Saturday, 7 October 2023

सप्तश्रृंगी गडाच्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार

 सप्तश्रृंगी गडाच्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार

                                                   उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

कळवण-सुरगाणा तालुक्यातील 494 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

                    

            नाशिकदिनांक: 7 ऑक्टोबर2023 (जिमाका वृत्तसेवा): कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास शासनस्तरावर मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज कळवण येथे कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी व्यासपीठावर विधासभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळखासदार सुनिल तटकरेआमदार माणिकराव कोकाटेदिलीप बनकरनितिन पवारहिरामण खोसकरडॉ. रावसाहेब शिंदेकळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडेनगराध्यक्ष कौतिक पगारमाजी जि.प. अध्यक्ष जयश्री पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेनाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मंजूरी देण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजनांची अमंजबजावणी शासनस्तरावर करण्यात येत आहे. विविध विकास कामांवरील असलेली स्थगितीही शिथिल झाली असून येणाऱ्या काळात प्रस्तावित विकासकामांनाही मंजूरी देण्यात येवून आर्थिक तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देवून कळवण तालुक्यातील ओतूर धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजूरी देण्यात येणार असून हा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने शुन्य टक्के व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

            शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उर्जितावस्थेसाठी शासनस्तरावर तोडगा काढला जाईल. परंतु यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कळवण व सुरगाणा तालुक्यातील 494 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. चणकापूर धरण परिसरात माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटन स्थळाच्या धर्तीवर आदिवासी जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुरगाणा व कळवण तालुक्यात पर्यटनास चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचा विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येईल.

            राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणालेनाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या अडचणी  प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातील. कळवण व सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न शासनस्तरावर करण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

            विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणालेशेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अश्वासनाचे स्वागत आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासींच्या  विकास कामेवनपट्टे प्रश्न यावर सकारात्मक भूमिका शासनस्तरावर घेण्यात यावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

            याप्रसंगी आमदार नितिन पवार यांनी आपल्या मनोगतात कळवण व सुरगाणा तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच भविष्यात करावयाच्या कामांना शासनस्तरावर मंजूरी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

निवांत झोपेसाठी


पवईचा आंबा आणि राणीभारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडच्या राणीला पाठविण्यात आली होती.

 ....पवईचा आंबा आणि राणी


*18 मे 1838. याच दिवशी 1838 साली 

भारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडच्या  राणीला पाठविण्यात आली होती.  रत्नागिरी हापूसच्या जागतिक प्रसिद्धीचा रंजक इतिहास आज पाहू या*.  मेसेज मोठा आहे पण ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे वाचनीय आहे.  

*सध्या आंब्याचा सिझन चालू आहे:*

   कोकणचा आंबा जगावर राज्य करतो

याला एकमेव कारण म्हणजे 

*फ्रामजी कावसजी बाबा !*

   आज मुंबईमध्ये राहणाऱ्या आयटी पब्लिकची राजधानी कुठली विचारली तर पवई हिरानंदानी गार्डन हे उत्तर मिळेल. 

   अतिशय पॉश एरिया. भल्या मोठ्या काचेच्या इमारती, मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचं मुख्यालय. जवळच असलेल्या आयआयटी मुळे पवईची नॉलेज सिटी ही ओळख आणखी पक्की झाली आहे.

  पण काही वर्षापूर्वी इथे निबिड जंगल होतं हे कोणाला सांगून तरी पटेल काय?

   गोष्ट आहे १७९९ची. ब्रिटीश तेव्हा मुंबईत स्थिरावले होते. त्यांनी रस्ते बांधले, 

बाजारपेठ उभी केली. कुलाबा ते परळ 

हा भाग शहर म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र परळच्या पुढे सायन पर्यन्तचा भाग मागासलेला होता. जंगलवजा खेडी होती. 

हा भाग विकसित करण्यासाठी ब्रिटिशांनी 

एक पद्धत शोधुन काढली होती.

गावे आणि आसपासची जंगले लीजवर द्यायची.

पवई आणि त्याच्याजवळचा भाग स्कॉट नावाच्या ब्रिटीश डॉक्टरला भाड्याने दिला होता. भाडं होत ३२०० रुपये. डॉक्टर एकदम साधेसुधे होते. खूप महत्वाकांक्षी नव्हते. पवईच्या जंगलातून मिळेल तेवढ उत्पन्न काढायचं एवढच त्यांचं ध्येय. 

