Thursday, 4 May 2023

मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत व्यवसाय समुपदेशन मेळावा

 मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत व्यवसाय समुपदेशन मेळावा


 


            मुंबई, दि. 4 : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, व्यवसायाच्या विविध संधीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


            कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणारे हे शिबिर शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी ९ वाजता कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर येथे होणार आहे.


            दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi