Friday, 10 November 2023

मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

 मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार

कर्मचाऱ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

 

            मुंबईदि. ९:-  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री श्री . शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय जाहीर करताना म्हटले आहे कीदिवाळी सणाचा गोडवा द्विगुणित व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएचे कर्मचारी हे एक महत्वाच्या विकास यंत्रणेचे आणि या कुटुंबाचे सदस्य म्हणून काम करतात. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईलम्हणून हा गेल्या वर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आनंद बहुमोल आहे.वाढीव अनुदान जाहीर केल्याने एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. 

            एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. मुखर्जी यांनी,  सानुग्रह अनुदानाचा हा निर्णय म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच ठरेल. कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात जाईलते प्राधिकरणाच्या कामात आणखी उत्साहाने योगदान देत राहतीलअसा विश्वास व्यक्त केला आहे.


Thursday, 9 November 2023

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :

 *🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢*

*📄 आवश्यक कागदपत्रे :*

*१.आधारकार्ड*

*२.बॅंकपासबुक झेरॉक्स*

*३.मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)*

*4 व्यक्ती स्वतः*

*कोणाला लाभ घेता येणार आहे*

*✔️ सुतार*

*✔️ लोहार*

*✔️ सोनार*

*✔️ कुंभार*

*✔️ न्हावी*

*✔️ फुलारी*

*✔️ धोबी*

*✔️ शिंपी*

*✔️ मेस्त्री*

*✔️ चर्मकार*

*✔️ अस्रकार*

*✔️ बोट बांधणारे*

*✔️ अवजारे बनवणारे*

*✔️ खेळणी बनवणारे*

*✔️ चावी बनवणारे*

*✔️ मासेमारचे जाळे विणणारे.*


*काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?* 

*https://pmvishwakarma.gov.in/*


 *१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.*


*❇️ योजनेचा उद्धेश ?* 


 *योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह.*


*❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :*

*https://pmvishwakarma.gov.in/*


*१.पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना  पाच दिवसीय प्रशिक्षण  दिले जाणार आहे.*

*२.पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे.* 

*३.प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे.*

 *४.प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले जाणार आहे.*

**५.प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.*


*https://pmvishwakarma.gov.in/*

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

 दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप



 

            मुंबईदि. 09 : दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारीकंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. 

यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार सक्सेनाराज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघलराज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

0000

 

Maharashtra Governor distributes sweets to staff, workers on Diwali

 

            Mumbai, Nov. ०९ :Maharashtra Governor Ramesh Bais today distributed sweets to the workers, staff and contract workers of Raj Bhavan on the occasion of Diwali. The Governor extended Diwali greetings to all.

            Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, Secretary to the Governor Shweta Singhal, Comptroller of the Governor's Households Arun Anandkar and officers and staff of Raj Bhavan were present.

000


 


ध्वनी, वायू प्रदूषण टाळण्याचे आवाहन’

 ध्वनीवायू प्रदूषण टाळण्याचे आवाहन

दीपावली निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि. 9 : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

            दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंदसंपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करावाअसे आवाहन करतो व सर्वांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतोअसे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

 

 

Maharashtra Governor Ramesh Bais greets people on Diwali

 

          Mumbai Dated 9 : The Governor of Maharashtra Ramesh Bais has conveyed his greetings to the people of Maharashtra on the occasion of Diwali.  In a message to the people, the Governor has said: “May Deepawali, the festival of lights bring happiness, prosperity and peace in the lives of all. Let us make conscious effort to reduce air and noise pollution. I extend my heartiest greetings to the people on the auspicious occasion of Diwali.”

0000


 

हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे

 हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबई,दि.9 : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळानी तयार केलेल्या विविध साहित्यांच्या स्टॉलचे उच्च, तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात उद्घाटन केले.

            मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळांने तयार केलेल्या कापडाचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. 

            मंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

            या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर (महाहॅण्डलूम) महाराष्ट्रराज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यामुंबई  (महाटेक्स)हिमरू शाल उत्पादकछत्रपती संभाजीनगरआसावली महिला हातमाग विणकर सहकारी संस्था पैठणमहिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीनिमित्त सजावट साहित्यफराळसेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांचे स्टॉल येथे लावण्यात आले आहेत.

            यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग,उपायुक्त गोरक्ष गाडिलकरउपसचिव श्रीकृष्ण पवारउपसचिव श्रद्धा कोचरेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सरसावले

 राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सरसावले

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी 1000 टॅंकर

रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबईदि. 9 : राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरुपात काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता 1000 टॅंकर लावावेत. त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. एमएमआरडीएची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावीत. ॲण्टी स्मॉग गनस्प्रिंकलर्सचा वापर वाढवावाअसे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना सांगितले.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहापालिका आयुक्तपोलिस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य संवादप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरएमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जीपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराजएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मापरिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आदी यावेळी उपस्थित होते.

प्रदूषण मुक्त मोहीम लोकचळवळ व्हावी

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीमुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करावी

            मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामेविकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत. त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या 1000 पर्यंत वाढवावीअसेही त्यांनी सांगितले. मुंबईसह महानगर परिसरात एमएमआरडीएमार्फत विकास कामे सुरू आहेत अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले.

मातीडेब्रीज वाहून नेताना ती झाकून न्यावी

            सर्व महापालिकाशहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर संनियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाहनांमधून रस्त्यांवरील मातीडेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

अर्बन फॉरेस्ट वाढवावे

            राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महानगरपालिकांनी पुढाकार घ्यावा. मेडन मध्ये वृक्षारोपण करावे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करावा

            राज्यातील प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आयआयटीच्या तज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी या तज्ञांनी केले.

                                                                        ००००


 

आजारपणामुळे प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

 आजारपणामुळे प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याचे सांगत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. ८ :- गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणाथकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठीशुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांनाआपल्या कुटुंबीयांनानातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाशधनधान्याची समृद्धीउत्तम आरोग्य घेऊन येवोअशी प्रार्थना करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

००००००००

Featured post

Lakshvedhi