आजारी पडल्यावर ते इंग्लंडला गेले. त्यांच्यानंतर या प्रॉपर्टीची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही या जागेवर दावा केला नाही. अनेक वर्ष ही जागा पडीक राहिली.

अखेर १८२९ मध्ये पवईचे नशीब फिरले. *फ्रामजी कावसजी बानजी*  नावाच्या पारसी म्हाताऱ्याने सरकारकडे अर्ज केला की पवई आणि परिसर लीजवर मिळावा.

   तेव्हाचा मुंबईचा कलेक्टर जॉर्ज गिल्बर हा खूप धूर्त होता. त्याने सरकारला पवई भाडेतत्त्वावर देण्याची गरज नसल्याचं दाखवत फ्रामजी कडून लीजची रक्कम वाढवून घेतली, काही अटी घातल्या . त्या अटी देखील खूप गंमतीशीर होत्या. दहा वर्षाच्या अवधी साठी पवई भाड्याने मिळणार या काळात तिथे विहिरी, तलाव, पिण्याचे पाणी याची सोय करायची. तिथे दारू बनवली तर लोकल लोकांनाच विकायची. जंगल साफ करून शेती योग्य बनवायचे.


फ्रामजी कावसजी या सगळ्या अटीसाठी एका पायावर तयार झाले  आणि लवकरच ते पवईचे मालक बनले.

   त्यांनी खतं वापरून जमीन कसायला सुरवात केली. दरवर्षी एक याप्रमाणे 10 विहिरी बांधल्या. गावात धर्मशाळा उभारली, तलाव दुरुस्त केले. थोड्याच दिवसात त्याने इंग्रज सरकारकडून आणखी आसपास ची गावे मागून घेतली.

आज लोक मुंबईत स्क्वेअरफुट स्क्वेअर सेंटीमीटरवर घर घेतात अशा काळात फ्रामजी पवई ते साकीनाका चांदिवली विक्रोळी अशा महाप्रचंड भागाचा एकुलता एक मालक होता.

   ब्रिटीश खूप हुशार होते. त्यांनी फ्रामजीला ज्या अटी घातल्या होत्या त्यामुळे त्यांना जमिनीचा पैसा तर मिळतच होता शिवाय गावाचा विकास होऊन तिथल्या जनतेचा आशीर्वाद देखील मिळत होता. फ्रामजी सुद्धा धूर्त होता. त्याला माहित होते जर जास्त मेहनत केली नाही तर पवईची मालकी आपल्याला परवडणार नाही. त्याने एक हुशारी केली.

   पवईच्या साडेतीन हजार एकर परिसरात आंब्याची एक लाख कलमी रोपे लावली. अवघ्या तीन वर्षात ही रोपे बहरून आली. त्याला आंबे लगडू लागले. बॉम्बे मँगो या नावाने ते ब्रिटीश अधिकाऱ्यांच्यात फेमस देखील झाले. फ्रामजी कावसजीने तुफान पैसा छापला.

   इंग्रज पवईच्या आंब्यासाठी वेडे झाले होते. त्याच्या आंब्याची चर्चा इंग्लंड पर्यंत पोचली होती.

   फ्रामजीकडे व्यापारी डोके सुद्धा होतं. आपले आंबे देशातून बाहेर गेले तर जास्त पैसे कमवता येईल याची खुणगाठ त्याने बांधली होती, 

पण असे आंबे परदेशात विकणे सोपे नव्हते, आपण पारतंत्र्यात होतो.

   कोणतीही गोष्ट करायची झाली तर १०० नियम पार करावे लागायचे. फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजाला ते ती करंडी नेऊन ठेवली.

ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते.

१८ में १८३८ साली भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले,  अस म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागली होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली.

व्हिक्टोरिया राणीमुळे भारतीय आंब्याला परदेशी मार्केट खुले झाले. आजही कोकणचे हापूस आंबे जगावर राज्य करतात याला एकमेव कारण म्हणजे फ्रामजी कावसजी बाबा!

   फ्रामजी कावसजी फक्त आंब्यावर थांबला नाही. त्याने पवईमध्ये मलबेरीची झाडे लावली, तिथे रेशीम उत्पादन सुरु केले, ऊस लावला, त्या उसापासून साखर निर्मिती साठी छोटा कारखाना देखील सुरु केला. उसाच्या मळीपासून दारू देखील गाळली जाऊ लागली.

आज जिथे सिमेंटची जंगले आहेत त्या पवईमध्ये फ्रामजीने उसापासून ते सफरचंदापर्यंत अनेक गोष्टींचं उत्पादन घेतलंय.

   पुढे वय वाढेल तसा फ्रामजीला विरक्ती वृत्ती आली. त्याच लक्ष पैसा कमवण्यापेक्षा मुंबईतील लोकांचं जगणे कसे सुसह्य होईल याची तो काळजी घेत होता. 

   *त्यानेच मुंबईमध्ये पहिली पाईपलाईन टाकली. फ्रामजीने गिरगांवातील  मुगभाटमध्ये एका मैदानात तीन मोठ्या विहिरी बनवल्या, त्यातून पाणी खेचण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा पंप लावला. शिवाय बैलानी ओढण्यासाठी चारचाकी गाडीही कामाला लावली. गिरगांवला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू लागले. तो पर्यंत मुंबईकरांना पाईपलाईन हा शब्दही माहित नव्हता.*

   इंग्रजांना जे जमलं नव्हतं ते फ्रामजीने केलं. त्याला तब्बल ३०००० रुपये खर्च आला.

आजच्या काळात त्याची किंमत काढली तर अब्जावधी रुपये होतील. पण फ्रामजीने मागेपुढे पाहिलं नाही. त्यानेच मुंबईमध्ये गॅसबत्तीची सोय केली.

   आज मुंबई भारतातील सर्वात अत्याधुनिक शहर आहे, लोक याच श्रेय इंग्रजांना देतात मात्र त्यांच्या बरोबरच काही भारतीय देखील होते ज्यांचा दूरदृष्टीपणा मुंबईला मोठ करून गेला यातील प्रमुख नाव म्हणजे *फ्रामजी कावसजी बानाजी*.

त्याच्या या कार्याच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये *धोबीतलावाला फ्रामजी कावसजी*  यांचं नाव देण्यात आले आहे.🌹

हनुमान चाळीसा .. एक सिद्ध स्तोत्र....*

 *हनुमान चाळीसा .. एक सिद्ध स्तोत्र....*


.हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का?

 नसेल तर जाणून घ्या

 कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल?

 

 सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात.

 पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.


 गोष्ट *इ.स. १६००* ची आहे* हा काळ *अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.


 एकदा तुलसीदास जी मथुरेला जात होते, रात्री होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला, लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत.


 हे ऐकून

 त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.

 सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे?


 तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, त्याने रामचरितमानसचा अनुवाद केला आहे.

 हे रामभक्त तुलसीदास जी आहेत.

 मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.


 अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले.


 सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.


 हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?

 त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.


 हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले.

 आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ला आणण्याचा आदेश दिला.


 तरी

 बिरबलाने अकबराला असे नकरण्याचा सल्ला दिला.

 पण अकबराला ते मान्य नव्हते

 आणि तुळशीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.


 तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करा.


 तुलसीदासजी म्हणाले-

 मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.


 हे ऐकून अकबर संतापला.

 आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.


 दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.


 लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे?

 तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते.

 पण तू सहमत नाहीस

 आणि करिश्माला बघायचं असेल तर बघ.


 अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले. आणि

 साखळ्या उघडल्या गेल्या.

 तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे.


 मला अंधारकोठडीतील भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली.

 मी रडत होतो.

 आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.

 हे 40 चतुर्भुज,

 *हनुमान जी* यांच्या प्रेरणेने लिहिलेले.

 तुलसीदास जी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. काढले.


 ती *हनुमान चालीसा* म्हणून ओळखली जाईल.


 अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितलीआणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन, लव-लष्कर मथुरेला पाठवले.


 आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत.

 आणि

 या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे.

 आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.

 म्हणूनच हनुमानजींना "संकट मोचन" असेही म्हणतात.

