Wednesday, 6 December 2023

शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

 शासन आपल्या दारीअभियानाच्या माध्यमातून

1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना  विविध योजनांचा थेट लाभ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'शासन आपल्या दारीअंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप

प्रस्तावित योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

            बीड दि. 5, (जिमाका) : 'शासन आपल्या दारीया अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            परळी येथील ओपळे मैदानावर 'शासन आपल्या दारीअंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हयाचे पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडेमाजी मंत्री पंकजा मुंडेआमदार सुरेश धसआमदार प्रकाश सोळंकेआमदार लक्ष्मण पवारआमदार बाळासाहेब आजबेआमदार नमिता मुंदडाआमदार संजय दौंडविभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दडजिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठकजिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुरयांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

            राज्यातील 20 जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला असून त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमांने मोडले याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करतो. असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेया कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या  विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.  प्रस्तावित इमारत व वस्तीगृह आणि तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

            यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारीप्रशासकीयकृषि कार्यालयसिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वसतिगृह इमारत यांचा यात समावेश आहे.

            नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी कालच 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणालेनागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यास पुरवणी मागणीत अधिक मदत व निधी देण्याचा प्रयत्न शासन करेल. कृषिमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले हे देखील उल्लेखनीय आहे. असे श्री. शिंदे म्हणाले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाला सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाहीअसे प्रधानमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असूनएक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे.

            नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.

            गोपीनाथ गड येथे लोकनेते  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवारकृषिमंत्री श्री. मुंडे यांनी अभिवादन केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सर्व मान्यवरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेवून विकास आराखडयातील कामांचे भूमिपूजन केले.

महाराष्ट्र सुजलाम - सुफलाम करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास  विघुत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृध्द होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून  आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईलयासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी रुपये खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचे फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थश्रेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास - उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न आहेत.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेतयाचे समाधान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाचे मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय निघाले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करू

- कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

            शासन आपल्या दारी उपक्रमातून 36 हजार लाभार्थ्यांना लाभ झालायाचा आनंद झाला आहे.  बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहीलयासाठी प्राधान्याने काम करु व जिल्ह्यात विकासाची गंगा आणूसर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करूअसेही मुंडे म्हणाले.

            महिलांसाठी आठ निवासी शाळाकृषी महाविद्यालयअंबाजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकासकामे शासनाने केली आहेत. देशात उज्जैनकाशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ येथे प्रसाद योजनेंतर्गत प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेतअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केल्याबद्दल आभारही श्री. मुंडे यांनी मानले. 

            माजी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व श्रेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्याने करतो, असेही त्या म्हणाल्या.

            जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविकात जिल्हाभरात सुरु असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमाबाबतची माहिती दिली.

ठळक नोंदी

या कार्यक्रमासाठी एस.टी. महामंडळाच्या 580 बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी घेण्यात आल्या होत्या.

आजचा मुख्यमंत्री यांचा दौरा हा प्रचंड गर्दीचा दिवस आणि उच्चांकी उपस्थिती असल्याचे ठरला.

परळी शहरात जागोजागी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या.

विविध शासकीय विभागांच्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात  

आले होते.

मंत्री महोदयांनी गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. त्यानंतर परळी तीर्थश्रेत्र  

विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. एकाच वेळी गोपीनाथ आणि वैद्यनाथ या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र   

फडणवीस यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख् केला.

भूमिपूजन कामे

1) जिल्हाधिकारी कार्यालयबीड

2) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतबीड

3) कृषि भवनबीड

4) संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलोचे वस्तीगृहबीड

5) संत भगवानबाब ऊसतोड कामगार मुलींचे वस्तीगृहशिरुर कासार

6) कृषि महाविद्यालयजिरेवाडी ता. परळी

7) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयजिरेवाडी ता. बीड

8) सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपक्रेंदधर्मापूरी ता. परळी

9) एमआयडीसी विस्तार सिरसाळाता. परळी

10) श्रीश्रेत्र परळी विकास आराखडा विकास आराखडा कामे

11) परळी बसस्थानकपरळी


गर्म अनानास का पानी बचाएगा आपकी जानकैंसर हार गया

 कैंसर हार गया

अनानास का गर्म पानी

      कृपया यह जानकारी सभी ग्रुपों में फैलायें!!

      आईसीबीएस जनरल अस्पताल के प्रोफेसर डॉ.  गिल्बर्ट ए.  क्वोक ने जोर देकर कहा कि यदि बुलेटिन प्राप्त करने वाला प्रत्येक व्यक्ति दूसरों को दस प्रतियां दे तो कम से कम एक जीवन बचाया जा सकता है।

      मैंने अपना योगदान दिया, आशा है आप भी कर सकते हैं..

       धन्यवाद!

      गर्म अनानास का पानी बचाएगा आपकी जान

      गर्म अनानास कैंसर कोशिकाओं को मारता है।

      अनानास के 2 से 3 टुकड़ों को एक कप में पीस लें और इसमें गर्म पानी मिलाएं, यह "नमकीन पानी" बन जाएगा, अगर आप इसे रोजाना पिएंगे तो यह सभी के लिए अच्छा है।

      गर्म अनानास कैंसर रोधी पदार्थ छोड़ता है, जो प्रभावी कैंसर उपचार के लिए चिकित्सा में नवीनतम प्रगति है।

      अनानास के गर्म फल में सिस्ट और ट्यूमर को मारने का प्रभाव होता है।  यह सभी प्रकार के कैंसर को ठीक करने में सिद्ध हुआ है।

      गर्म अनानास का पानी एलर्जी/एलर्जी के कारण शरीर से सभी कीटाणुओं और विषाक्त पदार्थों को बाहर निकालता है।

      अनानास के रस से प्राप्त दवा केवल *हिंसक कोशिकाओं* को नष्ट करती है और स्वस्थ कोशिकाओं को प्रभावित नहीं करती है।

      इसके अलावा, अनानास के रस में अमीनो एसिड और अनानास पॉलीफेनोल्स उच्च रक्तचाप को नियंत्रित कर सकते हैं, आंतरिक रक्त वाहिकाओं की रुकावट को रोक सकते हैं, रक्त परिसंचरण में सुधार कर सकते हैं और रक्त के थक्के को कम कर सकते हैं।

      पढ़ने के बाद दूसरों, परिवार, दोस्तों को बताएं कि अपने स्वास्थ्य का ख्याल रखें।

   “इस संदेश को कम से कम पांच समूहों में भेजें*

    *कुछ नहीं भेजूंगा*

    *लेकिन मुझे उम्मीद है आप इसे जरूर भेजेंगे*

मां तुझे सलाम

 


Tuesday, 5 December 2023

हा दैवाचा खेळ निराळा, रमेश भाटकर

 📚           वाचनीय                 📚


 ' दुपारी तीनची वेळ. रमेश माझ्याजवळ आला.जवळ घेऊन म्हणाला," मृदुला, मी सगळं संपवायचं ठरवलंय.आयुष्याला आज पूर्णविराम देतोय." मी त्याच्याकडे पाहून म्हटलं, " मलापण तसंच वाटतंय.नाही जगायचं मला पण."

भूतपूर्व न्यायमूर्ती मृदुला रमेश भाटकर यांच्या ' हे सांगायला हवं ' या पुस्तकातील 📖 हा उतारा. आपल्या पतीवर झालेला बलात्काराचा खोटा आरोप व त्याविरोधात दिलेला लढा याची माहिती या पुस्तकात दिली आहे.

रमेश भाटकर हे एक मराठी रंगभूमी,चित्रपट, टीव्हीवरील नामवंत अभिनेते. अचानक एक दिवस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला .नेहमीप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांनी बातमीची शहानिशा न करता रमेश भाटकरांना दोषी ठरवलं. त्यांचं जगणं हराम करून सोडलं. हे सारं रमेश व त्यांच्या न्यायाधीश पत्नीला सहन झालं नाही आणि अखेर जोडीने त्यारात्री रेल्वेखाली जीव देण्याचं त्यांनी  ठरवलं. रात्री अमेरिकेत असलेल्या मुलाला फोन करून त्याच्याशी शेवटचं बोलायचं आणि या जगाचा निरोप घ्यायचा असा बेत ठरवला.


