Friday, 5 May 2023

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणा

 *🌹तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार...🌹*


*१) पोट :-* केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही....... 


*२) मूत्रपिंड :-* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही...... 


*३) पित्ताशय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही........ 


*४) लहान आतडे :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता....... 


*५) मोठे आतडे :-* केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता....... 


*६) फुफ्फुसे :-* केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता........ 


*७) यकृत :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता...... 


*८) हृदय :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता....... 


*९) स्वादुपिंड :-* केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता...... 


*१०) "डोळे" :-*  केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता...... 


*११) "मेंदू" :-* केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता....... 


निसर्गाने "माेफत" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची" योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका  शरीर "स्वस्थ" तरच आपण "मस्त".......


कारण----------


"शरीराचे" कोणते ही"अवयव" हे बाजारा मध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या "शरीरातील अवयवांची" नेहमी काळजी घ्या........


तुम्हीच आहात तुमच्या शरिराचे खरे राखणदार......


काळजी घ्या आपली व आपल्यांची.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*



Thursday, 4 May 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विषय तज्ज्ञांच्यासेवा उपलब्धतेसाठी शासन निर्णय निर्गमित

 महाराष्ट्र लोकसेवाआयोगाला विषय तज्ज्ञांच्यासेवा उपलब्धतेसाठी शासन निर्णय निर्गमित

            मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या विविध पदभरती परीक्षांच्या गोपनीय कामासाठी विषयतज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.


            आयोगाच्या गोपनीय व संवेदनशील कामकाजासाठी काही वेळेस शैक्षणिक संस्थांमधील संबंधित विषयांतील तज्ञांची सेवा उपलब्ध करुन घेताना आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम परीक्षांच्या वेळापत्रकावर होतो. परिणामी शासन सेवेत कामकाज करण्यासाठी आवश्यक उमेदवार वेळेवर मिळू शकत नाहीत. त्यामुळे पुरेशा मनुष्यबळाअभावी शासकीय कामकाजाच्या गतिमानतेवर परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन विविध शैक्षणिक संस्थांमधील विषय तज्ज्ञांच्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगास उपलब्ध व्हाव्यात याकरिता या शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.


             या शासन निर्णयान्वये संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांमधील अध्यापकीय संवर्गातील विषय तज्ज्ञांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सोपविण्यात आलेली गोपनीय व संवेदनशील कामे आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत व दर्जात्मक स्वरुपात पूर्ण करुन देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विहित केलेल्या कालमर्यादेत संबंधित विषयतज्ञांची सेवा आयोगास उपलब्ध करुन देणे उपरोक्त शैक्षणिक संस्था प्रमुखांवर बंधनकारक राहणार आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी निगडित कामकाजासाठी समन्वयक म्हणून क्षेत्रीय स्तरावरील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाच्या आवश्यकतेनुसार विषय तज्ज्ञांच्या सेवा आयोगास उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक सहकार्य करण्याची जबाबदारी अशा समन्वयकांवर राहणार आहे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्या

 चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविणात येणाऱ्याराज्य शासनाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन


 


            मुंबई दि. 4 : चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाची (चांभार, मोची, ढोर, होलार) आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासन अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येतात, तर केंद्र सरकारतर्फे एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येते. 


            अनुदान योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत परिपूर्ण कागदपत्र असलेले कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झाली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून, संबंधित पात्र अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह मुंबई शहर जिल्हा कार्यालय, खेरवाडी, बांद्रा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती पुराणिक यांनी केले आहे.

आरोग्य विभागाने ऑनलाईन प्रणालीचाउपयोग करून पारदर्शक बदली प्रक्रिया राबवावी

 आरोग्य विभागाने ऑनलाईन प्रणालीचाउपयोग करून पारदर्शक बदली प्रक्रिया राबवावी


- आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत


            मुंबई, दि. 4 : आरोग्य विभागाची आस्थापना मोठी आहे. दरवर्षी बदली प्रक्रिया राबविताना अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे विभागाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या.


               मंत्रालयातील त्यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेताना मंत्री श्री. सावंत बोलत होते. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसचिव अशोक आत्राम, श्री. लहाने आदी उपस्थित होते.


               बदल्यांबाबत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचा आढावा घेताना मंत्री श्री. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी www.transfer.maha-arogya.com व अधिकाऱ्यांसाठी www.officerstransfer.maha-arogya.com ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे. या ऑनलाईन प्रणालीवर बदलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. या प्रणालीमुळे सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा एका क्लीकवर उपलब्ध झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी व्यवस्था असून येथे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निश्चित कालावधीत निरसन करावे. या प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे चुका होतील. चुका सुधारण्यासाठी सहायक पथक तयार ठेवावे. तांत्रिक अडचणी, तक्रारी तातडीने सोडवाव्यात. तक्रारींचे निराकारण केल्यानंतरच तक्रार प्रणालीवरून काढावी. या प्रणालीसाठी ‘बॅक सर्वर’ तयार ठेवावा. सर्वर डाऊन होणार नाही, याची काळजी घ्यावी. सुरूवातीच्या दिवसांमध्ये प्रणालीविषयी आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी सेवा “24 बाय 7” सुरू ठेवावी.


                   मंत्री श्री. सावंत पुढे म्हणाले की, राज्यात दुर्गम भागातील आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी, अधिकारी व डॉक्टरांना मिळणाऱ्या विशेष सवलती, लाभ, सुविधांची माहिती देण्यात यावी. त्यामुळे मेळघाटसारख्या दुर्गम भागाकडे नियुक्त होण्यास कर्मचारी आकर्षित होतील. परिणामी, दुर्गम भागात रिक्त पदे न राहता नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतील. आरोग्य विभागातंर्गत सातत्याने दवाखाने व अन्य इमारतींचे बांधकाम, दुरूस्ती करण्याची मागणी येत असते. त्यासाठी विभागाची स्वतंत्र बांधकाम यंत्रणा असावी, कायदेविषयक बाबी सांभाळण्यासाठी कायदेविषयक यंत्रणा असावी, याबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करावी.


                  शासकीय रूग्णालयांमध्ये सर्व आरोग्य सुविधा नि:शुल्क करण्याबाबत कार्यवाही करावी. अन्य राज्यातील आरोग्य यंत्रणेचा अभ्यास करून त्यांच्याकडील चांगल्या बाबी राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी विभागाचे पथक पाठवावेत. राज्यात काम पूर्ण झालेले, अर्धवट असलेली व काही कारणास्तव सुरू न होऊ शकलेल्या रूग्णालयांची कारणांसह माहिती देणारा ‘डॅश बोर्ड’ तयार करावा. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून गरीब रुग्णांना लाभ होत आहे. आपला दवाखाना येथून उपसंचालक यांनी रुग्ण संख्या, दिलेल्या सेवा, औषधी वितरण याबाबत दैनंदिन अहवाल घ्यावा. खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य दूत नेमून विभागाने गरीब रूग्णांना मदत करावी. तसेच रूग्णालयांमधील खाटांची संख्या, रिक्त खाटांची माहिती देणारे ॲप तयार करावे. औषधी प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. यामध्ये तयार करण्यात आलेल्या घटनेला विधी व न्याय विभागाकडून मान्यता घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत राज्यात औषधांचा पुरवठा थांबू नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिला.


                 बैठकीत सुंदर माझा दवाखाना, माता सुरक्षित- घर सुरक्षित अभियान, महिलांमधील स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान व उपचार, हिरकणी कक्ष स्थापना याबाबतही आढावा घेतला. बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक, अधिकारी उपस्थित होते.


००००

मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत व्यवसाय समुपदेशन मेळावा

 मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत व्यवसाय समुपदेशन मेळावा


 


            मुंबई, दि. 4 : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, व्यवसायाच्या विविध संधीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


            कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणारे हे शिबिर शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी ९ वाजता कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर येथे होणार आहे.


            दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.


०००

लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा


राज्यात सुरू असलेली विकासकामे 'मिशन मोडवर' पूर्ण करावित


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. 4 : राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावित. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विविध विभागांच्या सचिवांना दिले.


            खासदार गजानन किर्तीकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, आमदार संजय गायकवाड या लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांमधील विविध विकास कामांविषयी आढावा घेणारी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.


            लोकप्रतिनिधींच्या मतदार संघांमध्ये सुरू असलेले रस्ते, उद्याने, जलसिंचन प्रकल्प, वळण रस्ते, उड्डाणपूल ही विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ह्या सर्व विकासकामांचा प्रत्यक्ष फायदा सामान्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळांची आणि मनोरंजनाची मैदाने देखभाल तत्वावर हस्तांतरित करण्यास शासनाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी यावेळी खासदार श्री. किर्तीकर, श्री. शेट्टी यांनी केली. याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात एक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले. वर्सोवा अंधेरी येथील खाडीतील गाळ काढणे, त्या ठिकाणी नवीन मच्छ‍िमार जेट्टी बांधणे याविषयी चर्चा झाली.


            आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदारसंघातील विविध विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेमुळे सुमारे ४३ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या योजनेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.


            बुलढाणा शहरालगत कृषी महाविद्यालय स्थापन करणे, मोताळा तालुक्यात नवीन एमआयडीसी स्थापन करणे, बुलढाणा शहराला रिंग रोड मंजूर करून बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील बोथा अभयारण्यात उड्डाणपूल बांधणे, राजूर घाटात एकेरी वाहतूक करणे, आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा

 झाली.


०००००


जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे.*

 *जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे.*


छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर घातलेलं पाणी पिऊ शकता.  

 

▪️ *वजन कमी करण्यासाठी फायदेशीर* 

आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी करणारे) आणि अँटिऑक्सिडंट्स गुण आढळतात. यामुळे आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही.


चयापचयाची क्रिया तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग होतो. तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास तुमचा पचनक्रियेचा त्रास नक्कीच दूर होतो. तसंच वजनही नियंत्रणात राहते.


▪️ *पचनक्रिया उत्तम राहते.*

आवळ्याला एक आदर्श फळच म्हटले जाते. कारण यामध्ये अनेक गुण असून शरीरासाठी याचे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते. पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरूवात होते. वास्तविक यामध्ये *फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्रास कमी होतो.* फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्धकोष्ठासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्याच्या पावडरमुळे पचनक्रिया उत्तम होऊन अन्य त्रासापासून सुटका मिळते. 


▪️ *लिव्हर निरोगी ठेवते.*

अनेक अँटिबायोटिक आणि औषधांच्या गोळ्या अथवा सतत दारूचे सेवन हे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थांचे निर्माण करते. पण तुम्ही नियमित आवळा पावडरचा समावेश आपल्या आहारात करून घेतला तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.


▪️ *हृदय स्वास्थ्यासाठी*

एका शोधामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. याशिवाय याचा उपयोग हायपोलिपिडेमिक एजंट स्वरूपातही होतो. यामुळे रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणे सोपे होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते. यामुळे हृदय रोगापासून तुम्हाला दूर राहता येते आणि हृदयाची काळजीही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते.


▪️ *प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी*

रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून इम्यूनोमॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते आणि आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच तुम्ही नियमित आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्यास अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रतिकारकशक्ती अधिक वाढण्यासाठी याचा उपयोग होतो.



Featured post

Lakshvedhi