Saturday, 5 August 2023

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूननागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

 उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूननागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही


            मुंबई, दि. 5 :- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.4) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधिमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती, अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. या निमित्ताने श्री. पवार यांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.


00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi