Wednesday, 8 March 2023

नारी तू नारायणी

 



वृंदावन

 सहज प्रेम अगर महकेगा

तो मन चंदन हो जायेगा...


नारी *"राधा"* हो जायेगी

नर *"कान्हा"* हो जायेगा...!!


"तन" को चाहे जितना रंग लो

कोई फर्क नही होगा .....


"मन" को जिस दिन रंग लोगे

वो *वृंदावन* हो जायेगा ....!!


꧁‼️ शुभ प्रभात ‼️꧂ *" ॐ श्री श्याम देवाय नमः "*

꧁‼️जय श्री श्याम ‼️꧂

 

*आपको रंगों के त्यौहार होली की हार्दिक शुभकामनाएं.!!*

~🎉🎊~~~🎊🎉

जागतिक* *महिला दिनाच्या

 *सुप्रभात🙏*


  *शक्ती,युक्ती,कीर्ती,*

*नीती,कृती,अन् मती.!*

     *तुझी रुपे किती,*

       *मोजू आता.!*


       *बाईपण थोर,*

     *तुझे तुला कळो.!*

      *न्यूनगंड जळो,*

        *तुझ्यातला.!*


         *जागतिक*

    *महिला दिनाच्या*

         *शुभेच्छा.!*


〽️💕

Tuesday, 7 March 2023

रंगात रंग हे

 


राज्यपालांनी सांगितल्या आपल्या कौशल्य शिक्षणाच्या आठवणी

 राज्यपालांनी सांगितल्या आपल्या कौशल्य शिक्षणाच्या आठवणी.

सांताक्रुझ येथील विकास रात्र विद्यालयाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट


            मुंबई दि. ७ : प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गदत्त काही ना काही प्रतिभा असते. या प्रतिभेला कौशल्य व ज्ञानाची जोड मिळाल्यास मनुष्य कोणत्याही वयात मोठी प्रगती करू शकतो असे सांगून रात्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाही व्यवसायासाठी तरी ज्ञानवर्धनासाठी तरी शिकावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. 


            राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी (दि. ६) मुंबईतील सांताक्रुझ येथील उपनगर शिक्षण मंडळातर्फे संचालित विकास रात्र विद्यालयाला भेट दिली व काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 


            माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी घरोघरी वर्तमानपत्र टाकले, रस्त्यांवरील दिव्याखाली बसून अभ्यास केला आणि पुढे मोठे वैज्ञानिक झाले, असे सांगताना दिवसभर काम करून तसेच कुटुंब चालवून रात्र विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली. 


            प्राप्त केलेले कौशल्य ज्ञान जीवनात कोठेही कामात येते असे सांगताना राज्यपालांनी आपण वयाच्या १५ व्या वर्षांपासून काष्ठशिल्पकला, लाकडावरील कोरीव काम तसेच चित्रकला शिकल्याचे सांगितले. त्याशिवाय मोटार कार दुरुस्ती करावयास देखील आपण शिकून घेतल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.    


            अनेक शाळांमध्ये पालकांची आर्थिक स्थिती पाहून पाल्याला शाळेत प्रवेश दिला जातो याबद्दल खेद व्यक्त करताना गरीब विद्यार्थ्यांसाठी रात्र शाळा चालवून निःशुल्क शिक्षण देत असल्याबद्दल राज्यपालांनी उपनगर शिक्षण मंडळ तसेच संस्थेचे अध्यक्ष व नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांबद्द्ल गौरवोद्गार काढले. 


            यावेळी रात्र शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रहास देशपांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, विकास रात्र विद्यालयाचे प्राचार्य दीपक कोतेकर, शिक्षक, विदयार्थी व आश्रयदाते उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रात्रशाळेत शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पारस इंटरमिजिअरीस लिमिटेड या उद्योग संस्थेच्या वतीने निलेश व जिगर यांनी रात्र शाळेला विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप भेट दिले.  


 


 


 


Maharashtra Governor visits Night School in Santacruz;


 Interacts with students


      Maharashtra Governor Ramesh Bais visited the Vikas Ratra Vidyalaya, a night school run by the Upanagar Shikshan Mandal at Santacruz, Mumbai on Monday (6 Mar) and interacted with the students. The Governor felicitated the meritorious students from the Andheri and Santacruz Night Schools on the occasion. Laptops were presented by Paras Intermediaries Ltd to the School for use by the students.


       Chairman of the Upanagar Shikshan Mandal and former Nagaland Governor P. B. Acharya, Chairman of the Night School Committee Chandrahas Deshpande, Working President Sanjeev Mantri, Principal of Vikas Ratra Vidyala Deepak Kothekar, teachers, students and patrons were present.


000



यंदाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन नवी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 यंदाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन नवी मुंबईत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

            मुंबई, दि.७ :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’ चे आयोजन करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. ८ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत हे प्रदर्शन भरणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे, अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सिडको भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


            ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळावी तसेच व्यवसायवृद्धी व्हावी, असा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे श्री.राऊत यांनी यावेळी सांगितले.


            दरवर्षी मुंबईतील वांद्रे या ठिकाणी भरविण्यात येणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा नवी मुंबईत भरविण्यात येत आहे. यामुळे नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२३ रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.


            महालक्ष्मी सरस प्रदर्शन अत्यंत नावीन्यपूर्ण आणि ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सुमारे ५११ स्टॉल असणार आहेत. यात महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून सुमारे ११९ स्टॉल असणार आहेत. तसेच नाबार्डचे ५० स्टॉल असतील. प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल्सचे भव्य फूड कोर्ट असणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसर, हातमागावर तयार केलेले कपड़े, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू असणार आहेत. याशिवाय महिलांच्या आकर्षणाचे अनेक प्रकारचे दागिणे, लाकडी खेळणी, इतर राज्यातील दुर्मिळ वस्तू या प्रदर्शनात असणार आहेत. नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता यावा याकरिता संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असणार आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी (प्ले एरिया) उभारण्यात आला आहे.


            आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष लक्षात घेऊन स्वतंत्र मिलेट दालन यात असणार आहे. खात्रीचे आणि प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ शहरवासियांना या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.


            राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद अभियान नेहमीच कार्यरत असते. महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करणे तसेच ग्रामीण भागातील महिलांना क्षमता विकास आणि कौशल्यवृद्धीसाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेद अभियानातून प्रशिक्षित महिला स्वयंसिद्ध व्हायला तयार आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय त्या करू लागल्या आहेत. या महिला स्वयंपाकघरातील गरजेच्या पदार्थांपासून ते एलईडी लाईट निर्मितीपर्यंत अनेक प्रकारची उत्पादने आता बाजारात आणत आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या वस्तू, उत्पादने, सहजपणे शहरी नागरिकांपर्यत पोहोचविता येतात. त्यांना हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची चांगली संधी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते.


            ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे या प्रदर्शनाला नियमित स्वरुपात मार्गदर्शन लाभत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला हातभार लागावा यासाठी प्रदर्शनाला भेट देऊन शुद्ध खात्रीच्या वस्तू आणि पदार्थाची खरेदी करावी, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.


00000

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामेत्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामेत्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा


            मुंबई ७ : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.


            शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 


            ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.


            मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.


000


 

Featured post

Lakshvedhi