रमेश त्यांच्या स्थावरजंगमाची यादी करायला बसले आणि अचानक फोनची घंटा वाजली.अचानक यासाठी की दोन दिवस फोन बंद होता. मृदुलांनी  फोन उचलला, तर  पलीकडे जस्टीस धनंजय चंद्रचूड (सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती) होते. ते म्हणाले , " मी आताच तुमची जजमेंट वाचून संपवली.मी व जस्टीस राधाकृष्ण जजमेंट तपासण्याच्या समितीत Very Good  शेरा दिला आहे.तुम्ही हायकोर्टात बेंचवर येण्याची वाट पाहतो." तेव्हा मृदुला बोलून गेल्या, ' सध्या आम्ही अत्यंत निराश आहोत.' चंद्रचूड म्हणाले, " सगळं बोगस दिसतंय. चिंता करू नका. माझ्या तुम्हा दोघांना सदिच्छा." 


हे ऐकून मृदुला थरारल्या. या कठीण परिस्थितीत कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवतोय हे सारं  उमेद वाढवणारं  होतं. त्यांनी सारं संभाषण रमेशना सांगितलं. ठरवलं. आपण लढायचं. सारं काही अजून संपलं नाही. ' काळाचे चक्र फिरेल, संपेल रात्र संपेल ' या आशावादाने ते दोघे या संकटाला सामोरे जाण्यास सज्ज झाले.


हे सारं घडलं,तेव्हा मृदुला भाटकर मोक्का कोर्टाच्या न्यायाधीश होत्या.मुंबई लोकल साखळी बाॅंब स्फोटाचा खटला त्यांच्यासमोर चालू होता.या संदर्भातील जजमेंट संबंधी चंद्रचूड यांचा ' तो ' फोन होता. पण हा खटला चालवत असतानाच अचानक त्यांची तेथून कोल्हापुरला बदली झाली. तेथे जाण्याच्या तयारीत असताना ही बलात्काराची बातमी सर्वत्र पसरली आणि पुढे दोघांच्या आयुष्याची  दहा बारा वर्षे विस्कळीत होऊन गेली. प्रसिद्धी माध्यमांनी तर ताळतंत्र सोडून भाटकरांवर नाना तऱ्हेचे गलिच्छ आरोप करायला सुरुवात केली होती. एफआयआरमध्ये कुठेही त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप नसताना बिनदिक्कतपणे ' बलात्कारी रमेश ' म्हणून प्रतिमा रंगवली. यामुळे समाजात बाहेर तोंड काढणं कठीण होऊन बसलं आणि त्याचमुळे कंटाळून दोघांनी आयुष्य संपवायचा निर्णय घेतला होता. चंद्रचूडना त्यावेळी ठाऊक नव्हतं की आपल्या एका फोनने आपण दोघा निरपराध व्यक्तींचे जीव वाचवले आहेत !


सर्वसाधारण स्त्री जे करेल, तेच मृदुलांनी केलं. त्यांनी रमेशना हे प्रकरण काय आहे ते विचारलं. त्यांनी आपणं असं काही केलेलं नाही हे सांगितलं.गेली २९ वर्ष रमेशबरोबर त्यांनी संसार केला होता. त्यांचाही रमेशवर विश्वास होता, पण एकवार खात्री करून घेतली होती. ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हापासून 

मृदुलांना वारंवार वाटतं होतं, की या प्रकरणात रमेश फक्त प्यादं आहे.खरे लक्ष्य आपण आहोत. हा जो कोणाचा अदृश्य हात आहे, तो त्यांनी शोधायचा ठरवला. त्यावेळी त्यांना  जळगाव वासनाकांडाचा खटला आठवला. हा खटला त्यांच्यासमोर असताना सरकारी दबावाला भीक न घालता त्यांनी तो खटला चालवला होता. त्याचीच किंमत तर आज चुकती करावी लागतं नाही ना, असा त्यांना संशय येत होता.


१९८८पासून जळगावमधील तरुण व अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार केले गेले होते. त्यासंबंधी १९९४ मध्ये या प्रकरणाला वाचा फुटली. अनेकांना पकडण्यात आलं. त्यातील काही सत्ताधारी पक्षाशी संबंधित होते. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आदेश दिल्याप्रमाणे त्या वेगाने खटल्याचं कामकाज चालवत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर अनपेक्षितपणे अनेक ठिकाणांहून दबाव येऊ लागला. एके दिवशी त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी ' लोकसत्ता ' या दैनिकात प्रसिद्ध झाली.मृदुलांनी ती बातमी मुख्य न्यायमूर्तीच्या निदर्शनास आणली व त्यातील सर्व माहिती खोटी असल्याचं सांगितलं.न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी 'लोकसत्ता'वर खटला भरण्यात आला. त्या दैनिकावर नामुष्कीची पाळी येऊन न्यायालयाची त्यांना माफी मागावी लागली व तसा खुलासा दैनिकातून प्रसिद्ध करावा लागला. जेव्हा एक खटला अंतिम निर्णय देण्याच्या टप्प्यावर आला, तेव्हा सरकारी वकील   निकालपत्र पुढे ढकलण्याची विनंती करू लागले.नेमकं त्याच वेळी एक ओळखीची आय.एस.एस.अधिकारी ' हा संवेदनशील  खटला आहे, तेव्हा  सावकाशीने काम कर ' असा सल्ला देऊ लागली. हे कमी म्हणून की काय मुख्य न्यायमूर्तींनी पण भेटायला बोलावलं. तेव्हा पुण्याहून मुंबईला जात असताना गाडीत दोघा इसमांच्या बोलण्यावरून त्यांच्या लक्षात आलं की विधानसभेची निवडणूक १२ फेब्रुवारीला आहे. आणि त्या निकाल त्या तारखेअगोदर देणार होत्या. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की कोणीतरी राजकारणी या निकालामुळे फटका बसू नये म्हणून खटल्याचा निकाल पुढे कसा जाईल हे पाहत आहे. त्या सावध झाल्या. मुख्य न्यायमूर्तीनी पण आडवळणाने तो खटला लांबणीवर टाकण्याचा सल्ला दिला. पण लेखी आदेश देत नव्हते.त्यामुळे या दडपणांना भीक न घालता, मृदुलांनी तो खटला चालवण्याचं ठरवलं, तर अचानक उच्च न्यायालयाने खटल्याला स्थगिती दिली.


मृदुलांना वाटतं होतं की हे दुखावलेले राजकारणी आज सूड घेत आहेत. आपण त्यांच्या पायाशी लोळण घ्यावी, या अपेक्षेत आहेत. म्हणजे आज उपकार करून पुढे कधी तरी या उपकाराची पुरेपूर परतफेड करून घेता येईल. पण यास दाद न देण्याचं त्यांनी ठरवलं.


या निर्णयामुळे नाना प्रकारच्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. ' बलात्काऱ्याची बायको ' म्हणून मृदुलांना त्यांच्या बारकडून साधा निरोप समारंभही देण्यात आला नाही. त्यांच्या  सहकाऱ्यांनी त्यांना टाळलं. कोल्हापुरात असताना न्या. चंद्रचूड व न्या. अभय ओक दोघे तेथे एका कामासाठी आले होते. रिवाजाप्रमाणे  या दोघांना व तेथील सहकारी न्यायाधीशांना मृदुलांनी बंगल्यावर जेवायला बोलावलं. यावेळी रमेश बंगल्यात असतानाही त्या मेजवानीत ते सामील होऊ शकले नाहीत.ते एकटेच बेडरूममध्ये जेवले. मृदुलांची  उच्च न्यायालयात नेमणूक झाल्यावर झालेल्या शपथविधीसाठी पण रमेश हजर राहू शकले नाहीत. कारण जेथे  न्यायाधीश उपस्थित आहेत, त्या सभारंभाला रमेशसारख्या ' गुन्हेगारा' ची उपस्थिती अशी बातमी  प्रसिद्ध होणं साऱ्यांना अडचणीत टाकणारं होतं. पुढे रमेशची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. तेव्हा मुलाचं लग्न करायचं ठरलं. तेव्हाही स्वागत समारंभाला न्यायाधीशांना आमंत्रित करायचं की नाही या द्विधा मनस्थितीत त्या होत्या.पण शेवटी त्यांनी सहकाऱ्यांना आमंत्रण दिलं. पुष्कळसे न्यायाधीश हजर राहीले. पण तेथेही रमेशचा त्यांच्याशी संबंध येणार नाही याची दोघांनी काळजी घेतली. सारी कोंडीच या दोघांची झाली होती.


 यावेळी त्यांचे कुटुंबीय व विजय गोखले आणि विनय येडेकर हे मराठी रंगभूमीवरील कलाकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले‌ . मृदुलांचे वडील न्यायाधीश प्रताप बेहरे, ( हे पुस्तक वाचल्यावर लगेचच प्रताप बेहरे यांचं ' मी एक न्यायाधीश ' हे पुस्तक वाचण्यात आलं.) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.डी.    तुळजापूरकर हे मामे आजोबा यांची शिकवण, मामेभाऊ प्रख्यात वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांचं सततचं मार्गदर्शन यामुळे ते या संकटाशी मुकाबला करू शकले.


या पुस्तकातून रमेश भाटकरांचं एक संवेदनशील,प्रेमळ व्यक्तिमत्त्व पाहायला मिळतं.आपण वकील झालो, त्याचं सारं श्रेय त्या रमेशना देतात.एल.एल.बीची तिसऱ्या वर्षीची परीक्षा असताना रमेश छोट्या हर्षवर्धनला सांभाळून त्यांना अभ्यासाला वेळ देत. ' जेव्हा लग्न झालं, त्या दिवशी रमेशच्या खात्यात फक्त सोळा रुपये होते.पण संसार मात्र सोळा आणे झाला '  असं त्या अभिमानाने  लिहितात. या ' लढाईच्या काळात ' मृदुला सांगतील त्याप्रमाणे ते वागत होते.


त्यांची ही कहाणी वाचत असताना   पुष्कळशी न्यायालयीन प्रक्रिया कळते. न्यायाधीश आणि न्यायमूर्ती यांतील फरक कळतो. कोर्टाचा अवमान,  एकेका न्यायाधीशाची खटला चालवण्याची पद्धत, लेखी आदेशाची किंमत,उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नेमणुकीची प्रक्रिया, नंतर राष्ट्रपतींकडून येणारं नेमणुकीचं वाॅरंट याची माहिती मिळते. आपल्यावर टीका होत असतानाही कायद्याच्या बंधनामुळे त्यांना आलेली हतबलता याचं ज्ञान होतं.


एवढं सारं भोगूनही मृदुला जेव्हा लिहितात, की ' या सगळ्या काळात आम्ही दोघांनी आनंदानं काळ घालवला कारण आमची आमच्या कामावरची श्रद्धा व प्रेम ', तेव्हा त्यांच्या खंबीर मनाचं कौतुक करावसं वाटतं.


अशा वेळी आठवतात सुरेश भटांच्या गाण्याच्या ओळी,

' भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले ! 

एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ! '


लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणारी पत्रकारिता जेव्हा बेजबाबदारपणे वागते, तेव्हा त्या संबंधित व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची काय घुसमट होते, हे कळण्यासाठी तरी ' हे  सांगायला हवं '

 हे वाचनीय पुस्तक वाचायलाच हवं.' हे सांगायला हवं म्हणून हा खटाटोप.

नक्की वाचा.


 प्रदीप राऊत

🖋️🖋️🖋️

Monday, 4 December 2023

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24

 विशेष लेख

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

सन 2023-24

शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गतच फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊसपुर्व शीतकरण गृहशीतखोली शीतगृहशीतवाहनरायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते.फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. फलोत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधाबाबत विशेष लेख... 

 

काढणीत्तोर व्यवस्थापन 

फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतातही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊसपुर्व शीतकरण गृहशीतखोली शीतगृहशीतवाहनरायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादनऔषधी सुगंधी मालाची साफसफाईप्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजार मुल्य ‍शेतकऱ्यांना कमी मिळते या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एकात्मिक पॅक हाऊसपुर्व शीतकरण गृहशीतखोली शीतगृहशीतवाहनरायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी इ. प्रकल्पांना प्रेात्साहन व अर्थसहाय्य दिले जाते.

 

उद्देश  :-

मोठया प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या फलोत्पादन उत्पादनाचे बाजार नियंत्रण करणे. फलोत्पादितऔषधी व सुगंधी वनस्पती पिकांचा दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे. बाजारपेठेमध्ये फलोत्पादित औषधी व सुगंधी वनस्पतींच्या पुरवठयात सातत्य ठेवणे. ग्राहकाला आवडीप्रमाणे सातत्याने चांगल्या दर्जाच्या मालाचा पुरवठा करणे. फलोत्पादितऔषधी व सुगंधी वनस्पतीचा टिकाऊपणा वाढविणे.

 

पात्र लाभार्थी :- 

शेतकरीशेतकरी उत्पादक गटभागीदारी संस्थामालकी संस्थानोंदणीकृत स्वयंसहाय्यता गटनोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील)शेतकरी उत्पादक कंपनीकंपनीमहानगरपालिकासहकारी संस्थासहकारी मार्केटिंग फेडरेशनलोकल बॉडीकृषि उत्पन्न बाजार समितीपणन मंडळशासकीय विभागग्रामपंचायत. शेतकरी उत्पादक कंपनीशेतकरी उत्पादक संस्थाशासन मान्य संस्थासहकारी संस्था यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. वैयक्तिक शेतकरीभागीदारी संस्थामालकी संस्थानोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील)शेतकरी उत्पादक कंपनीकंपनीशेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊसपुर्व शीतकरण गृहशीतखोली शीतगृहशीतवाहनरायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्थाराज्य सहकारी संस्थानोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाहीमात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबाबत चे पुरावे सादर करावे लागतील.

 

काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमान निहाय देय अनुदान पुढीलप्रमाणे :

 1.पॅक हाऊस (Pack House) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 4.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी. X 6 मी.असे राहील. देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र

50 %   (रु. 2.00 लाख) असे असेल.

 

2. एकात्मिक पॅक हाऊस कन्व्हेअर बेल्टसंकलन व प्रतवारी केंद्रवॉशिंग व ड्राईंग यार्ड आणि भारत्तोलनइ. सुविधांसह  (Integrated pack house with facilities for conveyer belt, sorting, grading units, washing) या साठी अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 50.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी.  x 18 मी.,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के  (रू. 17.50 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र  50 टक्के (रू. 25.00 लाख) असे असेल.

 

3. पुर्व शितकरण गृह (Pre-cooling Unit)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम

रू. 25.00 लाख /  प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,

35 टक्के  (रू. 08.75 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र  50 टक्के (रू. 12.50 लाख)

असे असेल.

 

4. शितखाली (स्टेजिंग) Cold Room (Staging)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रु. 15.00 लाख प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 05.25 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 07.50 लाख) असे असेल.

 

5.नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण (Technology induction and Modernization of cold-chain) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 250.00 लाख,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 87.50 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र

50 टक्के  (रू. 125.00 लाख) असे असेल.

 

6. शितवाहन (Refrigerated Transport Vehicles)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 26.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मे. टन  ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के                  (रू. 09.10 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के     (रू. 13.00 लाख) असे असेल.

 

7. रायपनिंग चेंबर (Ripening Chamber) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 1.00 लाख प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता 300 मे. टन,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्केडोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के असे आहे.               

 

8. शितगृह (नविन) (Cold Storage Unit- New Construction)

अ) नविन शितगृह युनिट प्रकार- 1 (एक सारख्या तापमानात राहण्याऱ्या उत्पादनासाठी) (प्रति चेंबर 250 टन),अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 8000  प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता

रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,

35 टक्के जास्तीत जास्त रु. 140.00 लाख,

डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के जास्तीत जास्त रु. 200.00 लाख असे आहे.

 

ब) शितगृह युनिट प्रकार- 2 (एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी) कमीत कमी 6 चेंबर्स पेक्षा जास्त (प्रति चेंबर 250 टन) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टनबांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र,50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख असे आहे.

 

क) शितगृह युनिट प्रकार-२ (नियंत्रण वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे)

अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र,50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख असे आहे.

 

9. एकात्मिक शीतसाखळी कार्यपध्दती (Integrated Cold Chain supply System)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 600.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी घटक क्र. 1 ते 8 मधील किमान 2 घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के  (रू. 210.00 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र, 50 टक्के   (रू. 300.00 लाख) आहे.

 

योजनेत सहभागी होण्यासाठी

 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ :- http://krishi.maharashtra.gov.inhttp://mahanhm.in किंवा नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये

 मुंबईतील ३०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्या शुभारंभ


         मुंबई, दि. ३ : मुंबई महानगर क्षेत्रातील ३०० शाळामहाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग,शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनशिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दिनांक ५ डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

            शालेय शिक्षण घेत असताना करिअरच्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत याबाबत विद्यार्थी आणि पालकांना  माहिती व्हावी, यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग एकत्र येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानितविनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन मळावा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

      करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये करिअर कसे निवडावे, करिअरच्या विविध वाटा, व्यक्तिमत्व विकास, कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. यावेळी विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करिअर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यास उपलब्ध असेल. विविध करिअर क्षेत्रेविविध अभ्यासक्रमप्रवेश परीक्षाप्रवेश प्रक्रियास्पर्धा परीक्षाशिष्यवृत्ती योजना याबाबत अद्यायावत माहिती असलेले करिअर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी व पालकांना विनामूल्य देण्यात येईल. या कार्यक्रमामध्ये करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्करप्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनिषा पवार यांचे पथक करिअर मार्गदर्शन करणार आहे.

००००

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियानांतर्गत राज्यातील एक कोटी पुरुषांची तपासणी पूर्ण

 निरोगी आरोग्य तरुणाईचेवैभव महाराष्ट्राचे अभियानांतर्गत

राज्यातील एक कोटी पुरुषांची तपासणी पूर्ण

- प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई,  दि. ४ : निरोगी आरोग्य तरुणाईचेवैभव महाराष्ट्राचे अभियानांतर्गत आतापर्यंत १ कोटी पुरुषांच्या मोफत आरोग्य तपासणीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत ४ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ वर्षांवरील १ कोटी ७२ हजार पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ९२ लाख लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या असून त्यापैकी सोळा लाख लाभार्थ्यांना औषधोपचार देण्यात आलेले आहेत. सुमारे तेरा हजार लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्रआरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रशहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रशहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्रशहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयसामान्य रुग्णालयजिल्हा रुग्णालयसंदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणीआवश्यक चाचण्यागरजेनुसार ईसीजीसिटीस्कॅनएक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत आणि गरजेनुसार रुग्णांना आवश्यक शस्त्रक्रिया सार्वजनिक जारोग्य विभाग अंतर्गत रुग्णालयांमध्ये मोफत केल्या जाणार आहेत.

 गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या निरोगी आरोग्य तरुणाईचेवैभव महाराष्ट्राचे’ या अभियानासाठी विशेष अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. या अॅपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणीत्यांना दिलेले औषध उपचार तसेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रियाकरण्यात आलेल्या चाचण्याया माहितीची नोंद केली जाते.

0000

Featured post

Lakshvedhi