Wednesday, 4 October 2023

येत्या दोन वर्षात पालिकेचे सुसज्ज कार्यालय उभे करावे

 येत्या दोन वर्षात पालिकेचे सुसज्ज कार्यालय उभे करावे



- आमदार अतुल भातखळकर यांची मागणी


- मालाड पूर्वला पी उत्तर-पूर्व विभागाच्या तात्पुरत्या कार्यालयाचे लोकार्पण  


मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला महापालिकेच्या पी उत्तर-पूर्व विभागाचे तात्पुरते का होईना पण कार्यालायचे लोकार्पण झाले याबद्दल समाधान व्यक्त करत येणाऱ्या २-३ वर्षाच्या आत नव्या जागेवर सुसज्ज कार्यालय उभे केले पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पालिकेच्या पी उत्तर –पूर्व या कार्यालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले, यावेळी आजोजित समारंभात आमदार भातखळकर बोलत होते.


आमदार भातखळकर म्हणाले, मालाड पूर्वला हे कार्यालय व्हावे, यासाठी २०१७ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास विभागाने निर्णय घेतला होता. या कार्यालयासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, या प्रयत्नांना यश आले याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. आ. भातखळकर म्हणाले, या रामलीला मैदानाचा वापर खेळासाठी होत आहे त्यामध्ये कोठेही बाधा येता कामा नये. याशिवाय या कार्यालयासाठी लवकरात लवकर पश्चिम द्रुतगती मार्गावरील भूखंडाचे अधीग्रहण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.


सध्या या कार्यालयामध्ये पाणी, कचरा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अशा सामान्य लोकांशी संबंधित विभाग आज सुरु झाले आहेत. या कार्यालासाठी आवश्यक असलेली पदस्थापना झाली असल्याने येथे आठवडयातुन किमान दोन दिवस सहाय्यक आयुक्तांनी बसावे, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी यावेळी बोलताना केली. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi