कोणीतरी विचारले मला परवा
तुला राम हवा की कृष्ण हवा
मी म्हणाले किती छान विचारला प्रश्न
सांगते , कधी मला राम पाहिजे कधी कृष्ण
रामराया पोटात घालेल माझी चूक
आणि कृष्ण भागवेल माझी भूक
रात्रीची शांत झोप रामरायच देतो
भूक लागली की कृष्ण च आठवतो,
कशाचीही भिती वाटली की मला आठवतो राम
कष्ट झाले , दुखः झाले की कृष्णाकडे च मिळतो आराम,
रक्षण कर सांगते रामरायाला च
सुखी ठेव सांगते मी श्रीकृष्णाला च
बुध्दीचा विवेक रामाशिवय कोणाकडे मागवा,
व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा,
सहनशक्ती देतो माझा रामराया
कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्याया,
रामाला नेहमी शरण जावे वाटते
कृष्णाशी मात्र बोलावेसे भांडवेसे वाटते,
रामाला क्षमा मागावी
कृष्णाला भीक मागावी
रामाला स्मरावे
जय श्री कृष्ण बोलावे
अभ्यास करताना प्रार्थना राजं मणी रामाला
पायावर उभे राहताना विनवणी विष्णूला
एकाचे दोन होताना घ्यावे रामाचे आशीर्वाद
संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद
आरोग्य देणारा राम
सौंदर्य देणारा कृष्ण
राज्य देणारा राम
सेना देणारा कृष्ण
बरोबर चूक सांगतो राम
चांगले वाईट सांगणे कृष्णाचे काम
रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम
कृष्णाकडे मागावे मी मित्रांचे प्रेम
दोघांकडे मागावे तरी काय काय
ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,
म्हणत आहेत, अग आम्ही एकच
तु फसलीस की काय.....,
म्हणाले , कोण हवा हा प्रश्न च नाही
मिळू दोघेही नाहीतर कोणीच नाही,
मी रडले आणि म्हणाले
दोघेही रहा माझ्याबरोबर
परत नाही विचारणार हा प्रश्न
राम का कृष्ण परत विचारले जरी
फक्त म्हणेन जय जय रामकृष्ण हरी
ll जय जय रामकृष्ण हरी ll
🙏🌺🪷🌹🙏
श्रद्धा कारुळकर
No comments:
Post a Comment