Friday, 11 August 2023

भूमि अभिलेख नोंदी, आधार जोडणीसाठी15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

 भूमि अभिलेख नोंदीआधार जोडणीसाठी15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबईदि. 10 : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले असून राज्यातील 97 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला12 लाख शेतकरी पात्र असूनही भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत नसणेई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणेया तीन कारणांनी वंचित राहिले आहेत. त्यांना लाभ मिळावा यासाठी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहेअशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारभूमिअभिलेख अधिकारी आणि  कृषी अधिकारी यांची त संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर ग्रामसेवकतलाठी व कृषी सेवक यांनी वरील तीन अटींमुळे लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी शोधून  तीनही अटींची पूर्तता करायची आहेअसे त्यांनी सांगितले.

            राज्य  शासनाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या ‘नमो किसान सन्मान योजने’चा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या सर्व अटींची पूर्तता करण्याचे काम केले जाणार आहे.

            याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना केल्या आहेतत्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. सदर मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील  12 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ आणि ‘नमो किसान सन्मान योजने’चाही लाभ मिळणार आहे.

            जे पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी संनियंत्रण समितीशी संपर्क करून अटींची पूर्तता करून घ्यावीअसे आवाहनही मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

Thursday, 10 August 2023

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध कराआता व्हॉट्सॲपवर तक्रार

 ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध कराआता व्हॉट्सॲपवर तक्रार

           

            मुंबईदि. 10 : ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणेभाडे नाकारणेविहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार  करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे.  

        या कारवाई अंतर्गत 31 जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात एकूण 154 तक्रारी प्राप्त झाल्या असून या कार्यालयाशी संबंधित 59 तक्रारी आहेत. त्यापैकी 53 तक्रारी या ऑटोरिक्षा व सहा तक्रारी या टॅक्सी संबंधीत प्राप्त आहेत. तक्रारींमध्ये 45 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणेसात तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे व दोन तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 54 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. यापैकी 99 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच दोन परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणेदोन परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाना 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

            पाच तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच 15 परवानाधारकांचे परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करून या 15 वाहनांची वाहन 4.0 प्रणालीवर ब्लॅकलिस्ट (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. तक्रारदारांना त्यांनी केलेल्या तक्रारीबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती व्हॉट्सअॅप व मेल आयडी या माध्यमातून त्यांना अवगत करण्यात आली आहे.

         अशाप्रकारे नागरिकांशी गैरवर्तन करू नये अन्यथा या कार्यालयाकडून या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे. परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरिक उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आहेत. नागरिकांना ऑटोरिक्षा/टॅक्सी चालकांकडून गैरवर्तन, भाडे नाकारणेविहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी तक्रारी असतीलतर 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि  mh०३autotaxicomplaint@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावाअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

******

कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत

 कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत


- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 10 : राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.


            महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (आर.पी.टी.ओ.) अंतर्गत सुरु असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र इतर विद्यापीठात चालू करण्यासंदर्भात व प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष कराड,तसेच कृषी विद्यापीठाचे संबंधित विभागाचे संशोधन अधिकारी, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुंडे म्हणाले, शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळे ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे . ही कामे ड्रोनद्वारे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाद्वारे केल्यानंतर शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात किती फरक पडेल याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी कापूस, सोयाबीन, भात, तूर, ऊस आदी सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश असलेल्या प्रत्येकी 100 एकर आकाराच्या प्लॉटवर ड्रोनचा वापर करावा. यासाठी शेतकऱ्याला येणारा उत्पादन खर्चाचा तुलनात्मक अहवाल शासनाला सादर करावा. त्या आधारावर राज्यात सर्वत्र शेतीतील दैनंदिन कामांसाठी ड्रोनचा वापर करण्याचे धोरण शासन निश्चित करेल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.


             तसेच नॅनो युरिया सुद्धा ड्रोनद्वारे फवारणी करून राज्यातील कृषी विद्यापीठांनी देशात आदर्श निर्माण करावा. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरामुळे युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.


0000

सातारा जिल्ह्यात पर्यटनाचा पर्यावरणपूरक विकास करणार

 सातारा जिल्ह्यात पर्यटनाचा पर्यावरणपूरक विकास करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेl

            सातारा दि. 10 (जि.मा.का.) : सातारा जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. जिल्ह्यात पर्यटनाचा पर्यावरणपूरक विकास करुन स्थानिकांच्या रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली, कास, वासोटा या सर्व भागात पर्यटन विकासासाठी सर्व सुविधा उभारल्या जात आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी पूल बांधण्यात येत आहे. तेथील नागरिकांचे दळवणवळ अधिक सोयीचे व्हावे यासाठी आणखी दोन पुलांना मंजुरी देण्यात आली आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. क्लस्टर शेतीमध्ये लोकांना एकत्र आणणे, बांबू लागवड करणे अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने कामही सुरु केले आहे. कंदाटी खोऱ्यात वन औषधी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्यावरही काम करण्यात येत असल्याचे, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानभरपाईबाबतचे निकष बदलण्यात आले आहेत. एनडीआरएफचे निकष दुप्पट केले असून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानापोटी मोठ्या प्रमाणावर भरपाई देण्यात येत आहे. यासाठी पंधराशे कोटी रुपये मदत वाटप केली आहे. पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वाटप केले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर आणखी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय आहे. एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिं

दे म्हणाले.


इतर राज्यातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठीआकर्षित होतील अशी सुस्थिती निर्माण करावी

 इतर राज्यातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठीआकर्षित होतील अशी सुस्थिती निर्माण करावी


- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ


 


            मुंबई, दि. १० : “शासकीय वैद्यकीय, आयुष आणि दंत महाविद्यालयांच्या इमारती अधिक सुसज्ज, दर्जेदार कराव्यात व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. इतर राज्यांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी आकर्षित होतील अशी सुस्थिती निर्माण करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.


            राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष आणि दंत महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्याकडून रुग्णालय आणि महाविद्यालयांचा आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.


            मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील गरीब व गरजूंना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांत औषध आणि साहित्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत गुणवत्तेनुसार साधारण परिस्थिती असणारे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना चांगल्या प्रकारचे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची संख्या वाढावी यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील समस्या व नवीन सुधारणांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. रिक्त पदे १०० टक्के भरण्यात आली असून, वर्ग ३ व ४ कर्मचारी एक महिनाभरात पदभरती करण्यात येईल. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी होणार आहे. महाविद्यालये आणि रुग्णालये स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अधिष्ठातांना केल्या.


            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण व आयुष्यचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.अजय चंदनवाले, आयुष्य संचालनालयाचे संचालक डॉ.वैद्य रामन घुंगळेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे यांच्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.


०००

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा

 शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


 


            मुंबई, दि. १० : मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.


            माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था परिसरात १३ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरु अनिरुध्द पंडित, संचालक उदय अन्नपुरे प्राध्यापक प्रदीप वाविया, कुलसचिव राजेंद्र देशमुख, अधिष्ठाते, विविध विभागांचे विभाग प्रमुख, आजी माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे आजी - माजी विद्यार्थी, संस्थेत शिकून पुढे विविध कंपन्यांचे प्रमुख झालेले माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या संस्थेने आतापर्यंत १९ पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेले ६०० पेक्षा अधिक उद्योजक देशाला दिले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये नॅकमध्ये ४ पैकी ३.७७ असे सर्वोत्तम गुण मिळवून A++ ग्रेड, टाईम्स हायर एज्युकेशन २०२३ क्रमवारीत आशिया युनिव्हर्सिटी रैंकिंगमध्ये २५१ ते ३०० च्या दरम्यान तर केंद्र सरकारच्या एनआयआरएफ क्रमवारीत विद्यापीठांमध्ये २३ वा क्रमांक तसेच एमएचआरडीने जाहिर केलेल्या अटल (ARIIA) क्रमवारीत सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला बलशाली आणि वैभवशाली बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी तरुणांनी नवीन संशोधन, पेटंट आणि नाविन्यता यावर अधिक भर द्यावा, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


            संशोधनाच्या क्षेत्रातही रसायन तंत्रज्ञान संस्था उत्तम कामगिरी करीत आहे. गेल्या १० वर्षांत ४०० पेक्षा अधिक पेटेंट्स घेतलेले आहेत. अनेक संशोधन प्रकल्पांवर काम सुरू आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन संस्थेने जालना व भुवनेश्वर येथे सेंटर सुरू केले आहे. या दोन्ही ठिकाणी नविन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.


००००

महिला बचत गटांना माविमने व्यवसायाभिमुख मार्गदर्शन करावे

 महिला बचत गटांना माविमने व्यवसायाभिमुख

 मार्गदर्शन करावे


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


            मुंबई, दि. 10 : राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटांतील सदस्यांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. बचतगटातील सदस्यांना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अधिकाधिक मार्गदर्शन देऊन बचत गटांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.


             महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड, महाव्यवस्थापक कुसुमताई बाळसराफ, रविंद्र सावंत माविमचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


                    मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील ९९ हजार ६९९ बचतगटांना शहरी भागातील ६५ हजार ३३० बचतगटांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात यावे. ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. ई-बिझनेस प्लॅटफॉर्ममध्ये महिलांचा सहभाग वाढवावा. शाश्वत विकासासाठी माविमने बचत गटांसाठी योजना सादर कराव्यात, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.


                  तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, केंद्रपुरस्कृत योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम, स्वयंसहाय्यता बचत गट, माविमचे ध्येय व उद्दीष्टे, नाविन्यपूर्ण उपक्रम याची सविस्तर माहिती यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड यांनी दिली.


***

Featured post

Lakshvedhi