Tuesday, 7 November 2023

दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार

 दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार

-कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. ७ : रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  रायगड येथे या केंद्रासाठी पाठपुरावा केला होता.

            रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आग्रही होते.

            या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणेदिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणेअत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजनरोजगार निर्मितीरोपवाटिका उभारणेकलमे विकसित करणेपरिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi