Monday, 5 June 2023

शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त

 

शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त

महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी,6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे.


            या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे सचिव संतोषकुमार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.


            'छत्रपती शिवाजी महाराज' हा शब्द चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय राज्य शासनाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.


            शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य शासनाचा विचार असून राजमाता माँ जिजाऊ यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.


शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन


            टपाल तिकीट अनावरणानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘शिववंदना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची1 जुलै रोजी परतफेड

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची1 जुलै रोजी परतफेड

 

               मुंबईदि. ५ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ४.६३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची परतफेड करण्यात येणार आहे. अदत्त शिल्लक रकमेची ३० जून २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १ जुलै २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईलअसे वित्त विभागाच्या सचिव शैला ए (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसूचने महाराष्ट्र शासनाने १ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर            दि. १ जुलै २०२३  पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियमानुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी४.६३ महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरित्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करीलअसे वित्त (वित्तीय सुधारणा) विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे.

०००००


 

वृत्त क्र. 1800

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची

३ जुलै रोजी परतफेड

 

               मुंबईदि. ५ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.९५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची परतफेड करण्यात येणार आहे. कर्जाच्या अदत्त शिल्लक रकमेची २ जुलै २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ३ जुलै २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईलअसे वित्त विभागाच्या सचिव शैला ए (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            महाराष्ट्र शासनाने ३ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ३ जुलै २०२३  पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी७.९५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरित्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करीलअसे वित्त (वित्तीय सुधारणा) विभागाच्या सचिव शैला ए. यांनी कळविले आहे.

०००००


50 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल

 50 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार

 

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

 

राज्यपालमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजभवनात अनावरण

 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात   वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल  विभागाच्या सहकार्याने एक टपाल  तिकीट  काढण्याचा निर्णय घेतला असून येत्या मंगळवारी,6 जून रोजी महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉल मध्ये  समारंभपूर्वक या  तिकिटाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवारपर्यटन मंत्री श्री मंगलप्रभात लोढाशिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकरपोस्ट मास्टर जनरल सौ स्वाती पांडेप्रधान सचिव श्री. विकास खारगेराज्यपालांचे सचिव श्री संतोषकुमार  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

 

'छत्रपती शिवाजी महाराजहा आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे.   कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात  जना जनानांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून  महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असे ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार असून माँ जिजाबाई यांची यामागील भावनासंकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणीगडकिल्लेअष्टप्रधान मंडळप्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहेया प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पुढे सरसावला आहे.  अस्मानी पातशाह्यांना टक्कर देणारा आणि स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हे  महान राजे खरे  नायक आहेतहे भावी पिढीलासुद्धा कळावे ही यामागील भावना आहे असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन

टपाल तिकीट अनावरणा नंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भवताल पाहू या

 यंदाचा पावसाळा अनोखा बनवूया

पावसाचा प्रत्येक क्षण जगूया...


भवताल तर्फे 'भिजूया - मोजूया' या उपक्रमात दरवर्षी पावसाळ्यात सामूहिकरित्या पाऊस मोजला जातो. येत्या पावसाळ्यातही तो मोजला जाणार आहे.


कोणीही व्यक्ती दररोजची १५-२० मिनिटे देऊन कोणत्याही शहरात / गावात पाऊस मोजू शकते. पर्जन्यमापक तयार करून पाऊस कसा मोजायचा याबाबत भवताल टीमकडून ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल. (प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असेल.)


नावनोंदणी सुरु आहे, इच्छुकांनी आजच नाव नोंदवून पाऊस - निसर्गाशी जोडून घ्यावे!

 

नावनोंदणी व माहितीसाठी लिंक : https://www.bhavatal.com/bhijuya-mojuya


(सहभागी व्हा आणि इतरांसाठी शेअरही करा 🙏🏼


टिम भवताल


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com



Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350

862 / bhavatal@gmail.com

ग्रामीण भास्कराचार्य गणितज्ञ, पहा

मुलांना शिकवा
 गुप के सभी विद्वान पता लगाये ये केसे हुआ,
चाहे तो CA कि मदद भी ले लेवे..


अशीही एक वटपौर्णिमा

 अशीही एक वटपौर्णिमा

   चित्रा अविनाश नानिवडेकर. सफाळे 


आज तन्वी च्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं. लग्नानंतर ची पहिलीच वटपौर्णिमा. आठवड्यापासून तिची तयारी चाललीय. आईने दिलेली गर्भरेशमी हिरवी पैठणी, सासूबाईनीं आठवणीने काढून आणलेल्या गोठ पाटल्या, पहिल्या वटपौर्णिमे साठी म्हणून मुद्दाम तिने आणि तनिष ने खरेदी केलेला लफ्फा, झालंच तर नथ वगैरे काढून ठेवली…तिला लहानपणापासून हया सणाचं खूप अप्रूप होतं…छान ताट सजवून घ्यायचं त्यावर स्वतः विणलेला क्रॉशाचा रुमाल घालायचा पाच सवाष्णी बरोबर वडाच्या पारावर जायचं…मनोभावे पूजा करून नाजूक हाताने वडाला दोरा गुंडाळत एकीकडे "जिवाच्या सख्या "कडे पाहायचं…लौकरच मनात धरलेलं स्वप्नं सत्यात येणारं हे धरूनच तिची तयारी चालली होती. सासूबाई आणि तनिष हळूच तिची फिरकी घेत होते परवा पासून

"अगं.. तूझं तबक धुवायचे राहिले…किंवा साडी चा ब्लाउज आणायचा राहिला…आणि हो त्या दिवशी कडक उपास असतो बरं…फक्त शहाळ नि केळं खायचं "

मंद हसून ती त्यांना दाद देत होती. लग्नानंतर येणारी पहिली वटपौर्णिमा मनात रंगवत रात्री तिने तनिष ला न विसरता बजावलं

"फोटो काढण्यात कंजूस पणा करू नकोस उदया. मला स्टेटस ला भरपूर फोटो टाकायचे आहेत."


…. आणि सकाळीच तिला मेट्रन चा फोन आला. हॉस्पिटल मध्ये अपघाताच्या केसेस आल्यात तुझी सुट्टी कॅन्सल. ताबडतोब जॉईन हो. खूप इमर्जन्सी आहे. सासूबाईनीच फोन घेतला त्या आणि तनिष दोघेही म्हणाले..

 "जा… तन्वी वटपौर्णिमा परत सुद्धा साजरी करता येईल पण आत्ता हॉस्पिटल मध्ये खरी तुझी गरज आहे. आम्ही समजू शकतो "

डोळ्यातलं पाणी परतवून तिने युनिफॉर्म चढवला. हॉस्पिटल कंपाउंड मध्येच रहात असल्यामुळे पाचव्या मिनिटाला ती इमर्जन्सी वॉर्डात दाखल झाली.

खरंच रोड अपघातात सापडलेली संपूर्ण फॅमिली, ड्रायवर, चिमुकली दोन मुलं. नशिबाने त्यातील एक तरुणी दाराच्या बाहेर फेकली गेली होती म्हणून थोडक्यात खरचटलं आणि पायावर फ्रॅक्चर वर निभावलं.

तन्वी च्या टीम ने भराभर सगळ्यांना ईलाज सुरू केले. डॉक्टर्स ऑर्डर देत होते. आणि सगळ्या त्या प्रमाणे ट्रीटमेंट देत होत्या. त्या तरुणीच्या मिस्टर ना जेंव्हा आय. सी. यू. मध्ये हलवले…तिने तन्वी चा हात घट्ट पकडत डोळ्यातून पाणी काढून म्हटलं.

"सिस्टर…माझ्या साठी तुम्ही आज सावित्रीचं रूप आहात…माझ्या.. माझ्या सत्यवानाला प्लिज प्लिज यमाच्या दारातून बाहेर आणा…मी.. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन."

तन्वी च्या अंगावर सर्रकन काटा आला. तिला धीर देत तन्वी म्हणाली "हो.. काळजी नको करुस. आम्ही सगळे प्रयत्न करू. हे बघ माझ्या हातात त्यांचेच ब्लड सॅम्पल आहे.2..3.. बॉटल रक्त लागेल द्यायला. तेंव्हा ते नक्कीच शुद्धीवर येतील. विश्वास ठेव आम्ही सर्व जण शर्थीचे प्रयत्न करू. तू पण देवाला प्रार्थना करत राहा "


अक्षरशः रात्री आठ वाजता त्या तरुणी च्या मिस्टरांनी ट्रीटमेंट ला प्रतिसाद दिला तेंव्हाच तन्वी आय सी यू च्या बाहेर आली.

त्या तरुणीला व्हील चेअर वर घेऊन तन्वी ने तिच्या नवऱ्याच्या बेडजवळ नेलं.नवऱ्याचा हात हातात घेऊन ती तरुणी भरभरून रडत म्हणाली…

"वटसावित्री आज तुमच्या रूपाने फळाला आली सिस्टर तुम्ही होतात म्हणून. मला समजलं आज स्वतः ची पहिली पूजा सोडून इमर्जन्सी मध्ये आलात . पण ड्युटीवर आल्या पासून जरा ही खंत न करता तुम्ही सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली.मी मनापासून प्रत्येक वर्षी वटसावित्री दिवशी एक सौभाग्य वाण तुमच्यासाठी देणार. आज तुमच्यामुळे माझं सौभाग्य मला सहिसलामत मिळतं आहे."


तन्वी चे सुद्धा डोळे भरून आले. तिच्या पाठीवर थोपटून तन्वी म्हणाली "अगं…मेडिकल मधले सगळेच ह्यासाठी झटले.. म्हणून ह्या अपघातातले सगळेच वाचले. चल मी निघू? उदया येईनच ड्युटीवर "


व्हरांड्यात तनिष ला बघून तिला आश्चर्य वाटले. "अरे…इकडे कसा काय? मी येतच होते घरी "

"बाईसाहेब…वटपौर्णिमा काय तुम्ही एकट्याने पुजायचा मक्ता घेतलाय? मी पण अशी कर्तव्यदक्ष बायको सातजन्म मिळावी म्हणून उपास करून होतो."

"म्हणजे? मी नाही समजले "

तेवढ्यात एक म्हातारे आजोबा जवळ येऊन तनिष च्या पाठीवर थोपटत म्हणाले

"बाळा.. किती रे धावपळ केलीस माझ्या मुलाला ब्लड मिळवण्यासाठी, नातवंडाना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास. हिला तूझ्या आईने बळजबरी जेवू घातलं…खूप सेवा केलीत. हया परक्या ठिकाणी आम्हाला तुमचा खूप आधार वाटला रे. तुमच्या रूपाने देव भेटला…!"

तन्वी चे डोळे कृतज्ञतेने भरून आले.

अश्या तऱ्हेने तिची वटपौर्णिमा साजरी झाली.


©® चित्रा अविनाश नानिवडेकर. सफाळे पालघर.

स्त्रीसखी - शतावरी*

 *स्त्रीसखी - शतावरी*


*मूळ संस्कृत शब्द शतवीर्या. वीर्य म्हणजे ताकद किंवा कार्यशक्ती. म्हणून माणसाची कार्यशक्ती शतपटीने वाढविते अशी ही वनस्पती.*


*◼️ गुणधर्म*


१. मधुर व कडू रस, स्निग्ध व थंड, त्यामुळे पित्तशामक.

२. डोळे, हृदय व शुक्रधातूला हितकर आणि गर्भपोषक.

३. सप्तधातूंचे पोषण करणारे उत्तम रसायन (इथे रसायन याचा अर्थ 'केमिकल - लॅबोरेटरीत बनवता येते ते ' असा नाही, तर रसायन म्हणजे सप्तधातूचे पोषण करणारी द्रव्ये). त्यामुळे बुद्धिवर्धन, बलवर्धन व रोगनाशन यांचे सामर्थ्य मिळते.

४. बुद्धिवर्धक, बलवर्धक व रोगनाशक.

५. शरीरघटकांचा लवकर नाश होऊ देत नाही; परिणामी, वृद्धत्व लांबवते.


*◼️ उपयोग*


१. गर्भपोषक - स्त्री-पुरुषातील वीर्य वाढवते व गर्भधारणेसाठी योग्य स्थिती निर्माण करण्यास मदत करते. भूक सुधारते. त्यामुळे गर्भारपणातील अशक्तपणा लवकर जातो. गर्भाचे योग्य पोषण करते. बाळंतपणानंतर अंगावरील दूध वाढविते व सूज कमी करते.

२. मधुमेह - रक्तातील साखर व चरबी कमी करते. लघवीला साफ होते. यामुळे मधुमेह व कोलेस्टेरॉल वृद्धीवर उपयोगी.

३. स्नायूंच्या समस्या - स्नायूंची लवचिकता वाढते. स्नायूंच्या वेदना व सूज कमी करते आणि मांसाचे पोषण करते. आंत्रवण किंवा अल्सरमध्ये अंत:त्वचेला मऊपणा येतो. शतावरी तेल चोळून लावल्यास स्नायू कणखर बनतात; त्यांचा स्टॅमिना वाढतो.


*◼️ वापरण्याची पद्धती*

शतावरी कल्प २ चमचे, एक कप दुधात टाकून, सकाळी व रात्री झोपताना घ्यावे किंवा शतावरी चूर्ण अर्धा ते एक चमचा + दूध १ कप उकळून, साखर - घालून प्यावे - (मधुमेहींनी साखर घालू नये.) रोज दोन वेळा.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



Featured post

Lakshvedhi