Saturday, 5 August 2023

केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबतघेतलेल्या निर्णयांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

 केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबतघेतलेल्या निर्णयांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी


- सहकार आयुक्त अनिल कवडे


 


            पुणे, दि.४ : केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबत विविध मोठे निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्याप्रकारे करण्यात येत आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्वावलंबी व्हाव्यात आणि कार्यक्षमपणे काम कराव्यात यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


            महाराष्ट्रामध्ये २० हजारांपेक्षा जास्त विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्राम पातळीवर कार्यरत आहेत. या संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट होणे व त्या माध्यमातून पतपुरवठा विविध सेवा व वस्तूंचा पुरवठा ग्रामीण भागातील जनतेला व्हावा, या दृष्टिकोनातून या संस्थांचे संगणकीकरण होत आहे. या संस्थांच्या पोटनियमामध्ये काही बदल करण्यात आले असून बाहेरील कर्ज घेण्याची मर्यादा स्वनिधीच्या १० पटऐवजी २५ पट करण्यात आली आहे. तसेच या संस्थांना १५२ प्रकारच्या वस्तू व सेवांचा व्यवसाय करता येईल, अशीही तरतूद करण्यात आली आहे. राज्यामध्ये याबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पातळीवर कार्यवाही सुरु झालेली आहे.


            विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून संबंधित संस्थांच्या सभासदांना किफायतशीर दरामध्ये योग्य दर्जाची जेनरीक औषधे उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून या संस्थांना जेनरीक औषधी दुकानांचे परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान अशा प्रकारची ५ दुकाने उघडण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असून राज्यामध्ये आतापर्यंत ३४० संस्थांनी असा उपक्रम घेण्याची तयारी दर्शविली आहे. यातील आतापर्यंत ३२० संस्थांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. नजीकच्या भविष्यकाळात या दुकानांच्या माध्यमातून स्वस्त दराने औषधी पुरवठा झाल्यामुळे जनतेच्या दैनंदिन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.


             विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ई-सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून कॉमन सर्व्हिस सेंटर या संस्थांमार्फत सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली असून राज्यातील आतापर्यंत २ हजार ७०० संस्थांनी कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत नोंदणी केलेली आहे. या माध्यमातून भविष्यकाळामध्ये ग्राम पातळीवर लागणाऱ्या ३०० पेक्षा जास्त सेवा पुरविल्या जातील.


            राज्यातील धान्य उत्पादनाचा विचार करुन साठवणूक क्षमता सहकारी संस्थांमार्फत वाढविण्याचा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील नेर पिंगळाई, जि. अमरावती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.


            विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू व सेवा पुरवठ्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुढील काळात या संस्था आत्मनिर्भर बनतील व संबंधित गावांसाठी खऱ्या अर्थाने विकास केंद्र म्हणून काम करतील, अशी अपेक्षा सहकार आयुक्तांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला व शेतीशी संबंधीत सर्व उपक्रम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांसाठी सहाय्यभूत ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


००००



 

सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहा

 सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहा


महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत संचलन संपन्न


: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


          नाशिक, दि. 5: येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


          आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र क्रमांक 122 च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर, डॉ. अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आगामी काळ हा आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी


सोबतच सायबर व आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून


चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेवून बाहेर पडणारे


पोलीस उपनिरीक्षक हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रती निष्ठा बाळगून आपली व देशाचीप्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. लोकांच्या सेवेकरीता आपण पोलीसदलात रूजू झालो आहोत. शिस्तीत काम करीत असताना संवेदनशील राहिल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देवू शकाल. समाजात गुणवत्तापूर्ण सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या कामाने, जनतेची शाबासकी मिळविणे हेच आपल्या जीवनातील महत्वपूर्ण पदक असेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


           ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने


आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रलोभनांना बळी


न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे.


त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत


काढण्यासाठी सज्ज रहावे.


          पोलीस महासंचालक रजश्रीश सेठ आपल्या मागर्दशनात म्हणाले की, प्रशिक्षणार्थी आज आपले प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत रूजू होणार आहेत. समाजातील वंचीत व शोषित घटकास समान न्याय व संरक्षण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अवैध वाळू उपसा, अंमली पदार्थ या सारख्या असामाजिक गुन्हेगारीवर आपला अंकुश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांप्रती आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी. गुन्ह्याचा तपास कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे.


          प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. १२२ (सरळ सेवा) चे प्रशिक्षण सत्र हे १ ऑगस्ट, २०२२ पासुन सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या ३४९ पुरुष व १४५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असून १ प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. एकुण ४९४ पोलीस उपनिरीक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या


प्रशिक्षणार्थी पैकी ८८ टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व १२ टक्के पदव्युत्तर आहेत, यांना सर्व


प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी दिली.


          या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.


दीक्षांत संचलनात उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले कॅडेट...


▪ अभिजित भरत काळे: यशवंतराव चव्हाण गोल्ड कप - ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच


▪ रेणुका देविदास परदेशी : अहिल्याबाई होळकर कप - ऑल राऊंड वुमन कॅडेट ऑफ द बॅच


▪ रुबिया ताजुद्दिन मुलाणी : बेस्ट कॅडेट इन ड्रील


▪ प्रशांत हिरामण बोरसे : एन.एम. कामठे गोल्ड कप बेस्ट कॅडेट इन राफेल अँड रिव्हॉल्वर शूटिंग


▪ अभिजित भरत काळे : रिव्हॉल्वर ऑफ हॉनर - बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच


▪ किरण सुभाष देवरे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप - बेस्ट कॅडेट इन लॉ


▪ किरण सुभाष देवरे : सिल्व्हर बॅटन - बेस्ट कॅडेट इन स्टडीज


▪ किरण सुभाष देवरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच


          दीक्षांत संचालन समारंभानंतर नूतन शैक्षणिक संकुल, मोटर परिवहन विभाग इमारत,


अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंत कोनशिलेचे अनावरण आणि भूमीपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भुसे, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, डॉ.राहुल आहेर, श्री. ढिकले, पोलीस महासंचालक श्री. सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर व अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार उपस्थित होते.


          असे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे नूतन शैक्षणिक संकुल


           महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई अंतर्गत 13 हजार 846 चौरस मीटर जागेत 79 कोटी 68 लाख 61 हजार 908 रुपयांचे नवीन शैक्षणिक संकुल व इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 26 वर्ग खोल्या, 1 सायबर लॅब, 1 संगणक लॅब, 1 स्टाफ रूम, 1 कॉन्फरन्स हॉल असणार आहे. तसेच मोटर परिवहन विभाग इमारत, प्रवेशद्वार, टेहाळणी टॉवर, संरक्षक भिंत याप्रमाणे इतर पायाभूत सुविधा या शैक्ष

णिक संकुलात उपलब्ध होणार आहेत.


0000000




वृत्त क्र. 2650


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम:वर्षभरात 100 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम:वर्षभरात 100 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक


 


            मुंबई, दि. ५: साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं. अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली. श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत या वर्षभरात १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. हा एक अनोखा विक्रम असून त्याबद्दल निधी कक्षाच्या टीमचे कौतुक करतानाच गरजू रुग्णांच्या मदतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधानभवनातील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या दालनात धर्मा सोनवणे यांना एक लाख रुपयांच्या वैद्यकीय मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हे तेच धर्मा सोनवणे आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईकडून ठाण्याला परतत असताना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ताफा थांबवून रुग्णाची विचारपूस केली..त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा श्री. सोनवणे यांना केवळ रुग्णवाहिकाच दिली नव्हती तर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार देखील केले होते. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला त्याचाच एक लाखांचा धनादेश काल श्री. सोनवणे यांना देण्यात आला. त्यावेळी मला तुमच्यामुळे नवं आयुष्य मिळाल्याची भावना सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली.


            श्री. सोनवणे यांच्या चेहऱ्यावर दिसलेले कृतज्ञतेचे भाव हेच अलौकिक समाधान देऊन गेल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले होते. गरजूंना मदत देताना प्रसंगी सोपस्कार होत राहतील परंतु त्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे अशी भावना देखील व्यक्त केली होती.


मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक


            मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गेल्या वर्षभरात १०० कोटींची मदत वितरित करण्याचा टप्पा सर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कौतुक केले. या कक्षाने केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे हे साध्य झाल्याचे सांगत भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीम मध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय सहाय्यक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या कक्षाचा वैद्यकीय मदतीचा आलेख कायम चढता राहिला असून यापूर्वी ५० तर आता १०० कोटी वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा सर केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी हा निधी कक्ष हा एक आशे

चा किरण ठरला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूननागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

 उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूननागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही


            मुंबई, दि. 5 :- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.4) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधिमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती, अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. या निमित्ताने श्री. पवार यांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.


00000

जीवनसाथी कोण आहे, खरंच हा पन सवाल आहे

 


आमदार प्रशांत दादा ठाकूर जी यांच्या वाढदिवसानिमित्त थळ जिल्हा परिषद

 माननीय. आमदार प्रशांत दादा ठाकूर जी यांच्या वाढदिवसानिमित्त थळ जिल्हा परिषद विभागामधील रायगड जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे कॉम्प्युटर सीपीयू व शैक्षणिक साहित्य वाटप केले गेले हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी चे सोशल मीडिया प्रमुख श्री पंकज प्रवीण अंजारा जी आणि महिला मोर्चा सरचिटणीस अलिबाग तालुका सौ. जान्हवी पारेख अंजारा यांच्या हस्ते पार पडला.



विश्वेश्वराय पुलाच्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल

 विश्वेश्वराय पुलाच्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल


- उदय सामंत


 


            मुंबई, दि. 4: माटुंगा रोड रेल्वे स्थानकाजवळ विश्वेश्वराय उड्डाणपुल डागडुजी करण्यात येत आहे.या पुलाच्या मध्यापासून धारावीच्या दिशेने जाणारा पूल हा धोकादायक वळणाचा असून या ठिकाणी अंधुक बिंदू असल्यामुळे यापूर्वी अपघात होऊन जिवीतहानी झाल्या आहेत. त्यामुळे या विश्वेश्वराय पुलावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी या पुलालगत असलेल्या बाधीत झोपड्यांचे निष्कासन करणे अत्यंत गरजेचे होते. याबाबत तेथील झोपडपट्टीधारक व गरीब नागरिकांवर अन्याय होत असल्यास उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.


    याबाबत सदस्य अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


       मंत्री श्री.सामंत म्हणाले, विश्वैश्वरैय्या पुलाजवळील 17 झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून तेथे एकही झोपडी अस्तित्वात नाही. तरी लोकप्रतिनिधी यांच्या माहितीनुसार तेथे झोपड्या असल्यास व तेथील नागरिकांवर अन्याय होत असल्यास चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात विकासकाला कुठलाही लाभ देण्यात आला नाही. झोपडपट्टी धारकांसाठी शासनाचे धोरण आहे, या धोरणापलीकडे जावून काम करीत असलेल्यांवर कारवाई होईल. या चर्चेत सदस्य विलास पोतनीस यांनी सहभाग घेतला.   

Featured post

Lakshvedhi