Wednesday, 12 July 2023

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख

 सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख


जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. १२ : नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


            खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.


            जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


००००

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चा स्तुत्य

 अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चा स्तुत्य


उपक्रम 

अलिबाग, ता. 29

सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अॅड ्व्हिडीओग्राफर्स असोसिएशन  शी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि  अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वेश्वी  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आरती पाटील यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. 

अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. उजवल जैन, डॉ. अमेय केळकर, डॉ. समीर धाटावकर, डॉ. अनघा भगत,  डॉ. गणेश गवळी,  डाॅ. राजाराम हुलवन,  डाॅ. अश्विनी हुलवान  यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, छाती, पोट, हृदयाचे ठोके, रक्त प्रमाण, दातांची तपासणी करून मोफत औषधं दिली. 


यावेळी रायगड फोटोग्राफर्स अॅड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार  जितेंद्र मेहता, शाळेचे मुख्याध्यापिका अश्विनी लांगी, वेश्वी चे माजी सरपंच प्रफुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनंत मुळूस्कर, जुई शेळके, रुपाली गुरव, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सहकार्याध्यक्ष सुबोध घरत, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, सल्लागार सुरेश खडपे, सचिन आसरानी,  शाळेतील शिक्षक निर्मला शिरसाठ, नरेश गायकवाड, रवींद्र साळुंखे व विद्यार्थी उपस्थित होते. 


अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहे. या संस्थेमार्फत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात.त्याचा फायदा ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील घटकाला चांगल्या पध्दतीने होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ६३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 


-----------

फोटोओळी : अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व  अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी करताना डाॅक्टर्स.

बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

 *बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*


आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे...


  *(१)गुडघेदुखी कमी होते...*

बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच गुडघेदुखी समूळ नष्ट होते.


*(२)डोकेदुखी दूर होते.*.* वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..


*(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*

आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर, पांढरे पाणी जाणे, अशा समस्या बहुतेक महिलांना होतात. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच.


*(४) पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते...*

बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो. वंध्यत्व दूर होते.


*(५) पाठदुखी कंबरदुखी...* या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात.


*(6) जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*

बरेच वेळा, बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते, यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.


*(७) अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या. 


.तेव्हा वरील फायदे बघता बाभळीच्या शेंगांचे चूर्ण अतिशय मौल्यवान औषध आहे आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं. जरुर हि पावडर घरात असू द्यावी.


*आयुर्वेद अभ्यासक सुनिता सहस्रबुद्धे, निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


डॉक्टर आनंद कुलकर्णी, पीएचडी, सायकोलॉजी.,

 डॉक्टर आनंद कुलकर्णी, पीएचडी, सायकोलॉजी.


त्यांनी तीन टेक्निक डेमोसह दाखवलेले आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो, शरीरातली निगेटिव्ह एनर्जी कशी निघून जाते, खूप छान समजावून सांगितलेला आहे. पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळवायची? त्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून पहावा.

स्वच्छता मॉनिटर्स उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार

 स्वच्छता मॉनिटर्स उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविणाऱ्या ‘लेटस् चेंज’ उपक्रमात मागील वर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता हा उपक्रम यावर्षी अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


            मागील वर्षी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत लेटस् चेंज प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स जबाबदारी स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. यास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्याबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, उपसचिव समीर सावंत, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, कक्ष अधिकारी मृणालिनी काटेंगे, लेटस् चेंज प्रकल्पाचे रोहित आर्या आदी उपस्थित होते. तर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच विभागीय आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. समाजातील निष्काळजीपणा दूर करणे हा स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाचा उद्देश असून विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तर त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा अनुभव आहे. मागील वर्षी या उपक्रमात 12 हजारांहून अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यातील सर्वच शाळांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 22 जुलै 2023 पर्यंत नोंदणी करावी, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील यात सहभागी होऊन सर्वांनी एकत्रितपणे अभियान म्हणून हा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांना केल्या.


            या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि मुख्यत: कचरा न होऊ देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावयाचे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करावयाचे आहेत. या अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबर 2023 रोजी गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


00000

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थविशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थविशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त राज्य शासनाचा पुढाकार


            नवी दिल्ली, 11 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेकाच्या निमित्ताने विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आज केली.


            वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीचे आयोजन विज्ञान भवन येथे आज करण्यात आले होते. या बैठकीसाठी मंत्री श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. बैठकीच्या वेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी श्रीमती सीतारामन यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक स्मरणार्थ जारी करण्यात येणाऱ्या नाण्यामध्ये सोन्याचा वापर करण्याबाबत परवानगीची मागणी केली.


            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून राज्य शासनाने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 2 जून 2023 रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन किल्ले रायगडावर आठवडाभर करण्यात आले होते. या उत्सवांचा एक भाग म्हणून, राज्य शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक विशेष टपाल तिकीट नुकतेच जारी केले. राज्याभिषेक वर्षानिमित्ताने स्मारक नाणे जारी करण्याचा प्रस्ताव यापूर्वी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे दिलेला आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.


            छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे "होण" काढले होते. या होणची प्रतिकृती असलेले विशेष नाणे 350 व्या राज्यभिषेकाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. हे नाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून काढून ते जनतेला उपलब्ध करून द्यावे. या नाण्यांनमध्ये सोन्यासह अन्य धातूंचा वापर केला जाईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. या महत्त्वाच्या प्रस्तावाला जलद मंजुरी देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, अशी विनंती त्यांनी केली. यावर केंद्रीय वित्त मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.


00000



 

स्त्रीचा पदर

 *•• 🌹 " स्त्रीचा पदर " 🌹••* 

*खुप छान मेसेज नक्की वाचा...*


     *पदर काय जादुई शब्द आहे !! हो मराठीतला !!*


*काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द.*


*पण केवढं विश्व सामावलेलं आहे त्यात....!!*


 *किती अर्थ, किती महत्त्व...*

 *काय आहे हा पदर......!?* 


*साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग..!*


*तो स्त्रीच्या " लज्जेचं रक्षण" तर करतोच. सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं..!* 

*पण,आणखी ही बरीच "कर्तव्यं" पार पाडत असतो..!* 


 *या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल ते सांगताच येत नाही..!?*


*सौंदर्य खुलवण्यासाठी "सुंदरसा" पदर असलेली " साडी" निवडते..! सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते.*

*सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. .....!!*


*लहान मूल आणि*

*" आईचा पदर "*

*हे अजब नातं आहे.!* 

*मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन " अमृत प्राशन" करण्याचा हक्क बजावतं......!!*


*जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा " पदर " पुढे करते..!* 


*मूल अजून मोठं झालं., शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या " पदराचाच आधार " लागतो..!* 

*एवढंच काय...! जेवण झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल ऐवजी "आईचा पदरच" शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं पदराला नाक जरी पुसलं तरी ती रागावत नाही..!* 


*त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला " आईचा पदरच " सापडतो.....!!*


*महाराष्ट्रात तो " डाव्या खांद्या वरून " मागे सोडला जातो.....!!*


*तर गुजराथ, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो..!* 


*कांही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात..!* 

 *तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं " पदरच " झटकतात..!*


 *सौभाग्यवतीची "ओटी "भरायची ती पदरातच अन्‌ "संक्रांतीचं वाण "लुटायचं ते " पदर " लावूनच..!* 


*बाहेर जाताना " उन्हाची दाहकता " थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो.!* 

*तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच " छान ऊब " मिळते....!!*


*काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच " गाठ " बांधली जाते..* 

*अन्‌ नव्या नवरीच्या*

*" जन्माची गाठ " ही नवरीच्या पदरालाच.*

*नवरदेवाच्या उपरण्यासोबतच बांधली जाते.....!!*


*पदर हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना...!?*


*नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते..!* 

*पण संसाराचा राडा दिसला..! की पदर कमरेला खोचून कामाला लागते..!* 


*देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना .....?*

*माझ्या चुका " पदरात " घे..!* 


*मुलगी मोठी झाली, की "आई " तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते अगं.! चालताना तू पडलीस तरी चालेल..! पण, " पदर " पडू देऊ नकोस !*

*अशी आपली भारतीय संस्कृती...!*


 *अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा " विनयभंग " तर दूरच ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणार ही नाहीत..!* 

 *ऊलटे तिला वाट देण्यासाठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या पदरात..* 


*ही आहे आपली भारतीय संस्कृती...* 



जय श्री राधे कृष्ण


🙏🌹

Featured post

Lakshvedhi