Thursday, 30 March 2023

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचेपणन संचालकांचे आवाहन.

 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचेपणन संचालकांचे आवाहन.

            मुंबई, दि. 29 : सन २०२२ - २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे.


            राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.


            तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.


अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे


            विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत,ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र. आवश्यक आहे.


            सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक ,नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.

कोणीतरी विचारले मला परवा

 कोणीतरी विचारले मला परवा

तुला राम हवा की कृष्ण हवा


मी म्हणाले किती छान विचारला प्रश्न

सांगते , कधी मला राम पाहिजे कधी कृष्ण


रामराया पोटात घालेल माझी चूक

आणि कृष्ण भागवेल माझी भूक


रात्रीची शांत झोप रामरायच देतो

भूक लागली की कृष्ण च आठवतो,


कशाचीही भिती वाटली की मला आठवतो राम

कष्ट झाले , दुखः झाले की कृष्णाकडे च मिळतो आराम,


रक्षण कर सांगते रामरायाला च

सुखी ठेव सांगते मी श्रीकृष्णाला च


बुध्दीचा विवेक रामाशिवय कोणाकडे मागवा,

व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा,


सहनशक्ती देतो माझा रामराया

कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्याया,


रामाला नेहमी शरण जावे वाटते

कृष्णाशी मात्र बोलावेसे भांडवेसे वाटते, 


रामाला क्षमा मागावी

कृष्णाला भीक मागावी


रामाला स्मरावे

जय श्री कृष्ण बोलावे


अभ्यास करताना प्रार्थना राजं मणी रामाला

पायावर उभे राहताना विनवणी विष्णूला


एकाचे दोन होताना घ्यावे रामाचे आशीर्वाद

संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद


आरोग्य देणारा राम

सौंदर्य देणारा कृष्ण


राज्य देणारा राम

सेना देणारा कृष्ण


बरोबर चूक सांगतो राम

चांगले वाईट सांगणे कृष्णाचे काम


रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम

कृष्णाकडे मागावे मी मित्रांचे प्रेम



दोघांकडे मागावे तरी काय काय

ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,

म्हणत आहेत, अग आम्ही एकच

तु फसलीस की काय.....,


म्हणाले , कोण हवा हा प्रश्न च नाही

मिळू दोघेही नाहीतर कोणीच नाही,


मी रडले आणि म्हणाले 


दोघेही रहा माझ्याबरोबर 

परत नाही विचारणार हा प्रश्न


राम का कृष्ण परत विचारले जरी

फक्त म्हणेन जय जय रामकृष्ण हरी  


ll जय जय रामकृष्ण हरी ll

      🙏🌺🪷🌹🙏


श्रद्धा कारुळकर

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचेनूतनीकरण करून घेण्याचे आवाहन.

 दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचेनूतनीकरण करून घेण्याचे आवाहन.

मुंबई, दि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.


आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.


भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.


००


 



सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार

 सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये

“मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार


- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. 29 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियाने सुरु केली असून राज्यात 30 मार्च 2023 पासून ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            ‘मिशन थायरॉईड’ या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


            थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.


            साधारणपणे प्रत्येकी 1 लाख महिलांमागे अंदाजे 2,000 महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदानदेखील होत नाही. अशा सर्व महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे. अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुध्दी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.


००००

कुणबी चेम्बर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज ही संस्था नव्हे सुवर्णसंधी !!!*

 *▪️कुणबी चेम्बर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज ही संस्था नव्हे सुवर्णसंधी !!!* 


समस्त कुणबी समाज बांधवांना 

जय कुणबी👏


     *शनिवार दिनांक २५ मार्च २०२३ रोजी गडकरी रंगायतन ठाणे* येथे झालेल्या *कुणबी चेम्बर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या* व्यावसायिकांच्या *प्रोत्साहन सभेला* हजारपेक्षा जास्त व्यावसायिक उपस्थित होते.

     हा दैदित्यमान व अविस्मरणीय सोहळा कुणबी समाजाला भविष्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीला दिशा देणारा ठरेल यात तिळमात्र शंका नाही .


      *KCCI ची स्थापना का करावीशी वाटली* हा सर्वच कुणबी समाज बांधवांना पडलेला प्रश्न होता त्याचा उलगडा २५ मार्चला झाला परंतु समाजाचा आपण पूर्व इतिहास पाहिला तर कळेल की,

     *१०२ वर्षाचे सामाजिक संघटन व सहकार क्षेत्रात बळकट असलेली सामाजिक संस्था* (कुणबी समाजोन्नती संघ आणि कुणबी बँक) असूनही कुणबी समाज दिशाहीन का आहे?.

     याच दरम्यान १०२ वर्षात समाजाच्या अनेक सामाजिक संघटनांचा उदय झाला परंतु आपापली राजकीय व सामाजिक पोळी भाजून घेण्याकरिता राजकीय पक्षात विखुरला गेलेला समाज बांधव आणि त्यामुळे समाजाला लागलेली राजकीय कीड या सर्वाचा सारासार विचार करून राजकारणविरहित आणि समाजाला आर्थिक बाजूने सक्षम बनविण्यासाठी KCCI चा जन्म झाला. KCCI साठी सर्व सामाजिक संघटना व समाज बांधवांना एकत्रित आणण्याची किमया साधणारे *कुणबी चेबर्स ऑफ कॉमर्सचे संस्थापक सन्मा श्री अशोकजी वालम यांना मानाचा मुजरा👏* 


      *KCCI च्या स्थापनेला ऑक्टोबर २०२२ पासून प्रारंभ झाला* आणि अवघ्या अडीच महिन्याच्या कालावधीतच *नॉट आऊट ११०० सभासद नोंदणीचा विक्रमी पल्लाही गाठला* आणि २५ मार्च २०२३ पर्यंत *हाच टप्पा १५०० पेक्षा जास्त व सर्वात जलद सदस्य नोंदणी* करणारी KCCI ही व्यवसाय क्षेत्रातील एकमेव संस्था ठरली आहे याचा आपणा सर्वांना अभिमानच नाही तर गर्व सुद्धा आहे.

      

     *KCCI ह्या संस्थेची रचना* समाजातील शेवटच्या समाज घटकापर्यंत पोहचुन सामान्यातल्या सामान्य समाज बांधावाला व्यवसायाकडे वळवून त्यांना व्यावसायिक व आर्थिक मार्गदर्शनाबरोबर व्यवसायात सक्षम करून त्यांचे आर्थिक पुनर्वसन करणे हे होय! त्याकरिता KCCI ने काही धेय्य आणि उद्दिष्टे देखील आपल्या समोर ठेवली आहेत ती मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो !


 *▪️ध्येय :-* 

प्राथमिक स्तरावर समाजातील १ लाख आर्थिक सशक्त व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक तयार करणे


▪️ *उद्दिष्टे:-* 

👉व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करणे

👉व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी व असलेल्या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी लागणारे आर्थिक भांडवल कसे उभे करता येईल यासाठी पुढाकार व मार्गदर्शन करणे

👉विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची एक वेगळी मोट बांधून KCCI नावाने विविध क्षेत्रात नवीन ब्रँड तयार करणे

👉व्यावसायिक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा याकरिता कृतिशील राहणे

👉ग्राहक व व्यावसायिक यांची योग्य सांगड घालून मालाची विक्री व खरेदी योग्य दरात करणे

👉भविष्यात KCCI चे व्यापारी संकुल उभारणे

👉विविध क्षेत्रातील खेळाडू कलाकार आणि विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळवून देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दर्जा प्राप्त करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन व आर्थिक नियोजन करून देणे 


ही प्रामुख्याने KCCI ची धेय्य आणि उद्दिष्ट्ये असतील 


     याकरिता आपण सर्वांनी KCCI चा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी संस्थेची सभासद नोंदणी अभियान चालू असून त्याला उदंड प्रतिसादही मिळत आहे आपणही ह्या चळवळीत भाग घेण्यासाठी *₹११०० भरून KCCI चे सभासद व्हा आणि समाजाला व्यावसायिकदृष्ट्या आर्थिक बाजूने सशक्त ,सबळ व बळकट करूया !*


सभासद नोंदणी करण्यासाठी *श्री शांताराम जायगडे यांच्या Gpay No 9324071075 वर खात्री करून payment* करा व माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर *8928959657* त्याचा स्क्रीन शॉट पाठवा जेणेकरून तुमचा रेकॉर्ड माझ्याकडे व KCCI कडे राहील व आपल्याला KCCI च्या व्हॉट्सॲप ग्रूपवर सहभागी करता येईल .

 

                👏 *धन्यवाद !!👏* 


 *|| एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत ||* 

 

*|| जय तुकोबा, जय शिवराय||* *|| जय जिजाऊ, जय शिवराय||* 

 *जय कुणबी👏* 

श्री संतोष आत्माराम शिगवण

▪️ *सह-संपर्क प्रमुख मंडणगड तालुका* 

(मुंबई शहर विभाग)

▪️ *स्वयंभू इंटर प्रायजेस (मुंबई)* 

आमच्याकडे सौर उर्जेवर *(सोलर एनर्जी)* चालणारे प्रॉडक्ट व सोलर होम सिस्टीम उपलब्ध आहेत

ऑर्डरसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:-

📱 *8928959657*

पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*

 *पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*


*१. उत्तम औषध...*

 रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.


*२. पोटात गॅस...*

 होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.


*३. अपचनाच्या सर्व तक्रारींत...*

 बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.


*४. मुलांना दात येताना...* जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.


 *५. वीर्यवृद्धी करते.*


*६. भूक लागत नसेल...* तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.


*७. स्मरणशक्ती...* सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण+ तूप, चाटण द्यावे.


*८. तापामध्ये अंगाची आग होत असेल...*

जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.


*९. मासिक पाळीचे वेळी...* पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी. 


*१०. लघवी कमी होत असेल...*

तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.


*११. उलट्या होत असल्यास...*

अर्धा चमचा बडिशेप चूर्ण, एक चमचा

मोरावळ्यांत टाकून चाटण करणे.


*१२. कोरडा खोकला...*

 असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.


*१३. सूज व वेदना...*

असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.


*१४. बडीशेप सरबत...*

बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.

उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.


*१५. स्वादिष्ट विरेचन चूर्ण...*

बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.

त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.


*१६. बलदायी पेय (Energy Drink )...*

बडिशेप एक चमचा, एका वेलचीचे दाणे व दोन खजुराच्या आठळ्या ( बिया काढाव्यात. ) हे सर्व मिसळून दोन कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सरमधून काढावे म्हणजे बलदायी पेय तयार होते, ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





Salutes, नौजवान के लिये







 गॅस पे फिफ्टी percent सवलत मांगा ने वालो एक नजर edhar भी.

Featured post

Lakshvedhi