी आज त्यांच्या दालनात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआयुक्त अभिमन्यू काळेसह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरातसहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवलेसहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितलेअन्न व औषध प्रशासन विभागाच्या बळकटीकरणासाठी  आवश्यक साहित्याची खरेदी करण्याबरोबरच  फिरत्या प्रयोगशाळेसाठी १६ वाहने खरेदी करण्याचे नियोजन केले आहे.  या प्रयोगशाळा पिपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम गतीने व्हावे म्हणून विभागातील सह आयुक्त अन्नऔषधसहाय्यक आयुक्त अन्नऔषध पदावरील पदोन्नतीची प्रकरणे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावीत. विभागाकडील पदे पुनर्जीवित करणेनवीन पदांना मान्यता घेणेवर्ग तीन व चार पदांची भरती प्राधान्याने  करावीअशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र

 इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल

मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र

            मुंबईदि. ३० :- अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या इट राईट कॅम्पस उपक्रमात मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उत्कृष्ट  कामगिरी केली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी लहू कनसकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

            या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआयुक्त अभिमन्यू काळेसह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरातसहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवलेसहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे आदी उपस्थित होते.

            मुंबई मध्यवर्ती कारागृहाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाक गृहातील उपकरणांची स्वच्छता व देखभाल नोंदीपेस्ट कंट्रोल रेकॉर्ड्सअन्न पदार्थ हाताळणाऱ्यांना देण्यात येणारे  प्रशिक्षण तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रऑडिटकच्च्या मालाची गुणवत्ता तसेच बनवलेल्या अन्नाची गुणवत्ता व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता या निकषांमध्ये परिपूर्ण कामगिरी केली आहे. इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून प्रमाणपत्र मिळवणारे पहिले कारागृह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढेही मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उपक्रमात सातत्य राखावे अशी अपेक्षा मंत्री श्री. आत्राम व्यक्त केली.

            मंत्री श्री. आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात इट राईट कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.  या उपक्रमातून राज्यातील रुग्णालयेमहाविद्यालयाची कॅन्टीनइंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स कॅन्टीन मध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) श्रीमती अनुपमा पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

सागरी वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी लिथुआनियाला सर्वतोपरी सहकार्य

 सागरी वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी

लिथुआनियाला सर्वतोपरी सहकार्य

– मंत्री संजय बनसोडे

            मुंबईदि. ३० : महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. राज्यात सागरी वाहतूक आणि त्या अनुषंगाने विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक कऱण्यासाठी लिथुआनियातील उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईलअसे राज्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            लिथुआनियाच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री श्री. बनसोडे यांची भेट घेऊन येथील सागरी क्षेत्र वाहतुकीतील विविध संधींबाबत चर्चा केली.

            लिथुआनियाचे भारतातील राजदूत डायना मिक्व्हीसीनडायरेक्टर जनरल कापेडा सी पोर्ट ॲथॅारिटीचे अल्गीस लटाकस यांच्यासह तेथील बंदरे विभागाचे महासंचालक, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळबंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरातप्रशासन अधिकारी प्रदीप बढियेराजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव  मिलिंद हरदास आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणालेलिथुआनिया हा बाल्टीया प्रदेशापैकी एक सागरी विकास क्षेत्रात अग्रणी भाग आहे. राज्यात सागरी विकास धोरण २०२३ मधील विविध नवीन वैशिष्ट्य सागरी पर्यटन, नवीन बंदरे, मालवाहतुकीसाठी रस्ते व रेल्वे कडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधासह अद्यावत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले असल्याचे सांगितले.

            यावेळी महाराष्ट्र आणि लिथुआनियातील सागरी क्षेत्रातील विविध संधींसंदर्भात मंत्री श्री. बनसोडे यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली. राज्यातील सागरी वाहतूक आणि इतर संधीच्या अनुषंगाने सादरीकरणही करण्यात आले. यावेळी बंदरे विकास मंत्री आणि सागरी विकास मंडळाचे अधिकारी यांना लिथुआनियाच्या सागरी विकासउद्योगास भेट देण्याचे निमंत्रण शिष्टमंडळाने दिले.

            महाराष्ट्रात काम करणे निश्चितपणे आवडेलअशी भावना यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली. एकत्रितपणे बंदरे विकासाच्या अनुषंगाने यापुढील काळात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मंत्री श्री. बनसोडे यांनीया क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने राज्यात निश्चितपणे स्वागत आणि सहकार्य केले जाईलअसे सांगितले.

000

जर्मनीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार

 जर्मनीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार

मंत्री चंद्रकांत पाटील यांची जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत बैठक

            मुंबईदि. ३० : जर्मनीला  किमान ४ लाख कुशलप्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावेयासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईलअसे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलरअंद्रेस रिस्किटओमकार कलवाडे यांच्या समवेत जर्मन शिष्टमंडळाची बैठक झाली.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीयाबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करूनया विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यानंतर जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल.

            या निवडलेल्या विद्यार्थ्यांना जर्मन येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाईल. जर्मन येथे गेल्यानंतर त्यांचे किमान तीन महिन्याचे प्रशिक्षण होईल. मात्र यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी किंवा संबंधित कंपनीकडून नाकारले तर त्यांना किमान तीन महिन्यांचा भत्ता देणे अनिवार्य करावेअशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

            आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग  तंत्रज्ञान वापरण्याचे युग आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून युवा पिढी एकापेक्षा अधिक कौशल्य विकास प्राप्त करू शकते. जर्मनी येथे संधी मिळालेले विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपल्या देशाचीराज्याची वेगळी ओळख निर्माण करतील असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi