Wednesday, 8 November 2023

राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन

 राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या

महाराष्ट्र शाखेचे उदघाटन

 

            मुंबई, दि. ७ : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ७) राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या तसेच वर्ल्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.  राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मार्गदर्शकांच्या सत्कार करण्यात आला.

            यावेळी परिषदेचे अध्यक्ष  डॉ गौरव गुप्तासल्लागार पिनल वानखेडेमहाराष्ट्र शाखेच्या संस्थापक ऐश्वर्या वानखेडेउपाध्यक्ष विक्रांत चंदवाडकरडॉ संदीप मारवाडॉ कल्पना सरोज व कौन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते.

            कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने विविध देशांच्या दूतावासाच्या सहकार्याने राज्यात गुंतवणूक व व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

००००

 

Governor Bais launches Maharashtra Chapter of Global Trade and Technology Council of India

 

          Mumbai Dated 7 : Maharashtra Governor Ramesh Bais launched the Maharashtra Chapter of the Global Trade and Technology Council of India at Raj Bhavan Mumbai. The Governor unveiled the posters of the Maharashtra Chapter of the Council and the World Business Conclave being organised by the Council.

          A few well wishers of the Council were felicitated on the occasion.

          Founder President of the Council Dr. Gaurav Gupta, Advisor Pienaal Wankhadey, President of Maharashtra Branch Aishwarya Wankhadey - Sachdeva, Vice President Vikrant Chandwadkar, Dr. Sandeep Marwa, Dr. Kalpana Saroj and office bearers of the Council were present.

          The Council aims to promote trade and investment in the state by collaborating with embassies of various countries in India.

0000


महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल

 महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी

सामंजस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल

- पर्यटनमंत्री गिरीश महाजन

 

          मुंबईदि. ७ : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आज केलेला  सामजंस्य करार  महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

          सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन वाढीसाठी मॉरिशस प्रजासत्ताकचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन संचालनालयमहाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी मॉरिशसच्या पर्यटन मंत्रालयचे दुष्यंतकुमार बकोटवारपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील उपस्थित होते.

          यावेळी मंत्री श्री.महाजन म्हणालेमहाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये झालेला सामंजस्य करार हा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.दोन्ही प्रदेशातील पर्यटन-संबंधित उद्योग वाढवण्याच्या उद्देशाने पर्यटन क्षेत्रातील क्षमता वाढविणे,परस्पर भेटीबैठका आणि  सुसंवाद दृढ करणे,आपल्या क्षेत्रातील अनुभवकौशल्य आणि सर्वोत्तम यशोगाथांची माहिती देणे यावर भर देण्यात येईल.सागरी पर्यटन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन  देणेनैसर्गिक वारशाचे संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर हा करार दोन्ही प्रदेशातील संस्कृतीची ओळख करून देणारा ठरेल, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.

Tuesday, 7 November 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'धरणांच्या देशा' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

'धरणांच्या देशाकॉफी टेबल बुकचे प्रकाशन

 

            मुंबई दि ७ :- 'धरणांच्या देशाया कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनआमदार मंगेश चव्हाणजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेधरणांसंदर्भातील कॉफी टेबल बुकची संकल्पना अतिशय अभिनव आणि उपयुक्त असून या निमित्ताने जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांच्या इतिहासाचे जतन होणार आहे. अभ्यासकांसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरेल असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            अपर मुख्य सचिव दीपक कपूर म्हणालेजलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येतात. देशातील एकूण मोठ्या धरणांपैकी सुमारे ४० टक्के धरणे महाराष्ट्रात असून सह्याद्री पर्वताच्या कुशीत तसेच सखल भागात पाणी उपलब्धता विचारात घेऊन ही धरणे बांधण्यात आली आहेत.

            धरणे आणि त्यांचे जलाशय यामुळे नवीन परिसंस्था उदयाला येतात. निसर्गरम्य परिसरामुळे ही धरणस्थळे प्रेक्षणीय स्थळे म्हणून नावारुपाला आली आहेत. या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून निवडक धरणांची छायाचित्रे तेथील अभियांत्रिकी कौशल्याचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे निसर्गरम्य देखावे राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही श्री कपूर यांनी सांगितले.

आभार प्रदर्शन सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी केले तर  सूत्रसंचालन उप सचिव प्रविण कोल्हे यांनी केले.

-----000-----


दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार

 दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार

-कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. ७ : रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  रायगड येथे या केंद्रासाठी पाठपुरावा केला होता.

            रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आग्रही होते.

            या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणेदिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणेअत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजनरोजगार निर्मितीरोपवाटिका उभारणेकलमे विकसित करणेपरिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय पाळणाघर योजनेबाबत लवकरच निर्णय घेणार

 राष्ट्रीय पाळणाघर योजनेबाबत लवकरच निर्णय घेणार

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि.७: राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत समिती स्थापन करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            मंत्रालयातील दालनात केंद्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय पाळणाघर योजनेतंर्गत दुर्बल घटकातील कामकाजी महिला, पाळणाघर महिला कमर्चारी यांच्याबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादवऑल एन.जी.ओ.वेल्फेअर असोसिएन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दादाराव डोंगरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

         महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या कीराष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. आतापर्यंत केंद्राकडून आलेले अनुदान व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या तसेच त्या कालावधीतील सर्व तपशील तपासून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

             जेथे कामगार जास्त आहेत, अशा ग्रामीण भागात आणि शहरी भागातही जिथे अंगणवाडीला जोडून एखादी खरेदी असेल अशा ठिकाणी पाळणाघर  सुरू करण्याचे विचाराधीन आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आणि राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे  पाळणाघर सुरू  करण्याबाबतही निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री कु. तटकरे यांनी दिली.

००००

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा

 रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि.७ :- मौजे - मेढा हनुमाळ माळी शिंगरकोंड (मोरेवाडी)तिसे या गावातील आणि रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत विविध समस्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत मांडल्या.

            मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले, रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे कायमस्वरूपी करावयाचे पुनर्वसनाबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. शासनाकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जाईल, त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील लिपनी वावे व मोहम्मद खनीखार या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश  दिले.

दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही व्हावी

- मंत्री कु.आदिती तटकरे

             महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या,मौजे मेढा हनुमाळ माळी गावचे पुनर्वसन करणे,मोजे तिसे येथे दरड कोसळल्या बाबत,भिंगारकोड (मोरेवाडी) या गावातील दरड ग्रस्त कुटुंबीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्याबाबत रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने कार्यवाही होणे गरजेचे आहे.स्थानिक प्रशासनाकडून मदत व पुनर्वसन विभागाला आलेल्या प्रस्तावांना लवकर मान्यता मिळावी अशी मागणी केली जेणेकरून या प्रस्तावाची कामे तातडीने सुरू करतील असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरेउपसरपंच वरसगाव राकेश शिंदेपुनवर्सन विभागाचे अधिकारी, उपसरपंच (तिसे) राजेश कदम, सरपंच संगे संजय सानप,मेढाचे सदानंद गोवर्धने,जयंत गोवर्धने,तिसे ग्रामपंचायत सदस्य महेश पवार,संभेचे गणेश सानप,संदेश सानप यावेळी उपस्थित होते.

००००

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

 शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम

 

            मुंबईदि. 7 : दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करुन वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असते. या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावीयाकरीता प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान - 2023’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने बुधवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली जाणार आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारशालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनोज सौनिकपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शपथ दिली जाणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

            गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या कार्यक्रमाला बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

 

Featured post

Lakshvedhi