*आपल्या समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहा ,उपाय नक्कीच सापडेल....*😊
वेड्यांच्या दवाखान्या
समोर एकाची कार पंक्चर झाली. तो पटकन गाडीतून खाली उतरला.
चार नट काढून मागचं चाक काढलं. पंक्चर झालेलं चाक काढून तिथे स्टेपनी लावली आणि परत जेव्हा चार नट लावायला गेला तेव्हा लक्षात आलं की, चार नट बाजूच्या गटारात पडले आहेत.
जे आता काढणे शक्य नाही.
अवघड परिस्थिती झाली. समस्या वेगळीच होती.
गाडी हवेत, चारी नट बाजूच्या गटारात पडलेले, सापडत नव्हते. पंक्चरच्या जागी लावायला नवीन चाक आहे.
पण नट नसल्यामुळे ते बसू शकत नाही.
त्याने वेड्याच्या दवाखान्याकडे बघितलं. एक वेडा गॅलरीत उभा राहून त्याच्याकडे बघत होता.
"मला मदत करणार का? मला शहरात जायचंय ?” समोरच्या कारवाल्याने त्या वेड्याला विचारलं.
"मग जा की.”
"नाही. गाडी नाहीये."
"ती काय समोर उभी आहे."
"अहो, ती पंक्चर आहे."
"प्रॉब्लेम काय आहे?"
त्याने सगळं त्या वेड्याला सांगितलं.
तो म्हणाला, “सोपं आहे. समस्येमध्येच समाधान आहे. तुमच्याकडे तीन चाकं आहेत.
प्रत्येक चाकाला चार नटं आहेत. आणि एक चाक तीन नटांवर राहू शकतं.
तुम्ही प्रत्येक चाकाचा एक एक नट काढा आणि चौथ्या चाकाला तीन नट लावा. "
आता मात्र याचे डोळे मोठे झाले. चमकून त्याने, "खरंच की.' असं म्हटलं.
खरंतर समस्या ही आधीपासून नव्हती. फक्त त्या समस्येकडे बघायला दृष्टी नव्हती.
हे असं शक्यच नाही, या विचारानेच त्याला बांधून ठेवलं होतं.
इंग्रजीत आपण त्याला म्हणतो, चॅलेंज युवर अझम्शन्स.
म्हणजे आपण मानलेल्या गोष्टींवर प्रहार करा. समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहा.
त्याने भराभरा प्रत्येक चाकाचा एक एक नट काढला आणि चौथ्या चाकाला तीन नट लावून गाडी तयार झाली.
त्याने त्या वेड्याकडे बघितलं आणि म्हणाला, “अरे, तुला
कोणी अॅडमीट केलं इथे? तू तर अजिबात वेडा नाहीस.'
तो म्हणाला, “मी वेडा आहे पण एवढी साधी गोष्ट न कळायला मी मूर्ख नाही."
असंच होतं. ज्या वेळेला आपल्या आयुष्यात आपण आजूबाजूला चाललेल्या अनेक गोष्टी अशाच आहेत, असं मानून बसतो त्या वेळेला त्यात नवीन मार्ग दिसत नाही.
नवीन मार्ग न दिसल्यामुळे आपण अनेकदा तिथेच फिरत राहतो.
समस्या ज्या कारणासाठी आपल्या आयुष्यात आली आहे त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही.*
🙏🌹