Sunday, 1 October 2023

सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल

 सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल

                              – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

------------------

राज्यात एक तारीख एक तास मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद

 

72 हजारापेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची मोहीम

 

मुंबईदि.1 : आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिकविद्यार्थी यांच्या जोडीनेराज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी एक तारी











ख एक तास या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्रसुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेलं हे मोठं पाऊल असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची लोकचळवळ झाली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलतांना म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.

 

            उद्या (2 ऑक्टो) रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनोज सौनिकबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ इक्बाल सिंह चहलनगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंद राजज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरइस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबीकोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगीअभिनेते नील नितीन मुकेशपद्मिनी कोल्हापुरेजुही चावलासुबोध भावे आदींची उपस्थिती होती.

 

            या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी जेव्हा पहिल्यांदा स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केलापण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. प्रधानमंत्री म्हणतात त्याप्रमाणेस्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा कार्यक्रम नाहीतर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे.

 

 

स्वच्छता कागदावर नको

 

स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलंअसं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असं होता कामा नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊयाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.

 

गडकिल्लेमंदिर परिसरात स्वच्छता

 

राज्यातल्या गडकिल्लेधार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीजे पन्नास साठ वर्षात जमले नाही ते पंतप्रधानांनी गेल्या आठ नऊ वर्षांत केले आणि देशात स्वच्छतेचे काम झालेभ्रष्ट्राचाराची सफाई झाली. 

 

चौपाटीवर नागरिकांचा उत्साह

 

गिरगाव चौपाटीवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथम ग्रीनलॉन्स स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. हे विद्यार्थी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपल्या शिक्षकांसोबत आले होते. मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले आणि त्यांचे कौतुक केले. जोगेश्वरीच्या मर्कझ उल मारिफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थी सुद्धा स्वच्छतेसाठी गिरगाव चौपाटीवर आले होते. मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील बोलले. आज चौपाटी येथे स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीने अनेक संस्था देखील उतरल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आले होते. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानएनसीसीगुरुनानक हायस्कूल, नवनीत कॉलेजसागरी सीमा मंचउत्कल सेवा समितीनैशनलं हौसिंग बँकसेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलीसहोमगार्ड्समहानगरपलिका कर्मचारी यांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र- स्वच्छ भारताच्या घोषणा देण्यात येत होत्या.  

 

प्रारंभी जय जय महाराष्ट्र माझा राज्य गीताने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी स्वच्छतेची प्रार्थना देखील घेण्यात आली.

 

000


कोकण विभागातील नागरिकांनी घ्यायची काळजी

 


स्वतच्या अबियान रायगड अलिबाग


 

अन्नपुर्णेचे किंवा सुगरणीचे घरातले अन्नपदार्थ चांगले ठरविण्याचे काही निकष

 अन्नपुर्णेचे किंवा सुगरणीचे घरातले अन्नपदार्थ चांगले ठरविण्याचे काही निकष


★आमटी कशी एकसंध असावी....डाळ व पाणी फारकत झाल्यासारखे वेगळे -वेगळे नको.


★भात कसा मोगर्‍याच्या कळ्यांसारखा दिसावा. पांढराशुभ्र, मोकळा पण मऊ शीत असावे.


★भाजी नुसती तिखट व तेलकट म्हणजे चवदार नाही. योग्य तितका मसाला पण असावा.


★पुरणपोळी मधे अंगठ्याने दाबून मधे खळगा करता आला पाहिजे व त्यात तूप घेता आले पाहीजे .इतके पुरण असावे.


★भाकरीला पोट व पोळीला काठ असता कामा नये.


★हिरवी चटणी म्हणजे नुसता नारळाचा चोथा नको. पुरेसा तिखटपणा असावा.


★तूप कणिदार व रवाळच असलं पाहीजे नाहीतर डालडा किवा तेल वाढल्यासारखे वाटते.


★चहा दाट असला तरी चहा म्हणजे साखरेचा पाक नको (खडा चम्मच). त्याला चहाचा सुगंध आला पाहिजे,रंघी लाल किंवा काळपट नसावा. चहा योग्य तितका मुरलेला असेल तरच तरतरी येते.


★ताक कसं थोडे आंबट व मधुर असावे. नाहीतर नुसते नासवलेले दूध वाटते.


★जेवायला काहीही करा,पण जेवण चवदार व वेळेत बनवा. भूक परतली तर जेवणाची मजा जाते.


★जेवणाचे ताट इतके सुबक व स्वच्छ रीतीने वाढावे की,भूक नसणार्‍यालाही जेवावेसे वाटले पाहीजे. नाहीतर जेवणाचे अयोग्य पद्धतीने वाढलेले ताट म्हशीला अंबोण ठेवल्यासारखे दिसते.


★सगळ्यात शेवटी महत्वाचे म्हणजे, जेवणार्‍याने इतके आकर्षक पध्दतिने जेवावे की, तुम्हाला जेवताना कोणी पाहीले तर,त्यानाही भूक लागली पाहीजे. नाहीतर एकेकजण इतके किळस वाणे जेवतात की,शेजारी जेवणार्‍याची भूकच मरते.


★पदार्थ खाण्यापूर्वी मला आवडत नाही असं म्हणू नये आधी खाऊन पहावा आवडला नाही तर परत घेऊ नये पानात काही टाकू नये आज कोणती भाजी आहे विचारून नाक मुरडणे चांगले नाही.


अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे।.

ज्ञानवैराग्य सिद्यर्थम्

भिक्षांदेहिच पार्वती ।।

एक साथ एक तास स्वच्छता' अभियान मोहीम उत्स्फूर्तपणे सुरुवात भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वत्र 'एक साथ एक तास स्वच्छता' या अभियानास उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली असून येणाऱ्या काळात हे अभियान संपूर्ण विधानभेत पूर्ण ताकदीने राबवणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले. कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक परिवार, आकुर्ली रस्ता येथे रविवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले, यावेळी ते बोलत होते.


आमदार भातखळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संपूर्ण देशात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत हे अभियान राबवले जात आहे. कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला तीन ठिकाणी आणि कांदिवली पूर्वमध्ये ठिकठिकाणी या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. येणाऱ्या काळातही स्वच्छता अभियान आम्ही पूर्ण ताकदीने राबवू. यावेळी कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर ते आकुर्ली रस्ता अशी तासभर स्वच्छता करण्यात आली.


या अभियानात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे कर्मचारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, एनएनएसचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कांदिवली पूर्व विधानसभेत सर्वत्र स्वछता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा


ला. 

ज्येष्ठ नागरिक दि न ३६५ दिवस हवा


 

👆👆ही पद्धत सर्व देवस्थानां पर्यंत पोचवायला हवी. आणि अमलात स्थानिक महिला, युवक मंडळांनी अमलात आणायला हवी

 रोजगाराच्या नव्या वाटा,


Featured post

Lakshvedhi