Friday, 12 January 2024

मुंबई फेस्टीव्हल २०२४' ठरणार जागतिक पर्यटकांचे आकर्षण

 मुंबई फेस्टीव्हल २०२४' ठरणार जागतिक पर्यटकांचे आकर्षण


 


       महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित करण्यात आला आहे.


            देशातील आणि परदेशातील लोकांना मुंबईचे आकर्षण असून या फेस्टीव्हलच्या माध्यमातून राज्याच्या संस्कृतीची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' एक व्यासपीठ ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदशनाने या फेस्टीव्हलचे उत्कृष्ठ नियोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती देखील अविरतपणे काम करत आहे. मुंबई फेस्टीव्हल राज्यात प्रथमच आयोजित केला जात आहे. या महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://mumbai-festival.com/ येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.


            फेस्टीव्हलमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, याबाबत पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी पर्यटन फेस्टीव्हल संदर्भात सविस्तर माहिती या मुलाखतीत दिली आहे.


‘मुंबई फेस्टिव्हल 2024 चे प्रथमच आयोजन करण्यात येणार आहे.


फेस्टिव्हलच्या या संकल्पनेबाबत काय सांगाल ?


        मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून प्रमुख व्यापारी केंद्र आहे. देश-विदेशातील लोकांमध्ये मुंबई शहराबद्दल तसेच इथल्या बॉलीवूडबद्दल विशेष आकर्षण आहे. मुंबई शहरास दररोज हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक, व्यवसायिक भेटी देत असतात. राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे मुंबईत शहर व उपनगरातील विविध विभागात आयोजन करण्यात येणार आहे.


‘मुंबई फेस्टिव्हल 2024 हा प्रथमच होत आहे.


खाजगी उद्योजक आणि शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात येणार आहे.


          मुंबई महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती गठीत करण्यात आली असून, यामध्ये विविध विभागांचे शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कार्यक्रम संयोजकाच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.                                             


मुंबई फेस्टिव्हलमध्ये संगीत प्रदर्शन, चित्रनगरी, बीच फेस्ट आणि


विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाणार आहे याबद्दलही सांगा


            या महोत्सवात राज्याच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी क्रीडा उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम उदा. सायकलींग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्, पॅरामॉटर शो, जुहू बीच येथे बीच फेस्टीव्हल याअंतर्गत फुटबॉल, वॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे.


या फेस्टिव्हलमध्ये होणारा ‘मुंबई वॉक’ ही संकल्पना काय आहे


            'मुंबई वॉक' हा एक 'फॅशन शो' कार्यक्रम असून यामध्ये बॉलीवूड सेलीब्रेटी सोबत मुंबईच्या दैनंदिन जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असलेले मुंबई डब्बेवाले, टॅक्सीचालक, बेस्ट चालक आणि वाहक, पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सफाईगार इत्यादींना कार्यक्रमात सहभागी करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.


मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे 'शॉप ॲण्ड विन फेस्टिव्हल' हे आहे.


याबद्दल जाणून घ्यायला आवडेल


            या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई व उपनगरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिक यांना सहभागी करुन घेण्यात येत असून दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर यामध्ये सहभागी होणाऱ्या विविध शॉपिंग मॉल, नाईट मार्केट व महत्त्वाच्या रिटेल ऑऊटलेटच्या माध्यमातून खरेदीवर ग्राहकांना विशेष सूट तसेच आकर्षक बक्षीस योजना उपक्रम राबविण्यात येणार आहे.


तरूणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये काय संधी आहे


        या महोत्सवात राज्याच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी क्रीडा उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम उदा. सायकलींग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्, पॅरामॉटर शो, जुहू बीच येथे बीच फेस्टीव्हल याअंतर्गत फुटबॉल, वॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी हस्तकला, मुंबई एक्स्पो, फूड कोर्ट, गाईडेड सीटी टूर इत्यादींच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक व तरुण वर्गाला सहभागाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


या फेस्टिवलमध्ये स्थानिक प्रशासनाला आपण कशाप्रकारे सहभागी करून घेतले आहे


             मुंबई महोत्सवाच्या नियोजनपूर्वक आयोजनासाठी विविध शासकीय विभागांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस व स्थानिक प्रशासन इत्यादींचा समावेश असून त्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक ती परवानगी, कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करणे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्रदेश विकास प्राधिकरण यांचे सहकार्य तसेच महोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस व वाहतूक व्यवस्था व पार्कींगसाठी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक पोलीस तसेच कोणताही अनुचित अपघात घडू नये यासाठी मुंबई अग्नीशमन यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांची मदत घेण्यात येणार आहे.


मुंबईतील पर्यटनाला चालना देणे आणि या ठिकाणी असणाऱ्या पर्यटन स्थळांचा विकास करणे यासाठी विभागामार्फत कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत


            मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिद्धी मोहीम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. तसेच बॉलीवूड टूरीझम, मुंबईतील युनेस्को हेरिटेज स्थळे, दक्षिण मुंबईतील वास्तू कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या इमारतींच्या प्रसिद्धीसाठी हेरिटेज वॉक, गेटवे ऑफ इंडिया येथे लाईट ॲण्ड साऊंड शो, उपनगरातील गोराई येथील विपश्यना सेंटर, कान्हेरी कॅव्हज्, गिलबर्ट हिल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुहू चौपाटी इत्यादी पर्यटन स्थळांची व्यापक प्रसिद्धी करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. तसेच खाजगी सहल आयोजकांच्या माध्यमातून मुंबई दर्शन व बॉलीवूड टूर या सहलींचे देखील आयोजन करण्यात येते.


मुंबई फेस्टिवल हा जागतिक पातळीवर पोहोचावा याच्यासाठी कशाप्रकारे


 प्रसिद्धी करण्यात येत आहे


        मुंबई महोत्सवाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर व्यापक प्रसिद्धीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी नामांकीत वृत्तपत्र समुह व दूरचित्रवाहिनी यांना मीडिया पार्टनर म्हणून देखील सहभागी करुन घेण्यात आले आहे.                                                              


            मुंबई मॅरेथॉन आणि 'काळा घोडा कला महोत्सव' यांचे आयोजक देखील या फेस्टिवलमध्ये सहभागी आहेत. मुंबईमध्ये नावाजलेल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा या महोत्सवामध्ये सहभाग असणे ही अभिमानाची गोष्ट आहे आपण काय सांगाल याबद्दल


            मुंबई मॅरेथॉन व काळा घोडा महोत्सव हे दोन कार्यक्रम मुंबईमधील नामांकित तसेच सर्वसामान्यांच्या आकर्षणाचे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमात अनेक नामांकित व्यक्ती सहभागी होत असतात. हे कार्यक्रम हे जानेवारी मध्येच आयोजित होत असल्यामुळे त्यांना या महोत्सवाचा एक भाग म्हणून सहभागी करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून या कार्यक्रमांना देखील व्यापक प्रसिद्धी देऊन त्यामाध्यमातून स्थानिक तसेच पर्यटकांना त्याचा लाभ घेणे शक्य होईल. 


या फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी काय आवाहन कराल.?


 या फेस्टिवलसाठी सर्वांना सहभागी होता येणार आहे का याच्यासाठी प्रवेश शुल्क आकारले आहे का ?


            या महोत्सवात सर्व मुंबईकर व पर्यटकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर जावून २० ते २८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करावी. तसेच सदर महोत्सवा दरम्यान शॉपिंग मॉल, रिटेलशॉप, नाईट मार्केट व मुंबई एक्स्पो इत्यादी ठिकाणी प्रवेश नि:शुल्क असेल. या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी माफक शुल्क आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. 


              *


००००


 


 


हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार संसदीय समिती अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट लवकरच हंगेरीत भारतीय विद्यापीठ स्थापन होणार : जोल्ट नेमेथ

 हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार संसदीय समिती

अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

लवकरच हंगेरीत भारतीय विद्यापीठ स्थापन होणार : जोल्ट नेमेथ

 

            मुंबई, दि. ११ : हंगेरी व भारतातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध पूर्वापार दृढ राहिले आहेत. भारतातील सर्व नामांकित कॉर्पोरेट उद्योजकांचे हंगेरीशी उद्योग व्यापार संबंध आहेत. हंगेरी येथे टीसीएस सारख्या कंपन्यांमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. उभय देशांमधील संसदीय संबंध दृढ होताना महाराष्ट्रातील विद्यापीठे व हंगेरीतील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण व विशेषतः वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्याच्या संधी आहेत.  लवकरच हंगेरीत भारतीय विद्यापीठ देखील स्थापन होईलअसा विश्वास हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जोल्ट नेमॅथ यांनी आज येथे व्यक्त केला.  

            जोल्ट नेमेथ यांनी हंगेरीच्या संसदीय समितीचे उपाध्यक्ष डॉ ऍटिला टिलकी यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांची गुरुवारी (दि. ११) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

            हंगेरी १९९० साली सोव्हिएत युनियनच्या जोखडातून मुक्त झाला. हा लढा आपल्या लोकांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने लढला असे नमूद करून गेल्यावर्षी भारत - हंगेरी राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. हंगेरी आपले भारताशी असलेले संबंध पंतप्रधान व्हिक्टर ओरबान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तरावर नेण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.   

            जी - २० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर महासत्ता म्हणून उदयाला आला असून जी २० व जी ७ देशांना जोडणारा पूल ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. 

            भारतीय चित्रपटांमुळे भारत व हंगेरीतील लोकांना जोडल्याचे नमूद करून 'डंकीचित्रपटातील बहुतांश चित्रीकरण हंगेरी देशात झाले असल्यामुळे आपण तो चित्रपट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात आल्यावर आपण 'गल्ली बॉयचित्रपट पाहिल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय संगीतनृत्ययोग हंगेरीत लोकप्रिय

            भारत लवकरच जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असून भारत - हंगेरी संबंध अधिक दृढ करण्याची ही योग्य वेळ असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी नमूद केले.

            भारतीय संगीतनृत्यआयुर्वेद व योग हंगेरीत लोकप्रिय असून राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने महाराष्ट्र व हंगेरीतील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तसेच  शिक्षक आदानप्रदानसंयुक्त पदवी तसेच परस्पर देशात एक सत्र पूर्ण करण्याची सुविधा याबाबत विचार व्हावा अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

            रशिया- युक्रेन युद्धानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या ६ हजार विद्यार्थ्यांना मायदेशी परत येण्यास हंगेरीने मदत केली तसेच हंगेरी येथे उर्वरित शिक्षण करण्यास देखील तयारी दाखवल्याबद्दल राज्यपालांनी हंगेरीचे आभार मानले.  

            एकट्या मुंबईतून हंगेरीला जाण्यासाठी दरवर्षी १५००० व्हिजा दिले जातात व हंगेरीत भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण होत असल्यामुळे आणखी मोठ्या संख्येने पर्यटक हंगेरीला जातील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

            बैठकीला हंगेरीचे मुंबईतील वाणिज्यदूत फेरेंस यारीपरराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचे सचिव डॉ रॉबर्ट फ्युरेस व अध्यक्षांच्या सचिव आना लॉफ्लर उपस्थित होते.  

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी

 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी

- मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. 11 : राज्यातील नवीन मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून महाविद्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी तातडीने करण्यात यावी. शासनस्तरावरील प्रस्ताव असतील तर ते तत्काळ सादर करण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधितांना दिल्या.

            आज मंत्रालयात राज्यातील नवीन मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांच्या विविध समस्याबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

            यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकरआयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारीअधिष्ठाता उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अंबरनाथभंडारागडचिरोलीबुलढाणावर्धा- हिंगणघाटअमरावतीहिंगोलीजालनानाशिकवाशिमग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमुंबई या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जागांची उपलब्धतासार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम प्रगती, शासकीय जमिनींचे हस्तांतरणनिधी वितरण विषयी आढावा घेऊन संबंधितांना निर्देश दिले.

रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालयाचा श्रेणीवर्धन व बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करावे

            वरळी येथील रा.आ.पोदार वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित म.आ.पोदार रुग्णालय याठिकाणी विद्यार्थी प्रवेश क्षमता 60 असताना पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वर्ग आणि परीक्षेसाठी पाच अध्ययन खोल्या बांधल्या होत्या. सध्या विद्यार्थ्यांची वाढलेली क्षमता विचारात घेता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तसेच परीक्षेसाठी बसण्याची व्यवस्था अपूर्ण पडत आहे. महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धन व बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशाही सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिल्या.

0000

भटके - विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम

 भटके - विमुक्त समाजातील नागरिकांना

शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम

            मुंबईदि. 11 : भटके - विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मुलभूत दस्ताऐवज आहे. त्यामुळे राज्यातील भटके - विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 15 जानेवारी ते 14 मार्च 2024 या कालावधीत  शिधापत्रिका वितरणाची विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे.

            राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार राज्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे 44 हजार रुपये आणि 59 हजार रुपये इतकी वार्षिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या अनुषंगाने विशेष मोहीम राबवताना नियमानुसार पडताळणी करुन भटके व विमुक्त समाजाच्या नागरिकांना इष्टांकाच्या मर्यादेत शिधापत्रिका वितरीत करून शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ देण्यात येणार आहेत. तरी भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Thursday, 11 January 2024

मुंबई फेस्टीव्हल २०२४' मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

 मुंबई फेस्टीव्हल २०२४' मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन


- पर्यटनमंत्री गिरीश महाजन


मुंबई शहर आणि उपनगरात होणार विविध कार्यक्रम


           मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. राज्याची कलासंस्कृती दर्शविण्यात या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.


                  'मुंबई फेस्टिव्हल २०२४' कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता क्रॉस मैदान गार्डन येथे होणार आहे. तसेच एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे महा एक्स्पोचे आयोजन केले असून दि.२० जानेवारी रोजी दुपा


री १२ वाजता ‘महा एक्सपो’चे उद्धघाटन होणार आहे. हा ‘महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महा एक्सपो’ सुरू असेल तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महा एक्सपो’ सुरू असेल.


        मुंबईतील विविध ठिकाणी दिनांक १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी रोजी शॉपिंग फेस्टचे आयोजन केलेले आहे.काळा घोडा येथे दिनांक २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप आणि स्क्रिनींग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित केले आहेत.


            सिनेमा फेस्ट दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपट गृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केलेले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू असेल. क्रिकेट क्लिनीक दिनांक २० ते २१ जानेवारी आणि दिनांक २७ व २८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ओव्हल मैदान येथे आयोजित केले आहे.


                 टाटा मुंबई मॅरेथॉनचे दिनांक २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे.टर्बो स्टार्ट फॉरईव्हर प्लॅनेट चॅलेंज दिनांक २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट दिनांक १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे.                           


            या महोत्सवात राज्याच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सायकलींग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्, पॅरामॉटर शो, जुहू चौपाटी येथे बीच फेस्टीव्हल याअंतर्गत फुटबॉल, व्हॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता मोहीम, मुव्हीज् स्क्रीन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे


*****

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, सफाई कामगारच यशाचे खरे हिरो

 केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम

स्वच्छता प्रेमी नागरिकसफाई कामगारच यशाचे खरे हिरो

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदनस्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ११ :- केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचेमहानगरपालिकासर्व नगरपरिषदानगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातूनआणि सफाईस्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे. स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे नमूद करूनमुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने ७ स्टार मानांकनासह तिसरा क्रमांक पटकावला आहे. एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये नगर परिषद सासवडला प्रथम आणि लोणावळा शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेला ५ स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला ५ स्टार मानांकनासह वॉटरप्लस मानांकन मिळाले आहे. याशिवाय एक लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सासवडलोणावळ्यासहकराडपाचगणी व विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावले आहेत. तर गडहिंग्लजविटादेवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवले आहे. यामुळे देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ८ शहरांनी स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात झाली आहेत्यापूर्वी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु झालेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेने मुंबईचे रस्तेगल्ल्या स्वच्छ होऊ लागल्या आहेत. स्वच्छता कामगारांच्या बरोबरीने जनता या स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होत असून या चळवळीला आता लोकचळवळीचे स्वरुप आले आहे.

            मुंबईपासून सुरु झालेली ही मोहिम आता राज्यभर राबविण्यात येत असतानाच आज महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज्यातील जनतास्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व अधिकारी-कर्मचारी अधिक जोमानेउत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील. यापुढेही आपण स्वच्छतेच्या अभियानात असेच सातत्य राखूया असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुरस्कार आणि मानांकन प्राप्त शहरांचेही अभिनंदन केले आहे.

0000

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप

 स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप

            मुंबईदि. 11 : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये झालेल्या सोहळ्यात गुरूवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते.

            स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 चे निकाल आज जाहीर झाले. त्यात महाराष्ट्राने पहिल्यांदाच इतर राज्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. देशात इंदूर आणि सुरत या शहरांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार राज्यातील नवी मुंबई महानगरपालिकासासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगरपालिकांना प्राप्त झाले आहेत. नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहरांत सेव्हन स्टार मानांकनासह आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. तर एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवड देशात पहिले तर लोणावळा शहर देशात तिसऱ्या स्थानांवर आहे. या संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका (स्वच्छतेत 10 वा क्रमांक) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत 13 वा क्रमांक)गडहिंग्लज (25 ते 50 हजार लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग)कराड (50 हजार ते एक लाख लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग)पाचगणी (15 हजारांहून कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग) (देशात 28 वा क्रमांक) यांना देखील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम 10 शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवडलोणावळागडहिंग्लजकराडपाचगणी या शहरांव्यतिरिक्त विटादेवळालीसिल्लोड या शहरांचाही समावेश आहे.

            मागील वर्षी राज्यातील केवळ नवी मुंबई या एका शहरास सेव्हन स्टार दर्जा प्राप्त झाला होता. तो दर्जा नवी मुंबईने यावर्षी देखील कायम राखला आहे. देशात केवळ तीन शहरांना सेव्हन स्टार दर्जा प्राप्त आहे. यावर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांनी फाइव्ह स्टार दर्जा मिळविला आहे. तर 28 शहरांना थ्री स्टार दर्जा प्राप्त झाला असून या गटात महाराष्ट्र देशपातळीवर प्रथम आहे. या शिवाय 81 शहरांना वन स्टार दर्जा प्राप्त झाला आहे.

            स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये महाराष्ट्र राज्यातील फक्त चार शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला होता. त्यात वाढ होऊन स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्रातील 21 शहरांना वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. देशातील सर्वाधिक वॉटर प्लस शहरे आता महाराष्ट्रात  झाली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये 200 शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त होता. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 264 शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त झालेला आहे.

            केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 सन 2021 ते सन 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात शाश्वत घन कचरा व्यवस्थापनशाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन ही उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहेत. तसेच सन 2026 पर्यंत राज्यातील सर्व शहरे कचरा मुक्त (जीएफसी) 3 स्टार मानांकन आणि ओडीएफ प्लस प्लसतसेच एक लक्षपेक्षा कमी लोकसंख्या असलेली 50 टक्के शहरे वॉटर प्लस करण्याचे उद्दिष्ट आहे.

            ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पुरस्कार स्वीकारताना नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरूद्ध जेवळीकरस्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालक नवनाथ वाठ आदी उपस्थित होते.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

Featured post

Lakshvedhi