 

CREDIT - Dattamaharaj 👈👈👈


टीप - ( सदर पोस्ट @Dattamaharaj या फेसबुक पेजवरून घेतली आहे त्यामुळे या लेखनाच श्रेय त्यांना जात)

-----------------

*ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update मिळविण्यासाठी join करा..*

*सहेली.. शब्द प्रांगण Whatsapp group 3*


https://chat.whatsapp.com/EuwJswnmmQz0ViF1KrByT7

*किंवा* 

*सहेली.. शब्द प्रांगण Whatsapp Group 2:*


https://chat.whatsapp.com/KDdHQJXdx4H7wK41nRyUDM


*किंवा*

*सहेली.. शब्द प्रांगण*

*WhatsApp Group 1*:

https://chat.whatsapp.com/I7EOMYxcLeg9V5EOqzNR54

मूत्राशय गुदमरल्यास...* ________________ मूत्राशय भरले आहे,

 *मूत्राशय गुदमरल्यास...* ________________

 मूत्राशय भरले आहे,

 आणि लघवी होत नाही,

 किंवा लघवी करता येत नाही. मग काय करायचं?? 

 हा अनुभव आहे एका प्रख्यात ॲलोपॅथी फिजिशियन 70 वर्षांच्या *ईएनटी* तज्ञाचा.

 चला ऐकूया अनोखा अनुभव..

 एके दिवशी सकाळी त्याला अचानक जाग आली. त्याला लघवी करणे आवश्यक होते, परंतु तो करू शकत नाही (काही लोकांना ही समस्या नंतरच्या वयात होते). त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, पण सलग प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा त्याला समजले की एक समस्या निर्माण झाली आहे.

 डॉक्टर असल्यामुळे अशा शारीरिक समस्यांपासून ते अस्पर्शित नव्हते; त्याचे खालचे पोट जड झाले. बसणे किंवा उभे राहणे कठीण झाले, खालच्या ओटीपोटात दाब वाढू लागला.

 होईल.

       मोठ्या कष्टाने त्याने आपल्या मित्र डॉक्टरला परिस्थिती सांगितली.

 त्या मित्राने सांगितले :- *"अरे, तुझे मूत्राशय भरले आहे. आणि प्रयत्न करूनही तुला लघवी करता येत नाही... काळजी करू नकोस. मी सांगतो तसे कर. या त्रासातून सुटका मिळेल."*

 आणि त्याने सूचना दिली:-

  *"सरळ उभे राहा आणि जोमाने वारंवार उडी मारा. उडी मारताना, झाडावरून आंबा तोडल्यासारखे दोन्ही हात वर ठेवा. हे 10 ते 15 वेळा करा."*

 डॉक्टरांनी विचार केला: "काय? मी खरोखर या स्थितीत उडी मारू शकेन का? उपचार थोडे संशयास्पद वाटले. तरीही डॉक्टरांनी प्रयत्न केला...

 3 ते 4 वेळा उडी मारल्यावरच त्याला लघवी करण्याची इच्छा जाणवली आणि त्याला आराम मिळाला.

  इतक्या सोप्या पद्धतीने समस्या सोडवल्याबद्दल त्याने आपल्या मित्र डॉक्टरचे आनंदाने आभार मानले.

 अन्यथा, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असते, मूत्राशयाच्या चाचण्या, इंजेक्शन्स, अँटीबायोटिक्स इत्यादी तसेच कॅथेटर घालावे लागले असते… त्याच्यावर आणि त्याच्या जवळच्या लोकांसाठी मानसिक तणावाबरोबरच लाखोंचे बिलही आले असते.

 *कृपया ज्येष्ठ नागरिकांसोबत शेअर करा. हा असह्य अनुभव असलेल्या प्रत्येकासाठी हा एक सोपा उपाय आहे....* 

 *कृपया हे शेअर करा*


*श्री स्वामी समर्थ*

रविंद्र आहीरे आयुर्वेदाय

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद महाराज जी* 🚩


 *प्रयागराज रेल्वे स्टेशन पर गाड़ी की प्रतीक्षा में ये हैं पुरी पीठाधीश्वर पूज्य पाद भगवत स्वरुप जगद्गुरु १००८ स्वामी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद महाराज जी* 🚩  *इनके बारे में थोड़ा सा जान या संक्षिप्त परिचय कर लीजिए उसी से उनकी विद्वत्ता का आंकलन कर सकते हैं।*  *" _ISRO ने अनेकों बार मदद ली है। आज भी समय समय पर सेवा लेता रहता है।_ "*  *NASA ने भी परामर्श लिया है।  सलाहकारों की सूची में सबसे पहला नाम अंकित है।*  *World bank ने भी अनेकों बार अर्थव्यवस्था की उलझी हुई समस्या को सुलझाने के लिए सहायता मांगी जिसको वैदिक गणित की सहायता से कुछ मिनटों में स्थायी समाधान  ही बता दिया.!!!*  *ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय के गणितज्ञ भी सलाह लेते हैं।*  *कैम्ब्रिज विश्वविद्यालय के भी विद्वान मार्गदर्शन लेते हैं।*  *IIM, IIT, IISC, भी आप श्री से गणितीय परामर्श के लिए सहायता लेते हैं।*  *200 से अधिक ग्रन्थों की रचना जिनमें वैदिक गणित, विज्ञान, संस्कृति, ज्योतिष, धर्म आदि सहित अनेकों विषय शामिल हैं।*  *यह तो सिर्फ एक छोटा सा ही परिचय है। देश की सबसे बड़ी धर्मपीठ के पीठाधीश्वर और हिन्दू संस्कृति के ओजस्वी सूर्य दिवाकर, मूर्धन्य विद्वान का जब आदर नहीं होता,या उनको ही हाशिये पर दिखाया जाता या रखा जाता है तो मन, हृदय रोम रोम विलाप करता है।*  *आप पूज्यश्री की विद्वत्ता से सोचिए कि हमारे ऋषि महर्षि कितने विद्वान व वैज्ञानिक रहें होंगे? जिन्होंने अपनें समय में ग्रह नक्षत्रों के बारे वो सब कुछ बता दिया जिसे आज विज्ञान खोज रहा है।*  *हमें गर्व होना चाहिए अपनी अर्वाचीन आर्य सनातन ज्ञान व सन्त परम्परा पर...!*  *हिन्दू सनातन धर्म ही सर्वश्रेष्ठ है। इसमें किसी पर अवांछनीय दबाव या जोर जबरदस्ती नही होती है।* 🚩🎉🌹🎉🙏🏻🙏🏻

चर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी ‘लिडकॉम’चा पुढाकार रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारणार

 चर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी ‘लिडकॉम’चा पुढाकार

रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारणार

धम्मज्योती गजभिये

        मुंबई‍‍दि.०६ :  राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. धारावी हे राज्यातील चर्मोद्योगांसाठीचे मुख्य केंद्र मानले जाते. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये मेगा  क्लस्टर पार्क व  मुंबई-देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

    संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम याबाबत श्री. गजभिये यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

          श्री. गजभिये म्हणाले कीमहामंडळाची साताराहिंगोलीदर्यापूर आणि कोल्हापूर येथे चार उत्पादन केंद्रे असून या केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या उत्पादन केंद्रात बूटचप्पल व चर्मवस्तू उत्पादन करण्यात येते. नांदेडजळगाववाशीधुळेसोलापूरबांद्रा येथे सहा विक्री केंद्रे असून या विक्री केंद्राचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. सात विभागांमध्ये चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून दर्यापूर येथे पी.यू.टी.पी.आर प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. महामंडळाने दि. १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत इटलीमधील मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात कोल्हापुरी चपलेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक चर्म प्रदर्शनात कोल्हापुरी चपलांचा ठसा उमटला आहे. महाराष्टातील चर्मोद्योगाचा विकास करण्यासाठी सीएलआरआय(CLRI) चेन्नई येथील चर्मोद्योग क्षेत्रातील संस्थेसोबत बेसलाईन सर्वेक्षणलेदर क्लस्टर व प्रशिक्षणाचे धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात येत आहे. महामंडळांतर्गत ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येणार असून नव्याने ई-कॉमर्स पोर्टल तयार करण्यात येईल. विभागीयस्तरावर चर्मवस्तू प्रदर्शनाची योजना, नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महामंडळाचे संकेतस्थळ नव्याने तयार करण्यात येईल.

            एफडीडीआय (FDDI) नवी दिल्ली यांच्यामार्फत चर्मोद्योग पदवी अभ्यासक्रमासाठी मुलांना महामंडळामार्फत प्रायोजकत्व करणे, सीएफटीआय (CFTI )आग्रा व चेन्नई यांच्यामार्फत चर्मोद्योग पदवी अभ्यासक्रमासाठी मुलांना महामंडळामार्फत प्रायोजकत्व करणेअसे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.गजभिये यांनी दिली.

       महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचे शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविल्या जातात.  एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत लघु व्यवसाय योजना १ लाख रुपये१.५० लाख व २.०० लाखचर्मोद्योग २  लाखलघुऋण वित व महिला समृध्दी प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज देण्यात येते. मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघुव्यवसाय योजना ५ लाख लघुऋण वित्त व महिला समृध्दी योजना १.४० लाख तसेच  महिलांकरीता पाच लाखांची नव्याने महिला अधिकारिता योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्याजदरात २ ते ३ टक्के योजनेनुसार सूट देण्यात येत आहे. तसेच बीज भांडवल कर्जावर देखील २ टक्के सूट देण्यात येणार आहे. शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झालेली असून देशात २० लाख व विदेशामध्ये ३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत २५ हजार उमेदवारांना उद्योजकता प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.गजभिये यांनी सांगितले आहे.

0000लेदर पार्क उभारणार

धम्मज्योती गजभिये

        मुंबई‍‍दि.०६ :  राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. धारावी हे राज्यातील चर्मोद्योगांसाठीचे मुख्य केंद्र मानले जाते. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये मेगा  क्लस्टर पार्क व  मुंबई-देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

    संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम याबाबत श्री. गजभिये यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

          श्री. गजभिये म्हणाले कीमहामंडळाची साताराहिंगोलीदर्यापूर आणि कोल्हापूर येथे चार उत्पादन केंद्रे असून या केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या उत्पादन केंद्रात बूटचप्पल व चर्मवस्तू उत्पादन करण्यात येते. नांदेडजळगाववाशीधुळेसोलापूरबांद्रा येथे सहा विक्री केंद्रे असून या विक्री केंद्राचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. सात विभागांमध्ये चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून दर्यापूर येथे पी.यू.टी.पी.आर प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. महामंडळाने दि. १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत इटलीमधील मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात कोल्हापुरी चपलेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक चर्म प्रदर्शनात कोल्हापुरी चपलांचा ठसा उमटला आहे. महाराष्टातील चर्मोद्योगाचा विकास करण्यासाठी सीएलआरआय(CLRI) चेन्नई येथील चर्मोद्योग क्षेत्रातील संस्थेसोबत बेसलाईन सर्वेक्षणलेदर क्लस्टर व प्रशिक्षणाचे धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात येत आहे. महामंडळांतर्गत ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येणार असून नव्याने ई-कॉमर्स पोर्टल तयार करण्यात येईल. विभागीयस्तरावर चर्मवस्तू प्रदर्शनाची योजना, नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महामंडळाचे संकेतस्थळ नव्याने तयार करण्यात येईल.

            एफडीडीआय (FDDI) नवी दिल्ली यांच्यामार्फत चर्मोद्योग पदवी अभ्यासक्रमासाठी मुलांना महामंडळामार्फत प्रायोजकत्व करणे, सीएफटीआय (CFTI )आग्रा व चेन्नई यांच्यामार्फत चर्मोद्योग पदवी अभ्यासक्रमासाठी मुलांना महामंडळामार्फत प्रायोजकत्व करणेअसे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.गजभिये यांनी दिली.

       महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचे शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविल्या जातात.  एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत लघु व्यवसाय योजना १ लाख रुपये१.५० लाख व २.०० लाखचर्मोद्योग २  लाखलघुऋण वित व महिला समृध्दी प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज देण्यात येते. मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघुव्यवसाय योजना ५ लाख लघुऋण वित्त व महिला समृध्दी योजना १.४० लाख तसेच  महिलांकरीता पाच लाखांची नव्याने महिला अधिकारिता योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्याजदरात २ ते ३ टक्के योजनेनुसार सूट देण्यात येत आहे. तसेच बीज भांडवल कर्जावर देखील २ टक्के सूट देण्यात येणार आहे. शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झालेली असून देशात २० लाख व विदेशामध्ये ३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत २५ हजार उमेदवारांना उद्योजकता प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.गजभिये यांनी सांगितले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi